एमसीव्हीसी फुल फॉर्म MCVC Full Form In Marathi

MCVC Full Form In Marathi आपल्या शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याचश्या शाखा आहेत, कोर्सेस आहेत, अभ्यासक्रम आहेत. आजच्या लेखात आपण शैक्षणिक क्षेत्रातील संबंधित अशाच एका शब्दाबद्दल माहिती बघणार आहोत. आज आपण MCVC म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. त्याचसोबत MCVC full form in Marathi, MCVC meaning in Marathi  आणि  MCVC बद्दल इतर सर्व माहिती आज आपण जाणून घेऊया. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

MCVC Full Form In Marathi

एमसीव्हीसी फुल फॉर्म MCVC Full Form In Marathi

MCVC Full Form In Marathi | MCVC Long Form In Marathi :

MCVC ह्या शब्दाचा Full Form In Marathi म्हणजेच MCVC Long Form In Marathi हा Minimum Competency and Vocational Courses (मिनिमम काँपटेन्सी अँड वोकेशनल कोर्सेस) असा आहे. MCVC शब्दाचा मराठी अर्थ हा किमान क्षमता आणि व्यावसायिक अभ्यासक्रम असा आहे.

MCVC म्हणजे काय? | What Is MCVC? :

MCVC म्हणजे किमान सक्षम व्यावसायिक अभ्यासक्रम होय. नावाप्रमाणेच MCVC असे अभ्यासक्रम आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यास किमान आवश्यक असेल एवढे व्यवसायिक शिक्षण दिले जाते. MCVC यास HSC अभ्यासक्रम म्हणूनदेखील ओळखले जाते.

MCVC अभ्यासक्रम हे असे अभ्यासक्रम म्हणजेच कोर्सेस असतात जे विद्यार्थ्यास 10वी नंतर देखील करता येतात. MCVC अभ्यासक्रम हे अशा प्रकारे बनवलेले असतात की 10वी नंतर ह्या कोर्सेस मध्ये प्रवेश घेता येतो आणि हे कोर्सेस केल्यानंतर नोकरीची आणि व्यवसाय करण्याची संधीदेखील उपलब्ध होते.

MCVC अभ्यासक्रम हा एक खूप चांगला पर्याय समजला जातो. बरेचसे विद्यार्थी 10वी नंतर 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करतात आणीं त्यानंतर एखादी व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. पण फक्त 12वी पर्यंत शिक्षण घेऊन नोकरी मिळणे बऱ्याचदा अवघड असते. म्हणून भारतात सरकारकडून MCVC कोर्सेस घेतले जातात.

MCVC कोर्स हे 12वी करण्यासारखेच आहे. म्हणजेच तुम्ही जर एखादा MCVC कोर्स केलेला असेल तर ते 12वी च्या बरोबर मानले जाते. म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्हाला 12वी शिक्षण पूर्ण असावे अशी अट असेल तिथे तुम्ही जर एखादा MCVC कोर्स केलेला असेल तर तो मान्य असतो.

MCVC व्यवसायिक अभ्यासक्रमातून अनेक व्यवसायिक नोकऱ्या आणि स्वयंरोजगाराच्या साधी उपलब्ध झाल्या आहेत म्हणून MCVC कोर्स हा 12वी साठी अगदी उत्तम पर्याय मानला जातो. MCVC कोर्सेस मुळे रोजगाराच्या संधी लक्षणीयरीत्या वाढतात. 10वी नंतर आयटीआय कोर्सेस, डिप्लोमा कोर्सेस याबरोबरच MCVC कोर्सेस हा एकदम चांगला पर्याय आहे.

MCVC कोर्सेस मध्ये अनेक प्रकारच्या शाखांमधून कोर्स करता येतात. यामध्ये वेवेगल्या शाखांचे पर्याय उपलब्ध आहे त्यातील आवडती शाखा निवडायची संधी विद्यार्थ्यांना MCVC कोर्सेस मध्ये असते.

MCVC कोर्सेस मधील शाखांमध्ये संगणक तंत्रज्ञान (Information Technology), अभियांत्रिकी तंत्रज्ञान (Engineering Technology), Hotel Management, अश्या वेगवेगळ्या शाखा उपलब्ध आहेत. MCVC मधील कोर्सेस मध्ये व्यवसायिक ज्ञान देण्यावर भर दिला जातो. संबंधित शाखेतील व्यवसायिक ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना नोकरिक्षम बनवले जाते.

MCVC कोर्स लगेच नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत पण याचबरोबर उच्च शिक्षण घेण्याची संधी देखील आहे. बरेचसे विद्यार्थी MCVC कोर्स नंतर उच्चशिक्षण घेण्याचा निर्णय घेतात. MCVC कोर्स नंतर त्याच शाखेत उच्चशिक्षण घेतल्याने अजून चांगल्या दर्जाची नोकरी मिळते.
आपण बघितले की MCVC म्हणजे काय. आता आपण MCVC कोर्स मध्ये कोणत्या शाखा येतात हे बघुया.

Branches In MCVC Courses | MCVC कोर्स मधील शाखा :

खालील शाखा ह्या MCVC कोर्स मध्ये उपलब्ध आहेत –

1. Engineering Technology म्हणजेच अभियांत्रिकी तंत्रज्ञान ह्या शाखेतून MCVC कोर्स करता येतात.
2. Commerce Technology म्हणजे वाणिज्य तंत्रज्ञान शाखेचे काही MCVC कोर्स उपलब्ध आहेत.
3. कृषी तंत्रज्ञान म्हणजेच Agriculture Technology ही शाखा देखील MCVC कोर्स अंतर्गत येते.
4. आरोग्य आणि पॅरामेडिकल तंत्रज्ञान म्हणजे Health And Paramedical Technology.
5. Home Science म्हणजे गृहविज्ञान तंत्रज्ञान.

MCVC कोर्स वैशिष्टे | MCVC Course Characteristics :

आपण बघितले की MCVC अभ्यासक्रम म्हणजे काय. आता आपण बघुया की MCVC अभ्यासक्रमाची वैशिष्टे काय आहेत.

  •  MCVC कोर्स हे दिवसेंदिवस खूप लोकप्रिय होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 12वी नसेल करायची आणि डिप्लोमा किंवा आयटीआय करायचा नसेल अश्या विद्यार्थ्यांना MCVC अभ्यासक्रम हा उत्तम पर्याय म्हणून मिळाला आहे.
  •  MCVC अभ्यासक्रम हा 11वी-12वी केल्याप्रमाणे मानला जातो. MCVC कोर्स हा 12वी केल्याप्रमाणे गृहीत धरण्यात येतो तसेच MCVC अभ्यासक्रमाचे प्रमाणीकरण हे 12वी प्रमाणे केले जाते. यामुळे MCVC कोर्स नंतर पुढील उच्चशिक्षण कोणत्याही शाखेतून घेण्याची संधी विद्यार्थ्याकडे उपलब्ध असते.

MCVC अभ्यासक्रम पात्रता | MCVC Course Eligibility :

MCVC कोर्स करण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Duration of MCVC course | MCVC अभ्यासक्रमाचा कालावधी :

MCVC अभ्यासक्रमाचा कालावधी हा 2 वर्षांचा असतो.

MCVC कोर्स ची फी | MCVC Course Fees :

MCVC अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क खूप कमी आहे. बहुतेक संस्थांमध्ये, विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी  2 ते ₹ 5000 पर्यंत पैसे द्यावे लागतील.

या अभ्यासक्रमासाठी बहुतेक महाविद्यालये किंवा संस्था राज्य आणि केंद्र सरकार स्वतः व्यवस्थापित करतात.

अशाप्रकारे आपण आजच्या लेखात MCVC म्हणजे काय, MCVC meaning in Marathi, MCVC full form in Marathi म्हणजेच MCVC long form in Marathi तसेच MCVC course काय असतात याबद्दल सर्व माहिती आपण आज बघितली आहे.

FAQs – Frequently Asked Questions:

MCVC चा full form काय आहे?

MCVC शब्दाचा full form हा Minimum Competency and Vocational Courses असा आहे.

MCVC नंतर मी काय करू शकतो?

MCVC कोर्स नंतर तुम्ही नोकरी करू शकता किंवा उच्चशिक्षण देखील घेऊ शकता. MCVC कोर्स नंतर तुम्ही ज्या शाखेतून कोर्स केला आहे त्याच शाखेत पदवी घेऊ शकता किंवा इतर एखाद्या विषयात पदवी घेऊ शकता. तुम्ही इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, कॉमर्स, विज्ञान, आर्ट्स, अग्रिकल्चर अश्या कुठल्याही शाखेत पदवी घेऊ शकता.

व्यावसायिक अभ्यासक्रम किती काळ आहे?

MCVC कोर्स हे 2 वर्षांचे असतात.

12वी MCVC म्हणजे काय?

MCVC म्हणजे किमान सक्षमता आणि व्यावसायिक अभ्यासक्रम होय. MCVC कोर्स हे 10वी करण्यात येणारे व्यवसायिक कोर्स म्हणजेच अभ्यासक्रम आहेत. कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत 12वी मधील शिक्षण न घेता एखाद्या व्यवसायिक शाखेत शिक्षण घेण्यासाठी MCVC कोर्स करण्यात येतो.

Leave a Comment