युजीसी फुल फॉर्म UGC Full Form In Marathi

UGC Full Form In Marathi महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेकदा आपल्याला UGC हा शब्द कानावर येत असतो. यामध्ये UGC द्वारे घेतल्या जाणाऱ्या NET सारख्या परीक्षांच्या माध्यमातून तरी आपल्याला UGC शब्द ऐकायला येतो. मात्र हे UGC म्हणजे नक्की काय, UGC चा Full Form काय आहे, UGC चा इतिहास काय आहे, UGC द्वारे घेतली जाणारी NET परीक्षा काय आहे आणि UGC विषयी इतर काही महत्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

UGC Full Form In Marathi

युजीसी फुल फॉर्म UGC Full Form In Marathi

UGC Full Form in Marathi । UGC Long Form in Marathi

UGC अंतर्गत देशभरात असलेले अनेक महाविद्यालय चालतात. या सर्व महाविद्यालयांवर कायदेशीर नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्याचे काम हे UGC कडे असते.
UGC शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा University Grant Commission (युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन) असा आहे. UGC शब्दाचा मराठी भाषेत Full Form किंवा अर्थ हा विद्यापीठ अनुदान आयोग असा होतो.

UGC म्हणजे काय? – What is UGC in Marathi?

UGC हा एक आयोग आहे. महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातील UGC चे स्थान हे अत्यंत महत्वाचे आहे. भारताच्या संसदेमध्ये UGC या शासन नियंत्रित आयोगाची स्थापना एका अधिनियमानुसार करण्यात आलेली आहे. म्हणून UGC ला शिक्षण क्षेत्रातील एक कायदेशीर संस्था म्हणून ओळखले जाते.

UGC ही संस्था आधी सांगितल्याप्रणे केंद्र शासनाच्या नियंत्रणाखाली चालते. शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे निर्णय, विद्यापीठांसाठी नियमावली बनविणे आणि आवश्यक त्या सुविधांचा पुरवठा करण्याचे काम हे UGC द्वारे केले जाते. UGC ने कोरोना काळात प्रत्येक विषयाला अगदी व्यवस्थितपणे हाताळले होते. कोरोना संकट काळातील UGC च्या गाईडलाईन्स आपण देखील वाचलेल्या असतील.

UGC चा इतिहास – History of UGC

UGC ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. ब्रिटिश काळात सार्जंट समिती ने दिलेल्या प्रस्तावानुसार एक शैक्षणिक आयोग असावा अशी मागणी करण्यात आली. ही मागणी 1944 नंतर 1945 मध्ये अनेक समित्यांची स्थापना करून काहीशी पूर्ण करण्यात आली मात्र तेव्हा असलेला शिक्षण आयोग हा फक्त दिल्ली , वाराणसी आणि अलिगढ या काही विद्यापीठांसाठी बनविण्यात आला होता.

पुढे जाऊन यामध्ये बदल करण्यात आला व 1947 रोजी या शैक्षणिक आयोगाला सर्व भारतातील विद्यापीठाचे नियंत्रण देण्यात आले. हा सर्व होता स्वातंत्र्यपूर्व इतिहास, आता जाणून घेऊयात UGC हे नाव कसे आले व त्यामागे कोणत्या राजकीय व्यक्तीचा हात होता. 1948 रोजी डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली.

त्याचे अध्यक्ष हे डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण हे होते. त्यांच्या केलेल्या शिफारशी अनुसार विद्यापीठ शिक्षण आयोगाचे नाव बदलून विद्यापीठ अनुदान आयोग असे करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोग या संस्थेची स्थापना 28 डिसेंबर 1953 रोजी शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम यांच्या हस्ते करण्यात आली. त्यामुळे 28 डिसेंबर हा दिवस UGC स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र अजूनही या संस्थेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला नव्हता. 1956 मधील कायद्यानुसार UGC या संस्थेला संविधानिक दर्जा देण्यात आला.

UGC चे काम कसे चालते?

UGC ही संपूर्ण देशातील विद्यापीठांना सांभाळण्याचे काम करते असे म्हणायला हरकत नाही. देशातील प्रत्येक विद्यापीठ हे UGC अंतर्गत चालते. जेव्हा कधी एखादे नवीन विद्यापीठ सुरू करायचे असते तेव्हा त्याला UGC द्वारे मान्यता घेणे गरजेचे असते.

संपूर्ण देशात शिक्षणात गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी आणि समानता राखण्यासाठी UGC सदैव कार्यरत असते आणि त्याबाबतीत सरकारला सल्ला देण्याचे काम UGC करते. UGC फक्त देशात कार्यरत आहे असे नाही तर जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ इच्छित असतात त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती पुरविण्याचे कार्य UGC करते.

UGC चे काम हे राष्ट्रीय पात्रता चाचणी म्हणजेच NET परीक्षा घेणे असते. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून जर नोकरी करायची असेल तर ही NET परीक्षा पात्र होणे गरजेचे असते. शिक्षकांसाठी पात्रता निकष, परीक्षा, पगार आणि इतर धोरण राबविण्याचे काम UGC चे आहे.

UGC ची कार्ये – Functions of UGC

शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा आणि पारदर्शकता आणण्यासाठी UGC सदैव कार्य करत असते. UGC संलग्नित येणाऱ्या सर्व संस्थांवर म्हणजेच विद्यापीठे आणि महाविद्यालये यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम UGC करत असते. विद्यापीठाच्या शिक्षण, परीक्षा आणि संशोधन या तीनही बाबींमध्ये लक्ष ठेवण्याचे काम हे UGC करते. अनेकदा बदलत्या परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांच्या हितासाठी काही नियम बदलावे देखील लागतात, त्यासाठी UGC कार्यरत असते.

नवीन नियमावली बनवून त्यांची अंमलबजावणी करण्याचे महत्वाचे काम UGC चे आहे. UGC हा आयोग शक्यतो उच्च शिक्षणासाठी कार्यरत आहे. त्यामुळे उच्च शिक्षणतील बदल, सुधारणा आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य UGC चे असते. शिक्षण पद्धतीत वेळेनुरूप बदल करून आणणे गरजेचे असते. हे बदल समजून घेऊन त्यांचा अवलंब करणे आणि त्यासाठी काही नवीन योजना राबवावी लागत असेल तर त्या संदर्भात सरकार कडे तरतूद करणे.

संशोधन करण्यासाठी शिक्षक आणि विद्यापीठ यांना अनुदान देण्याचे कार्य UGC करते. विद्यापीठाला सुधारणेसाठी आणि नियोजनासाठी निधी उपलब्ध करून देणे आणि इतरही मदत करणे हे कार्य UGC करते.

UGC NET परीक्षा

NET म्हणजेच National Eligibility Test ही UGC द्वारे घेतली जाणारी सर्वात महत्वाची परीक्षा आहे. एखाद्याला जर महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर व्हायचे असेल तर त्याला ही परीक्षा पात्र करणे हा UGC चा नवीन निकष आहे.

शिक्षण क्षेत्रात येणारा प्रत्येक प्राध्यापक हा तेव्हडा शिक्षित आणि अभ्यासू असावा व त्याचा फायदा मुलांना व्हावा यासाठी ही NET परीक्षा एक शिक्षण क्षेत्रात सुधारणा आणणारी ठरली आहे.

FAQ

UGC संलग्नित महाविद्यालय किंवा विद्यापीठ नसेल तर काय होते?

जर तुमचे विद्यापीठ आणि महाविद्यालय UGC संलग्नित नसेल तर तुमचे शिक्षण हे बाहेर कुठेही गेले तर शून्य असते. तुमच्या पदवीला काही किंमत नसते.

UGC अंतर्गत घेतलेली पदवी परदेशात ग्राह्य असते का?

हो, UGC संलग्नित कोणत्याही विद्यापीठातून घेतलेली पदवी ही परदेशात देखील ग्राह्य धरली जाते.

NAAC आणि UGC मध्ये काय संबंध आहे?

NAAC म्हणजेच National Assessment and Accreditation Council ही संस्था UGC ने स्थापन केलेली आहे. NAAC विद्यालय आणि विद्यापीठ यांना त्यांच्या कार्यानुसार ग्रेड देत असते.

UGC NET परीक्षा कोणासाठी असते?

UGC NET ही परीक्षा पदवी शिक्षण पूर्ण होऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांसाठी असते ज्यांना महाविद्यालयात प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) म्हणून नोकरी करायची आहे.

Leave a Comment