एनओसी फुल फॉर्म NOC Full Form In Marathi

NOC Full Form In Marathi तुम्ही काही कागदपत्र करताना किंवा एखादी सरकारी काम करताना NOC हा शब्द ऐकला असेल. “NOC द्यावी लागेल” असं कुठेतरी ऐकलं असेल. आजच्या लेखात आपण NOC म्हणजे काय, त्याचा काय उपयोग असतो, NOC full form, NOC long form याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर चला बघुया की NOC म्हणजे काय असते.

NOC Full Form In Marathi

एनओसी फुल फॉर्म NOC Full Form In Marathi

NOC full form in Marathi | NOC long form in Marathi

NOC शब्दाचा long form म्हणजेच NOC full form हा No Objection Certificate ( नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ) असा होतो. यास शुद्घ मराठी ना हरकत प्रमाणपत्र असे म्हणतात.

NOC म्हणजे काय?

NOC म्हणजे No Objection Certificate. मराठीत याचा अर्थ ना हरकत प्रमाणपत्र असा होतो. ना हरकत प्रमाणपत्र ( NOC) हे एक कायदेशीर प्रमाणपत्र आहे. हे असे प्रमाणपत्र आहे जे तुमच्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास आणि इत्यादी बाबदित कुठलीही हरकत नाही यासाठी दिलेले जाते. NOC हे एखाद्या गोष्टीसाठी हरकत नाही यासाठी बनवले जाते. जी व्यक्ती NOC देते त्या व्यक्तीची ज्या कामासाठी NOC दिले आहे त्या कामास काही हरकत नाही या उद्देशाने NOC दिले जाते.

समजा तुम्हाला एखाद्या संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र हवे आहे. तर तुम्ही त्या व्यक्ती किंवा संस्थेला तशी विनंती करू शकता. NOC प्रमाणपत्र तुम्हाला ज्या कामासाठी किंवा प्रकल्पासाठी म्हणजेच ज्या संबंधित NOC हवे आहे त्या विषयाचा पुर्ण उल्लेख असावा. त्यात सविस्तर लिहिलेले असावे की या कामासाठी किंवा प्रकल्पासाठी माझी कुठलीही हरकत नसावी. हे सर्व जी व्यक्ती NOC देणार आहे म्हणजे जीच्याकडून तुम्हाला NOC पाहिजे आहे व्यक्तीच्या नावे असते. आणि ज्या व्यक्तीला NOC हवे आहे त्या व्यक्तीचा उल्लेखही प्रमाणपत्र हवा असतो.

NOC काय आहे? | What is NOC?

NOC काय आहे हे आपण उदाहरणातून समजून घेऊया.

उदाहरणार्थ समजा तुम्ही एक गाडी खरेदी केली आणि ती मोटरसायकल तुम्ही emi वर घेतली. (EMI चा अर्थ महिन्याला ठराविक रक्कम देणे. गाडीची जी काही किंमत असेल ती पूर्ण होईपर्यंत ही रक्कम द्यावी लागते.) आता समजा तुम्ही गाडीची पूर्ण रक्कम भरली आहे आणि तुमच्यावर कुठ्ल्याही प्रकारचे कर्ज किंवा हप्ता बाकी नाही. मग अशावेळी तुम्ही ज्या ठिकाणी किंवा ज्या व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून गाडी घेतली त्यांच्याकडून NOC घेऊ शकता.

यावेळेला तुम्ही NOC या कारणास्तव घेणार की तुमच्या गाडीची पूर्ण रक्कम तुम्ही भरली आहे त्यामुळे ती गाडी पूर्णपणे तुमची असण्यास विकृदरची काहीही हरकत नाही आणि विक्रेता त्यावर कुठ्ल्याही प्रकारचा हक्क सांगू शकत नाही किंवा त्याचा गाडीवर कुठ्ल्याही प्रकारचा हक्क शिल्लक नाही. अशापवेळी तुम्ही NOC घेऊ शकता.

NOC बनवण्याचे उद्दिष्ट काय आहे? | What is the purpose of NOC?

NOC हे एखाद्या गोष्टीसाठी हरकत नाही यासाठी बनवले जाते. समजा तूही एखादे काम करत आहात, ते कोणतेही असू शकते, आणि आणखी एखादी व्यक्ती आहे किंवा सस्था आहे जिचं त्या कामाशी प्रत्यक्ष संबंध येतो. अशावेळी तुम्ही करत असलेल्या कामास त्या व्यक्तीची कुठ्ल्याही प्रकारची हरकत नाही याचा पुरावा म्हणुन NOC घेतले जाते.

NOC हा एक पुरावा आहे. गरज पडल्यास तुम्ही हा न्यायालयात पुरावा म्हणून दाखल करू शकता. NOC शाश्वती देते की तुम्ही जे काही काम करत आहे त्यास समोरच्याची कुठलीही हरकत नाही किंवा तुम्हाला समोरच्याच्या कार्याची कुठलीही हरकत नाही.

NOC कधी आवश्यक आहे?

तुम्हाला समजलेच असेल की NOC काय आहे. आता आपण NOC केव्हा आवश्यक असते हे जाणून घेऊया.
खालील बाबींमध्ये NOC ची आवश्यकता निदान होऊ शकते :

 • कुठल्याही प्रकारचे वाहन खरेदी करणे.
 • तुमच्या व्यवसायात नवीन गोष्टी आणणे, नवीन गोष्टींची सुरुवात करणे अशावेळी NOC आवश्यक आहे.
 • तुमच्या व्यवसायात भागीदार जोडणे अशावेळी देखील NOC आवश्यक आहे.
 • व्यवसायातील किंवा इतर काही कामातील नवीन शाखा सुरू करताना NOC आवश्यकच आहे.
  अशा आणि अनेक कामांत NOC आवश्यक आहे. हे एक महत्वाचे कागदपत्र आहे आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

NOC कसे काढावे? | How to apply for NOC?

वेगवेगळ्या ठिकाणी आई वेगवेगळ्या विषयांत लागणारे NOC साठी वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करावा लागतो. आपण वर बघितले की लोन्स (कर्ज) आणि वाहन (vehicle) साठी NOC काय असते. आताच्या भागात NOC कसे मिळवायचे किंवा काढायचे हे बघुया.

Vehicle NOC | वाहन NOC ( ना हरकत प्रमाणपत्र)

जेव्हा तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन न्यायचे असेल किंवा विक्री करायची असेल तेव्हा NOC आवश्यक असते. वाहनासाठी NOC कसे काढावे हे बघुया.

 • सर्वप्रथम NOC अर्ज जमा करण्यासाठी वाहन मालकास RTO अधिकाऱ्याला स्वतः भेटावे लागते.
 • CMW 28 फॉर्म भरावा लागतो आणि तो तिथे स्वतः जाऊन जमा करावा लागतो. जमा करतेवेळी आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासहित जमा करावी लागतात.
 • NOC अर्ज भरण्यासाठी 100 रुपये शुल्क आहे जे भरावे लागते.
 • एकदा अर्ज जमा केल्यावर RTO कार्यालयाकडून तुमचे वाहन पोलिसांकडून जमा केले जाईल आणि कुठ्ल्याही प्रकारच्या गुन्ह्यात त्याची नोंद आहे का याची तपासणी केली जाईल.
 • जर वाहनावर कुठ्ल्याही प्रकारची थकबाकी आणि गुन्हे नोंदणी नसेल तर clearance म्हणजेच मंजुरी दिली जाते आणि त्यानंतर NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र हे जरी केले जाते.
 • त्यानंतर कामाच्या 3 दिवसांच्या आत NOC प्रमाणपत्र हातात दिले जाते.

FAQs ( Frequently Asked Questions)

NOC हे कायदेशीर कागदपत्र आहे का?

होय. NOC हे कायदेशीर कागदपत्र आहे.

NOC कधी आवश्यक असते?

मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी, शालेय अभ्यासक्रम सोडण्यासाठी, न्यायालयीन कामासाठी किंवा हेतूसाठी, व्हिसा साठी, घरमालकडून, भाडेकरू कडून, बँकेतील कामकाजासाठी, अशा अनेक बब्दित NOC ची आवश्यकता येऊ शकते.

NOCची वैधता काय आहे?

NOC मिळाल्यानंतर ते फक्त सहा महिन्यांसाठी वैध असते.

NOC मिळवणे महत्वाचे का आहे?

NOC हे मुख्यतः कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणी येऊ नये म्हणून वापरले जाते आणि काही अडचणी आल्या तर पुरावा म्हणून महत्वाचे ठरते.

1 thought on “एनओसी फुल फॉर्म NOC Full Form In Marathi”

 1. माझ्या आईचा रुम विकायचा आहे त्या मध्ये ही N O C चा प्रोब्लम आहे तर आम्ही काय करायचे

Leave a Comment