आरआयपी फुल फॉर्म RIP Full Form In Marathi

RIP Full Form In Marathi एखाद्याचे निधन झाल्यानंतर आपण बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारातील लोकांचे स्टेट्स बघतो त्यात RIP हा शब्द लिहिलेला असतो. आपल्याला RIP हे वाचून इतके कळते की कोणाचे तरी निधन झाले आहे आणि त्याला आदरांजली म्हणून RIP लिहिलेले आहे, मात्र नक्की हे RIP काय आहे? याविषयी आपल्याला माहिती नसते.

RIP Full Form In Marathi

आरआयपी फुल फॉर्म RIP Full Form In Marathi

आज आपण RIP म्हणजे काय, RIP Full Form in Marathi, RIP हा शब्द कधी पासून वापरण्यात आला आहे, RIP शब्दाचा इतिहास काय आहे, आपण दररोज बघतो त्याशिवाय RIP चे काही Full Form आहेत त्याविषयी देखील जाणून घेऊयात.

RIP म्हणजे काय? (What Is RIP In Marathi)

आपण मराठी गर्वाने जरी म्हणत असलो तरी देखील आपल्या दैनंदिन जीवनात आपण RIP सारखे अनेक इंग्रजी शब्द सहज वापरून जातो. हा शब्द पूर्णपणे इंग्रजी देखील नसून इसाई धर्माशी याचा संबंध आहे. ईसाई धर्माने देखील लॅटिन भाषेचा आधार घेत हा शब्द वापरात आणलेला आहे.

आपल्याकडे आपण एखाद्याला पुरल्यानंतर देखील त्यावर बसविलेल्या दगडावर आदरांजली देणारे शब्द लिहितो. याच प्रमाणे आपण पाश्चिमात्य संस्कृतीकडे बघितले तर त्यांच्याकडे एखाद्या व्यक्तीच्या निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीला पुरले जाते. आपल्याकडे काही धर्मांमध्येचे पुरण्याची प्रथा आहे.

जेव्हा पाश्चिमात्य संस्कृतीत जमिनीत ते शरीर टाकले जाते त्यानंतर त्याच्या जागेवर एक दगड उभा केला जातक किंवा भिंत बांधली जाते. या भिंतीवर किंवा या दगडावर RIP हे मोठ्या अक्षरात लिहिलेले असते. आपल्याकडे होते त्याच प्रमाणे आदरांजली वाहण्याची ही एक वेगळी पद्धत आहे.

शब्द जरी वेगळे असले तरी देखील त्यामागील भावना या मात्र सारख्याच आहेत. मराठी भाषेत एखाद्याच्या मृत्यूनंतर सहानुभूती दाखविण्यासाठी आपण देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो यासारखे जे शब्द वापरतात त्याच प्रमाणे इंग्रजी भाषेत RIP बोलले जाते.

RIP Full Form in Marathi । RIP Long Form in Marathi

आपण शब्द वापरतो मात्र आपल्याला त्याचा अर्थ मात्र माहीत नसतो. या प्रकारात RIP हा देखील शब्द आहे.अनेकदा आपण एखाद्याला सांत्वन देण्यासाठी स्टेट्स देखील ठेवतो मात्र आपल्याला त्यातील RIP म्हणजे आदरांजली देतोय हेच माहिती असते.

RIP हा पाश्चिमात्य शब्द असून याचा इंग्रजी भाषेत Full Form हा Rest in Peace असा असतो. RIP शब्दाचा मराठी भाषेत अर्थ हा शांततेत विश्रांती घ्या असा होतो. REST म्हणजे विश्रांती आणि PEACE म्हणजे शांतता होय.

RIP शब्दाचा इतिहास (History Of RIP Word)

RIP या शब्दाची खरी सुरुवात आणि उत्पत्ती ही लॅटिन भाषेत झालेली आहे. Requiescat in Peace हा लॅटिन शब्द आहे. या लॅटिन शब्दाचा अर्थ देखील शांततेत विश्रांती घ्या असाच होतो. लॅटिन शब्दापासून मग पुढे Rest in Peace हा शब्द इंग्रजी भाषेत आला.

जवळपास 16 व्या शतकाच्या मध्यावर हा RIP शब्द पाश्चिमात्य देशांमध्ये वापरण्यात आला होता. याचा शोध घेत असताना त्या काळातील मृत व्यक्तीच्या कबरीवर असलेल्या दगडावर RIP लिहिलेलं आढळून आले आहे.

भारतात देखील RIP शब्द वापरला जातो मात्र हा शब्द इसाई धर्मात जास्त वापरला जातो. हिंदू धर्मात हा शब्द वापरणे चुकीचे आहे असे देखील म्हणाले जाते. मात्र आपल्या देशात एकोप्याचे प्रदर्शन हे सतत होत असते आणि त्यामुळे RIP हा शब्द आज सर्वत्र वापरला जातो आहे.

ईसाई धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो त्यानंतर त्याची कबर बांधली जाते. या कबरीवर एक भिंत किंवा दगड लावला जातो आणि त्यावर RIP लिहिण्याची प्रथा आहे. मात्र भारतात आजही RIP ऐवजी आपल्या आपल्या धर्माचे आदरांजली देणारे वाक्य लिहिले जाते.

ईसाई म्हणजेच ख्रिश्चन धर्म होय. या धर्मात कबरीला Grave किंवा Mausoleum असे म्हणतात. Grave वरच RIP लिहिण्याची प्रथा आहे. Grave वर त्या व्यक्तीचे नाव आणि मृत्यू दिनांक देखील लिहिलेला असतो.

RIP या शब्दाला पर्यायी म्हणून वापरले जाणारे इतर शब्द

मराठी भाषेत RIP ऐवजी अनेक वेगळे शब्द वापरले जातात. त्याविषयी खाली बघुयात,

  • ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो
  • ईश्वर त्यांना स्वर्गात स्थान देवो
  • ईश्वर त्यांना स्वतःच्या चरणी जागा देवो
  • राम नाम सत्य है
  • ओम शांती
  • भावपूर्ण श्रद्धांजली
  • देवा त्याला मोक्ष प्राप्त करू दे

RIP चे इतर काही FULL FORMS

आपण RIP चा FULL FORM जरी आता बघितला असला तरी प्रत्येक वेगळ्या क्षेत्रात RIP चे इतर काही फुल फॉर्म आहेत. प्रोटोकॉलच्या क्षेत्रात RIP म्हणजे Routing Information Protocol हा फुल फॉर्म आहे. इमेज प्रोसेसिंग क्षेत्रात RIP चा फुल फॉर्म हा Raster Image Processing असा आहे. याशिवाय Refractive Index Profile आणि Regulation of Investigatory Powers हे काही इतर RIP चे फुल फॉर्म आहेत.

RIP या शब्दाचा इंग्रजी भाषेत FULL FORM, RIP म्हणजे काय, RIP Full Form in Marathi, RIP शब्दाचा इतिहास, RIP शब्दाला पर्यायी शब्द, RIP चे Rest in Peace शिवाय इतर काही फुल फॉर्म याविषयी आज आपण जाणून घेतले.

FAQ’s

RIP चे फुल फॉर्म काय आहेत?

RIP चे फुल फॉर्म "रेस्ट इन पीस" आहे. ज्याचा अर्थ "आत्म्याची शांती" असा होतो.

RIP म्हणजे काय?

RIP म्हणजे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना करणे!

Leave a Comment