सीपीआर फुल फॉर्म CPR Full Form In Marathi

CPR Full Form In Marathi आपण जर कोरोना ने बाधित झाला असाल तर ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूची कमतरता काय असते हे आपल्याला नक्कीच जाणवलं असेल. अनेकदा आपल्यासमोर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यास किंवा एखादा व्यक्ती आपल्यासमोर जर पाण्यात बुडाला तर त्याला बाहेर काढून त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी एक टेक्निक वापरता येते जेणेकरून त्याचा जीव देखील वाचू शकतो.

CPR Full Form In Marathi

सीपीआर फुल फॉर्म CPR Full Form In Marathi

ही मेडिकल टेक्निक म्हणजेच CPR होय. आज आपण CPR Full Form in Marathi, CPR म्हणजे काय, CPR कसा देतात, CPR दिल्याने काय होते आणि CPR विषयी इतर माहिती जाणून घेणार आहोत.

CPR Full Form in Marathi – CPR Long Form in Marathi

CPR शब्दाचा इंग्रजी भाषेत full form हा Cardio- Pulmonary Resuscitation हा आहे. CPR चा मराठी मध्ये Full Form हा कारडीओ पल्मोनरी रिससिटेशन असा आहे. मराठी मध्ये CPR चा शब्दशः अर्थ हा हृदय आणि फुफुस यांच्या संबंधित पुनरुत्थान करण्याचे तंत्र म्हणजेच CPR होय.

एखाद्या कठीण काळात एखाद्या व्यक्तीला पुन्हा जीवनदान देण्यासाठी हे CPR तंत्र असून हे जर प्रत्येकाने शिकून घेतले तर आपण कमीत कमी एका व्यक्तीचा जीव वाचवून त्याला अजून जास्त आयुष्य नक्की देऊ शकतो.

CPR म्हणजे काय? What is CPR in Marathi?

CPR ही एखाद्याला आपत्कालीन स्थितीत जसे की हार्ट अटॅक आल्यास किंवा श्वास अडकल्यास जीवनदान देण्यासाठी उपयोगी येणारे तंत्र आहे. एखाद्या वेळी जर आपल्यासमोर एखाद्याचा जीव जातो आहे तर त्याच्यावर काहीही उपाय न करता बसण्यापेक्षा थोडीसे प्रयत्न करुन जर त्याचा जीव वाचत असेल तर आपल्याला CPR शिकून घेण्यास काही हरकत नाही.

आपण चित्रपटात पाहिले असेल की एखादी अभिनेत्री पाण्यात बुडते आणि नंतर त्या चित्रपटातील नायक त्या अभिनेत्रींच्या छातीवर दबाव टाकतो आणि नंतर तिला तोंडातुन श्वास देतो. आणखी एक उदाहरण म्हणजे एखादा नायक त्या चित्रपटात एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला असेल तर त्याच्या छातीवर दोन्ही हातांनी दाब देत असतो आणि अचानक तो व्यक्ती जिवंत होतो. हे दोन्ही उदाहरण CPR ची आहेत. CPR हे तंत्र छाती वर दबाव देऊन फुफुस सक्रिय करणे आणि तोंडातून आपल्या तोंडाच्या माध्यमातून श्वास देऊन जीव वाचविण्याचे एक वैद्यकीय तंत्र आहे.

CPR ने त्या व्यक्तीला लगेच जाग येईल असे नाही मात्र कमीत कमी त्याला पुढील उपचार मिळे पर्यंत त्यांच्या शरीरातील रक्तपुरवठा मुख्यतः मेंदूला होणारा रक्तप्रवाह आणि श्वासोच्छ्वास काही प्रमाणात सुरळीत ठेवत असतो.

CPR का दिला जातो?- Why give CPR?

एखाद्यावेळी अपघात झाला तर आपल्याला त्या आपत्कालीन स्थितीत एखाद्या व्यक्तीला CPR द्यावा लागू शकतो. हार्ट अटॅक आणि कार्डिअक अरेस्ट या दोन वेगळ्या आपत्कालीन स्थिती आहेत. मात्र दोन्ही स्थितीत व्यक्तीचा श्वास कोंडला जातो म्हणजे व्यक्तीला श्वास घेताच येत नसतो. मेडिकल टर्म नुसार बघायला गेलं तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला जितका लवकर कृत्रिम प्राणवायू मिळेल तितके चांगले असते.

मात्र हॉस्पिटल आणि आपत्कालीन परिस्थिती यामध्ये अंतर जास्त असते. ते अंतर आणि त्या व्यक्तीचा जीव यातील अंतर जर आपल्याला कमी करायचे असेल CPR हे तंत्र वापरता येते. मेडिकल क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती, डॉक्टर, नर्स, लाईफगार्ड, पोलीस, आर्मी जवान यांना CPR या तंत्राचे प्रशिक्षण दिले जाते. आपण देखील CPR प्रशिक्षण घ्यायला हवे.

CPR कधी दिला जातो? -When can we give CPR?

  1. एखाद्या व्यक्तीला जर विजेचा शॉक लागत असेल तर त्याचा श्वास अडकतो. तेव्हा CPR देऊन आपण त्या व्यक्तीला कदाचित वाचवू शकतो.
  2. लहान मुलांमध्ये घशात कधी कधी वस्तू अडकतात. अनेकदा कॉइन, झाकण लहान मुले गिळतात, जेवताना कधी कधी अन्न अडकल्यानंतर CPR देता येतो.
  3. गोळ्यांचा आकार मोठा असेल तर ते देखील अडकण्याची शक्यता असते. तेव्हा CPR देता येतो.
  4. विषबाधा झाल्यानंतर ते विष बाहेर काढण्यासाठी CPR देतात.
  5. पाण्यात जर कोणी बुडत असेल तर त्याला वर काढल्यानंतर छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढल्यानंतर तोंडातून श्वास देऊन CPR दिला जातो.
  6. SIDS हा लहान मुलांमध्ये प्रकर्षाने जाणवणारा आजार आहे यामध्ये खेळत असणारे लहान मूल अचानक हालचाल करणे बंद करते.
  7. अपघातात जास्त रक्त वाहून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.
  8. एखाद्याच्या डोक्याला मार लागून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.

याशिवाय इतरही अनेक परिस्थिती आहेत…

CPR द्वारे होणारे वैज्ञानिक बदल

आपल्या शरीराची रचना अशी केलेली आहे की प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. जे एखाद्याचा आपत्कालीन स्थितीत किंवा अपघातात जर श्वासोच्छ्वास बंद झाला तर त्याला ऑक्सिजन मिळणार नाही आणि परिणामतः त्याच्या शरीरातील पेशी मृत व्हायला लागतील. पेशी मृत व्हायला सुरुवात ही मेंदूला कार्य करण्यापासून रोखते आणि मेंदूवर याचा सर्वात आधी परिणाम जाणवतो.

त्यामुळे जर आपण CPR देत राहिलो तर कमीत कमी काही कालावधी साठी तरी त्या व्यक्तीच्या शरीरातील पेशी कार्यरत राहतील आणि तो व्यक्ती कदाचित त्या काळातून सावरून पुन्हा उभा देखील राहू शकतो.

CPR चे इतर काही Full Form

  • Computer Peripheral Repair
  • Crosby, Pevar and Raymond
  • Condominium Property Regime
  • Catch, Photograph and Release
  • Clubs for Prevention and Recovery
  • Calibrated Peer Review
  • Code of Professional Responsibility
  • Cost Performance Report
  • Coffee Provides Resuscitation
  • Computerised Patients Record
  • Continuous Plankton Recorder
  • Canadian Pacific Railways
  • Civil Procedure Rules
  • Colorado Public Radio

CPR वापरून कदाचित एखाद्याचा जीव देखील वाचवता येत असेल मात्र जर तुम्हाला त्याचे प्रशिक्षण नसेल तर कृपया कधी तो प्रयत्न देखील करू नका. एखादा व्यक्ती खोकत असेल तर त्याला कधीही CPR देऊ नये ही छोटिशी गोष्ट आपण देखील लक्षात घ्यायला हवी.

FAQ (Frequently Asked Questions)

CPR म्हणजे काय?

CPR हे एक वैज्ञानिक तंत्र असून जेवहा एखाद्या व्यक्तीचा श्वास अडकत असेल तेव्हा त्याला काही काळासाठी प्राण देण्याचे हे तंत्र आहे. CPR म्हणजे कारडीओ पल्मोनरी रिससिटेशन होय.

CPR मध्ये CAB म्हणजे काय असते?

CPR तंत्रात CAB चा अर्थ हा C म्हणजे Circulations/Compression, A म्हणजे Airways आणि B म्हणजे Breathing होय.

Mouth to Mouth Breathing वर पर्यायी CPR तंत्र कोणते आहे?

अनकेदा आपल्याला अपरिचित व्यक्तीला तोंडाने श्वास देणे वेगळे वाटू शकते आणि त्यातून स्वतःच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता असते त्यामुळे हॅन्ड ओन्ली सीपीआर हे तंत्र अमेरिकन हार्ट असोसिएशनने पुढे आणले आहे.

लहान मुलांना सीपीआर द्यावा का?

हो, लहान मुलांना देखील CPR देता येतो. तज्ज्ञांच्या मतानुसार लहान मुलांना CPR देता येतो मात्र त्यावेळी जास्त काळजी घ्यावी लागते. कारण छातीवर आपण देत असलेला दाब हा जास्त झाल्यास त्याच्या शरीराला आंतरिक इजा होऊ शकतात.

Leave a Comment