एसडीएम फुल फॉर्म SDM Full Form In Marathi

SDM Full Form In Marathi तुम्ही सरकारी कार्यालयात गेल्यावर किंवा काही सरकारी काम करताना SDM हा शब्द ऐकला असेल किंवा “ती अमुक व्यक्ती SDM आहे” अस कौतुकास्पद कुणाकडून तरी ऐकलं असेल. आज आपण याच SDM शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत. SDM म्हणजे काय, SDM full form in Marathi आणि SDM बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

SDM Full Form In Marathi

एसडीएम फुल फॉर्म SDM Full Form In Marathi

SDM full form in Marathi | SDM long form in Marathi

SDM या शब्दाचा full form हा सब Divisional Megistrate (सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट) असा आहे. Sub-Divisional Megistrate (SDM) यास मराठीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी असे म्हणतात.

SDM म्हणजे काय? | SDM meaning in Marathi

SDM चे म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी होय. प्रत्येक जिल्ह्याचे एकत्रितपणे काम ना बघता काही उपविभाग केले जातात. हया उभविभगांचे नियत्रंण करणे आणि सुव्यवस्था सांभाळण्याचे काम हे SDM कडे असते. SDM अधिकाऱ्यास SDM जिल्हाधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी हया दोन्ही अधिकाऱ्यांचे अधिकार असतात.
SDMचे त्याच्या उपविभागाच्या तहसीलदारांवर पूर्ण नियंत्रण असते आणि ते त्यांच्या उपविभागाचे जिल्हा अधिकारी आणि तहसीलदार या दोघांमधील दुव्याचे काम करतात.

SDM चे काम काय असते? | What does SDM do?

SDM ची कर्तव्ये किंवा भूमिका हि खालीलप्रमाणे आहे :

 • ग्रामीण जनतेच्या विकासासाठी आणि त्यांच्या अभिवृद्धीसाठी सरकारने सुरू केलेल्या विविध ग्रामीण विकास योजना आणि आणि ग्रामीण विकास करते यांची अंमलबजावणी करण्यात SDM महत्वाची भूमिका पार पाडते. या सर्व योजना योजना ग्रामीण जनेतपर्यंत पोहाचाव्या याची खबरदारी SDM घेतो.
 • उपविभागातील काम सुव्यास्थित्पणे आणि सुरळीतपणे चालावे यासाठी स्थानिक जनता आणि उपविभागातील इतर अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखण्याचे काम SDM अधिकारी हाताळतो.
 • जमीन महसूल गोळा करणे.
 • निवडणुकीवर आधारित काम हाताळणे.
 • ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण आणि जारी करणे.
 • नूतनीकरण आणि शस्त्र परवाना जारी करणे.
 • जात प्रमाणपत्र , अधिवास प्रमाणपत्र जारी करणे
 • उपविभागातील पोलिसांशी सहकार्य आणि सामंजस्य सुनिश्चित करणे.
 • उपविभागात राहणाऱ्या विविध वर्ग आणि समाजातील लोकांमधील संबंधांवर नियंत्रण ठेवणे.
 • उपविभागात विशेषत: शुभ सणांच्या आणि उत्सवांच्या वेळी शांतता आणि सुव्यवस्था ठेवणे आणि कुठ्ल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थितीत आल्यास आवश्यक ती कार्यवाही किंवा उपाययोजना करणे.
 • गरज पडल्यास तिथे जिल्हा दंडाधिकार्‍यांना शिफारसी आणि सूचना देण्याचे काम SDM चे असते.
 • पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याशी संबंधित असलेले कोणतेही रेकॉर्ड रजिस्टर्स पाहण्याचे, त्याचे विश्लेषण करण्याचे आणि त्याबद्दल विचारण्याचा अधिकार SDM कडे असतों.
 • एखादया पोलिस विभागात गोंधळ दूर करण्यासाठी आणि परिस्थितीचे स्पष्टीकरण घेण्यासाठी तेथील पोलीस अधिकाऱ्याला स्पष्टीकरण घेण्यासाठी बोलावू शकतो.
 • उपविभागातील शांतता, सुव्यवस्था बिघडेल अश्या कुठ्ल्याही प्रकारच्या आक्षेपार्ह, अस्वीकार्य घटकांना दूर करण्याचा अधिकार SDM कडे असतो.
 • विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात SDM अधिकाऱ्यास निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या SDM अधिकाऱ्यास निवडणुकीवेळी सर्व सुव्यवस्था आणि सुरक्षेचे नियत्रंण ठेवावे लागले. निवडणूक योग्य पद्धतीने पार पडली जवी याची जबाबदारी SDM अधिकाऱ्यास सांभाळावी लागते.

SDM अधिकारी हा सरकारी अधिकारी असल्यामुळे त्यांचे कामही काही स्तरावर कठीण आणि जबाबदारीचे आहे. SDM अधिकाऱ्यास होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. तसेच कामाचा प्रचंड दबाव आणि राजकीय दबावाविरुद्ध खंबीरपणे उभे राहणे देखील गरजेचे आहे.

अशाप्रकारे आपण बघितले की SDM अधिकारी काय काम करतो आणि कोणती कर्तव्ये पार पाडतो. आता आपण जाणून घेऊया की SDM अधिकाऱ्यास मिळणारे फायदे कोणते.

SDM अधिकाऱ्यास असणारे सरकारी फायदे | SDM’s Benefits –

 • SDM हि एक सरकारी नोकरी आणि मोठा हुद्दा आहे यामुळे आपल्या समाजात यास खूप जास्त सन्मान दिला जातो. कोणीही SDM अधिकाऱ्याने कुतूहलाने आणि आदराने बघतात
 • SDM अधिकाऱ्यास मिळणार पगार आणि भत्ते हे अंत्यात किफायतशीर आहेत. त्यांना विशेष असे अधिकार असतात.
 • SDM अधिकाऱ्यास म्हणजेच SDM म्हणून काम करणाऱ्या IAS अधिकाऱ्यास पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश असतो.
 • या अधिकार्‍यांना पगारासह मिळणाऱ्या सुविधांमध्ये सरकारी निवास, सुरक्षा कर्मचारी आणि घरातील काम करण्यासाठी कर्मचारी मिळतात. यासोबतच सरकारकडून वाहने, टेलिफोन कनेक्शन, मोफत वीज हे सर्व मिळते.
 • सरकारी दौऱ्यांदरम्यान निवास, उच्च शिक्षणासाठी रजा, पेन्शन आदींचा समावेश आहे. वेतन आणि सुविधा अनेक राज्यांमध्ये थोड्याफार वेगवेगळ्या असू शकतात.

अशाप्रकारे आपण जाणून घेतले आहे की SDM अधिकाऱ्यास सरकारकडून काय काय फायदे मिळतात. आता आपण जाणून घेऊया की SDM अधिकारी कसे बनावे.

SDM कसे बनावे ? | How to become SDM?

SDM होण्यासाठी तुम्हाला UPSC हि परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही IAS होता आणि मग तुमची नियुक्ती SDM पदावर केली जाते.
UPSC द्वारे घेतली जाणारी Civil Service Examination (सिव्हिल सर्व्हिस एक्सामिनेशन) म्हणजेच नागरी सेवा परीक्षा द्यावी लागते. देण्यासाठी आणि म्हणूनच SDM बनण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.

तुम्ही कुठ्ल्याही शाखेतून पदवी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही UPSC परीक्षा देण्यासाठी प्राप्त ठरू शकता. तुम्हाला स्पष्ट झालेच असेल की SDM होण्यासाठी तुम्हाला आधी आयएएस अधिकारी व्हावे लागेल. आयएएस अधिकारी होण्यासाठी तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षेसाठी (CSE) पात्र असणे आवश्यक आहे.

SDM ला मिळणारे वेतन | SDM Salary –

1-4 वर्षांच्या सेवेत असणाऱ्या SDM अधिकाऱ्यास वेतन श्रेणी 10 नुसार मूळ वेतन हे 56, 100 रुपये इतके आहे. याशिवाय विविध सरकारी भत्ते देखील दिले जातात.

FAQs – Frequently Asked Questions –

उपविभागीय दंडाधिकार्याकडे कोणते अधिकार असतात?

उपविभागातील सरकारी कामाशी निगडित सर्व अधिकार SDM कडे असतात.

SDM चे प्रमुख कर्तव्य कोणते असतात?

SDM चे प्रमुख कर्तव्य हे उपविभागातील सुव्यवस्था नियंत्रित ठेवते आणि कायदे, योजनांची अंमलबजावणी करणे हे आहे.

SDM अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करता येते का?

होय. हाय कोर्ट मधे तुम्ही SDM अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकता.

SDM हा एक आयएएस अधिकारी असतो का?

होय. SDM हा एक आयएएस (IAS) अधिकारी असतो.

Leave a Comment