एनएमएमएस फुल फॉर्म NMMS Full Form In Marathi

NMMS Full Form In Marathi सातवी इयत्तेतील स्कॉलरशिप परीक्षा झाल्यानंतर इयत्ता 8वि मध्ये NMMS ही एक परीक्षा मुलांच्या समोर असते. सर्वांना ही परीक्षा देता येत नाही मात्र आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता दाखविण्यासाठी ही परीक्षा एक संधी असते. NMMS परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवून स्कॉलरशिप मिळविण्याची संधी असते. जेणेकरून यातून त्यांच्या भविष्यातील शिक्षणाला हातभार लावला जाईल.

NMMS Full Form In Marathi

एनएमएमएस फुल फॉर्म NMMS Full Form In Marathi

आज आपण NMMS Full Form in Marathi, NMMS म्हणजे नक्की काय आहे, NMMS परीक्षा कोणाला देता येत आणि त्यासाठी पात्रता अटी, NMMS परीक्षेचे स्वरूप, NMMS स्कॉलरशिप याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

NMMS Full Form in Marathi – NMMS Long Form in Marathi

NMMS ही एक परीक्षा किंवा सरकारची शिष्यवृत्ती योजना आहे. NMMS शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा National Means Cum-Merit Scholarship असा होतो. NMMS शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा नॅशनल मिन्स कम-मेरिट स्कॉलरशिप असा आहे. NMMS चा मराठी अर्थ हा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना असा आहे.

NMMS म्हणजे काय? – What is NMMS in Marathi?

देशात अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थी आहेत ज्यांच्या मध्ये शिक्षणाची आस आहे आणि हे विद्यार्थी पुढे आर्थिक बळ मिळाले तर आयुष्यात नक्की काहीतरी घडवू शकतात. भारत शासनाने असेच हुशार विद्यार्थी शोधण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी NMMS या परीक्षेच्या माध्यमातून स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

NMMS या परिक्षेला त्यामुळे खूप जास्त महत्व आहे. NMMS परीक्षेच्या माध्यमातून आर्थिक दृष्टया दुर्बल असे विद्यार्थी शासनाला सापडतात आणि त्यांच्या ज्ञानाला वाव देखील देता येतो आहे.

NMMS परीक्षेचा उद्देश्य – Aim of NMMS Exam

NMMS ही परीक्षा महाराष्ट्र शासनाने 2007-08 या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आजपर्यंत ही परीक्षा यशस्वीपणे आणि विद्यार्थ्यांना फायदा देत सुरू आहे. NMMS परीक्षा घेण्याचा उद्देश हा खालीलप्रमाणे आहेत.

  • आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांतील जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यामधील गुणवंत विद्यार्थी शोधून त्यांना पुढील चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी एक आर्थिक पाठबळ हे शिष्यवृत्ती स्वरूपात देणे.
  • कमीत कमी 12 वि पर्यंत तरी त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून सरकार या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते.
  • अनेकदा हे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी इयत्ता 10 वि नंतर पैशांच्या अडचणीमुळे शिक्षण सोडून देतात. हे घडू नये आणि त्यांनी कमीत कमी 12 वि पर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे हा NMMS परीक्षा घेण्यामागील सरकारचा उद्देश आहे.

NMMS संकेतस्थळ – Official website of NMMS

आता सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाली असल्याने आपल्याला NMMS परीक्षेची सर्व अर्ज प्रक्रिया ऑनलाइन झालेली आहे. तुम्हाला NMMS परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

www.mscepune.in किंवा nmmsmsce.in

अर्ज हे विद्यालयांकडून भरले जातात त्यामुळे या वेबसाईट विद्यालयातील शिक्षकांसाठी उपयुक्त असतील.

NMMS साठी पात्रता – Eligibility Criteria for NMMS

NMMS ही परीक्षा आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी असल्याने NMMS साठी काही पात्रता निकष लावण्यात आले आहेत. ते पात्रता निकष कोणते हे जाणून घेऊयात,

  • पालकांचे म्हणजेच आई आणि वडिलांचे दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. याचा पुरावा म्हणून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांचा त्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला हा तलाठी आणि नंतर तहसील कार्यालयातून काढून घ्यावा.
  • तहसील कार्यालयाने दिलेला 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी स्वतःकडे जतन करून ठेवावा अशी अट NMMS परीक्षा घेणाऱ्या मंडळाने घातलेली आहे. हा दाखला कधीही मंडळाकडून मुख्याध्यापकांना पुरावा म्हणून मागितला जाऊ शकतो.
  • इयत्ता सातवी मध्ये विद्यार्थ्याला 55% हुन अधिक गुण असावेत असा महत्वाचा निकष आहे.
  • SC आणि ST या दोन प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मार्कंमध्ये 5% टक्क्यांची सूट आहे. त्यांना इयत्ता 7वि मध्ये 50% हवेत.
  • विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिकी शाळा यामध्ये शिकणारे विद्यार्थी आधीच योजनांचे लाभ घेत असतात त्यामुळे ते NMMS परीक्षेसाठी पात्र नसतात.
  • याशिवाय शासकीय वसतिगृह आणि सवलती, भोजनव्यवस्था घेणारे व ज्यांना शिक्षणात आधीच सवलती आणि सुविधा आहेत असे विद्यार्थी या NMMS योजनेसाठी पात्र नसतात.

NMMS परीक्षेचे स्वरूप

NMMS या योजनेसाठी विद्यार्थी निवड ही एक परीक्षेच्या माध्यमातून होते. NMMS साठी लेखी परीक्षा घेतली जाते जीचे नाव देखील NMMS EXAM हेच असते.
परीक्षेला एकूण 2 पेपर असतात त्यांना MAT आणि SAT मध्ये विभागलेले आहे.

1) MAT- MENTAL ABILITY TEST (बौद्धिक क्षमता चाचणी)

आपण सातवी किंवा चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत दिलेला शिष्यवृत्ती हा पेपर इथे असतो. या पेपरला एकूण 90 मिनिट कालावधी दिलेला आहे आणि या 90 मिनिटांमध्ये 90 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.

2) SAT- SCHOLASTIC APTITUDE TEST (शालेय क्षमता चाचणी)

शालेय क्षमता या नावात आपल्याला कळून जाते की यामध्ये तुम्हाला शाळेतील विषय असतात. 90 गुणांचा हा पेपर असून याचे विभाजन सामान्य विज्ञान 35 गुणांसाठी, समाजशास्त्र 35 गुणांसाठी आणि गणित 20 गुणांसाठी असे केलेलं आहे. 90 मिनिटांचा वेळ दिलेला असून प्रत्येक प्रश्न 1 गुणांचा असतो.

  • सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र -11 मार्क, जीवशास्त्र -13 मार्क, रसायनशास्त्र -11 मार्क (यामध्ये थोडाफार बदल हा होऊ शकतो)
  • समाजशास्त्र : इतिहास -15 मार्क, भूगोल – 15 मार्क, नागरिकशास्त्र -5 मार्क
  • गणित – 20 मार्क

FAQ

NMMS योजनेत शिष्यवृत्ती किती मिळते? NMMS साठी शिष्यवृत्ती रक्कम किती मिळते?

NMMS मध्ये तुम्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला 4 वर्षांसाठी प्रत्येक वर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. म्हणजे एकूण 12 वि पूर्ण होउपर्यंत विद्यार्थ्याला NMMS मधून 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळालेली असते.

NMMS योजनेसाठी उत्पन्नाची अट काय आहे?

NMMS योजनेला पात्र होण्यासाठी पालकांचे मागील 1 आर्थिक वर्षाचे उत्पन्न हे दीड लाखांच्या (1 लाख 50 हजार रुपये) आत असावे ही अट आहे.

NMMS योजना लेखी परीक्षेसाठी प्रवेश अर्ज शुल्क काय आहे?

NMMS योजनेसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी 100 रुपये प्रति विद्यार्थी हे प्रवेश अर्ज शुल्क आहे. यामध्ये वेळेनुसार बदल होत असतात.

NMMS शिष्यवृत्ती मध्ये आरक्षण आहे का?

हो, NMMS योजनेमध्ये आरक्षण दिलेले आहे. भारतात एकूण 1 लाख शिष्यवृत्ती दिल्या जातात. प्रत्येक राज्याला त्यांचा कोटा ठरवून देण्यात आलेला असून त्या राज्यानुसार मेरिट लागते. हे मेरिट आरक्षणाच्या आधारावर असते.

Leave a Comment