आरटीआय फुल फॉर्म RTI Full Form In Marathi

RTI Full Form In Marathi आपला भारत देश हा विकासाच्या दिशेने जात आणि यासोबतच भारतीय नागरिक देखील जागरूक नागरिक बनत आहे. भारतातील अधिकतर लोक हे साक्षर होत आहेत आणि वेळेनुसार भारताच्या विकासच विचार ते करत आहे.

RTI Full Form In Marathi

आरटीआय फुल फॉर्म RTI Full Form In Marathi

अशाच जागरूक नागरिकास अजून जागरूक करण्यासाठी आणि भारतातील विकासात लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी सरकारने एक कायदा केलेला आहे तो म्हणजे RTI. आजच्या लेखात आपण RTI म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. RTI long form, RTI Marathi Meaning आणि RTI बद्दल सर्व माहिती बघुया.

RTI Full Form In Marathi | RTI Long Form In Marathi

RTI या शब्दाचा full form म्हणजेच RTI long form हा Right to Information (राईट फॉर इन्फॉर्मेशन) असा आहे. RTI शब्दाचा मराठीतील अर्थ हा माहितीचा अधिकार असा आहे.

RTI म्हणजे काय? | RTI meaning in Marathi

RTI म्हणजे माहितीचा अधिकार होय. भारतातील नागरिकांना सरकारकडून काही माहिती घ्यायची असेल तर ती माहिती घेण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकास आहे. RTI कायदा 2005 हा 15 जुन 2005 रोजी सरकारने स्वीकारला आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून RTI कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली.

 • भारतीय संविधानाच्या कलम १९(१) अन्वये हा एक मूलभूत अधिकार आहे.
 • हा कायदा भारतातील नागरिकांना सरकारी अधिकार्‍यांच्या नियंत्रणाखाली असलेली सार्वजनिक माहिती मिळविण्याचा अधिकार देतो.
 • RTI अधिकारामुळे भारतीय नागरिकाला सरकारी कागदपत्रांच्या प्रती मागता येतात आणि सरकारी कामाची तपासणी आणि चौकशी करता येते.
 • RTI कायदा जम्मु आणि काश्मीर राज्य वगळता बाकी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू पडतो.
 • RTI कायदा करण्याचा प्रमुख उद्देश हा सरकारी संसस्थामध्ये आणि योजनांमध्ये पारदर्शकता आणणे हा आहे.
 • माहिती पुनर्प्राप्त करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.

आपण आता पुढे बघुया की RTI कायद्यांतर्गत आपण कोणकोणत्या समस्या सोडवू शकतो.

RTI वापरून समस्या कशा सोडवता येतील?

RTI कायद्यांतर्गत खालील वैर्क्तिक स्वरूपाच्यासमस्या सोडवता येतात.

 • जर तुमचा इन्कम टॅक्स परत करण्याचा बाकी असेल तर RTI कायद्यांतर्गत तुम्ही त्याबद्दल चौकशी करू शकता.
 • Pf काढण्यास विलंब होत असेल तर तुम्ही RTI अधिकार वापरून तुमचा पीएफ काढण्यास येणारी अडचणी आणि लागणारा वेळ याची चौकशी करू शकता. विलंबित पीएफ हस्तांतरण
 • तुम्ही पासपोर्ट तयार करायला दिला आहे पण ठराविक वेळेत तो तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही संबंधित कार्यालयात चौकशी करू शकता आणि पासपोर्ट न मिळण्याचे कारण विचारू शकता.
 • आधार कार्डला विलंब झाला असल्यास तुम्ही RTI कायद्यांतर्गत त्यासंबंधित आधार कार्यालयात चौकशी करू शकता.
 • IRCTC परतावा मिळण्यात उशीर झाला असेल तर तुम्ही RTI अधिकारामुळे त्याबद्दल चाचणी करू शकता.
 • बोर्ड आणि इतर परीक्षेची तुम्हास तुमची उत्तरपत्रिका हवी असल्यास तशी मागणी तुम्ही शिक्षण विभागाकडे करू शकतात. RTI नेहा अधिकाऱ्यास प्रत्येक विद्यार्थ्यास दिला आहे.
 • मालमत्ता दस्तऐवज प्रमाणपत्र किंवा पूर्णता प्रमाणपत्रची मागणी तुम्ही करू शकता.
 • तुम्ही पोलिस विभागात एखादा खटला म्हणजेच केस दाखल केली असल्यास त्याबद्दल चौकशी संबंधित पोलिस स्टेशन मध्ये करू शकता आणि खटल्याची किती प्रगती झाली आहे हे RTI कायद्यांतर्गत विचारू शकता.
 • RTI कायदा हा ईपीएफची स्थिती अधिकार प्रत्येक नागरिकास देतो.
 • शिष्यवृत्तीला विलंब झाला असल्यास त्याबद्दलची चौकशी तुम्ही RTI अधिकारातून करू शकता.
 • रस्ते खराब झाले असल्यास RTI अधिकारामुळे तुम्हीं रस्ते नीट करण्याची मागणी करू शकता.
 • सरकारी प्रकल्पांची सध्याची अतिथी आणि आरकाहादा मागू शकता.

आपण आता बघुया की RTI कसा दाखल करावा.

RTI कसा दाखल करावा? | How to file RTI?

 • तुम्ही RTI अर्ज हा कागदावर लिहून किंवा टाईपकरुन करू शकता. इंग्रजी, हिंदी किंवा तुमच्या राज्याची जी अधिकृत भाषा असेल त्या कोणत्याही भाषेत तुम्ही RTI अर्ज करु शकता.
 • काही राज्यांनी RTI अर्ज करण्यासाठी नमुना दिलेला असू शकतं अशावेळी संबंधित विभागाच्या PIO म्हणजेच जन माहिती अधिकाऱ्यांना त्याबद्दल विचारावे.
 • RTI अर्जामध्ये तुम्हाला हवी असलेल्या माहितीबद्दल प्रश्न विचारावे. ज्या बाबड माहिती विशिष्ट प्रश्न विचारा. प्रश्न हे पूर्ण आणि स्पष्ट विचारावे. गोंधळ होईल असे प्रश्न टाळावे.
 • RTI अर्जामध्ये तुमचे पूर्ण नाव, संपर्क तपशील आणि आणि.ज्या ठिकाणी तुम्हाला RTI माहिती किंवा प्रतिसाद हवा आहे तिथला पत्ता लिहावा.
 • रेकॉर्ड ठेवण्यासाठी RTI अर्जाची झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे ठेवावी.
 • पोस्टाने RTI अर्ज पाठवत असाल, तर तो नोंदणीकृत पोस्टाने पाठवण्यास प्राधान्य द्यावे म्हणजे तुमच्याकडे तुमच्या विनंतीच्या वितरणाची पोचपावती असेल.
 • तुम्हाला संबंधित विभागातील PIO कडे वैयक्तिकरीत्या अर्ज जमा करता येतो अशावेळी त्यांच्याकडून ना विसरता पावती घ्यावी.

ऑनलाइन RTI कसा दाखल करावा? | How to file RTI online? –

केंद्र आणि काही राज्य सरकारच्या विभागांमध्ये ऑनलाइन RTI दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय अनेक वेगवेगळ्या वेबसाइट्स म्हणजेच संकेतस्थळे हे RTI अर्ज ऑनलाईन भरून देतात तसेच तो संबंधित विभागाकडे ऑनलाईन पाठवला जातो. यासाठी काही शुल्क (फी) देखील आकारली जाऊ शकते पण ती फारच कमी असेल. ऑनलाईन अर्जात तुमचा पूर्ण तपशील देण्याची गरज नसते त्यामुळे ही पद्धत जास्त सोयीस्कर वाटते.

अशाप्रकारे आजच्या लेखात आपण RTI बद्दल सर्व माहिती बघितली आहे. RTI म्हणजे काय, RTI meaning Marathi, RTI full form, RTI साठी अर्ज कसा करावा, हे सर्व आपण आजच्या लेखात जाणून घेतले.

FAQs – Frequently Asked Questions :

30 दिवसांत RTI कडून उत्तर ना आल्यास काय करावे?

अर्ज जमा केल्यानंतर ३० दिवसांच्या आत संबंधित विभागाकडून अर्जदाराला RTIसाठी प्रतिसाद न मिळाल्यास अर्जदार अपील दाखल करू शकतो.

RTI साठी कोण पात्र आहे?

भारतातील प्रत्येक नागरिक हा RTI साठी पात्र आहे.

किती वेळा RTI अर्ज करणे शक्य आहे?

वर्षातून 3 वेळा RTI अर्ज केला जाऊ शकतो.

RTI अर्ज करणे विनाशुल्क आहे का?

दारिद्र्यरेषेखालील कोणत्याही नागरिकास RTI फी आकारली जात नाही.

Leave a Comment