LPG Full Form In Marathi भारतात आता सर्वच घरांमध्ये गॅस शेगडीचा वापर केला जातो आहे. भारत सरकारने गरीब कुटुंबासाठी देखील योजनांच्या माध्यमातून गॅस जोडणी दिलेली आहे. अन्न शिजविण्यासाठी कुटुंबांना मोफत गॅस दिला गेला होता मात्र आता त्यासाठी अधिकाधिक पैसे आपल्याला मोजावे लागत आहेत. गॅस चे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. आपल्या घरांमध्ये वापरला जाणारा गॅस हा LPG गॅस असतो.
एलपीजी फुल फॉर्म LPG Full Form In Marathi
आज आपण LPG म्हणजे काय, LPG Full Form in Marathi, LPG गॅस कसा बनतो, LPG सिलेंडरचे वजन किती असते, LPG गॅस बुकिंग कशी करतात याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
LPG Full Form in Marathi – LPG Long Form in Marathi
LPG हा गॅस आपण घरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरत असतो. LPG शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Liquefied Petroleum Gas (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) असा आहे. मराठी भाषेत LPG चा अर्थ किंवा Full Form हा द्रवरूप पेट्रोलियम गॅस असा होतो. LPG या गॅसला कोणत्याही प्रकारचा रंग नसतो मात्र यातून काही वास नक्की येतो.
LPG म्हणजे काय? – What is LPG in Marathi?
LPG हा गॅस आपण आपल्या घरांमध्ये स्वयंपाकासाठी जास्त करून वापरतो. LPG या गॅसला कोणत्याही प्रकारे वास नसल्याने त्याला गंधहीन आणि रंग नसल्याने रंगहीन वायू म्हणून ओळखले जाते. अनेक हायड्रोकार्बन गॅसेसला एकत्र करून LPG हा ज्वलनशील गॅस बनविला जातो. यामध्ये प्रोपेन, ब्युटेन आणि आयसोब्युटेन या वायूंचा समावेश असतो. LPG हा गॅस कमी काळात अधिक जास्त उच्च तापमान गाठतो आणि त्यामुळे यातून कमी खपत होऊन जास्तीत जास्त ऊर्जा मिळते.
घरात स्वयंपाकासाठी या गॅसला वापरण्याचे कारण म्हणजे जेवहा LPG गॅस जळतो त्यानंतर तो कोणत्याही प्रकारे मागे ऊर्जा सोडता काही ठेवत नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचा धोकादायक वायू यातून बाहेर पडत नसल्याने याचा पर्यावरणाला जास्त काही धोका नाही.
LPG हा वायू सहज साठवता येतो आणि त्यामुळे आपण सिलेंडर सारख्या ठिकाणी त्याला साठवून वापर करू शकतो. LPG मध्ये अनेक असे गुणधर्म आहेत ज्यांच्यामुळे आज LPG गॅस स्वयंपाक आणि अजूनही इतर काही ठिकाणी ऊर्जास्रोत म्हणून वापरला जातो.
LPG गॅसची वैशिष्ट्ये – Features of LPG
आपण LPG गॅस घरात वापरण्याचे कारण ही त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. आज आपण त्याविषयी जाणून घेऊयात.
- LPG गॅस हा रंगहीन तर असतो पण गंधहीन देखील असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारे या गॅसला ज्वलनानंतर वास येत नाही. त्यामुळे त्याचा स्वयंपाकात बनविलेल्या पदार्थांना गंध लागत नाही.
- नावात जरी द्रवरूप असले तरी देखील LPG गॅस हा वायुरूपात साठविला जातो.
- LPG गॅसला कमी जागेत जास्त घनतेने भरता येते.
- LPG गॅस हा ज्वलनशील असतो आणि यातून मिळणारी ऊर्जा ही अधिक असते.
- LPG ज्वलनाने पर्यावरणाचे प्रदूषण होत नाही.
LPG गॅसचा उपयोग – Uses of LPG
आपल्याला LPG गॅस स्वयंपाकात वापरतात इतके माहिती असेल मात्र अजून कुठे LPG चा वापर होतो हे जाणून घेऊयात.
- अन्न शिजविणे
- पाणी गरम करण्यासाठी काही ठिकाणी गॅस हिटर्स असतात. त्यांना गॅस गिझर्स म्हणून देखील ओळखले जाते.
- LPG ज्वलन झाल्याने कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही आणि याचाच फायदा घेत लोक CNG ऐवजी LPG गॅसचा वापर गाड्यांमध्ये, बस मध्ये करत आहेत.
- क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूच्या जागेवर सध्या LPG चा वापर हा रेफ्रिजरंट म्हणून केला जातो आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन ने ओझोन लेयरला होत असलेला धोका लक्षात घेता कोणत्याही प्रकारे प्रदूषण न करणारा LPG गॅस जास्त वापरला जातो आहे.
LPG गॅस कसा बनतो? – How does LPG get manufactured or created?
LPG हा गॅस असून ड्रीलिंग ऑईल्स आणि गॅस विहीरी यांमधून हा गॅस काढला जातो. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू मिळवत असताना हायड्रोकार्बन संरचनेत LPG गॅस मिळत असतो. LPG वायू हे एकप्रकारे बाय प्रोडक्ट असते. तेल रिफायनिंग मध्ये देखील आपल्याला LPG हे उत्पादन मिळते. क्रूड ऑइल जेव्हा हिटिंग प्रक्रियेतून जात असते तेव्हा LPG हा वायू मिळवता येतो.
प्रोपेन आणि ब्युटेन यासारख्या वायूंच्या मिश्रणातून LPG हा गॅस मिळवतात. LPG गॅस चे देखील उत्पादन हे इंधनाच्या साठ्यांवर आणि नैसर्गिक वायूंच्या साठ्यांवर अवलंबून आहे.
LPG सिलेंडरचे वजन – Weight of LPG Household Cylinder
भारतामध्ये जे घरघुती वापरासाठी गॅस सिलेंडर वितरित केले जातात त्यांचे वजन हे साधारणतः 15 किलो ते 17 किलोच्या आसपास असते. सिलेंडर वर त्याविषयी माहिती नमूद केलेली असते. सिलेंडरचे वजन आणि LPG गॅसचे वजन वेगवेगळे असते. एका सिलेंडर मध्ये 14 किलो 200 ग्राम इतका LPG गॅस भरलेला असतो.
15 किलो वजनाची जर टाकी असेल तर त्यामध्ये 14 किलो 200 ग्राम LPG असतो आणि त्याचे एकूण वजन हे 19 किलो 200 ग्राम इतके असते. तुमच्याकडे जर एखाद्यावेळी यापेक्षा कमी वजनाची टाकी आली तर त्याचे वजन करून तुम्ही त्याविषयी रीतसर तक्रार देखील नोंदवू शकतात.
तक्रार नोंदविण्यासाठी आणि LPG गॅस विषयी अधिक काही माहिती हवी असेल तर 18002333555 हा भारत गॅस कडून देण्यात आलेला टोल फ्री क्रमांक आहे. यावर तुम्ही संपर्क करून तुमच्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतात किंवा एखादी तक्रार असेल तर ती देखील नोंदवू शकतात.
FAQ :-
घरांमध्ये स्वयंपाकासाठी कोणता गॅस वापरला जातो?
घरांमध्ये आपल्याकडे भारत गॅस किंवा इंडेन सारख्या कंपन्यांच्या जरी टाक्या असतील तरी देखील त्या सिलेंडर मध्ये LPG म्हणजेच Liquified Petroleum Gas भरलेला असतो.
LPG हा गॅस ज्वलनशील असतो का?
हो, LPG हा गॅस सर्वाधिक ज्वलनशील वायूंच्या यादीमध्ये येतो. LPG गॅस ज्वलनशील असला तरी देखील LPG गॅस जळल्या नंतर कोणत्याही प्रकारे प्रदूषण करत नाही.
LPG आणि प्रोपेन यामध्ये फरक काय आहे?
प्रोपेन हे देखील LPG प्रमाणे हायड्रोकार्बनचे रूप आहे. LPG गॅस बनवताना यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन या दोन हायड्रोकार्बन संरचनांचे मिश्रण केलेले असते.
LPG आरोग्याला घातक असतो का?
वायूमध्ये पसरलेला LPG गॅस हा वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो. त्यामुळे गंधहीन आणि रंगहीन असलेला हा LPG गॅस एखाद्याला भुरळ आणू शकतो. LPG हा ज्वलनशील असल्याने अनेकदा घरातील सिलेंडरचा स्फोट होण्यासारख्या गोष्टी घडलेल्या आहेत.