एमएनसी फुल फॉर्म MNC Full Form In Marathi

MNC Full Form In Marathi कॉर्पोरेट विश्वात किंवा जॉब च्या शोधासाठी बाहेर पडला असाल तर MNC हा शब्द अनेकदा कानांवर पडला असेलच. जरी आता जॉब शोधत नसाल आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी तुमचा काही एक संबंध नसेल तरी देखील आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती किंवा नातेवाईक एखाद्या कंपनीत जर जॉबला लागला असेल तर तो MNC कंपनीत लागला, MNC कंपनीसाठी अर्ज करत जा असे आपण नक्की ऐकले असेल.

MNC Full Form In Marathi

एमएनसी फुल फॉर्म MNC Full Form In Marathi

तर आपल्याला जरी पुढे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधायचा असतील तर MNC लाच का APPLY केले जाते किंवा MNC कंपनी निवडावी असा सल्ला इतर लोक का देतात, MNC म्हणजे नक्की आहे तरी काय, MNC Full Form in Marathi, MNC कंपनीत काय सुविधा असतात, भारतात कोणत्या MNC कंपन्या आहेत याविषयी आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

MNC Full Form in Marathi – MNC Long Form in Marathi

आपल्याला हा शब्द कॉर्पोरेट क्षेत्रात ऐकायला मिळत असतो मात्र तरी देखील अनेकदा आपण या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतो. त्यामुळे MNC चा नक्की Full Form काय आहे हे जाणून घेऊयात.

MNC म्हणजे Multi National Company नव्हे! MNC या शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Multi National Corporation असा होतो. MNC शब्दाचा मराठी भाषेत Full Form / अर्थ हा बहुद्देशीय महामंडळ असा होतो. आता वर तुम्ही जो सर्वात आधी full form समजला त्याचा आणि मुख्य full Form चा अर्थ एकच आहे. कंपनीलाच आपण कॉर्पोशन असे म्हणत असतो.

MNC म्हणजे काय? – What is MNC in Marathi?

MNC म्हणजे Multinational Corporation हे तर तुम्हाला आता समजले असेल. Multi म्हणजे बहु आणि National म्हणजे राष्ट्रीय, तर या शब्दाचा अर्थ बहुराष्ट्रीय असा होतो. कॉर्पोरेशन म्हणजे कंपनी किंवा एखादे महामंडळ म्हणजेच संस्था होय.

MNC म्हणजे अशी कंपनी जी अनेक देशांमध्ये काम करते आणि तिचे उत्पादन तसेच उत्पादन विक्री देखील अनेक देशांमध्ये केली जाते. MNC कंपन्या या विश्व स्तरावर काम करत असतात आणि त्यामुळे या कंपन्यांमध्ये आपल्याला जॉब मिळाला तर वेतन देखील जास्त मिळू शकते. कंपन्यांचे कार्य हे अधिक मोठ्या प्रमाणावर सुरू असते आणि याचा फायदा आपल्याला नोकरीमध्ये होतो. जास्तीत जास्त अनुभव घेण्याच्या आणि परदेशात जाऊन काम करण्याच्या संधी MNC कंपनी मार्फत आपल्याला मिळू शकतात. कंपन्यांचा व्यापार हा मोठा असतो आणि परिणामतः सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन देखील जास्त असते.

MNC कंपन्या आणि सध्या राष्ट्रीय कंपन्या यामध्ये खूप फरक असतो. राष्ट्रीय कंपन्या या फक्त एखादया देशात त्यांचा व्यवसाय करत असतात आणि त्यांची शाखा जरी देशभर असली तरी ते इतर कोणत्याही देशात त्यांचे कार्य करत नसतात. याउलट MNC कंपन्यांच्या शाखा या सर्व देशांमध्ये पसरलेल्या असतात. सर्व म्हणणे चुकीचे ठरेल पण भरपूर देशांमध्ये असतात. या शाखांना नियंत्रित करण्यासाठी त्या MNC कंपनीचे एका देशात मुख्यालय असते आणि तिथून या सर्व शाखांवर नियंत्रण ठेवलेले असते.

MNC कंपन्यांचा टर्न ओव्हर हा राष्ट्रीय कंपन्यांपेक्षा खूप जास्त असतो. त्यांच्या मालाचे मग ती सेवा असो किंवा एखादी वस्तु असो, त्याचे उत्पादन हे त्या देशात होते आणि त्याची विक्री ही काही त्याच देशात आणि काही विदेशात होते.

उदाहरण द्यायचे झाले तर Google हा एक समूह आहे. गुगलला आपण एक मोठी कंपनी म्हणून संबोधतो. गुगलचे मुख्यालय हे माऊंटन व्ह्यु, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेटस इथे आहे. संयुक्त अमेरिका मध्ये जरी गुगल काम करत असले तरी देखील सर्व विश्वात त्यांच्या सेवा सुरू आहेत.

मुख्यालय हे USA मध्ये जरी असले तरी देखील भारतात आणि इतर देशात ज्या गुगलच्या शाखा आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आता भारतात जरी आपण गुगल वापरत आहोत. गुगलच्या सुविधा आणि सेवा या जगभरात पसरलेल्या आहेत आणि त्यामुळे गुगल ही एक सर्वात नावाजलेली आणि मोठी MNC कंपनी म्हणून प्रचित आहे.

भारतातील MNC कंपन्यांची यादी – MNC Companies in India

भारत हा विकसनशील देश म्हणून सध्या जगाला परिचित आहे मात्र भारताला आता जवळपास सर्व कंपन्या या विकसित देशांमध्ये ग्राह्य धरतात आणि त्यामुळेच जगभरातील सर्व मोठ्या कंपन्यांची मुख्यालय किंवा मुख्य शाखालय हे भारतात आहेत. भारत सरकारच्या एका नियमानुसार ज्या कंपन्या भारतात काम करतात त्यांचे एक मुख्यालय भारतात देखील असायला हवे जेणेकरून त्यांच्याशी संपर्क साधने सोपे होईल.

 • गुगल
 • APPLE
 • मायक्रोसॉफ्ट
 • नेस्टले
 • इन्फोसिस
 • हिंदुस्थान युनिलिव्हर
 • अमेझॉन
 • आय बी एम
 • द कोका कोला
 • सॅमसंग
 • एल अँड टी
 • सोनी
 • टाटा ग्रुप
 • सिटी ग्रुप
 • नायके
 • जॉन्सन अँड जॉन्सन
 • आदिदास
 • एल टी आय
 • हिरो मोटोकॉर्प
 • बजाज
 • आदित्य बिर्ला ग्रुप
 • डॉ रेड्डीज लॅबोरेटरी
 • डाबर
 • एच सी एल
 • विप्रो
 • अमूल

MNC कंपन्यांची वैशिष्ट्ये

 • MNC हे अनेक देशांमध्ये काम करतात आणि त्यामुळे त्यांचे कार्य हे खूप मोठ्या स्तरावर सुरू असते.
 • MNC मध्ये प्रत्येक देशात काहीतरी वेगळे घडते आणि त्या देशासाठी त्या कंपनीचे एक्सपोजर असल्याने सर्व काही त्या देशासाठी घडते. याचा फायदा त्या देशाला आणि परिणामतः कंपनीला देखील होतो.
 • MNC कंपनीला दोन मुख्यालय असतात. पहिले मुख्यालय हे सर्वात वरच्या स्तराचे असते आणि दुसरे मुख्यालय हे त्या देशात एक बनविलेले असते. या मुख्यालयाच्या आदेशानुसार कंपनीच्या इतर सर्व शाखा कार्य करत असतात.
 • MNC या कंपनी फक्त त्या देशात काय चालू आहे हे बघत नसल्याने इतर ज्या देशांमध्ये जे तंत्रज्ञान सध्या विकसित झाले आहे ते आपल्या देशात देखील वापरतात. याचा फायदा भारताला तंत्रज्ञानात अजून झपाट्याने पाऊले टाकण्यासाठी होतो आहे.
 • MNC कंपनीचा टर्न ओव्हर हा खूप जास्त असतो आणि त्याचा फायदा जिथे त्या कंपनी कार्य करतात त्या सरकारला देखील होतो.
 • MNC कंपनीवर सरकारकडून काही प्रमाणात कमी कर लावला जातो कारण त्यांच्याकडून सरकारला मिळणारे उत्पन्न म्हणजेच टॅक्स हा खूप मोठ्या प्रमाणात असतो.
 • MNC मध्ये नोकरीला असलेल्या व्यक्तीला परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात आणि कंपनीच्या कार्यानुसार त्याला जास्त प्रमाणात वेतन देखील मिळत असते.

FAQ

MNC म्हणजे काय?

MNC म्हणजे मल्टी नॅशनल कॉर्पोरेशन होय. MNC या कंपनी अनेक देशांमध्ये त्यांचा व्यवसाय करत असतात.

MNC कंपन्यांचा फायदा प्रादेशिक प्रशासनाला होतो का?

होय, MNC कंपन्यांकडून प्रादेशिक सरकारला टॅक्स च्या स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो.

MNC कंपनी होण्यासाठी काय करावे लागते?

कंपनीला MNC बनायचे असेल तर त्यासाठी त्या कंपनीला अनेक देशांमध्ये स्वतःचे कार्य वाढवावे लागेल. त्यासोबत त्या कंपनीला त्यांचा व्यवसाय हा मोठ्या स्तरावर घेऊन जावा लागेल. यासाठी जास्त प्रमाणात आर्थिक आणि फिजिकल असेट्स जमा करावे लागतात.

भारतात मुख्यालय असलेल्या MNC कंपनी कोणत्या आहेत?

टाटा ग्रुप, हिरो मोटोकॉर्प, बजाज, आदित्य बिर्ला ग्रुप, डॉ रेड्डीज लॅबोरेटरी, इन्फोसिस, विप्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, आय टी सी, अमूल या काही भारतात मुख्यालय असलेल्या भारतीय MNC कंपन्या आहेत.

Leave a Comment