सीएनजी फुल फॉर्म CNG Full Form In Marathi

CNG Full Form In Marathi पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवर एक पर्यायी इंधन म्हणून अनेकांना काही काळापूर्वी CNG कडे बघायला सुरुवात केली होती. अनेक कंपन्यांनी त्यांच्या नवीन येणाऱ्या गाड्यांमध्ये CNG द्यायला देखील सुरुवात केली. नैसर्गिक वायू असल्याने होणारे प्रदूषण देखील खूप कमी असल्याने सरकारने देखील पर्यायी इंधन म्हणून सीएनजी वापरला जास्त चालना दिली.

CNG Full Form In Marathi

सीएनजी फुल फॉर्म CNG Full Form In Marathi

काही काळापूर्वी आपल्या भागात CNG पंप नव्हते म्हणून लोक गाडी घेत नव्हते मात्र आता CNG पंप देखील सुरू झाल्याने आता CNG गाड्यांचा देखील वेटिंग पिरियड खूप जास्त वाढला आहे. आज आपण CNG म्हणजे काय, CNG Full Form in Marathi, CNG गॅसचा इतिहास, CNG चे फायदे, CNG चे तोटे आणि CNG गॅस चे काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत.

CNG Full Form in Marathi – CNG Long Form in Marathi

CNG हा एक गॅस असून याचा वापर सध्या वाहनांमध्ये इंधन म्हणून केला जातो आहे. CNG शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Compressed Natural Gas असा आहे. CNG शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा संकुचित नैसर्गिक वायू किंवा समपीडित प्राकृतिक वायू असा होतो. आपण आजपर्यंत जे CNG म्हणत होतो त्याचा अर्थ आता नक्कीच समजला असेल. आता आपण या CNG गॅस विषयी अधिकाधिक माहिती जाणून घेऊयात.

CNG म्हणजे काय? – What is CNG in Marathi?

भारतात आता पेट्रोल, डिझेल आणि LPG सारख्या इंधनांना एक पर्यायी इंधन म्हणून CNG प्राप्त झाला आहे. CNG हा गॅस इतर पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनापेक्षा खूप कमी प्रदूषण करतो आणि त्यासोबत LPG पेक्षा CNG वापरण्यास धोका देखील कमी असल्याने आजच्या परिस्थितीत CNG इंधन पर्याय म्हणून अनेक गाड्या बाजारात येत आहेत.

CNG हा असा नैसर्गिक वायू आहे त्याचे संपूर्ण ज्वलन होते असे म्हणतात. मागे काही शिल्लक न ठेवता CNG जळतो. पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे काजळी मागे राहत नाही मात्र वातावरणात काही वायू सोडले जातात. हे वायू तितक्या जास्त प्रमाणात पर्यावरणाला हानिकारक नसल्याने CNG वापराला शासनाने परवानगी तर दिलीच आहे मात्र त्याचा पाठपुरावा देखील केला जातो आहे.

कार्बनच्या प्रारूपांपैकी कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायओक्साईड सारखे सर्वाधिक घातक वायू वातावरणात पेट्रोल आणि डिझेल वापराने वाढलेले आहेत. सध्या दिल्ली सारख्या ठिकाणी प्रदूषणाचे प्रमाण इतके जास्त वाढलेले आहे की त्यामुळे दृश्यता पातळी देखील खूप कमी होते आहे. यावर आता सरकारने पर्याय म्हणून CNG या ग्रीन गॅसला आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांना चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.

CNG साठवणूक आणि रासायनिक संरचना – CNG Storage and Chemical Combination

LPG आपण ज्या सिलेंडर मध्ये घरात वापरतो त्याचप्रमाणे CNG साठी देखील एक सिलेंडर असतो. यामध्ये CNG हा गॅस भरून त्याला गाडीच्या मागील भागात ठेवून त्याचा वापर करून गाडी चालविता येते.

CNG हा वायू बनविण्यासाठी त्यामध्ये 93% हुन अधिक प्रमाण हे मिथेन, नायट्रोजन, प्रोपेन आणि कार्बन डायॉक्साईड असतात. CNG मध्ये थोड्या प्रमाणात इथेन हा वायू देखील असतो. CNG चा वापर कमी प्रमाणात गॅस जरी बाहेर टाकत असला तरी देखील जो गॅस बाहेर पडतो हा हरितगृह वायू आहे. हरितगृह वायू म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेस होय. आता आपल्याला याचे गांभीर्य समजले असेल की जास्त CNG वापराने देखील ओझोन वायूचा थर कमी होईल आणि सध्या ग्रीनहाऊस इफेक्ट मध्ये अजून वाढ होईलच.

CNG चा इतिहास – History of CNG

1626 मध्ये विलियम हार्ट या अमेरिकन संशोधकाने अमेरिकेत CNG या प्राकृतिक वायूंचा शोध लावला. असे जरी म्हणले जात असले तरी प्रत्यक्षात या वायूंचा शोध आणि अनुभव हा न्यूयॉर्क शहरात असलेल्या फ्रेडोनिआ या ठिकाणी आला. फ्रेडोनिया येथे 1821 नंतर मग फ्रेडोनिया गॅस लाईट कंपनीची सुरुवात झाली.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने त्यांच्या वाहनांमध्ये CNG या वायूंचा वापर केलेला आढळतो. CNG ची सुरुवात वाहनांमध्ये होण्यास अमेरिकेने सर्वात आधी पुढाकार घेतला होता असे म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. अमेरिकेत नैसर्गिक वायू पुरवठा हा FGL कडूनच केला जातो आहे.

CNG गॅसचे फायदे – Benefits of CNG

CNG गॅसवर चालणारी वाहने आता जास्त प्रमाणात येत आहेत. त्यामुळे नक्की CNG गॅसचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

  • CNG गॅस हा पेट्रोल आणि डिझेल इंधनाच्या तुलनेत स्वस्त आहे.
  • स्वस्त असण्यासोबत CNG वापराने आपल्याला जास्त मायलेज मिळते.
  • CNG हा ज्वलनशील गॅस आहे मात्र याचे पेट घेण्याचे तापमान खूप जास्त आहे. त्यामुळे गाड्यांमध्ये CNG वापरण्याचा धोका तसा खूप कमी आहे.
  • CNG ज्वलन प्रक्रिया ही खूप शांततेत होते. मशीन मध्ये जास्त वेगाने हालचाली होत नाहीत आणि त्यामुळे CNG गाड्यांमध्ये पेट्रोल गाडीच्या तुलनेत कमी आवाज येतो.
  • CNG ज्वलनाने ग्रीन हाऊस गॅस बाहेर पडतो. याने पर्यावरणाला नुकसान होत असले तरी देखील हे नुकसान पेट्रोल डिझेल ज्वलनाच्या तुलनेत खूप कमी आहे.

CNG गॅसचे तोटे – Cons of CNG

CNG जर इतका स्वस्त आहे आणि याचे इतके फायदे आहेत तर मग आपण का पूर्णपणे CNG चा वापर करत नाही, का आपल्याकडे CNG सगळीकडे वाहनांमध्ये वापरला जात नाही? तर यासाठी CNG चे तोटे आपण लक्षात घ्यायला हवेत.

  • भारतात CNG स्टेशन कमी प्रमाणात आहेत. जिथे आहेत तिथे लांबच लांब रांगा लागतात.
  • गाडी पेट्रोल डिझेल वरून CNG करायची असेल तर खर्च जास्त येतो. आणि गाडीमधील मागील सामान ठेवण्याचा भाग CNG टाकीसाठी अडकून असतो.
  • टाकीचे भरल्यानंतर वजन जास्त असल्याने गाडीमध्ये अजून जास्त वजन वाढते.
  • CNG देखील गंधहीन वायू आहे आणि त्यामुळे याचे लिकेज लक्षात येत नाही. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याचे ज्वलन तापमान खूप जास्त आहे त्यामुळे एखादी गाडी लिकेज नंतर पेट घेईल, अशी शक्यता फार कमी असते.
  • CNG ज्वलनाने एक्सोस्ट व्हॉल्व्ह वर जास्त परिणाम होतो आणि आपल्याला तो थोडया दिवसांनी सतत बदलावा लागतो.

FAQ :-

CNG आणि LPG यापैकी वाहनांसाठी सुरक्षित गॅस कोणता आहे?

CNG आणि LPG दोन्ही वायू हे वाहनांसाठी इंधन म्हणून वापरले जातात मात्र LPG हा गॅस खूप कमी तापमानाला देखील पेट घेत असल्याने CNG हा गॅस वाहनांमध्ये वापरण्यासाठी सुरक्षित आहे.

CNG आणि LPG पैकी स्वस्त आणि परवडणारा गॅस कोणता आहे?

CNG हा LPG पेक्षा स्वस्त गॅस आहे. तुमच्या भागात अनुदान आणि घरगुती गॅस जोडणीत मिळणारा LPG कदाचित CNG पेक्षा स्वस्त असेल मात्र CNG हा आपल्याला LPG पेक्षा नेहमी जास्त मायलेज देतो.

CNG स्वयंपाक करण्यासाठी वापरता येतो का?

अनेक देशांमध्ये स्वयंपाक बनविण्यासाठी LPG न वापरता CNG वापरला जातो. CNG हा गॅस लाईनच्या माध्यमातून सर्वत्र पाठविता येतो. CNG चा वापर घरांमध्ये गिझरसाठी देखील काही बाहेरील देशांमध्ये करतात. भारत CNG चा वापर स्वयंपाक करण्यासाठी शक्यतो केला जात नाही. कारण याचे ज्वलन तापमान खूप जास्त आहे.

CNG च्या किंमती का वाढत आहेत?

पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढण्यामागील कारण म्हणजे जागतिक स्तरावरील तेल आणि नैसर्गिक वायूंच्या वाढत्या किंमती हेच कारण CNG च्या किंमती वाढण्यासाठी कारणीभूत आहे.

Leave a Comment