एनएएसी फुल फॉर्म NAAC Full Form In Marathi

NAAC Full Form In Marathi एखाद्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठात प्रवेश घेताना त्या कॉलेज किंवा विद्यापीठाची गुणवत्ता बघितली जाते. विद्यापीठात किंवा कॉलेज मध्ये कोणत्या दर्जाचे शिक्षण दिले जाते याचा विचार केला जातो. हे जाणून घेण्यासाठी त्या विद्यापिठात किंवा कॉलेजला NAAC मानांकन काय आहे हे बघितले आहे.

NAAC Full Form In Marathi

एनएएसी फुल फॉर्म NAAC Full Form In Marathi

आजच्या लेखात आपण झेच जाणून घेणार. NAAC म्हणजे काय, NAAC Long Form, NAAC Full Form, NAAC Marathi Meaning आणि NAAC बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

NAAC Full Form In Marathi | NAAC Long Form In Marathi :

NAAC शब्दाचा full form म्हणजेच NAAC Long Form हा NATIONAL ASSESSMENT AND ACCREDITATION COUNCIL (नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडीटेशन काऊन्सिल) असा आहे. NAAC शब्दाचा मराठीतील अर्थ हा राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद असा आहे.

NAAC म्हणजे काय? | NAAC Meaning in Marathi :

NAAC म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद हि भारतातील उच्च शैक्षणिक संस्था जसे की महाविद्यालये, विद्यापीठे आणि शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करते तसेच मान्यता संस्थेच्या ‘गुणवत्तेची स्थिती’ काय आहे याचे परीक्षण करते.

NAAC हे मूल्यांकन करताना आणि गुणवत्ता तपासताना संबंधित शैक्षणिक संस्थेची शैक्षणिक प्रक्रिया, शैक्षणिक प्रक्रियेचा प्रभाव, अभ्यासक्रम काय आहे आणि किती पूर्ण केला जातो, अध्यापन कसे केले जाते, विद्याशाखा, संस्थेतील संशोधन प्रकल्प, संस्थेत पायाभूत सुविधा आहेत की नाही जसे की बसण्याची व्यवस्था, व्यवस्थित कार्यालये, पाण्याची आणि शौचालयाची सोय, यासोबतच शिक्षण संसाधने आहेत की नाही आणि कोणत्या दर्जाची आहेत.

संस्था प्रशासन कसे आहे, विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे वातावरण किती अनुकूल आहे, अभ्यासक्रमाशी आय घेतले जाणारे इतर कार्यक्रम आणि प्रकल्प, विद्यार्थ्यांनाच होणारा सर्वागीण विकास, कार्यालयीन काम किती व्यवस्थित आणि सोयीस्कर आहे, आर्थिक कल्याण आणि संस्थेत राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना जसे कमवा आणि शिका, अश्या सर्व बघितल्या जातात. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार NAAC करते आणि त्यांचा बघून विद्यार्थ्यांवर त्याचा होणारा परिणाम अश्या सर्व गोष्टींचे परीक्षण केले जाते. हे सर्व परीक्षण केल्यानंतर NAAC कडून संस्थेस मानांकन दिले जाते.

NAAC चे उद्दिष्टे :

  • NAAC चे प्रमुख उद्दिष्ट हे उच्च शिक्षण संस्था किंवा त्यांच्या युनिट्स किंवा विशिष्ट शैक्षणिक कार्यक्रम किंवा शैक्षणिक प्रकल्पांचे नियतकालिक मूल्यांकन करणे आणि मान्यता देणे हे आहे.
  • NAAC शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्तेला चालना देते. अध्यापन आणि शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा वाढवते.
  • NAAC हि अशी परिषद जीचे मूल्यांकन महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते म्हणून मूल्यांकन पात्रतेसाठी उच्च शिक्षण संस्थेतील स्वयं-मूल्यांकन , नवीन कल्पना, जबाबदारी, स्वायत्तता यांना प्रोत्साहन मिळते.
  • NAAC हे शिक्षणीक सणांस्थांना गुणवत्ता-संबंधित संशोधन, सल्लागार आणि प्रशिक्षण कार्यक्रम करण्यास प्रोत्साहन देते.

NAAC मान्यताचा हेतू | Purpose of NAAC Credentials :

NAAC मान्यता असल्याने संबंधित शैक्षणिक संस्थेचा दर्जा आपल्याला कळतो. यामुळे संस्थेचे शिक्षण, तिथे होणारे संशोधन, विद्याशाखा, पायाभूत सुविधा इत्यादी गोष्टींचा दर्जनानी गुणवत्ता काय आहे हे आपल्यास समजते. म्हणून शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठ किंवा महाविद्यालय किंवा कोणतीही शैक्षणिक संस्था निवडताना NAAC मुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळतो कोणते दर्जेदार संस्था निवडत आहेत. उत्तम NAAC मानांकन असलेल्या शिअक्षणीक संस्थेत विद्यार्थ्यांना शिकण्याचे प्रोत्साहन मिळते आणि याचा फायदा विद्यापीठास पण होतो.

  • NAAC हे राष्ट्रीय विकासात योगदान करते.
  • NAAC द्वारा दर्जेदार शिक्षणास प्रोत्साहन मिळून विद्यार्थ्यांमध्ये जागतिक क्षमता वाढवली जाते.
  • विद्यार्थ्यांमध्ये मूल्य प्रणाली विकसित होते.
  • NAAC हे एक प्रकारे शैक्षणीक संस्थेस तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देते.

NAAC मान्यतेचे फायदे | NAAC Credential Benefits :

  1. NAAC मान्यता प्रक्रियेमुळे संस्थेला संस्थेत असलेल्या उणिवा समजतात तसेच संस्थेच्या चांगल्या बाबी, येणाऱ्या पुढच्या संधी ओळखण्यात मदत करते. यामुळे महाविद्यालयास खूप फायदा होतो.
  2. गुणवत्ता सुधारण्यासाठी NAAC मूल्यांकन ही सर्वात उत्तम पद्धती आहे.
  3. संस्थांना अंतर्गत भागात नियोजन आणि संसाधनांचे वाटप करण्याची गरज समजून घेण्यास सक्षम करते.
  4. NAAC मूल्यांकन हे शिक्षण दर्जाची खात्री देते. यामुळे मान्यता प्रवास संस्थांना आधुनिक आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक पद्धतींचा परिचय करून देतो.
  5. दीर्घकाळात, ते संस्थेची प्रतिमा उंचावते आणि यशाची नवीन दिशा देते.
  6. अंतर्गत प्रक्रिया आणि संप्रेषण सुधारते.
  7. विद्यार्थ्यांचा भर्ती दर वाढवतो

NAAC मान्यता कशी मिळते? :

  • NAAC संस्थेने मान्यताप्राप्तीसाठी अर्ज करायचा असल्यास संस्थांना काही पात्रता निकष दिले जातात. संस्था पात्रता निकषांत बसत असेल तर त्यांना खालील कागापत्रे सादर करण्यास सांगितले आहेत -संस्थेचा डेटा आणि अहवाल, पुरावा आणि समर्थन दस्तऐवज, सत्यापित डेटा, विद्यार्थी अभिप्राय, आयसीटी सक्षम शिक्षण.
  • NAAC च्या अधिकृत वेबसाइटवर संस्था नोंदणी ऑनलाईन करू शकते.
  • प्रारंभिक गुणवत्ता मूल्यांकन (IIQA) साठी संस्थेचा सर्व डेटा जमा केला जातो.
  • IIQA पूर्ण झाल्यानंतर संस्थांनी स्वयं-अभ्यास अहवाल NAAC कडे द्यावा.
  • जर IIQA नाकारला गेला तर संस्थांना मान्यता मिळवण्यासाठी एका वर्षाच्या आत दोनदा अर्ज करता येतात.
  • संस्थेने जमा केलेल्या डेटाची पडताळणी NAAC कडून केली जाते आणि पात्र ठरल्यास संस्थेला प्री-क्वालिफायर स्कोअर म्हणजेच गुण दिले जातात.
  • सर्व डेटा पडताळणी केल्यानंतर NAAC कडून विद्यार्थी समाधान सर्वेक्षण केले जाते यात विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकवले जाते, काय काय उपक्रम घेतले जातात याबद्दल सर्वेक्षण केले जाऊ शकते.
  • यानंतर NAAC पीअर टीम पुढील पडताळणीसाठी संस्थेला भेट देते आणि सर्व पडताळणी नंतर NAAC संस्थेस श्रेणी देते.

अशाप्रकारे आजच्या लेखात आपण NAAC म्हणजे काय, NAAC full form, NAAC meaning in Marathi आणि NAAC बद्दल सर्व माहिती बघितली आहे.

FAQs – Frequently Asked Questions :

NAAC चा उद्देश काय आहे?

NAAC हे महाविद्यालये, विद्यापीठे आणि मण्यातपटे शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता समजून घेण्यासाठी त्यांचे मूल्यांकन करते आणि त्यांना मान्यता देते.

NAAC द्वारे मूल्यांकन आणि मान्यता अनिवार्य आहे का?

19 जानेवारी 2013 च्या अधिसूचनेने उच्च शैक्षणिक संस्थांना (HEIs) NAAC हे अनिवार्य केले आहे.

कोणते चांगले आहे: NAAC किंवा UGC?

UGC महाविद्यालय किंवा विद्यापीठाला मान्यता देते तर NAAC विद्यापीठ किंवा संस्थेमध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची गुणवत्ता बघते.

NAAC च्या प्रक्रियेच्या संदर्भात मूल्यांकन काय आहे?

NAAC मूल्यांकन हे शैक्षणिक संस्था, विद्यापीठाचे किंवा महाविद्यालयाचे आणि तिच्या कामगिरीचे मूल्यांकन आहे.

Leave a Comment