टीसी फुल फॉर्म TC Full Form In Marathi

TC Full Form In Marathi – TC या छोट्याशा शॉर्ट फॉर्म सोबत अनेक लॉंग फॉर्म जोडलेले आहेत. TC हा शब्द आपण रेल्वे मध्ये असताना ऐकतो, TC आपल्याला शाळा किंवा कॉलेज सोडल्यानंतर लागतो, TC चा वापर आपण झोपताना मेसेजमध्ये वापरतो आणि इतरही अनेक ठिकाणी TC हा शब्द वापरला जातो.

TC Full Form In Marathi

टीसी फुल फॉर्म TC Full Form In Marathi

आज आपण TC चे जे काही मुख्य लॉंग फॉर्म आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत. TC म्हणजे काय, रेल्वेतील TC म्हणजे काय, शिक्षण क्षेत्रातील TC म्हणजे काय, आणि गुड नाईट च्या मेसेजमधील TC म्हणजे काय याविषयी आणि TC संदर्भात इतरही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

TC Full Form in Marathi – TC Long Form in Marathi

TC शब्द अनेकदा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो त्यामुळे याचे full form देखील क्षेत्रानुसार वेगळे आहेत. आपण त्या क्षेत्रानुसार TC चा Full Form समजून घेऊयात.

TC Full Form in Railways

रेल्वे विभागात TC हे एक पद आहे. TC शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Ticket Collector असा होतो. काही ठिकानो TC म्हणजे Ticket Checker असा देखील उल्लेख आपल्याला आढळतो. आपण जिथे तिकीट घेतो त्या ठिकाणी हे तिकीट कलेक्टर असतात. एखाद्या दिवशी ते ट्रेन मध्ये चढून सर्वांची तिकिटे चेक देखील करतात. TC हा एक रेल्वे कर्मचारी असतो आणि त्याचे काम हे रेल्वे तिकिटांच्या संदर्भात असते.

TC full form in Education

शिक्षण क्षेत्रात आपण शाळा कॉलेजेस सोडल्यानंतर आपल्या हातात TC दिला जातो. तर इथे TC म्हणजे नक्की काय असते? TC शब्दाचा शिक्षण क्षेत्रातील इंग्रजी भाषेत Full Form हा Transfer Certificate असा होतो. आपल्याला इंटरनेट वर TC शोधले की हाच Full Form शक्यतो मिळतो. ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच हस्तांतरण प्रमाणपत्र होय. आपण एक विद्यालय सोडून जर दुसऱ्या विद्यालयात किंवा महाविद्यालयात प्रवेश घेत असलो तर आपल्याला जुन्या विद्यालयातून हे प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र आपण बदलत असलेल्या विद्यालयात किंवा महाविद्यालयात जमा करावे लागते.

TC full form in Messages

आपण व्हाट्सअप्प सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून थोडक्यात शब्दात आता व्यक्त होत असतो. त्यामध्ये रात्री झोपत असताना Gn Sd Tc हा मेसेज साहजिक आपल्याला बघायला मिळतो. तर आज आपण या गुड नाईट मेसेज मधील Tc चा full form काय हे जाणून घेऊयात. TC चा इंग्रजी भाषेत full form हा Take Care असा आहे. TC शब्दाचा मराठी भाषेत full form किंवा अर्थ हा काळजी घ्या असा होतो. मेसेज मध्ये Too Cool, Too Cute हे दोन्ही TC चे Full Form आहेत.

याशिवाय कर विभागात TC चा Full Form हा Tax Code, Tax Credit किंवा Tax Court असा होतो. नेटवर्किंग क्षेत्रात TC चा Full Form हा Transport Coverage आणि Temporary Correction असा होतो. जर Tc असा लिहिलेला असेल तर केमिस्ट्री मध्ये Technetium हा element आहे.

TC म्हणजे काय? – What is TC in Marathi?

शिक्षण क्षेत्रात आपण वापरत असलेला TC हा शब्द म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट होय. फक्त शिक्षणात नव्हे तर जेव्हा कधी एखादा व्यक्ती एका जागेवरून दुसरीकडे बदली होऊन जातो किंवा एखाद्याला एका विद्यालयातून दुसऱ्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असतो तेव्हा त्याला हे TC प्रमाणपत्र दिले जाते.

शिक्षण क्षेत्रात हे Transfer Certificate महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी शिवाय वैध समजले जात नाही. जेव्हा एखाद्याची बदली होत असते तेव्हा त्याला post ट्रान्सफर सर्टिफिकेट दिले जाते. त्याला देखील TC म्हणूनच ओळखतात. इतर क्षेत्रातील TC विषयी आपण Full Form सांगत असताना थोडक्यात माहिती बघितली आहे.

TC चे महत्व – Importance of TC

ट्रान्सफर सर्टिफिकेट हे का इतका महत्वाचा आहे याविषयी आज आपण जाणून घेऊयात.

  • ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच TC वरून आपल्याला दुसऱ्या शिक्षण संस्थेत प्रवेश घेता येतो.
  • TC वरून तुमचे मागील शिक्षण संस्थेतील वर्तवणूक नवीन शिक्षण संस्थेला समजते.
  • TC वरील शेरे हे तुम्हाला नवीन ठिकाणी ऍडमिशन द्यावे की नाही हे ठरवतात.
  • TC हे प्रमाणपत्र तुमचे मागील शिक्षण संस्थेतील व्यवहार पूर्ण आहेत हे दर्शविते.
  • तुमचे शैक्षणिक संकुल बदलले आहे याचा पुरावा म्हणजे दुसऱ्या ठिकाणी तुमचा जमा झालेला TC होय.

Ticket Collector कसे बनतात?

आपण तिकीट कलेक्टर म्हणले की समजून घेतो की हा आपले आता तिकीट तपासणार आणि आपल्याकडे तिकीट नसेल तर आपल्याला दंड करणार. हा सर्व त्यांच्या कामाचा भाग जरी असला तरी देखील त्यांचे कार्य हे ज्यांनी तिकीट काढलेले आहेत त्यांना जागा देणे आणि त्यांची सोय करणे हे असते.

तिकीट कलेक्टर हे सरकारी नोकरी मधील पद असून यासाठी काही पात्रता निकष आहेत. TC होण्यासाठी विद्यार्थ्याने 10 वि इयत्तेत 50% हुन आधील गुण मिळवून पास व्हायला हवे. यामध्ये त्याने हे शिक्षण कोणत्याही बोर्डातून घेतलेले असेल ते ग्राह्य धरले जाते. TC मधील काही उच्च पोस्ट या डिप्लोमा आणि बारावी बेस वर देखील असतात.

पदवीचे शिक्षण झालेले असेल तर तुम्हाला रेल्वेत आणखी चांगले पद मिळते. त्यामुळे भरपूर विद्यार्थी हे पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर TC साठी रेल्वेच्या परीक्षा देतात.

FAQ

Duplicate TC आपल्याला पुन्हा मिळवता येतो का?

जर आपला पहिला दाखल म्हणजेच TC हरवला असेल तर आपल्याला आपल्या जुन्या शिक्षण संस्थेतून पुन्हा TC म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट काढता येते. मात्र त्यावर Duplicate असा शिक्का मारलेला असतो.

रेल्वेतील TC हे पद किती वेगवेगळ्या पदांमध्ये विभागलेले आहे?

रेल्वेत आपण TC हा शब्द एका व्यक्तीला जरी संबोधून म्हणत असलो तरी देखील TC मध्ये देखील वेगवेगळी पदे आहेत. यामध्ये तिकीट एक्सामिनर, सिनियर तिकीट एक्सामिनर, ट्रॅव्हलिंग तिकीट इन्स्पेक्टर, चीफ तिकीट इन्स्पेक्टर ही मुख्य चार पदे आहेत.

Whatsapp वर TC शब्दाचा Full Form काय आहे?

Whatsapp वर आणि इतरही सोशल मिडीत अँप्स वर TC शब्दाचा Full Form हा Take care असा मुख्यतः होतो. मात्र याशिवाय Too Cute, Too Cool हे देखील काही इतर full form आहेत.

नोकरीत TC शब्दाचा Full Form काय आहे?

नोकरीमध्ये तुमच्या पगाराच्या स्लिप मध्ये येणारा TC शब्द म्हणजे Total Compensation असा होतो.

Leave a Comment