ओयो फुल फॉर्म OYO Full Form In Marathi

OYO Full Form In Marathi प्रवासात असताना आपल्याला रात्रीच्या वेळी आराम करण्यासाठी हॉटेल्सची गरज असते. आपण त्या भागात नवीन असल्याने तिथे अनेकदा आपल्याला नवीन हॉटेल्स विषयी माहिती नसते. आपण जिथे जाऊ तिथे कदाचित आपल्याला जास्त पैसे द्यावे लागू शकतात किंवा कधी कधी आपल्याला त्यापेक्षा एखादे चांगले हॉटेल देखील कमी पैशात मिळू शकले असते.

OYO Full Form In Marathi

ओयो फुल फॉर्म OYO Full Form In Marathi

अशा वेळी आपल्या मदतीला OYO सारखे हॉटेल बुकिंग अँप्स येतात. हॉटेल्सच्या बाहेर आपल्याला लाल रंगावर पांढऱ्या अक्षरात OYO हा शब्द दिसतो. मात्र नक्की हे OYO म्हणजे काय, OYO Full Form in Marathi, OYO चा इतिहास आणि स्थापना, OYO चे फायदे, OYO वापरून रूम कशी बुक करावी, OYO वरून बुकिंग कॅन्सल कशी करावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

OYO Full Form in Marathi – OYO Long Form in Marathi

अनेकांना वाटते की OYO हे स्वतःमध्ये एक नाव आहे मात्र तसे नसून हा एक शॉर्ट फॉर्म आहे. OYO शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा On Your Own असा आहे. इंग्रजी मध्ये याचा उच्चार हा ऑन युअर ओन असा केला जातो. मराठी भाषेत OYO शब्दाचा अर्थ हा तुमचे स्वतःचे असा होतो.

OYO या शब्दातून कंपनीला हेच सांगायचे आहे की जे काही तुम्ही आता बुक करणार आहात ते तुम्ही स्वतः बुक करणार आहात आणि जी रूम मिळेल ती पूर्णपणे तुमची स्वतःची असेल. यातून कंपनीला तुम्ही मालक असल्याची जाणीव ग्राहकाला करून द्यावयाची आहे.

OYO म्हणजे काय? – What is OYO in Marathi?

OYO म्हणलं की काहींच्या मनात वेगळे विचार येत असतील मात्र तरी देखील OYO हा प्लॅटफॉर्म हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म असून भारतात या अँप वरून सर्वाधिक हॉटेल बुकिंग केले जाते. OYO ही त्यावेळी एक वेगळी आणि नवीन संकल्पना होती मात्र आज ती सर्व हॉटेल विश्वात एक उच्च स्थानावर आहे.

OYO द्वारे आपल्याला कोणत्याही भागातील हॉटेल्स हे रास्त दरामध्ये बुक करता येतात. यामध्ये तुम्हाला त्या हॉटेल विषयी जवळपास सर्व माहिती मिळते. म्हणजे ते हॉटेल कसे आहे, त्याच्या जुन्या ग्राहकांनी त्यांना काय प्रतिसाद दिला आहे, त्यांची मते काय आहेत, हॉटेल कसे दिसते, आतमध्ये काय सुविधा आहेत, रूम कशा आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला OYO द्वारे कळतात. कमी कालावधीत OYO ला प्रसिद्धी मिळत गेली.

OYO अँप वापरून आपल्याला भारतात कुठेही सहज हॉटेल बुक करता येतात. यामध्ये तुम्हाला चेक इन आणि चेक आउट टाईम दिला जातो आणि त्यानुसार तुम्हाला तिथे जावे लागते. तुम्हाला एखाद्यावेळी जर प्लॅन कॅन्सल करावा लागला तर या OYO सर्व्हिस च्या माध्यमातून तुम्ही सहज तुमचा प्लॅन देखील कॅन्सल करू शकता. चेक इन टाईम आधी कॅन्सल केले तर तुम्हाला 100% रिटर्न देखील मिळतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे OYO वरून हॉटेल बुकिंग केल्यास आपल्याला कुपन कोड्स सोबत खूप जास्त फायदा मिळतो आणि त्यासोबतच इथे तुम्हाला बजेट ते 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्स देखील बुक करता येतात.

OYO ची स्थापना व इतिहास – History & Foundation of OYO

  • OYO या हॉटेल बुकिंग कंपनीची सुरवात ही रितेश अग्रवाल यांनी केली.
  • रितेश अग्रवाल हे OYO चे संस्थापक आणि सध्याचे CEO आहेत.
  • 2013 साली ओडिशा राज्यात एका छोट्याश्या गावातून वयाच्या 17 व्या वर्षी रितेश यांनी OYO या स्टार्टअप ला सुरुवात केली.
  • रितेश यांनी OYO चे सुरुवातीचे नाव हे Oravel Stays Private Limited असे ठेवले होते आणि तेव्हा त्यांची सुरुवात ही ऑफलाईन झाली होती.
  • नंतर OYO ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सुरू झाले आणि मग त्याचा विकास होत गेला.
  • OYO मधून ग्राहकांना आणि प्रवाशांना फायदा तर झालाच मात्र त्यासोबत जे हॉटेल खाली असत ते आता भरलेले असतात. हॉटेल व्यावसायिकांना देखील OYO मधून भरपूर फायदा झाला.

OYO चे फायदे – Benefits of OYO

  • देशभरात सर्वत्र हॉटेल्स OYO सोबत जोडलेले आहेत.
  • बुकिंग आधीच केल्याने तुम्हाला एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर रूम भेटत नाही अशी समस्या जाणवणार नाही.
  • OYO वर बजेट मध्ये रुम्स मिळतात त्यामुळे खिशाला भलतीच कात्री लागत नाही.
  • 399 रुपयांपासून OYO वर तुम्हाला रुम्स मिळतात.
  • OYO काही शहरांमध्ये तासाच्या रेट वर देखील रूम देतात.
  • OYO अँप आणि वेबसाईट दोन्ही सोप्या असून यावर तुम्हाला आकर्षक ऑफर्स सहज समजून येतात.
  • OYO मध्ये चेक इन टाईमच्या आधी बुकिंग कॅन्सल केल्यास 100% पैसे रिटर्न मिळतात. कोणताही कॅन्सलेशन चार्ज लागत नाही.

OYO वरून हॉटेल रूम बुक कशी करतात? – How to Book Hotel in OYO?

  1. सर्वात आधी आपल्याकडे मोबाईल असेल तर त्यात OYO चे अँप डाउनलोड करून ओपन करा. लॅपटॉप वर तुम्हाला OYO च्या वेबाईटवर जावे लागेल. OYO चे अँप वापरले तर तुम्हाला त्यात अधिक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळतो.
  2.  मुख्य पानावर तुम्हाला शहर निवडून तिथली हॉटेल्स बघायला मिळतील. सर्च बार मध्ये देखील तुम्हाला एखादे शहर किंवा एखादा एरिया सर्च करता येईल.
  3. वर दिलेल्या फिल्टर या ऑप्शन चा वापर करून तुमच्या बजेट नुसार आणि सुविधांवर अवलंबून तुम्ही हॉटेल्सची यादी फिल्टर करू शकतात.
  4. हॉटेल निवडल्यानंतर पुढे बुक नाउ वर क्लिक करा.
  5. आता तुम्हाला चेक इन आणि चेक आउट तारीख द्यावी लागेल. चेक इन म्हणजे तुम्ही कधी येत आहात आणि चेक आउट म्हणजे तुम्ही हॉटेल रूम कधी सोडणार हे होय.
  6. रूम मध्ये किती लोक असतील हा आकडा देखील तुम्हाला तिथे द्यावा लागेल.
  7. एकदा ही माहिती भरली की पुढे पेमेंट करून तुम्हाला बुकिंग फायनल करता येईल.
  8. बुकिंग झाल्यावर अँप वर तुम्हाला तुमची स्लिप मिळेल आणि इमेल वर देखील तुम्हाला बुकिंग विषयी माहिती मिळेल.
  9. ही स्लिप किंवा पावती तुम्हाला त्या हॉटेल मध्ये गेल्यावर दाखवावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तेथे बुकिंग केल्यानंतर सुद्धा आपली ओळखपत्रे आणि माहिती रजिस्टर वर द्यावी लागेल. यामागील सर्वात महत्वाचे कारण हे सुरक्षा असल्याने तुम्ही ही माहिती दिली पाहिजे.

FAQ

OYO रुम्स कॅन्सल केल्यास किती चार्ज घेतात?

OYO वरून बुक केलेल्या रुम्स जर आपण चेक इन टाईम अगोदर कॅन्सल केल्या तर आपल्याला 0% चार्ज लागतो. मात्र चेक इन टाईम नंतर कॅन्सल केल्यास 30% च्या आसपास आपल्याला कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागतो.

OYO ची स्थापना कोणी केली?

रितेश अग्रवाल यांनी OYO ची स्थापना केली. रितेश यांनी 2013 साली त्यांची ऑफलाईन कंपनी OYO म्हणून ऑनलाइन सुरू केली.

OYO चे सुरुवातीचे ऑफलाईन असताना नाव काय होते?

OYO चे सुरुवातीच्या काळात ऑफलाईन सुरू असताना Oravel Stays Private Limited हे नाव होते.

OYO हे अविवाहित जोडप्यांसाठी प्रसिद्ध का आहे?

OYO मध्ये अनेकदा अविवाहित जोडपी जातात असा समज आहे आणि तो काही प्रमाणात खरा देखील आहे. OYO मध्ये आपल्याला बुकिंग वेळी तुमच्या स्टेट्स विषयी विचारले जाते किंवा कामाविषयी विचारले जाते. त्यामध्ये कपल साठी चांगले हॉटेल्स OYO तुम्हाला स्वतः सजेस्ट करतात. OYO रुम्स वर आपली त्या एरिया मधील लोकल ओळखपत्रे ग्राह्य धरले जातात आणि त्यामुळे OYO हे अविवाहित जोडप्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Leave a Comment