टीआरपी फुल फॉर्म TRP Full Form In Marathi

TRP Full Form In Marathi सध्या भारतात जे काही टेलिव्हिजन विश्वात धावपळ आणि चढाओढ सुरू आहे ती म्हणजे TRP साठी होय. आज आपण TRP विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. न्यूज चॅनल विश्वात TRP ने जवळपास सर्वांना इतके जास्त वेड लावले आहे की आजकाल हे न्यूज चॅनल म्हणजेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आपल्या परीने अतोनात प्रयत्न करत आहेत.

TRP Full Form In Marathi

टीआरपी फुल फॉर्म TRP Full Form In Marathi

याशिवाय आपण टीव्हीवर जे काही शो बघतो मग त्यात रियालिटी आणि सिरिअल देखील TRP वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतात. जर एखादे चॅनल TRP साठी इतका जास्त खटाटोप करत असेल तर ते TRP म्हणजे काय, TRP चा Full Form काय आहे, TRP का काढतात, TRP कोण आणि कसे ठरवतात, सर्वात जास्त TRP असलेल्या मराठी मालिका कोणत्या आहेत आणि TRP विषयी सर्व माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.

TRP Full Form in Marathi – TRP Long Form in Marathi

TRP या शब्दाचा संबंध आपले टेलिव्हिजन विश्व आणि त्यावर सुरू असलेल्या मालिकाच्या संबंधित आहे. TRP चे इतर काही FULL FORM असतील तरी देखील आपण सर्वात जास्त प्रचलित अशा टेलिव्हिजन विश्वातील TRP ची आज चर्चा करूयात.

TRP शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Television Ranking Point (टेलिव्हिजन रँकिंग पॉईंट्स) असा होतो. मराठी भाषेत TRP शब्दाचा Full Form (अर्थ) हा टेलिव्हिजन क्रमवारी अंक असा होतो.

TRP म्हणजे काय? – What is TRP in Marathi?

TRP म्हणजे टेलिव्हिजन रँकिंग पॉईंट्स होय. हे अंक असतात ज्यांच्या आधारावर टीव्हीवर सुरू असलेल्या मालिकांच्या लोकप्रियतेविषयी माहिती मिळते. एखाद्या मालिकेला त्या वेळेवर सुरू असताना किती लोक बघतात आणि किती लोक त्यावेळी फक्त हीच मालिका बघण्यासाठी पसंती देतात याविषयी TRP वरून माहिती समजते.

TRP हा एखाद्या शहरावरून काढला जात असल्याने त्यामध्ये जास्त सत्यता असतेच असे नाही मात्र तरी देखील TRP जास्त असलेल्या मालिकांना एक सन्मान त्याद्वारे मिळतो. पुणे किंवा मुंबई सारख्या एखाद्या मोठ्या आणि जास्तीत जास्त प्रेक्षक असणाऱ्या शहरांमध्ये एखाद्या ठराविक ठिकाणी एक उपकरण बसविले जाते. आता सध्या त्या भागात कोणत्या प्रकारच्या फ्रिक्वेन्सी हा जास्त प्रमाणात आहेत याविषयी या उपकरणांमधून माहिती मिळते. त्यामुळे या उपकरणांना मीटर असे म्हणतात.

उपकरणांचे कार्य हे मोजणे इतके आहे. यामध्ये एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी सेट केलेली असते आणि त्या वेळेला त्या भागात जितक्या त्या फ्रिक्वेन्सी च्या लहरी असतील त्या मोजण्याचे कार्य म्हणजेच त्यावेळी त्या चॅनलला बघणारे किंवा ती सिरिअल बघनारे किती आहेत याचा आपल्याला आकडा मिळतो.

TRP कोण आणि कसे ठरवतात?

TRP काढण्याचे कार्य हे INTAM या संस्थेच्या मार्फत चालते. INTAM म्हणजे इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मॉनिटरिंग होय. नावांमध्ये या संस्थेविषयी सर्व काही सामावलेले आहे. सुरुवातीच्या काळात घरोघरी जाऊन सर्व्हे करून TRP काढला जात असे. मात्र आता तंत्रज्ञानाचा वापर करून हे कार्य अधिक सोपे झाले आहे. OTT platform आणि टेलिव्हिजन मध्ये असलेल्या कार्डच्या माध्यमातून आपली आवड आणि आपण काय बघतो याची माहिती सहज मिळविता येते आहे.

देशभरात असलेल्या या संस्थेच्या कार्यमार्फत एक डेटा गोळा करून त्यावर एनालिसिस केला जातो. डेटा वरून मग त्या फ्रिक्वेन्सी नुसार त्या चॅनलाचा आणि मालिकेचा TRP सांगितला जातो. जाहिरातदार आणि प्रेक्षक या दोघांसाठी देखील हा TRP खूप जास्त उपयोगी ठरत आहे. मात्र या TRP ला वाढविण्यासाठी अनेकदा मुख्यतः न्यूज चॅनल त्यांच्या सीमा ओलांडत आहेत.

TRP का काढतात? त्याचे फायदे – Why to Calculate TRP? Its Benefits

TRP चा फायदा हा त्या सिरिअल ला जितका होतो त्याहून जास्त मालिका सुरू असलेल्या चॅनलला होत असतो. त्यामुळेच आम्ही सुरुवात करत असताना TRP हा मालिकेचा न म्हणता चॅनलचा म्हणल आहे.

टेलिव्हिजन क्षेत्रात मराठी मध्येच बोलायचं झालं तर सोनी, झी आणि कलर्स सारख्या मोठ्या वाहिन्या सध्या कार्यरत आहेत. यांच्यामध्ये आपले चॅनल जस्टीफ जास्त लोकांनी बघावे म्हणून स्पर्धा सुरू असते. अनेकदा आपल्याला वाटते की आपण जे डिश रिचार्जचे पैसे देतो त्यातून त्यांना पैसे मिळतात मात्र तसे न होता त्यांची कमाई ही सर्वात जास्त त्यांना मिळणाऱ्या जाहिराती मधून होत असते.

सुरू असलेली मालिका जर जास्तीत जास्त TRP असलेली असेल तर तिच्यासाठी मिळणाऱ्या जाहिराती देखील जास्त किंमतीच्या असतात. आता हा हिशोष कसा लावला जातो तर जेव्हा आपण एखादी मालीका बघत असतो तेव्हा त्यातील जाहिराती देखील बघतोच. तर अशा वेळी एखाद्या TRP जास्त मालिकेतील जाहिरातींना जास्तीत जास्त लोक बघणार त्यामुळे या जाहिरातींचा रेट देखील जास्त असतो.

TRP मोजण्यासाठी पीपल्स मीटर चा वापर केला जातो. हे मीटर सर्व ठिकाणी बसविलेले नसल्याने यातून येणारी माहिती ही अगदी 100% खरी असे नाही मात्र जाहिरात देण्यासाठी ज्यांना टार्गेट करायचे आहे तिथले जर TRP वापरलेले असेल तर मग हे त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरते.

सर्वाधिक TRP असलेल्या मराठी मालिका – Marathi Serials with Highest TRP

झी मराठी ही वाहिनी सध्या टेलिव्हिजन विश्वात TRP च्या बाबतीत खूप जास्त पुढे आहे. झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये आपण अनेकदा इतर म्हणजेच बॉलिवूड सारखे स्टार्स आलेले बघतो. याचे कारण त्यांचा वाढलेला TRP हेच आहे.

आपण आता टॉप चे काही मराठी चॅनल्स आणि त्यांच्यावरील सर्वाधिक TRP असलेल्या मालिकांविषयी जाणून घेऊयात.

  • चला हवा येऊ द्या (झी मराठी)
  • आई कुठे काय करते (स्टार प्रवाह)
  • महाराष्ट्राची हास्य जत्रा (सोनी मराठी)

FAQ

सर्वाधिक TRP असलेली भारतातील मालिका कोणती आहे?

द कपिल शर्मा शो ही हिंदी मालिका भारतातील सर्वाधिक टीआरपी म्हणजेच 4.1 मिलियन TRP असलेली मालिका आहे.

TRP मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात?

TRP मोजण्याआठी पीपल्स मीटर या फ्रिक्वेन्सी मॅचिंग उपकरणाचा वापर केला जातो.

भारतातील TRP मोजणाऱ्या संस्थेचे नाव काय आहे?

भारतात टेलिव्हिजन विश्वात TRP मोजण्याचे कार्य INTAM (इंडियन टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट्स) अंतर्गत चालते.

TRP चा चॅनल्स साठी काय फायदा होतो?

जास्त TRP असेल तर त्या चॅनलला जाहिरात देण्यासाठी जास्तीत जास्त पैसे मिळतात. TRP चा फायदा हा त्या मालिकेला आणि चॅनलला जास्तीत जास्त पैसे कमविण्यासाठी होत असतो.

Leave a Comment