सीआरपी फुल फॉर्म CRP Full Form In Marathi

CRP Full Form In Marathi आपण कोरोना आजाराच्या काळात अनेक नवीन शब्द ऐकले त्यातीलच एक शब्द म्हणजे क्रप. CRP हा शब्द आपण नक्कीच ऐकला असेल. Corona आजाराच्या काळामध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करण्याची गरज पडत होती. अशावेळी दवाखान्यात किंवा इतर ठिकाणी CRP टेस्ट हा शब्द उच्चारला जात होता. आजच्या लेखात आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. CRP म्हणजे काय, cro meaning in Marathi, CRP long form in marathi हे सर्व आजच्या लेखात बघुया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.

CRP Full Form In Marathi

सीआरपी फुल फॉर्म CRP Full Form In Marathi

CRP Full Form In Marathi | CRP Long Form In Marathi

CRP या शब्दाचा Full Form In Marathi म्हणजेच CRP Long Form In Marathi हा C-Reactive Protein (सी – रिॲक्टिव प्रोटीन) असा आहे.

CRP म्हणजे काय? | What Is CRP? :

आपल्याला माहीत आहे की corona आजाराच्या काळात अनेक वैद्यकीय चाचण्या जनसामान्यांना कराव्या लागल्या. त्यातीलच एक म्हणजे CRP. CRP हि चाचणी कशी केली जाते हे आपण बघुया.

CRP टेस्टमध्ये रक्तातील C-Reactive Protein ची पातळी मोजली जाते. आपल्या रक्तात c-reactive नावाचा एक Porotein असतो. ह्या C-Reactive प्रोटीनची पातळी हि c-reactive चाचणीचे मोजता येते. आता ह्या प्रोटीन आणि आजाराचा काय संबंध?

C-Reactive प्रोटीन म्हणजेच CRP हे protein यकृत म्हणजेच लिव्हर (liver) मध्ये जेव्हा जळजळ म्हणजेच inflammation (इन्फ्लंमेशन) होते तेव्हा तयार होते. जेव्हा जळजळ होते तेव्हा यकृत त्याच्या प्रतिसादात CRP प्रोटीन तयार करते. जेव्हा CRP ची पातळी वाढते त्यावरून आपण एखादा रोग झाला आहे याचे निदान करू शकतो.

म्हणून शरीरात CRPची पातळी किती आहे यावरून रोगाचे निदान करता येऊ शकते, त्यासाठी CRPटेस्ट केली जाते. कर्करोग, एखाद्या विषाणूचा संसर्ग इत्यादी अनेक कारणांमुळे CRPची पातळी वाढू शकते. म्हणून CRP ची पातळी शरीरात वाढल्यावर CRPटेस्ट करणे गरजेचे असते.

आपण बघितले की CRP म्हणजे काय आता आपण बघुया की CRP वाढण्याचे कारण काय काय असू शकतात.

CRP ची कारणे :

CRP हे खालील कारणांमुळे वाढू शकते –

  • सेप्सिस सारखे जीवाणूंचा संसर्ग झाल्यावर CRP वाढते.
  •  एखादे fungal (फंगल) म्हणजेच बुरशी infection (इन्फेक्शन) झाल्यास CRPचे प्रमाण वाढते.
  •  हृदयविकाराचा झटका आल्यास किंवा येणार असल्यास CRPचे प्रमाण वाढते.
  •  एखादा दाहक म्हणजे आतड्याचा रोग झाल्यास CRPचे प्रमाण वाढते.
  •  निमोनिया झाल्यास CRPचे प्रमाण वाढते.
  •  क्षयरोग झाल्यास CRPचे प्रमाण वाढते.
  •  Osteomyelitis (ऑस्टियोमायलिटिस) म्हणजेच हाडांचे इन्फेक्शन झाल्यास CRPचे प्रमाण वाढते.
  •  संधिवात झाल्यावर देखील शरीरातील CRPवाढते.
  •  Lupus (ल्युपस) हा आजार झाल्यावर CRPवाढते.
  •   हृदयविकाराचा झटका
  • दाहक आतडी रोग
  •  ऑस्टियोमायलिटिस (हाडाचा संसर्ग)
  •  न्यूमोनिया किंवा क्षयरोग
  • ल्युपस किंवा संधिवात सारखे स्वयंप्रतिकार विकार
  •  Arthritis (अर्थिरित्स) हा रोग झाला की CRPचे प्रमाण वाढते.
  •  CRPची पातळी हि शरीरात इतर कारणांमुळे देखील वाढू शकते जसे की धूम्रपान, व्यामाचा अभाव असल्यास, लठ्ठपणा, इ. कारणांमुळे CRPप्रमाण शरीरात वाढू शकते.

वरीलपैकी कोणतीही आजार झाल्यास CRPटेस्ट हि केली जाते. वरच्या आजारांशिवय जर एखाद्या व्यक्तीस ताप येत असेल, मळमळ – उलट्या होत असेल, थंडी वाजून येत असेल आणि हृदयाची धडधड होत असेल अशावेळी डॉक्टर CRPटेस्ट करण्याचा सल्ला देतात. म्हणूनच corona विषाणूचा संसर्ग झाल्यावर CRPटेस्ट सांगितली जाते.

आता आपण बघितले की CRPम्हणजे काय आणि CRPचे प्रमाण कधी वाढू शकते, कोणत्या आजारांसाठी CRPटेस्ट करण्याची गरज पडू शकते. आता लेखाच्या पुढच्या भागात बघुया की CRPटेस्ट कशी केली जाते.

CRPटेस्ट कशी केली जाते? | How Is the CRP Test Performed? :

आपण  बघुया की CRP टेस्ट कशी केली जाते. CRP टेस्ट करण्यासाठी सर्वप्रथम हातामधील रक्तवाहिन्यातून सुईने आवश्यक तेवढे रक्त घेतले जाते. त्यानंतर हा रक्ताचा नमुना कुपीमध्ये गोळा केले जाते आणि ते पुढे CRPटेस्ट करण्यासाठी पाठवले जाते.

जेव्हा रक्तात CRPची पातळी हि उच्च असते किंवा नॉर्मल पेक्षा जास्त असते तेव्हा शरीरात कुठल्यातरी प्रकारची जळजळ असल्याचे दाखवते. पण CRPटेस्ट हे जळजळ शरीरातील नेमक्या कुठल्या भागात जळजळ म्हणजेच inflammation आहे आणि कोणत्या अर्णमुळे जळजळ होत आहे हे सांगत नाही.

CRP टेस्ट मध्ये मिळालेली CRPची पातळी हि CRP प्रती लिटर रक्तात किती ग्राम CRP आहे ह्या प्रमाणात मोजली जाते. म्हणजे एका लिटर रक्तात किती मिली ग्राम CRPआहे हे CRPटेस्ट मोजतो. CRPटेस्ट करण्यासाठी कुठ्ल्याही प्रकारची विशिष्ट तयारी करावी लागत नाही.

CRPटेस्ट करण्यासाठी रुग्ण कधीही जाऊ शकतो. तसेच CRPटेस्ट करण्यासाठी जास्त वेदना होत नाही. म्हणून CRPटेस्ट हि रुग्णासाठी करण्यास सोपे आणि कमी वेदनेचे ठरते.

अशाप्रकारे आजच्या लेखात आपण बघितले की CRPम्हणजे काय, CRP Meaning In Marathi तसेच CRP Long Form In Marathi, CRP Full Form In Marathi आणि  यासोबतच CRP विषयी इतर सर्व माहिती आपण आज बघितली आहे.

FAQs – Frequently Asked Questions:

CRP जास्त असेल तर त्याचा अर्थ काय?

रक्तामध्ये CRPची पातळी जर जास्त असेल तर ते शरीरातील जळजळ म्हणजे inflammation (इनफ्लामेशन) जास्त असल्याचे चिन्ह असते. CRPहा एखाद्या प्रकारचा संसर्ग ते कर्करोग अश्या कुठ्ल्याही प्रकारे होऊ शकते. त्यासोबतच CRPजर जास्त असेल तर ते हृदयातील रक्तवाहिन्यांत जळजळ असल्यामुळे देखील होऊ शकते, अशावेळी हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.

सामान्य CRP पातळी काय आहे?

सर्वसाधारणपणे, सामान्य CRPपातळी हि 3 mg/L म्हणजे प्रती लिटर 3 मिलिग्राम असते. नॉर्मल CRPपातळीत थोडाफार फरक होऊ शकतो.

सीआरपी चाचणी कोविडशी संबंधित आहे का?

कोविड-19 आजार असलेल्या रुग्णांच्या तपासणी केल्यानंतर आणींत्यावर अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनास आले की Covid-19 रुग्णांमध्ये CRPचे प्रमाण जास्त वाढते. Covid-19 आजारांच्या रुग्णांमध्ये CRPपातळी हि सरासरी 20 ते 25 मग/ल एवढ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली. सौम्य आजार असल्यावर CRPची पातळी असते त्यापेक्षा Covid-19 आजार असलेल्या रुगांमध्ये हि पातळी खूप जास्त होती म्हणून जर रुग्णात एवढ्या जास्त प्रमाणात CRPपातळी असेल तर त्यास Covid-19 आजार असू शकतो असे निदान करण्यात आले.

CRP शब्दाचा full form काय आहे?

CRPशब्दाचा full form हा C-Reactive Protein असा आहे. हे एक प्रोटीनचे नाव असून त्यासोबतच हे एका वैद्यकीय चाचणीचे नाव आहे.

Leave a Comment