सीओ फुल फॉर्म CO Full Form In Marathi

CO Full Form In Marathi – CO शब्द कदाचित तुम्ही ऐकलेला नसेल कारण CO हे आपल्याकडील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पद नाहीये. उत्तरेकडील राज्यांमध्ये पोलीस दलातील CO हे एक पद आहे. आज आपण CO म्हणजे काय, CO चा फुल फॉर्म, CO बनण्यासाठी पात्रता, CO ची कार्ये, CO होण्यासाठी निवड प्रक्रिया, CO चा पगार आणि इतर CO विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

CO Full Form In Marathi

सीओ फुल फॉर्म CO Full Form In Marathi

CO Full Form in Marathi । CO Long Form in Marathi

CO हे पोलीस दलातील एक पद आहे. याशिवाय CO चे इतरही काही फुल फॉर्म आहेत मात्र त्यांचा संबंध वेगळ्या क्षेत्रांसोबत आहे. CO शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Circle Officer (सर्कल ऑफिसर) असा होतो. CO शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा मंडळ पदाधिकारी असा होतो.

CO म्हणजे काय? – What is CO in Marathi?

CO म्हणजे सर्कल ऑफिसर होय. महाराष्ट्र राज्यात या प्रकारचे पद पोलीस दलात नाही. आपल्याकडे पोलीस दलाची एक वेगळी तुकडी सांभाळणारे जे पोलीस उपायुक्त किंवा पोलीस सहाय्यक आयुक्त असतात त्यांना उत्तरेकडील काही राज्यांमध्ये सर्कल ऑफिसर म्हणले जाते. म्हणजे पोलीस उपायुक्त किंवा पोलीस सहाय्यक आयुक्त हेच पद CO आहे.

उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार आणि उत्तराखंड या मुख्य राज्यांमध्ये पोलीस दलातील एका विभागाच्या अधिकाऱ्याला CO म्हणून पद दिले जाते. CO हा अधिकारी जरी असला तरी देखील त्याला वेगवेगळ्या तुकड्यांचा प्रमुख बनविलेले असते. त्यामुळे त्याच्या तुकडीचे नेतृत्व करण्याचे काम त्यांच्याकडे असते.

CO ची कार्ये – Works of CO

CO हा अधिकारी विविध विभागांच्या तुकड्यांचे नेतृत्व करत असल्याने त्याला त्याच्या क्षेत्रानुसार विविध कामे वाटून दिलेली आहेत.

  •  आपल्या तुकडीच्या माध्यमातून आपल्या सर्कल मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे.
  •  आपल्या सर्कल क्षेत्रात नागरिकांचे आणि मालमत्तांचे संरक्षण करणे.
  •  आपल्या क्षेत्रात विकासाची कामे होत असताना त्यावर लक्ष ठेवणे.
  •  सरकारी अधिकारी म्हणून गरजेच्या ठिकाणी नियंत्रण आणि हातभार लावणे.
  •  तुकडी अनुसार त्या क्षेत्रात कार्यभार करणे.
  • CO हा एक उच्च पदस्थ अधिकारी असल्याने त्यांच्या अंतर्गत इतर काही पदाधिकारी तो नेमणूक करत असतो. त्या सर्व हाताखालील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच तो कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत असतो.
  • CO च्या अंतर्गत कार्यभार चालविण्यासाठी डिस्ट्रिक्ट मॅजेस्ट्रेट म्हणजेच डीएम, पोलीस अधिकारी आणि इतर नगर विकास अधिकारी कार्यरत असतात. CO चा कार्यभार या अधिकाऱ्यांवर विभागून दिलेला असतो.

CO ची निवड कशी होते?

तुम्हाला CO बनायचे असेल तर वर सांगितलेल्या राज्यांमध्ये तुम्हाला हे पद मिळेल. या पदावर जाण्यासाठी तुम्हाला लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्याव्या लागतील. प्रत्येक राज्यांकडून त्यांच्या राज्यातील प्रशासकीय सेवेसाठी या परीक्षा घेतल्या जातात.

MPSC प्रमाणेच पहिले पूर्व परीक्षा नंतर मुख्य परीक्षा आणि सर्वात शेवटी मुलाखत ही रचना CO साठी आहे. फक्त CO साठी शेवटची मुलाखत ही शारीरिक चाचणी सोबत घेतली जाते. UPSC प्रमाणे शेवटी मेरिट यादी जाहीर करून मग CO हे पद भरती केले जाते.
शेवटी मुलाखत होत असताना तुम्हाला शारीरिक चाचणी हा टप्पा पार करावा लागतो आणि त्यासोबतीला मेडिकल टेस्ट देखील द्यावी लागते.

CO बनण्यासाठी पात्रता निकष – CO Eligibility Criteria

CO होण्यासाठी इतर लोकसेवा आयोगाच्या पात्रता निकषांप्रमाणे सर्व निकष लागू केलेलं असतात. त्यांची यादी खालीलप्रमाणे,

  •  विद्यार्थ्यांची म्हणजेच उमेदवारांची बारावी शिक्षण हे कोणत्याही शाखेतून पूर्ण झालेले असावे. त्याला या परीक्षेत 60% गुण असणे आवश्यक असते.
  •  उमेदवाराने त्याच्या राज्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेतलेले असावे. त्याच्याकडे पदवी प्रमाणपत्र असावे.
  •  ज्या राज्याने हे पद निर्माण केले आहे किंवा ज्या राज्याला या पदांची भरती करायची आहे त्या राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तुम्हाला घ्याव्या लागतात. त्यासाठी त्या राज्याचा नागरिक असणे गरजेचे असते.
  •  CO होण्यासाठी वयोमर्यादा अटी देखील आहेत. कमीत कमी वय हे 21 वर्षे तर जास्तीत जास्त 40 वर्षे असावे. यामध्ये इतर मागासवर्गीय जातींना वयाची अट सैल केली जाते.
  • टीप- महाराष्ट्र राज्यात हे पद नाहीये. त्यामुळे या पदासाठी तुम्हाला अर्ज करत असताना त्या दुसऱ्या राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे.

CO चे वेतन – Salary of CO

CO म्हणजेच सर्कल ऑफिसर चे वेतन हे 9 हजार रुपये ते 34 हजार 800 रुपये इतके असते. यामध्ये वेळेनुसार बदल होऊ शकतात मात्र हा आकडा साधारणतः 35 हजार इतका असतो.

वेतनाशिवाय त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ग्रेड पे (5000 रुपये), इतर सुविधा आणि भत्ते हे मिळत असतात. याशिवाय या अधिकाऱ्याला प्रशासनाची गाडी असते. त्यामुळे त्या गाडीचा खर्च देखील शासनाकडून मिळत असतो.

CO चे इतर Full Form – Other Full Forms of CO

CO चे राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात देखील सेंट्रल ऑफिसर व्यतिरिक्त इतर काही फुल फॉर्म देखील आहेत.

  • Commanding Officer
  •  Corrections Officer
  •  Commissioner’s Officer
  •  Contracting Officer

FAQ

CO हे पद कोणत्या राज्यांमध्ये आहे?

CO म्हणजेच सेंट्रल ऑफिसर हे पद राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये आहेत.

CO चा फुल फॉर्म प्रशासकीय क्षेत्रात काय आहे?

प्रशासकीय क्षेत्रात CO चा फुल फॉर्म हा सर्कल ऑफिसर असा होतो.

CO चा फुल फॉर्म काय आहे?

आपण अनेकदा आपल्या पोस्ट ऑफिसच्या पार्सल वर CO हा शब्द नक्की वाचलेला किंवा लिहिलेला असेल. तर हा C/O म्हणजे Care Of (केअर ऑफ) होय.

CO चा विज्ञानात म्हणजेच रसायनशास्त्रातील फुल फॉर्म काय आहे?

रसायनशास्त्र विषयात CO चा full form हा कार्बन मोनॉक्साईड (Carbon Monoxide) असा होतो.

CO हा IPS अधिकारी असतो का?

नाही, CO हा IPS अधिकारी नसतो. CO हा महाराष्ट्रातील DSP किंवा ACP दर्जाचा अधिकारी असतो.

Leave a Comment