इस्रो फुल फॉर्म ISRO Full Form In Marathi

ISRO Full Form In Marathi – ISRO या भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेविषयी सर्वांना माहिती असेलच मात्र ISRO म्हणजे नक्की काय, ISRO चा फुल फॉर्म काय आहे, ISRO चा इतिहास, ISRO ची कार्ये, ISRO ची केंद्रे, ISRO च्या मुख्य कामगिरी याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. इसरो हा भारताचा अभिमान का आहे याविषयी देखील तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून माहिती मिळेल.

ISRO Full Form In Marathi

इस्रो फुल फॉर्म ISRO Full Form In Marathi

ISRO Full Form in Marathi | ISRO Long Form in Marathi

इसरो ही भारताची एक अवकाश संशोधन संस्था असून भारताच्या शिरपेचात मानाचे अनेक तुरे रोवण्याचे काम या ISRO संस्थेने केलेले आहे. ISRO चा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.

ISRO शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Indian Space Research Organisation (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) असा आहे. ISRO शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था असा होतो. सामान्यतः इस्रो किंवा इसरो या नावाने ही संस्था ओळखली जाते.

ISRO म्हणजे काय? – What is ISRO in Marathi?

भारतातील महत्वाची आणि केंद्र सरकारी आदेशानुसार कार्यरत असलेली अवकाश संशोधन संस्था म्हणजे ISRO होय. इस्रो म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था होय. भारताचे वर्चस्व अंतराळात देखील ठेवण्यासाठी इस्रो संस्थेचे मोठे योगदान आहे.

भारतात असलेल्या स्पेस कमिशन अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या डिपार्टमेंट ऑफ स्पेस (अंतराळ विभाग) अंतर्गत ISRO चे कार्यभार चालतात. भारतातून जे काही अवकाश संशोधन केले जाते किंवा जी काही प्रक्षेपणे केली जातात त्यासाठी इस्रो कार्यरत असते. यामध्ये सॅटेलाईट सोडणे, अवकाश यान प्रक्षेपण करणे आणि एखाद्या ग्रहाच्या मोहिमा आखण्याचे काम इस्रो करत असते.

ISRO चा इतिहास – History of ISRO in Marathi

ISRO या अवकाश संशोधन संस्थेच्या स्थापनेचे सर्व श्रेय हे डॉ विक्रम साराभाई यांना जाते. डॉ विक्रम साराभाई यांना जरी हे श्रेय दिले जात असले तरी देखील इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च म्हणजेच INCOSPAR या संस्थेच्या अध्यक्षस्थानी डॉ विक्रम साराभाई होते.

ISRO चे आधी हेच नाव होते. मराठी मध्ये इसरो चे जुने नाव हे भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समिती असे होते.
ISRO ची स्थापना 1962 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर पुढे जाऊन 1969 मध्ये डॉ विक्रम साराभाई अध्यक्ष असताना या संस्थेचे नाव बदलून ISRO म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन करण्यात आले.

ISRO ची कार्ये – Works of ISRO

  • आपल्याकडे टेलिव्हिजन, संरक्षण आणि इतर ठिकाणी गरजेचे असणारे उपग्रह अंतराळात पाठविण्यासाठी त्यांच्या डिझाइन करणे. त्यांना अंतराळात पाठविण्यासाठी आवश्यक त्या सर्व तरतुदी पूर्ण करणे.
  •  भारताने सुरू केलेल्या नाविक या नेव्हीगेशन अँप साठी उपग्रहांच्या निर्मितीची आणि त्यांच्या मध्ये विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी इस्रो कडे आहे.
  •  रॉकेट्स आणि स्पेस लौंचिंग व्हेईकल्स बनविणे आणि त्यांच्यामध्ये अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी कार्यरत असणे.
  •  नैसर्गिक आपत्ती साठी अधिसूचना देण्यासाठी उपग्रह निर्मिती विकास आणि प्रक्षेपण करण्याची जबाबदारी इस्रो ची आहे. नैसर्गिक आपत्ती काळात आपतीग्रस्त क्षेत्राशी संपर्क करणे.
  •  अंतराळात पाठविलेल्या भारतीय उपग्रह आणि स्पेश स्टेशन सोबत संपर्क कायम ठेवून त्यांची देखरेख व काळजी घेणे. त्या मालमत्तेचे जतन करणे ही देखील इस्रो ची जबाबदारी असते.
  •  इतर देशांच्या अंतराळ संस्थांसोबत समन्वय ठेवून आंतरराष्ट्रीय अंतराळ संबंध कायम ठेवणे.

ISRO ची प्रमुख केंद्र – ISRO Centers in India

भारतात अवकाश संशोधन आणि प्रक्षेपण करण्यासाठी ISRO ने देशभरात अनेक केंद्र स्थापन केलेली आहेत. यामध्ये काही लौंचिंग स्टेशन आहेत तर अनेक संशोधन केंद्रे आहेत.नावावरून त्या केंद्राचे कार्य तुम्हाला सहज समजू शकेल.

  •  VSSC – Vikram Sarabhai Space Centre, Thiruvananthapuram
  •  SDSC SHAR – Satish Dhawan Space Centre, ShrihariKota
  •  URSC – U R Rao Satellite Centre, Vimanapura
  •  LPSC – Liquid Propulsion Systems Centre, Valiamala
  •  IPRC – ISRO Propulsion Complex, Mahendragiri
  •  SAC – Space Animation Centre, Ahmedabad
  •  NTSC – National Remote Sensing Centre
  •  ISTRAC – ISRO Telemetry, Tracking and Command Network, Banglore
  •  IISU – ISRO Inertial Systems Unit, Thiruvananthapurm
  •  LEOS – Laboratory for Electro-Optics Systems
  •  DECU – Development and Educational Communication Unit
  •  IIRS – Indian Institute of Remote Sensing
  •  MCF – Master Control Facility
  •  Department of Space and ISRO HQ
  •  Antrix Corporation Limited
  •  NSIL – NewSpace India Limited

ISRO च्या प्रमुख कामगिरी

  •  आर्यभट्ट हा इस्रो ने प्रक्षेपित केलेला पहिला उपग्रह भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा पाया रचणारे यश म्हणून ओळखले जाते. 19 एप्रिल 1975 रोजी इस्रो ने ही कामगिरी करून संपूर्ण जगाला भारताचे अंतराळातील स्थान दाखवून दिले होते.
  •  22 ऑक्टोबर 2008, हा दिवस म्हणजे जणू भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी आपले संपूर्ण जगाला वर्चस्व दाखविण्यासाठी पुरेसा ठरला. सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान 1 प्रक्षेपित केले गेले. चंद्राच्या कक्षेत चांद्रयान काही काळात स्थिरावले गेले. अपयश तर तेव्हा आले जेव्हा काही काळानंतर या चांद्रयानाचा संपर्क पूर्णपणे तुटला.
  •  चांद्रयान 1 चे सर्वात मोठे यश म्हणजे जे नासा सारख्या मोठ्या संस्थांना जे जमले नाही ते इस्रो ने करून दाखविले. चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावण्याचे काम याच चांद्रयान 1 मुळे शक्य झाले.
  •  पुढे इस्रो ची चांद्रयान 2 ही मोहीम यशस्वी झाली. आज आपण चांद्रयान 2 च्या मदतीनेच चंद्राची सर्व माहिती जगभरातील इतर अवकाश संशोधन संस्थांना देखील देतो आहे.
  •  भारताची मंगळ यान ही मोहीम देखील यशाचे उत्तुंग शिखर आहे. 24 सप्टेंबर 2014 हा दिवस म्हणजे भारताने मंगळाच्या सीमा ओलांडत कुंडली मध्ये असणाऱ्या मंगळाला भेटणारे मंगळयान चंद्राच्या कक्षेत यशस्वीरीत्या पाठविले.

FAQ

ISRO चे जुने नाव काय होते?

INCOSPAR हेच ISRO चे जुने आणि अगदी सुरुवातीच्या काळातील नाव होते. INCOSPAR म्हणजे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च होय.

ISRO ची स्थापना कोणी केली?

ISRO ची स्थापना करण्याचे श्रेय डॉ विक्रम साराभाई यांना जाते.

ISRO चे अध्यक्ष कोण आहेत?

ISRO या संस्थेचे अध्यक्ष डॉ के शिवन हे आहेत. शिवन यांना त्यांच्या कामगिरी बद्दल रॉकेट मॅन ऑफ इंडिया या नावाने संबोधले जाते.

भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? ISRO ने यशस्वीपणे प्रक्षेपित केलेला पहिला उपग्रह कोणता आहे?

ISRO ने प्रक्षेपित केलेला पहिला उपग्रह म्हणजे आर्यभट्ट होय.

Leave a Comment