व्हीआयपी फुल फॉर्म VIP Full Form In Marathi

VIP Full Form In Marathi : VIP हा शब्द आपण सर्रासपणे एखाद्याची चेष्टा करताना किंवा जेवहा कोणी एखादा प्रतिष्ठित व्यक्ती येणार असेल तेव्हा करत असतो. मात्र हे VIP म्हणजे नक्की काय प्रकरण आहे, VIP शब्दाचा फुल फॉर्म काय आहे, VIP आणि VVIP म्हणजे नक्की काय, भारतात कोणाला VIP म्हणले जाते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

VIP Full Form In Marathi

व्हीआयपी फुल फॉर्म VIP Full Form In Marathi

VIP Full Form in Marathi | VIP Long Form in Marathi

सोप्या भाषेत आपण ज्याला महत्व द्यायचे आहे किंवा ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे अशा व्यक्तीला VIP म्हणून ओळखतो. VIP शब्दाचा इंग्रजी भाषेत FULL FORM हा Very Important Person (व्हेरी इम्पोर्टन्ट पर्सन) असा होतो. VIP शब्दाचा मराठी भाषेत full Form हा अतिशय महत्वाचा व्यक्ती किंवा खूप महत्वाचा व्यक्ती असा होतो.

VIP म्हणजे काय? What is VIP in Marathi?

आपल्याकडे सर्व नेत्यांना आपण VIP म्हणत असतो याशिवाय आपल्याकडे जे स्टार आहेत म्हणजे अभिनेते, युट्युबर, क्रिकेटपटू, खेळाडू या सर्वांना आपण VIP म्हणतो. VIP म्हणजे एक प्रकारे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा इतकी जास्त असते की त्याला महत्वाचा दर्जा दिला जातो.

एखादा कार्यक्रम असेल किंवा एखाद्या समारंभात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जर वरील सांगितल्यापैकी किंवा लोकांमध्ये लोकप्रिय असलेली एखादी व्यक्ती येत असेल तर तिथे आपण साहजिकपणे बोलून जातो की VIP आलेली आहे.

आपल्याकडे आपण VIP कोणालाही म्हणत असलो तरी देखील VIP हा एक प्रकारे दर्जा आहे. या VIP व्यक्तींना काही वेगळे अधिकार असतात. यामध्ये त्यांच्या बाजूने बॉडीगार्ड असतात. त्या VIP व्यक्तीला स्वतःच्या जीविताच्या संरक्षणासाठी एखादे हत्यार बाळगण्याची परवानगी सरकार कडून देण्यात येते.

आता VIP नंतर VVIP ही एक संकल्पना समोर येते. VVIP चा फुल फॉर्म हा Very Very Important Person असा होतो. आता यामध्ये आणखी एक Very लागल्यानंतर तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही व्यक्ती VIP व्यक्तीपेक्षा देखील जास्त महत्वाची असते.

आपण VIP ची तुलना करत असताना त्याला आपल्या सामान्य जनतेच्या तुलनेत अधिक महत्वपूर्ण समजत असतो आणि VVIP म्हणजे हा व्यक्ती त्या सर्व VIP व्यक्तींच्या तुलनेत अधिक महत्वपूर्ण असतो.

भारतात VIP आणि VVIP कोण आहेत?

आपल्याला वरील माहितीनुसार हे तर कळाले असेल की VIP आणि VVIP हा व्यक्तींना दिला जाणारा विशेष दर्जा आहे. मुख्यतः भारतात राजकीय नेतृत्व आणि शासकीय नेतृत्वाना VIP आणि VVIP हा दर्जा दिला जातो.

भारतात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांना VVIP दर्जा दिला जातो. प्रत्येक राज्याचे राज्यपाल, राज्यसभा आणि लोकसभा सदस्य, अध्यक्ष, आमदार आणि खासदार यांना देखील VIP दर्जा दिला जातो. पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यकारणीमधील सर्व सदस्यांना VIP दर्जा असतो.

शासकीय सेवेत असलेले कर्मचारी म्हणजे IAS, IPS, IRS, ICS, IFS या सर्व आणि UPSC अंतर्गत भरती होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना VIP दर्जा दिला जातो. न्यायव्यवस्थेत येणारे सुप्रीम व हाय कोर्टाचे न्यायाधीश हे भारतीय VVIP दर्जामध्ये येतात. या व्यतिरिक्त भारतात असलेले अभिनेते आणि कलाकार, क्रिकेटपटू आणि खेळाडू, प्रतिष्ठित बिझनेसमन हे देखील VIP यादीमध्ये असतात.

भारत देश आणि VIP

भारतात VIP अंक VVIP या संकल्पना रद्द करून सर्वांना समान वागणूक देण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे. अनेकदा आपण यावर विचार केला तर एखादा VIP व्यक्ती जाणार असेल तर त्याचा त्रास सामान्य नागरिकांना काही काळासाठी रस्ते बंद करून दिला जातो.

मात्र यावर आता गांभीर्याने विचार केला जातो आहे. काही दिवसांपूर्वी मंत्र्यांच्या गाड्यांवर असणारे लाल दिवे काढण्याचे आदेश सराकरने देऊन एकप्रकारे VIP दर्जा बंद करण्यासाठी एक पाऊल उचलले होते.

भारतात जरी ही VIP प्रथा बंद होणार असली तरी देखील महत्वाच्या व्यक्तींसाठी ही सुरूच राहणार हे मात्र नक्की आहे. आपल्याकडे या सर्व महत्वाच्या व्यक्तींसाठी म्हणजेच VVIP लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुरक्षा दिल्या जातात.

भारतात झेड प्लस (Z+), झेड (Z), वाई (Y) आणि एक्स (X) या मुख्य सुरक्षा व्यवस्था आहेत. आपल्याकडे राष्ट्रपती आणि पंतप्रधान व सोबत हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांनाच फक्त झेड प्लस सुरक्षा दिली गेली आहे.

VIP चे इतर काही FULL FORM

Video Image Processing – संगणक क्षेत्रातील ही सर्वात मोठी शाखा आहे ज्यामध्ये व्हिडीओ आणि इमेज यांच्यावर प्रक्रिया केली जाते. आपण जे व्हिडीओ आणि फोटो एडिटिंग करतो त्याचा संबंध या व्हिडीओ इमेज प्रोसेसिंग सोबत आहे. व्हिडीओ आणि फोटो यांच्यावर प्रक्रिया करून त्यांना सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठविण्यासाठी या VIP तंत्रज्ञान वापरले जाते.

Variable Interest Plan – आर्थिक क्षेत्रात कमी जास्त होणारे व्याजदर लक्षात घेऊन आपल्या मुदत ठेवींवर आपल्याला Variable Interest Plan लागू करता येतो. किंवा कर्जावर देखील VIP लागू होत असतो.

Video Information Provider
Visual Interactive Programming
Visual Inspection Program
Volunteers in Progress
Very Important Place

Voucher Insurance Program – आपल्याला इन्श्युरन्स क्षेत्रात भरपूर वेळा हा शब्द कानावर पडतो. व्हाउचर स्वरूपात आपल्याला आपला इन्श्युरन्स हवा तेव्हाच क्लेम करता येतो.

Vision, Impact and Purpose – आर्मी क्षेत्रात हे शब्द वापरले जातात.

Virtual Internet Protocol – इंटरनेट विश्वात जेव्हा आपण एखादे VPN वापरतो तेव्हा आपला IP हा एक प्रकारे VIP म्हणजेच व्हर्च्युअल IP म्हणून काम करतो.
Virtual Internet Provider

VIP बॅग्स

VIP हा भारतातील मुंबई मधून सुरू झालेला एक बॅग्स चा मोठा ब्रँड आहे. त्याचे कार्यालय मुंबई मध्ये असून 50 हुन अधिक देशांमध्ये त्यांचे आउटलेट्स आहे. भारतात जवळपास 8 हजार हुन अधिक ठिकाणी तुम्हाला VIP बॅग्स चे आउटलेट बघायला मिळेल.

FAQ

VIP चा Full Form काय आहे?

VIP शब्दाचा Full Form हा Very Important Person हा आहे. याशिवाय प्रत्येक क्षेत्रानुसार याचे विविध फुल फॉर्म आहेत.

VVIP व्यक्तींना कोणत्या दर्जाची सुरक्षा दिली जाते?

VVIP व्यक्तींना भारत झेड प्लस (Z+) आणि झेड (Z) दर्जाची सुरक्षा दिली जाते.

VIP हा भारतीय ब्रँड आहे का?

हो, बॅग्स च्या बाबतीत VIP इंडस्ट्रीज हा भारतीय ब्रँड आहे. VIP इंडस्ट्रीजची सुरुवात नाशिक मधून झाली होती आणि आज त्यांचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे.

VIP इंडस्ट्रीज चे मालक कोण आहेत?

VIP या आशिया खंडातील सर्वात मोठ्या लगेज निर्माता कंपनीचे मालक हे श्री दिलीप जी. पिरामल हे आहेत.

Leave a Comment