आरएनए फुल फॉर्म RNA Full Form In Marathi

RNA Full Form In Marathi : RNA हा शब्द मेडिकल क्षेत्रातील आहेच सोबतच आपल्याला इयत्ता बारावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात देखील वाचायला मिळतो. मात्र आपण तेव्हा हा शब्द वाचून पाठ जरी केलेला असला तरी देखील आता आपल्याला तो काही लक्षात नसतो, हे देखील खर आहे. आज आपण RNA म्हणजे नक्की काय, RNA चा Full Form काय आहे, RNA चे विविध प्रकार कोणते आहेत, DNA आणि RNA यामध्ये नक्की काय फरक आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

RNA Full Form In Marathi

आरएनए फुल फॉर्म RNA Full Form In Marathi

RNA Full Form in Marathi | RNA Long Form in Marathi

RNA हा मनुष्याच्या शरीरातील एक घटक आहे. विज्ञानात याला DNA प्रमाणे एक महत्वाचे स्थान आहे. मेडिकल क्षेत्रात आपल्याला RNA चा अभ्यास करता येतो.
RNA शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Ribonucleic Acid (रायबोन्यूक्लीक ऍसिड) असा होतो. मराठी भाषेत RNA शब्दाचा Full Form हा रायबोज न्यूक्लिक आम्ल असा होतो.

RNA म्हणजे काय? What is RNA in Marathi?

RNA म्हणजे रायबोन्यूक्लीक ऍसिड होय. यालाच आपण रायबोज न्यूक्लिक आम्ल म्हणून देखील ओळखतो. आपल्याला पृथ्वीवर असलेली अनु आणि रेणू ही संकल्पना तर माहिती असेलच? यापैकी मनुष्याच्या शरीरात असलेला एक जैविक अणू म्हणून RNA ला ओळखले जाते.

RNA चे मनुष्याच्या शरीरात खूप अनन्यसाधारण महत्व आहे. मनुष्याच्या शरीरात होणारे प्रोटीन सिंथेसिस हे कार्य याच RNA मुळे होते. प्रोटीन सिंथेसिस सारखी सर्वात मोठी प्रक्रिया करत असताना ट्रान्सक्रिप्शन, डिकोडिंग, रेग्युलेशन आणि जीन्स सारख्या प्रक्रियांमध्ये RNA चा खूप मोठा हातभार असतो.

प्रोटीन सिंथेसिस होत असताना त्यामध्ये RNA कसा कार्य करतो हे समजून घेणे अगदी रंजक आहे. इतर कोणत्याही न्यूक्लीक ऍसिडला या प्रक्रियेत स्थान दिले जात नसते मात्र RNA इथे कार्य करतो.

आपल्या शरीरात DNA असतात हे आपल्याला माहिती असेलच. हेच DNA प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच प्रोटीन संस्लेशन प्रक्रियेत काही सिग्नल देत असतात.

आता हे सिग्नल सरळ त्या पेशींना पोहोचत नसतात. तर हे सिग्नल DNA पासून RNA च्या माध्यमातून त्या पेशींपर्यंत पोहोचविले जातात. यामध्ये RNA हा एका मोठ्या साखळीसारखा काम करत असतो.

RNA ची रचना – Composition of RNA

RNA हा विविध पदार्थांपासून बनलेला असतो. यामध्ये साखर म्हणजेच शुगर देखील असते. RNA हा रायबोज, फॉस्फेट आणि एडेनिन (A), ग्वानीन (G), सायटोसीन (C) आणि युरेसिल (U) हे नायट्रोजनिस बेस पासून बनलेला असतो.

AGC हे नायट्रोजन बेसेस वरून DNA देखील ओळखला जातो. मात्र यामध्ये काय फरक असतात याविषयी आपण पुढे मुद्द्यांमधून जाणून घेऊयात.

RNA चे प्रकार – Types of RNA

RNA चे त्याच्या कार्यानुसार मुख्य 3 प्रकार पडतात. त्याविषयी जाणून घेऊयात-

मेसेंजर RNA – DNA ट्रान्सक्रिप्शन हे महत्वाचे कार्य करण्यासाठी मेसेंजर RNA उपयोगी असतो. वर आपण सांगितल्याप्रमाणे हा RNA पेशी आणि DNA यांच्या मध्ये कार्य करतो. DNA सोबत या RNA चा एक भाग जोडला जातो आणि मग ती देवाणघेवाण सुरू होते.

ट्रान्सफर RNA – सर्वात छोट्या आकाराचा RNA म्हणून हा ट्रान्सफर RNA ओळखला जातो. आपल्या शरीरात प्रोटीन सिंथेसिस साठी अमिनो या आम्लची गरज असते आणि ही गरज भागविण्याचे काम टिश्यू करत असतात. या टिश्यू पासून हे आम्ल घेऊन येऊन त्यांना प्रोटीन सिंथेसिस प्रक्रियेत आणण्याचे काम ट्रान्सफर RNA करतात.

रायबोसोमल RNA – एखाद्या पेशी मध्ये असलेल्या RNA चा जवळपास 85 टक्केहून अधिक भाग हा रायबोसोमल RNA पासून बनलेला असतो. हे रायबोसोमल RNA देखील संपर्क करण्याचे काम करतात मात्र यांच्याकडे प्रोटीन सिंथेसिस प्रक्रियेत महत्वाच्या भूमिका दिलेल्या असल्याने या RNA शिवाय ही प्रक्रिया कधीच पूर्ण होऊ शकत नाही.

DNA आणि RNA मध्ये फरक – DNA vs RNA Difference

RNA म्हणजे रायबोन्यूक्लीक ऍसिड आणि DNA म्हणजे डीऑक्सि रायबोन्यूक्लीक ऍसिड! यामध्ये फक्त डी ऑक्सि कंगा फरक आहे मात्र हा फरक यांच्या संरचनेत मोठ्या प्रमाणात वेगळेपणा आणतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर RNA मध्ये शुगर असते आणि DNA मध्ये एक ऑक्सिजन कमी असतो.

तुम्ही जर RNA आणि DNA ची संरचना बघितली तर आपल्याला दिसेल की RNA हा एकदा साखळी बनवत असतो तर DNA हा साखळी बनवताना एक हेलिकल म्हणजेच एकमेकांमध्ये अडकून वेणीसारखी रचना बनवत असतो. अनेकदा आपल्याला RNA जोडीने डबल आनि DNA एकटे म्हणजेच सिंगल बघायला मिळू शकतात मात्र ती त्यांची अपघाती स्थिती असते त्यामुळे ते तिथर जास्त काळ टिकत नाही.

नायट्रोजन बेसेस विषयी फरक समजून घेतला तर AGC म्हणजेच एडेनिन, ग्वानीन आणि सायटोसीन ये तिन्ही नायट्रोजन बेस तुम्हाला RNA आणि DNA दोन्हीकडे बघायला मिळतात. मात्र याशिवाय DNA मध्ये थायमिन आणि RNA मध्ये युरेसिल हे वेगळे नायट्रोजन बेस आढळतात.

RNA ची कार्ये – Works of RNA

प्रोटीन सिंथेसिस प्रक्रियेत सहकार्य करणे हे RNA चे सर्वात महत्वाचे कार्य आहे. प्रोटीनच्या माध्यमातूनच तुमच्या शरीरात असलेल्या पेशीय रचना आणि प्रक्रिया घडत असतात.

हे सर्व कार्य करण्यासाठी DNA पासून संदेश वाहन करण्याचे महत्वाचे काम RNA करतात. त्यामुळे DNA जरी अमिनो ऍसिडला क्रम लावत असला तरी देखील त्याच क्रमाने ही माहिती पुढे पाठविण्याचे कार्य RNA करतात.

FAQ

DNA म्हणजे काय? फुल फॉर्म काय आहे?

DNA म्हणजे DEOXYRIBONUCLEIC ACID (डी ऑक्सि रायबोन्यूक्लीक) ऍसिड होय.

RNA म्हणजे काय? फुल फॉर्म काय आहे?

RNA म्हणजे RIBONUCLEIC ACID (रायबोन्यूक्लीक ऍसिड) होय.

DNA आणि RNA यापैकी आपल्या जणुकांवर वर कोणाचा प्रभाव असतो?

DNA चा आपल्या जनुकीय संरचनेवर प्रभाव असतो तर RNA फक्त मध्यस्थी चे कार्य करत असतात. मात्र RNA चे प्रोटीन संस्लेशन हे कार्य सर्वात जास्त महत्वाचे आहे.

मानवी शरीरात DNA आणि RNA कुठे सापडतात?

मानवी शरीरात पेशींच्या केंद्रकात आणि मायटोकॉन्द्रिया या भागात DNA तर सायटोप्लासम आणि रायबोजम मध्ये RNA सापडतात.

Leave a Comment