(UPSC Full Form In Marathi) :- UPSC आणि MPSC हे शब्द आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतात. यापैकी हे UPSC म्हणजे नक्की काय? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे जर तुमचे मित्र असतील तर ते म्हणतात की MPSC ची तयारी करतोय, मी UPSC ची तयारी करतोय किंवा तुम्ही जर UPSC करण्याचा विचार करत असाल तर UPSC चा FULL FORM नक्की काय आहे? UPSC कोण देऊ शकते? MPSC आणि UPSC मधील फरक नक्की काय आहे? UPSC अंतर्गत कोणत्या पोस्ट मिळतात? याविषयी आज जाणून घेऊयात.
यूपीएससी फुल फॉर्म UPSC Full Form In Marathi
UPSC म्हणजे काय? (What Is UPSC In Marathi)
UPSC हा स्पर्धा परीक्षा विश्वातील जिव्हाळ्याचा विषय… तस बघायला गेलं तर ही एक स्वायत्त संस्था आहे जिच्या अंतर्गत राज्यातील अ आणि ब दर्जाच्या कर्मचाऱ्यांच्या भरती होत असतात. UPSC हा एक संघातील लोक सेवा आयोग आहे. 1 ऑक्टोबर 1926 रोजी UPSC ची स्थापना झाली. स्थापना जरी आधी झालेली होती मात्र आयोगाच्या स्थापनेला खरी मान्यता ही 26 जानेवारी 1950 रोजी मिळाली. म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन हा UPSC च्या कार्याचा पहिला दिवस होता. केंद्र स्तरावर होणाऱ्या सर्व सिव्हिल सर्व्हिस परीक्षा या जवळपास UPSC अंतर्गत घेतल्या जातात. UPSC चे म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे.
UPSC हा आयोग आहे आणि त्यामुळे या आयोगाच्या अंतर्गत अनेक कार्य सुरू असतात. भारतीय राज्यघटनेतील कलम 320 अनुसार सर्व नागरी सेवा आणि पदे यांच्या होणाऱ्या भरत्यांचे अधिकार हे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे आहेत. परीक्षा घेण्यापासून ते मुलाखती घेणे, बदली आणि पदोन्नती करणे, सेवांमध्ये शिस्तबद्धता टिकून ठेवणे यासारखे महत्वाचे कार्य UPSC मार्फत होतात.
UPSC Full Form in Marathi ।। UPSC Long Form in Marathi
पुण्यासारख्या शहरात जर तुम्ही असाल तर तुम्हाला काही ठिकाणी याच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मिळतील. जर त्यांना तुम्ही विचारले की बाबा काय करतोय? तर त्यांच्या मुखातून भरपूर वेळा UPSC ची तयारी हा शब्द येतो. नक्की मग हे UPSC म्हणजे काय आहे? हे आपण वर बघितले मात्र याचा Full Form काय याविषयी जाणून घेऊयात.
UPSC चा Full Form हा Union Public Service Commission असा होतो. आयोग हा शब्द तर अनेकांनी ऐकलेला असेल. UPSC ला मराठी मध्ये केंद्रीय लोक सेवा आयोग म्हणून ओळखले जाते. भारतात केंद्राला संघ म्हणून ओळख असल्याने या आयोगाला संघ लोक सेवा आयोग म्हणून देखील ओळखतात.
UPSC साठी लागणारी पात्रता :-
- UPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे.
- कोणत्याही एखाद्या शासनमान्य विद्यापीठातुन पदवी अभ्यासक्रम पूर्ण असणे गरजेचे आहे.
- पदवीच्या शेवटच्या वर्षात असाल आणि तुम्हाला एक वर्षात जर पदवी मिळणार असेल तर अशा विद्यार्थ्याला देखील UPSC देता येते.
- UPSC साठी अर्ज करताना तुमच्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसावी हे अट आहे. तुमचे नाव जर एखाद्या गुन्ह्यात समाविष्ठ केलेले असेल तर तुम्हाला UPSC साठी अर्ज भरता येत नाही.
- UPSC उमेदवाराचे वय हे 21 ते 30 वर्ष असणे बंधनकारक आहे. अनुसूचित जाती आणि जमाती साठी यामध्ये 5 वर्षे आणि मागासवर्गीय जातीसाठी 3 वर्षे सूट वयोमर्यादेत मिळत असते.
UPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा :-
UPSC अंतर्गत अनेक परीक्षांचे नियोजन केले जाते. त्यापैकी काही महत्वाच्या परीक्षा खालीलप्रमाणे आहेत.
- सिव्हिल सेवा परीक्षा (CSE)
- भारतीय संरक्षण अकादमी परीक्षा (NDA)
- भारतीय वन सेवा परीक्षा (IFSE)
- इंजिनिअरिंग सेवा परीक्षा (ESE)
- भारतीय आर्थिक सेवा परीक्षा (IES)
- नौदल अकादमी परीक्षा (NAE)
- एकत्रिक संरक्षण सेवा परीक्षा (CDS)
- एकत्रिक वैद्यकीय सेवा परीक्षा (CMSE)
- भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा (ISS)
UPSC पदांची माहिती :-
UPSC अंतर्गत क्लास 1 आणि क्लास 2 पदांची भरती होत असते. यापैकी काही महत्वाची पदे आणि त्यांचे full form पुढे सांगतो आहे.
- IAS – Indian Administrative Services (भारतीय प्रशासकीय सेवा)
- IPS – Indian Police Service (भारतीय पोलीस सेवा)
- IFS – Indian Foreign Service (भारतीय परराष्ट्र सेवा)
- IRS – Indian Revenue Service (भारतीय महसूल सेवा)
UPSC भरती प्रकिया :-
UPSC ची भरती प्रक्रिया ही 3 टप्प्यात होते. उमेदवाराला हे तिन्ही टप्पे पार करूनच मग भरती होता येते.
1.पूर्व परीक्षा (prelim Exam)
UPSC अंतर्गत सर्व परीक्षांमध्ये पहिला टप्पा हा पूर्व परीक्षा असते. यामध्ये MCQ स्वरूपाचे प्रश्न असतात. पहिला पेपर हा सामान्य अध्ययन आणि दुसरा पेपर हा वैकल्पिक असतो. भारतात हे दोन्ही पेपर इंग्रजी आणि हिंदी या दोन मुख्य भाषांमधून देता येतात. पूर्व परीक्षा पास करणाऱ्या उमेदवारालाच पुढील टप्प्यात जाता येते.
दुसऱ्या म्हणजेच CSAT पेपर मध्ये तुम्हाला 33% मार्क्स असतील तरच तुम्ही पात्र असतात. एकूण 400 मार्कांचा पेपर हा पूर्व परीक्षेचा असतो. दोन्ही पेपर हे प्रत्येकी 200 गुणांचे असतात.
2.मुख्य परीक्षा (mains)
हा पेपर पूर्णपणे आपले विचार मांडण्याचा असतो. तुम्ही निवडलेले विषय आणि काही सामान्य अध्ययन आणि इंग्रजी सारख्या भाषांवर प्रभुत्व किती आहे हे तपासून बघण्यासाठी असतात. इथे एकूण 9 पेपर असतात. यातील मुख्य 2 भाषांचे पेपर हे त्या उमेदवाराची पात्रता ठरवत असतात. क्रमवारीत हे पेपर्स पेपर अ आणि पेपर ब असतात.
3.मुलाखत (Interview)
तिसऱ्या टप्प्यात पोहोचणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या हजरजबाबी पणासाठी आणि त्यांच्यातील गुणांना ओळखून योग्य ठिकाणी पोस्ट देण्यासाठी मुलाखत होत असते. यामध्ये उमेदवारांना पूर्णपणे तपासले जाते, ते मानसिक कसोटीवर कितपत उतरतात याविषयी देखील तपासले जाते. 275 गुणांची मुलाखत मिळून एकूण 2025 मार्कांपैकी संपूर्ण उमेदवारांची शेवटची यादी प्रकाशित केली जाते. या यादीत निवडलेले उमेदवार आणि त्यांच्या पदांचा उल्लेख केलेला असतो.
UPSC आणि MPSC मधील फरक
UPSC म्हणजे केंद्रीय लोक सेवा आयोग आणि MPSC म्हणून महाराष्ट्र लोक सेवा आयोग होय. UPSC केंद्र स्तरावर प्रशासकीय सेवेसाठी पदांची भरती करत असते तर MPSC महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय सेवांसाठी पदभरती करते. महाराष्ट्र राज्यसोबत अनेक इतर राज्यांना देखील स्वतःचा असा लोकसेवा आयोग आहे. यातून देखील गट अ, गट ब आणि गट क या जागा भरल्या जातात.
FAQ’s On यूपीएससी फुल फॉर्म UPSC Full Form In Marathi
UPSC परीक्षेची पात्रता काय आहे?
IAS परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. UPSC नागरी सेवा परीक्षा वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे असणे आवश्यक आहे आणि त्याचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
UPSC चा पगार किती असतो?
7 व्या वेतन आयोगानुसार, आयएएस अधिकाऱ्याचे मूळ वेतन 56,100 रुपये आहे. पगाराव्यतिरिक्त, आयएएस अधिकाऱ्याला प्रवास भत्ता आणि महागाई भत्ता यासह इतर अनेक भत्ते देखील दिले जातात. अहवालात असे म्हटले आहे की आयएएस अधिका-याचा एकूण पगार दरमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
मला पहिल्याच प्रयत्नात UPSC पास करता येईल का?
UPSC नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार सरासरी 2 पेक्षा जास्त प्रयत्न करतात. परंतु दरवर्षी असे अनेक उमेदवार असतात जे त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास करतात.
UPSC साठी 3 वर्षे पुरेशी आहेत का?
स्मार्ट इच्छुकांसाठी, आयएएस परीक्षेची तयारी सुरू करण्यासाठी कॉलेज हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तीन वर्षांच्या कॉलेजमध्ये चांगली तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि लवकर सुरुवात केल्याचा फायदा मिळू शकेल.