डब्ल्यूएचओ फुल फॉर्म WHO Full Form In Marathi

WHO Full Form In Marathi कोरोना काळात WHO हे नाव अनेकदा आपल्या कानावर पडले असेल मात्र कोरोना काळात आपण ज्या WHO च्या आदेशांची अंमलबजावणी करत होतो ते WHO नक्की काय आहे, WHO चा फुल फॉर्म काय आहे, WHO चे कार्य, WHO चा इतिहास, WHO चे मुख्यालय याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

WHO Full Form In Marathi

डब्ल्यूएचओ फुल फॉर्म WHO Full Form In Marathi

WHO Full Form in Marathi | WHO Long Form in Marathi

संयुक्त राष्ट्रात संपूर्ण जगभरात आरोग्याविषयी निर्णायक आदेश देणारी आणि आरोग्याशी संबधीत सर्व समस्या आणि त्यांचे समाधान देणारी संस्था म्हणून WHO नावारूपाला आली आहे.

WHO शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा World Health Organisation (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) होय. WHO शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा जागतिक आरोग्य संघटना आहे.

WHO म्हणजे काय? – What is WHO in Marathi?

संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत आरोग्यासंबंधीत कार्यरत असलेली संस्था म्हणजे जागतिक आरोग्य संघटना होय. संपूर्ण जगात ही संघटना कार्यरत आहे. जगातील सर्वात मोठी आरोग्य संघटना म्हणून WHO कडे बघितले जाते. आरोग्य संबंधीत येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना ही कार्यरत असते.

WHO ला व्हू म्हणून ओळखले जाते. WHO म्हणजेच World Health Organisation होय. मराठी मध्ये या संस्थेला जागतिक आरोग्य संस्था म्हणून ओळखतात.

WHO चा इतिहास – History of WHO in Marathi

7 एप्रिल 1948 रोजी संयुक्त राष्ट्र परिषदेत जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ची स्थापना करण्यात आली. त्या दिवसापासून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जगभरात आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि आरोग्याच्या विषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी WHO हु संस्था स्थापन करण्यात आली.

सुरुवातीच्या काळात WHO चे 63 सदस्य होते मात्र त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य संख्येत वाढ होत गेली. सध्या WHO चे एकूण 194 देश सदस्य आहेत. आरोग्य ही सेवा प्रत्येकाला निपक्षपणे पोहोचविण्याचे मोलाचे कार्य WHO मार्फत केले जाते.

कोरोना संकट काळात याच WHO संस्थेने मोलाचे कार्य करत जगातील गरीबातील गरीब देशांना सुद्धा या संकटातून सावरण्यासाठी मदत केली. WHO चे उद्दिष्ट हे आरोग्य सुविधा जसे की लस, औषधे, यंत्र यासारख्या श्रीमंत ते गरीब जनसामान्याला पुरवण्याचे काम करते.

WHO ची कार्ये – Functions of WHO

  •  WHO संघटना सर्व संलग्न राष्ट्रांसोबत आरोग्य सेवेसाठी मदत करत असते.
  •  आरोग्य विषयी सर्व सुविधा पुरविण्याचे कार्य जागतिक आरोग्य संघटना करते.
  •  आरोग्यासाठी पर्यावरण खूप जास्त महत्वाचे आहे आणि त्यासाठी आरोग्य आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याचे काम WHO करते.
  •  अनेक आरोग्य समस्या अशा असतात ज्यांच्याविषयी लोकांमध्ये गैरसमज असतात. अशा आरोग्य समस्या आणि त्यामुळे होणारे गंभीर परिणाम याविषयी WHO जनजागृती करते.
  •  WHO सर्व आरोग्य समस्यांवर नजर ठेवत असते. जसे की आता काही दिवसांपूर्वी कोरोना संकट काळात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर WHO बारकाईने लक्ष ठेवून होते.
  •  कोरोना संकट काळात या आजारावर कोणते उपचार होऊ शकतात याची गाईडलाईन WHO ठरवते.
  • अनेक देशांमध्ये मेडिकल सुविधांचा अभाव असेल तर ते लक्षात घेऊन WHO ने त्या देशांना सुविधा पुरविण्याचे काम केले.
  •  WHO आजारांवरील लसी आणि औषधांना मान्यता देण्याचे कार्य करते.
  • WHO चे कोरोना काळातील कार्य खरंच सन्माननीय आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणजे आज काही देशांमधून हे कोरोना संकट दूर झाले आहे तर अनेक देश या संकटातून बाहेर आले आहेत.
  •  एच आय व्ही सारख्या भयंकर समस्येच्या तडाख्यातून आज संपूर्ण विश्व सुरक्षित करण्यासाठी WHO चे सर्वात मोठे कार्य आहे.
  •  वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे लोक आणि प्रोफेशनल डॉक्टर्स यांच्या समूहात संतुलन ठेवणे. याचाच फायदा घेऊन मग आरोग्यासाठी समतोल राखण्याचा प्रयत्न करणे.
  •  आरोग्य क्षेत्रातील शोधांना चालना देणे आणि संशोधन घडवून आणणे.
  •  आरोग्य, मेडिकल आणि त्या संबंधित क्षेत्रातील शिक्षणात अधिकाधिक सुधारणा करून गरजेनुसार त्याची पातळी बदलणे आणि त्यासाठी एक प्रमाण निर्माण करणे.
  •  जागतिक आरोग्य समस्या आणि आजार यांचे नामकरण करणे. नवीन नावे आजारांना देणे आणि त्यासोबत त्या आजाराने एखाद्याचा मृत्यू झाल्यास काय लक्षणे असतात याविषयी एक प्रमाण स्थापित करणे.
  • अन्न, जैविक पदार्थ आणि फार्मा पदार्थ यांच्याविषयी एक आंतरराष्ट्रीय प्रमाण स्थापित करून त्याची कठोर प्रमाणबद्धता पालन करण्यास प्रोत्साहन देणे.

WHO मुख्यालय – WHO Headquarter

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे मुख्यालय हे जिनिवा, स्वित्झर्लंड येथे आहे. जिनिवा येथूनच WHO चा सर्व कार्यभार चालतो. प्रत्येक प्रदेशाला WHO चे एक कार्यालय असून ते त्या देशाचे WHO साठी मुख्यालय असते. भारतात देखील असे कार्यालय म्हणजेच WHO चे दक्षिण पूर्वी आशियाई मुख्यालय हे दिल्ली येथे आहे.

WHO प्रदेश आणि मुख्यालय

  • दक्षिण पूर्व आशिया – नवी दिल्ली (भारत)
  • आफ्रिका – ब्राझेव्हिले (कोंगो)
  • अमेरिकन – वॉशिंग्टन डिसी (यु एस ए)
  • युरोप – कोपेन्हगेन (डेन्मार्क)
  • पूर्वी मध्यआखाती – अलेक्झांड्रिया (इजिप्त)
  • पश्चिम पॅसिफिक – मॅनिला (फिलिपीन्स)

WHO ची रचना – Structure of WHO

WHO ची रचना ही मुख्य 5 विभागांमध्ये विभागली गेली आहे.

1. जागतिक आरोग्य सभा
2. कार्यकारी मंडळ
3. सचिवालय
4. प्रदेश (संख्या – 6)
5. सदस्य राष्ट्र (देश – 193)

FAQ

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

स्वित्झर्लंड मधील जिनिवा येथे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO चे मुख्यालय स्थित आहे.

WHO चे भारतातील मुख्यालय कोठे आहे?

भारताची राजधानी दिल्ली येथे WHO चे भारतीय मुख्यालय आहे.

जागतिक आरोग्य दिवस हा आपण कधी साजरा करत असतो?

7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ची स्थापना झाली. तेव्हापासून 7 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत?

WHO चे सध्याचे मुख्य अध्यक्ष हे डॉ टेड्रॉस अधानोम घेब्रेयेसुस (Dr Tedros Adhanom Ghebreyesus) हे आहेत.

जगातील कोणता देश हा WHO चा सदस्य राष्ट्र नाही?

जगातील 194 देशांपैकी 193 देश हे WHO चे सदस्य राष्ट्र आहेत. जगातील Liechtenstein हा देश WHO चा सदस्य राष्ट्र नाही.

Leave a Comment