(IPS Full Form In Marathi) IPS शब्द ऐकला की आपल्यासमोर एक डॅशिंग पोलीस ऑफिसर येतो हे नक्की आहे. मात्र पोलीस लाईन मध्ये देखील IPS हे पद इतर पदांपेक्षा वेगळे असून यासाठी तुम्हाला कोणत्या परीक्षा घ्याव्या लागतात? IPS चा Full Form काय आहे? IPS शब्दाचा अर्थ काय आहे? IPS होण्यासाठी काय पात्रता असायला हवी? IPS अधिकाऱ्याची कामे काय असतात? IPS ऑफिसरला पगार किती असतो? IPS ची निवड प्रक्रिया कशी होते? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
आयपीएस फुल फॉर्म IPS Full Form In Marathi
IPS म्हणजे काय? (What Is IPS In Marathi)
आपल्या भारतात केंद्रीय लोक सेवा आयोग ही एक अशी महत्वाची संस्था आहे ज्यामधून देशातील नागरी सेवेतील महत्वाची पदे भरली जातात. IAS नंतर या नागरी सेवा पदांमधील पोलीस खात्यातील IPS हे महत्वाचे पद आहे.
IPS ही पदवी एक अखिल भारतीय सेवा अंतर्गत येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत भारतीय वन सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवा या देखील दोन सेवा आहेत. IPS, IAS हे त्यांचे शॉर्ट फॉर्म आहेत.
राज्यात किंवा आपल्या अखत्यारीत येणाऱ्या विभागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे महत्वाचे कार्य हे IPS अधिकाऱ्यांकडे असते. पोलीस प्रणालीतील IAS या पदानंतर सर्वाधिक अधिकार हे IPS अधिकाऱ्यांकडे असतात. तज्ञ असे IPS हे अनेकदा मोठ्या पदांवर देखील रुजू केले जातात. यामध्ये सुरक्षा सल्लागार म्हणून शक्यतो जास्त करून पोस्टिंग होत असते. आपल्याकडे ज्या काही गुन्हेगारी मिटविण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांमध्ये उच्च पदस्थ अधिकारी म्हणून IPS अधिकाऱ्याला प्राधान्य दिले जाते.
IPS Full Form in Marathi ।। IPS Long Form in Marathi
- IPS या पदाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Indian Public Services असा आहे.
- IPS या पदाचा मराठी भाषेत Full Form किंवा अर्थ हा भारतीय पोलीस सेवा असा आहे.
- IPS हे पद जरी 1948 नंतर आले असले तरी या दर्जाचे पद आधी पासूनच म्हणजे जवळपास 1905 पासून भारतात वापरलेले होते.
IPS पोस्ट चा इतिहास
IPS ही भारतातील मुख्य 3 सर्वात जास्त प्रतिष्ठा असलेल्या अखिल भारतीय सेवांमध्ये समाविष्ट असलेली महत्वाची सेवा आहे. IPS पोस्ट ला ब्रिटिश काळापासून इतिहास लाभलेला आहे.
1905 साली ब्रिटिश काळात इम्पिरीयल पोलीस हे पद होते. ब्रिटिश काळात हे पदच IPS लेव्हल चे पद होते. 1948 साली भारतीय संविधानात कलम 312 नुसार अखिल भारतीय सेवा समाविष्ट करण्यात आल्या. यामध्ये तुम्हाला 3 मुख्य सेवा देण्यात आल्या आणि त्यातील सर्वात महत्वाची पोस्ट म्हणजे IPS होय. भारतात असलेली IPS ही सर्व्हिस भारतीय केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत चालते. गृह मंत्रालयाचे IPS या पदावर नियंत्रण असते.
IPS ची कामे काय असतात?
- देशातील राज्यातील आणि त्या प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी IPS ला कार्य करावे लागते. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी व पकडण्यासाठी IPS कार्यरत असतात.
- IPS पोस्टवर असलेल्या व्यक्तीच्या अंतर्गत वाहतूक व्यवस्थापनात देखील कार्य होत असते.
- सीबीआय, आरबीआय सारख्या मोठ्या संस्थांच्या उच्च पदांवर IPS अधिकारी असतात. त्या संस्थांचा सर्व कारभार हा IPS कडे असतात.
- रॉ ही भारताची गुप्तहेर संघटना आहे. रॉ या संस्थेतील मोठ्या आणि सर्व सदस्यीय स्थानांवर IPS अधिकारी असतात.
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या सदस्यामध्ये IPS ऑफिसर असतात. IPS अधिकारी या मोठ्या पदांवर योग्य निर्णय घेण्यासाठी कार्यरत असतात.
IPS साठी परीक्षा
- IPS ही पदवी केंद्र सरकारच्या गृह खात्याअंतर्गत येत असल्याने ही भरती UPSC अंतर्गत होते. UPSC हा केंद्रीय लोकसेवा आयोग असून ही परीक्षा एकूण 3 टप्प्यात होते.
- IPS होण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पूर्व परीक्षा पास करावी लागेल. ही पूर्व परीक्षा 400 गुणांची असून यामध्ये 2 वेगवेगळे पेपर असतात. दुसऱ्या पेपर मध्ये 33% हुन अधिक मार्क मिळाले तरच तुम्ही पुढील परीक्षेच्या टप्प्यासाठी पात्र असतात.
- मुख्य परीक्षेत एकूण 9 पेपर असतात. यामध्ये ज्यांना चांगले गुण असतील त्यांची निवड ही मुलाखतीसाठी होत असते. मुलाखत हा टप्पा कठीण असतो. यामध्ये त्यांना ही जबाबदारीची नोकरी एका सक्षम व्यक्तीला देण्यासाठी एक उच्च दर्जाची मुलखात आयोजित केलेली असते. मुलाखतीत मात्र व्यक्तिमत्व आणि राहणीमान तर त्यासोबत कागदपत्रे तपासणी देखील केली जाते.
- UPSC सारख्या परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण करणे कठीण असते मात्र अशक्य नसते. काही लोक IPS होण्यासाठी कठोर परिश्रम घेतात मात्र त्यांचा निभाव लागत नाही.
IPS होण्यासाठी काय पात्रता आहे?
IPS अधिकरी होण्यासाठी काही पात्रता निकष केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिलेले आहेत. त्यांची पूर्तता जर तुम्ही केली तर मग तुम्ही IPS होण्यासाठी पात्र आहात.
- IPS अधिकारी होण्यासाठी किंवा UPSC अंतर्गत मिळणाऱ्या कोणत्याही पदावर रुजू होण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
- वयाची मर्यादा ही 21 वर्षे ते 32 वर्षे इतकी आहे. मागासवर्गीय जाती आणि जमाती साठी वयाच्या मर्यादेत थोडीफार सूट दिलेली आहे.
- IPS अधिकारी होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एका सरकारमान्य विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून पदवी घेणे अनिवार्य आहे. ही पदवी सर्वमान्य असावी.
- IPS आणि इतरही UPSC अंतर्गत होणाऱ्या परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 6 अटेम्प्ट असतात. यामध्ये देखील जाती अनुसार काही उमेदवारांना जास्त अटेम्प्ट मिळतात.
- IPS ही पोलीस खात्यातील पोस्ट असल्याने यामध्ये तुमची शारीरिक तंदुरुस्ती तपासली जाते. शारीरिक तंदुरुस्ती कशी असावी याविषयी नियम खालीलप्रमाणे
○ पुरुष –
■ उंची- 165 सेमी
■ छाती- 84
■ नजर- 6 किंवा 6
○ महिला –
■ उंची – 150 सेमी
■ छाती- 79
■ नजर- 12 किंवा 9
IPS अधिकाऱ्याचा पगार
IPS होणं हे जरी पुढे घडणारी गोष्ट असली तरी देखील आपल्याला IPS अधिकाऱ्याचा पगार काय असतो याविषयी आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. आयपीएस अधिकाऱ्याला महिन्याला 56 हजार पासून मासिक वेतन दुरु होते. पदानुसार पगारात वाढ ही होत असते. एक आयपीएस ऑफिसर आयजी आणि डिजी या पदावर कार्यरत असतो. आयजीला पगार हा 1 लाख ते दीड लाखाच्या आसपास असतो. IPS अधिकारी हा डिजीपी असतो आणि या पदावर त्याला 2 लाखाहून अधिक पगार असतो.
FAQ’s On आयपीएस फुल फॉर्म IPS Full Form In Marathi
आयपीएस चा पगार किती असतो?
भारतात, आयपीएस अधिकाऱ्याची सामान्य वेतनश्रेणी दरमहा INR 56,100 ते INR 2,25,000 पर्यंत बदलते. ही वेतनश्रेणी भारतातील सेवा पदांसाठी सर्वोच्च आहे. आयपीएस अधिकाऱ्यांसाठी मासिक वेतनश्रेणी आणि इतर लाभ त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार वाढतात.
IPS साठी पात्रता काय आहे?
UPSC परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी पात्रता परीक्षेच्या (बॅचलर पदवी) अंतिम वर्षाच्या परीक्षा लिहिल्या आहेत आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहेत ते देखील अर्ज करू शकतात.
आयएएसपेक्षा आयपीएस चांगला आहे का?
IAS आणि IPS दोन्ही आपापल्या क्षेत्रात खूप शक्तिशाली पदे आहेत परंतु IAS हे IPS पेक्षा खूप शक्तिशाली आहेत. आयपीएसकडे फक्त त्याच्या विभागाची जबाबदारी असते, परंतु आयएएसकडे जिल्ह्यातील सर्व विभागांची जबाबदारी असते. एक आयएएस अधिकारी हा पोलिस विभागाचाही प्रमुख असतो.
IPS साठी कोणती पदवी सर्वोत्तम आहे?
आयपीएस होण्यासाठी तुम्हाला यूपीएससीची परीक्षा द्यावी लागेल, हा कठीण पेपर पास करण्यासाठी तुम्ही यूपीएससीच्या अभ्यासक्रमासारखे विषय असलेले कोर्स करावेत. बीए ही तुमच्याकडे असलेली सर्वोत्तम पदवी आहे जी तुम्हाला तुमच्या महाविद्यालयातून नागरी सेवांसाठी तयारी करण्यास मदत करेल. त्यासाठी तुम्ही जायला हवे.