आयटीआय फुल फॉर्म ITI Full Form In Marathi

(ITI Full Form In Marathi) आपल्याकडे ग्रामीण भागात एक कौशल्यपूर्ण शिक्षण म्हणून ITI कडे बघितले जाते. ITI हे एक प्रकारे प्रशिक्षण आहे. ITI केल्यानंतर नोकरीच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. भारतातील बेरोजगारी सारखी समस्या सोडविण्यासाठी ITI सारखे कौशल्यपूर्ण शिक्षण आता सर्वदूर सुरू झालेले आहे.
तर हे ITI म्हणजे नक्की काय आहे? ITI Full Form in Marathi, ITI कुठे करतात? ITI कोणत्या शाखेतून करता येतो? ITI झाल्यानंतर नोकरीच्या पुढे काय संधी आहेत? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

ITI Full Form In Marathi

आयटीआय फुल फॉर्म ITI Full Form In Marathi

ITI म्हणजे काय? (What Is ITI In Marathi)

इयत्ता दहावी नंतर किंवा इयत्ता बारावी नंतर अनेकांचे स्वप्न कमी मार्कांमुळे भंगले जाते मात्र अशा स्थितीत खचून जाण्याची काही गरज नाही. आपल्याला मार्क्स जरी कमी आले असतील तरी देखील तुमचे भवितव्य तुमचा निकाल ठरवू शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.

ITI सारख्या कोर्स मध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकतो आणि यातून तुमचे करियर देखील घडू शकते. त्यामुळे ज्यांना भविष्याची चिंता आहे मात्र मार्क्स कमी आहे त्यांना ITI सारख्या क्षेत्राकडे वळण्यासाठी काही हरकत नाही.

ITI ही एक प्रशिक्षण देणारी शैक्षणिक शाखा आहे. ITI कोर्सेस चा कालावधी हा कमीत कमी 6 महिने ते 2 वर्षे कालावधीचा असतो. ITI मध्ये अनेक प्रकारच्या शाखा आहेत. इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रात तुम्हाला हवे तितके प्रात्यक्षिक ज्ञान मिळत नाही मात्र ITI मध्ये ते तुम्हाला भेटते आणि त्यामुळेच ITI झालेल्या विद्यार्थ्याला घेण्यासाठी कंपन्या जास्त इच्छुक असतात.

ITI Full Form in Marathi – ITI Long Form in Marathi

ITI चा इंग्रजी भाषेत Full Form हा Industrial Training Institute असा आहे. ITI चा मराठी भाषेत Full Form हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था असा होतो.  आपल्याला अनेक औद्योगिक संस्थांमध्ये ITI कोर्स करण्याच्या संधी आहेत. संपूर्ण भारतात स्किल अप इंडिया अंतर्गत अनेक ITI प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू झालेल्या आहेत.

ITI कोणाला करता येतो?

ITI करण्यासाठी तुमचे शिक्षण हे कमीत कमी 8 वि पास असावे लागते. अनेकांना 8 वि पास केल्यानंतर ITI ला प्रवेश घेता येत नाही कारण ITI करण्यासाठी कमीत कमी 14 वर्षे वय पूर्ण असायला हवे. त्यामुळे शक्यतो 10 वि नंतर आणि 12 वि नंतर विद्यार्थी ITI ला प्रवेश घेतात. ज्यांचे डिप्लोमा सारखे शिक्षण झालेले आहे त्यांना देखील ITI करता येतो. अनेक इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी देखील आयटीआय कोर्सला प्रवेश घेत आहेत.

ITI मध्ये प्रवेश कसा घेतात?

ITI करण्यासाठी अनेक सरकारी आणि खाजगी महाविद्यालय आहेत. तुम्हाला जर खाजगी महाविद्यालयात ITI करायचा असेल तर जास्त खर्च येईल मात्र सरकारी महाविद्यालयातून तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. सरकारी महाविद्यालयात ही फी 10 हजारांच्या आसपास असते. खाजगी आयटीआय मधून जर तुम्ही शिक्षण घेणार असाल तर तुमच्या शाखेवर अवलंबून 15 हजार ते 40 हजार पर्यंत फी तुम्हाला असेल.

 • ITI या कौशल्यपूर्ण कोर्स साठी भारत सरकार कडून तुम्हाला काही शिष्यवृत्ती देखील मिळू शकते.
 • 10 वि आणि 12 वि चे निकाल लागल्यानंतर ITI कोर्ससाठी प्रवेश सुरू होतात. म्हणजे हा कालावधी शक्यतो जून जुलै महिन्यांचा असतो.

ITI ची प्रवेश प्रक्रिया :-

 • ITI साठी असलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरावा लागेल.
 • Website वर गेल्यानंतर New Candidate Registration या पर्यायावर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल.
 • तुम्हाला पुढे काही माहिती आणि कागदपत्रे देऊन अर्ज भरायचा आहे.
  ○ 10 वि किंवा 12 वि इयत्तेचा निकाल
  ○ 10 वि किंवा 12 वि बोर्डाचे प्रमाणपत्र
  ○ जात प्रमाणपत्र
  ○ डोमेसाईल सर्टिफिकेट
  ○ ओळख प्रमाणपत्र (आधार, पॅन किंवा मतदान कार्ड)
  ○ शाळा सोडल्याचा दाखला
 • महाविद्यालयांसाठी तुम्हाला एक क्रमवारी द्यावी लागेल आणि मेरिट लिस्ट अनुसार तुम्हाला कोणते महाविद्यालय मिळेल हे कळेल.
 • वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सर्व काही माहिती आणि मेरिट लिस्ट मिळेल मात्र ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला त्या महाविद्यालयात जाऊन आपले ऍडमिशन नक्की करावे लागेल.

ITI मध्ये कोणत्या शाखा आहेत?

ITI या कोर्सला मुख्यतः दोन विभागात विभागले गेले आहे. एक म्हणजे इंजिनिअरिंग आणि दुसरी म्हणजे नॉन इंजिनिअरिंग आयटीआय कोर्सेस होय. इंजिनिअरिंग आयटीआय मध्ये एकूण 80 पेक्षा जास्त तर नॉन इंजिनिअरिंग आयटीआय मध्ये 50 पेक्षा जास्त कोर्सेस आहेत.अनेकांना गणित नावडत असते आणि त्यामुळे त्यांच्यासाठी आयटीआय मध्ये नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत.

ITI मध्ये विद्यार्थी खालील काही शाखा जास्तीत जास्त वेळा निवडतात.

 1. प्लंम्बर
 2. वायरमन
 3. फिटर
 4. मेकॅनिस्ट
 5. मोल्डर
 6. इलेक्टरीशियन
 7. कार्पेन्टर
 8. पेंटर जनरल
 9. कॉम्प्युटर टेक्निशियन
 10. नेटवर्क टेक्निशियन
 11. ड्राफ्ट्समन
 12. बुक बाईंडर
 13. टर्नर
 14. इलेक्टरीकल मेंटेनन्स
 15. हेअर अँड स्किन केअर
 16. वेल्डर
 17. डिझेल मेकॅनिक
 18. मोटर मेकॅनिकल
 19. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड असिस्टंट

ITI केल्यानंतर नोकरीच्या संधी :-

आयटीआय करताना विद्यार्थ्याला 20 हजार ते 50 हजार इतकाच खर्च येतो. मात्र त्याला त्यानंतर नोकरीच्या खूप चांगल्या संधी असतात. आयटीआय हे क्षेत्र पूर्णपणे इंडस्ट्रीयल एरिया सोबत जोडलेले आहे. ITI झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या औद्योगिक कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. सध्याच्या काळात इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कार्यकुशल असे ITI झालेले विद्यार्थी कंपन्यांना हवे आहेत.

आयटीआय केल्यानंतर तुम्हाला कंपन्यांमध्ये 15 हजार ते 50 हजार प्रति महिना पगार असलेल्या नोकऱ्या मिळू शकतात. नोकरी करायची असेल तर तुम्हाला पगार मिळेल मात्र अनेक ITI झालेले विद्यार्थी स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करतात.

आयटीआय ज्या शाखेत झालेला आहे त्यासोबत निगडित असा काहीतरी स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्यासाठी तुम्हाला थोडा खर्च येईल मात्र यश देखील मिळण्याची शक्यता जास्त असते. भारत सरकार कडून स्टार्टअप इंडिया अंतर्गत तुम्हाला भरपूर प्रमाणात सवलती आणि कर्जाची तरतूद होऊ शकते. त्याचा फायदा घेऊन तुम्ही ITI च्या बळावर एक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.

आपण ITI म्हणजे काय? ITI Full Form in Marathi, ITI चा फुल फॉर्म, ITI कोर्स विषयी माहिती, ITI मधील रोजगाराच्या संधी, ITI कोर्स साठी काय पात्रता लागते, ITI कोर्स कोणत्या शाखेत करता येतो याविषयी संपूर्ण माहिती घेतली. ITI साठी असणारी प्रवेश प्रक्रिया देखील आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला.

FAQ’s On आयटीआय फुल फॉर्म ITI Full Form In Marathi

भारतात ITI अभ्यासक्रम काय आहे?

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (ITC) ही भारतातील माध्यमिकोत्तर शाळा आहेत ज्यांचे प्रशिक्षण महासंचालनालय (DGT), कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, केंद्र सरकारच्या अंतर्गत विविध व्यवसायांमध्ये प्रशिक्षण प्रदान केले जाते.

आयटीआयमध्ये आपण काय शिकतो?

इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अल्प-मुदतीच्या नोकरी-उन्मुख अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवार 10वी नंतर ITI अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात.

कोणत्या ITI नोकरीत सर्वाधिक पगार आहे?

ITI मध्‍ये सर्वाधिक पगाराची नोकरी म्हणजे व्यवस्थापक, प्रतिवर्ष ₹11.6 लाख पगार असतो.

भारतात किती ITI आहेत?

मंत्रालयानुसार, देशात 14312 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) कार्यरत आहेत. त्यापैकी 2204 शासकीय आणि 12108 खाजगी आयटीआय आहेत. हे सर्व मात्र नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंगशी संलग्न आहेत.

Leave a Comment