बीएससी फुल फॉर्म BSC Full Form In Marathi

(BSC Full Form In Marathi) अनेकदा आपल्याला BSC हे शिक्षण घेतो आहे असे ऐकायला मिळते. पण खर तर हे BSC म्हणजे नक्की काय, याचा अर्थ, Full Form काय होतो हे आपल्याला माहिती नसते. आपण आज या लेखाच्या माध्यमातून BSC या शब्दाचा Full Form मराठी मध्ये, BSC काय असते, BSC हे शिक्षण कुठे भेटते, BSC चा फायदा किती आहे आणि BSC करून करियरच्या काय संधी आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.

BSC Full Form In Marathi

बीएससी फुल फॉर्म BSC Full Form In Marathi

BSC म्हणजे काय? (What Is BSC In Marathi)

BSC हे पदवी शिक्षण आहे. इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून झाल्यानंतर आपल्याला BSC करता येते. अनेकदा अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सारख्या क्षेत्रात रुची नसेल किंवा तिकडे क्रमांक लागला नाही तर विद्यार्थी हे BSC या पदवी अभ्यासक्रमाला प्राधान्य देतात.

BSC मध्ये आपल्याला विषय निवडायचा असतो आणि त्या विषयात आपण पदवी घेऊ शकतो. यामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैव तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक, कृषी, नर्सिंग यासारखे अनेक विषय आहे.

अनेकांना असे वाटते की BSC सारखी पदवी घेऊन आपल्याला जास्त काही करता येत नाही किंवा अनेक लोक BSC करत आहे हे ऐकून त्या व्यक्तीला कमी दर्जाचे ठरवतात. मात्र BSC करणारे विद्यार्थी हे त्यांच्या त्या विषयात इतके जास्त तरबेज असतात की त्यांना यामध्ये कोणीही टक्कर देऊ शकत नाही. सध्याच्या युगात एक न धड भराभरा चिंध्या करण्यापेक्षा एकाच विषयात तज्ञ होऊन हे विद्यार्थी यशाची शिखरे गाठत आहेत.

BSC (Hons.) आणि BSC (General) हे दोन BSC चे मुख्य प्रकार आहेत. यामध्ये जास्त काही फरक नसतो. BSC करणारे विद्यार्थी एकाच विषयावर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि त्याचे शिक्षण घेतात. यामध्ये ते विद्यार्थी थेअरी सोबत प्रॅक्टिकल नॉलेज देखील घेतात.

BSC Full Form in Marathi – BSC Long Form in Marathi

BSC ही एक ग्रॅज्युएशन म्हणजेच पदवीचा अभ्यासक्रम आहे. आता या BSC चा Long Form म्हणजेच Full Form जाणून घेऊयात. इंग्रजी भाषेत BSC चा Full Form हा Bachelor of Science असा होतो. मराठी भाषेत सांगायचे झाले तर Bachelor म्हणजे स्नातक होय. विज्ञान क्षेत्रातील स्नातक म्हणजे BSC अभ्यासक्रम होय.

BSC मध्ये प्रवेश कसा मिळतो? (पात्रता)

आपण BSC विषयी सुरुवातीची माहिती जाणून घेतली मात्र आता या कोर्सला प्रवेश जर घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला कोणती पात्रता लागते याविषयी जाणून घेऊयात.

 1. विद्यार्थ्याने इयत्ता बारावी पास केलेली असावी. त्याला भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स आणि रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री या सोबत जो आणखी विषय असेल मग त्यात गणित असो किंवा जीवशास्त्र(बायोलॉजी) किंवा इतर कोणताही तांत्रिक विषय असेल तर त्यात देखील कमीत कमी 60% मार्क्स असायला हवेत.
 2. बारावीच्या निकालात मुख्य विषयांचे मार्क्स हे 50% हुन अधिक हवेत. काही महाविद्यालयात हे टक्केवारी 60% असते त्यामुळे याविषयी संभ्रम असू नये.
 3. 12 वि इयत्तेत विज्ञान विषय असणे विद्यार्थ्याला BSC साठी प्रवेश घेताना महत्वाचे असते. यामध्ये त्याने जे विषय घेतलेले असतील त्याच्याशी निगडित विषयांमध्येच तो विद्यार्थी BSC पदवी घेऊ शकतो.
 4. जर मार्क्स चांगले असतील तर BSC साठी चांगले कॉलेज मिळणे शक्य आहे. अन्यथा अनकेदा चांगले महाविद्यालय मार्क्स कमी असल्याने मिळत नाहीत.
 5. तुम्ही जर 12 वि केली नसेल आणि त्याशिवाय एखादा 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असेल तरी देखील तुम्हाला BSC ला ऍडमिशन घेता येते.
 6. काही महाविद्यालयांमध्ये BSC च्या प्रवेशासाठी वेगळी परीक्षा देखील घेतली जाते. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या नावाजलेल्या महाविद्यालयातून BSC करायची असेल तर त्यांच्या प्रवेश परीक्षा तुम्हाला घ्याव्या लागतील.
 7. BSC प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारे वयोमर्यादा नाही.

BSC कोणत्या विषयांत करता येते?

आपल्याला BSC या कोर्स मध्ये अनेक विषय पदवी अभ्यासक्रमासाठी निवडता येतात. खाली BSC मधील काही महत्वाचे विषय सांगतो आहे.

 • गणित (Mathematics)
 • वनस्पती विज्ञान (Botany)
 • संगणक शास्त्र (Computer Science)
 • भौतिकशास्त्र (Physics)
 • रसायनशास्त्र (Chemistry)
 • मायक्रोबायोलॉजी (Microbiology)
 • प्राणीशास्त्र (Zoology)
 • ऍनिमेशन
 • अनुवंश शास्त्र (Genetics)
 • विज्ञान तंत्रज्ञान (Information Technology)
 • इलेक्ट्रॉनिकस
 • नर्सिंग
 • कृषी
 • फूड टेक्नॉलॉजी
 • मल्टीमीडिया
 • स्टॅटिस्टिक्स
 • फिजिकल सायन्स

BSC करण्यासाठी किती खर्च येतो?

BSC हे कमीत कमी खर्चात होणारे शिक्षण आहे. BSC करायची असेल तर आपल्याला शासकीय महाविद्यालयात ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. जर तुम्ही शासकीय महाविद्यालयात BSC करत असाल तर तुम्हाला तिन्ही किंवा चारही वर्षांचा मिळून फक्त 3 हजार इतका खर्च येईल. जर तुम्ही ऍडमिशन घेत असलेले विद्यालयात खाजगी असेल आणि शासनाशी संलग्न असेल तर तिथे तुमचे शिक्षण हे 25 हजारात पूर्ण होईल. यामधील काही रक्कम ही तुम्हाला स्कॉलरशिप रूपाने परत देखील मिळेल.

खाजगी महाविद्यालयात मात्र तुमचे BSC हे शिक्षण देखील महाग पडू शकते. काही महाविद्यालयात एका वर्षाची फी ही 50 हजारांच्या आसपास असते.

BSC करून नोकरीच्या संधी काय आहेत?

तुम्ही जर BSC करत असाल तर तुम्हाला आमचा सर्वात मोलाचा सल्ला हाच असेल की BSC वर न थांबता तुम्ही MSC करावी किंवा MBA सारख्या क्षेत्राकडे जावे. कारण BSC करून तुम्हाला ज्या काही नोकरीच्या संधी मिळणार आहेत त्यामध्ये सध्याच्या युगात जीवन जगणे देखील कठीण होऊन जाईल.

BSC झाल्यानंतर तुम्ही जर MSC केली तर तुम्हाला प्राध्यापक बनण्याची संधी आहे. मात्र यासाठी तुम्हाला शासनाच्या NET, SET किंवा GATE सारख्या परीक्षा पास कराव्या लागतात. रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक सारख्या विषयात जर तुमची पदवी असेल तर तुम्हाला अनेक कंपन्यांमध्ये इंजिनिअरिंग दर्जाच्या रोजगाराच्या संधी आहेत.

अनेकांना IT क्षेत्राकडे जायचे आहे मात्र BSC घेतल्याने IT मध्ये कसे जाणार हा संभ्रम असतो. तुम्ही जरी BSC केलं असेल आणि ते संगणक शास्त्र विभागातील जरी नसेल तरी तुमची पदवी असल्याने तुम्हाला IT क्षेत्रात देखील नोकरीच्या संधी आहेत मात्र तुम्हाला त्या क्षेत्राविषयी थोडीफार माहिती असणे गरजेचे असते.
अनेकांना संशोधन क्षेत्रात जायचे असते तर त्यांच्यासाठी BSC करून त्या क्षेत्रात निपुण बनण्याच्या आणि रिसर्च साठी जाण्याच्या संधी आहेत.

आज आपण BSC म्हणजे काय, BSC Full Form in Marathi, Long Form in Marathi, BSC कोणत्या विषयात करता येते?, BSC साठी काय पात्रता लागते आणि BSC नंतर नोकरीच्या संधी कोणत्या आहेत याविषयी माहिती जाणून घेतली आहेत.

FAQ’s On बीएससी फुल फॉर्म BSC full form in Marathi

बीएससी म्हणजे काय?

बीएससी हा नक्कीच एक चांगला करिअर पर्याय आहे, म्हणूनच भारतातील जवळपास ५० लाख विद्यार्थी एकावेळी हा कोर्स करत आहेत.

बीएससी हा करिअरचा चांगला पर्याय आहे का?

बीएससी हा नक्कीच एक चांगला करिअर पर्याय आहे, म्हणूनच भारतातील जवळपास ५० लाख विद्यार्थी एकावेळी हा कोर्स करत आहेत.

बीएससी नंतर कोणत्या नोकऱ्या आहेत?

बीएससी नंतरच्या काही प्रमुख नोकऱ्या म्हणजे सायंटिस्ट, रिसर्च असोसिएट, प्रोफेसर, लेक्चरर, टेक्निशियन, स्टॅटिस्टिस्ट, लॅब केमिस्ट, नर्स इ.

बारावीनंतर बीएस्सी चांगले आहे का?

बारावी विज्ञान नंतरचे बीएससी अभ्यासक्रम हे अभ्यासाचे सर्वात निवडलेले क्षेत्र आहे. बीएससी ही ३ वर्षांची नोकरी देणारी पदवीपूर्व पदवी आहे. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी बीएससी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे सिद्ध होते कारण हा अभ्यासक्रम विज्ञान आणि गणित या विषयांची तीव्र आवड आणि पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे.

Leave a Comment