सिबिल फुल फॉर्म CIBIL Full Form In Marathi

CIBIL Full Form In Marathi कर्ज घेत असताना किंवा एखाद्या वस्तूची खरेदी करत असताना आपल्याला आपला सिबील स्कोअर चेक करण्यासाठी सांगितले जाते. CIBIL स्कोअर म्हणजे काय, CIBIL चा फुल फॉर्म काय आहे, CIBIL क्रेडिट स्कोअर कसा ठरविला जातो, CIBIL स्कोअर कसा वाढवावा, CIBIL स्कोअर कसा तपासावा,CIBIL स्कोअर चांगला असण्याचे फायदे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

CIBIL Full Form In Marathi

सिबिल फुल फॉर्म CIBIL Full Form In Marathi

CIBIL Full Form in Marathi । CIBIL LONG Form in Marathi

आपल्याला अनेकदा एखाद्या कंपनीचा लोन घेण्यासाठी कॉल केला जात असतो मात्र हे कॉल सर्वांना येतात असे नाही. कारण या सर्व कंपनी तुमच्या सिबील स्कोअर ला तपासून चांगला असेल तरच कॉल केला जातो.

CIBIL शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Credit Information Bureau India Limited (क्रेडिट इंफॉर्मशन ब्युरो इंडिया लिमिटेड) असा होतो. CIBIL ला मराठी भाषेत क्रेडिट सूचना कंपनी म्हणून देखील ओळखले जाते.

CIBIL म्हणजे काय? – What is CIBIL CREDIT SCORE?

CIBIL हा भारत सरकारचा एक ब्युरो आहे. या संस्थेची स्थापना ऑगस्ट 2000 मध्ये करण्यात आली. आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीचा आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून एक मूल्य ठरवून दिले जाते त्याला सिबील क्रेडिट स्कोअर असे म्हणतात आणि हे क्रेडिट स्कोअर सांगण्याचे कार्य सिबील ही संस्था करते.

आपला सिबील स्कोअर हा घेतलेले कर्ज आणि त्याची परतफेड होते आहे की नाही यानुसार पत ठरवीत असते. सिबील ही संस्था फक्त व्यक्ती नव्हे तर प्रत्येक ग्राहक, व्यावसायिक, संस्था आणि बँकांचे क्रेडिट स्कोअर ठरवत असतात.

सिबील या संस्थेला आणि त्यांनी दिलेल्या क्रेडिट स्कोअर ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने देखील मान्यता दिलेली आहे. बँका आणि आर्थिक संस्थांकडे कर्जासाठी मागणी केल्यानंतर  आपला सर्वात आधी हा सिबील स्कोअर चेक केला जातो आणि त्यानुसार मग त्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही हे ठरविले जाते.

CIBIL क्रेडिट स्कोअर कसा चेक करावा? – How to Check CIBIL Credit Score?

CIBIL क्रेडिट स्कोअर चेक करणे हे पूर्णपणे मोफत आहे. RBI च्या नियमांनुसार ज्या संघटनांना CIBIL स्कोअर चेक करण्याची परवानगी आहे त्याच संस्था तुमचा CIBIL स्कोअर चेक करू शकतात आणि त्याचा रिपोर्ट देणे देखील पूर्णपणे मोफत आहे.

खालील पायऱ्या वापरून तुम्हाला मोफत सिबील स्कोअर चेक करता येईल.

  1. कोणत्याही मान्यताप्राप्त सिबील स्कोअर साईटला भेट द्या.
  2. समोर येणारा फॉर्म मध्ये नाव, फोन नंबर, ईमेल आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  3. पुढील पायरीवर आता तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि इतर काही महत्वाची माहिती भरायची आहे. ही सर्व माहिती  अगदी अचूक असावी आणि ही माहिती कोणासोबत शेअर केली जात नाही.
  4. तुम्हाला पुढे काही सिबील आणि क्रेडिट कर्ज याविषयी प्रश्न विचारले जातील. या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या उत्तरांच्या आणि आधी पुरविलेल्या माहितीच्या अनुसार CIBIL स्कोअर येईल.

तुमचा सिबील स्कोअर हा वर्षाला एकदा पूर्णपणे मोफत मिळविता येत असतो मात्र नंतर अधिक वेळा हवा असेल तर तुम्हाला क्रेडिट स्कोअर समोर आला की मग खाली दिलेल्या काही इतर स्टेप्स देखील पूर्ण कराव्या लागतील.

कंपन्यांकडून आपल्याला अनेकदा सिबील स्कोअर चेक करण्यासाठी काही पेड सबस्क्रिप्शन सुचवते. आपल्याला हे सबस्क्रिप्शन जेव्हा वर्षातून एक पेक्षा जास्त वेळा सिबील स्कोअर चेक करायचा असतो तेव्हा घ्यावे लागतात. मात्र ज्या व्यक्तींना हे गरजेचे नसते त्यांनी एकदा क्रेडिट स्कोअर चेक केला की खाली असलेला No, Thanks हा पर्याय निवडावा.

  • आपला रिपोर्ट आपल्याला हवा असेल तर आपण बनविलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून खाते लॉगिन करावे. आपल्या ई-मेल वर एक मेल आलेला असेल त्यावर जाऊन आपले खाते पुष्टी करून घ्यावे.
  • तुम्हाला डॅशबॉर्ड वर तुमचा क्रेडिट स्कोअर बघायला मिळेल. मात्र हा क्रेडिट स्कोअर पूर्ण वर्षासाठी लागू असेल असे नसते. आपल्याला काही काळानंतर पुन्हा पुन्हा आपल्या व्यवहारातील बदलांमुळे CIBIL CREDIT SCORE चेक करत रहावा लागतो.

CIBIL SCORE आणि माहिती

तुमचा CIBIL स्कोअर म्हणजेच क्रेडिट स्कोअर काय दर्शवितो हे त्या मूल्यावरून जाणून घेऊयात.

  • 750 ते 900 : हा सर्वात उत्तम क्रेडिट स्कोअर समजला जातो. यामध्ये तुम्हाला लगेच कर्ज मंजूर होते. क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी देखील काही अडचण नसते.
  • 700 ते 749 : हा चांगला क्रेडिट स्कोअर आहे. यामध्ये देखील बँकांकडून कर्ज आणि क्रेडिट कार्ड मंजूर केले जातात.
  • 650 ते 699 : मध्यम स्वरूपाचा हा क्रेडिट स्कोअर असून बँका या व्यक्तींना देखील कर्ज देतात मात्र त्याआधी थोडीफार चौकशी केली जाते.
  • 600 ते 649 : हा जरा कठीण स्वरूपाचा क्रेडिट स्कोअर आहे. बँकांना या ग्राहकांना किंवा यापेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असणाऱ्या ग्राहकांच्या सोबत व्यवहार करण्यासाठी थोडा धोका वाटत असतो.

चांगल्या CIBIL क्रेडिट स्कोअरचे फायदे – Benefits of Good CIBIL Credit Score

  • चांगला सिबील स्कोअर हा तुम्हाला कर्ज घेण्यासाठी आणि जास्तीत जास्त कर्ज मिळविण्यासाठी मदत करतो.
  • कर्ज मिळविण्यासाठी अडचणी येत नाही.
  • व्याजदरात आणि जास्त आकारले जाणारे चार्ज देखील कमी केले जातात.
  • चांगल्या सिबील स्कोअर मुळे आपल्याला वार्षिक चार्ज न देता कर्ज मिळते.
  • क्रेडिट कार्ड मिळते.
  • क्रेडिट कार्डची लिमिट देखील वाढविता येते.
  • क्रेडिट कार्ड वर अधिकाधिक चांगल्या ऑफर्स देखील मिळतात.

FAQ

CIBIL म्हणजे काय?

CIBIL म्हणजे Credit Information Bureau (India) Limited (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) होय.

CIBIL क्रेडिट स्कोअर ची रेंज किती असते?

CIBIL क्रेडिट स्कोअर हा 300 ते 900 या तीन अंकी क्रमांक पैकी असतो.

CIBIL स्कोअर मिळविणे मोफत आहे का?

वर्षातून एक वेळा CIBIL स्कोअर चेक करणे आणि त्याचा रिपोर्ट मिळविणे मोफत आहे.

CIBIL ला RBI कडून मान्यता आहे का?

हो, जून 2002 पासून RBI च्या नियमानुसार CIBIL स्कोअर ला RBI कडून कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. नवीन कर्ज नियमावलीत देखील सिबील विषयी RBI ने उल्लेख केलेला आहे.

Leave a Comment