युपीआय फुल फॉर्म UPI Full Form In Marathi

UPI Full Form In Marathi कोठेही बाहेर हॉटेलला गेलो काय किंवा ऑटो रिक्षा ने गेलो काय आपण नेहमी स्कॅनर कुठे आहे हे विचारत असतो. आपण पैसे पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी सध्या जे तंत्रज्ञान दररोजच्या जीवनात वापरत आहोत ते म्हणजे UPI होय. UPI म्हणजे काय, UPI ID काय असतो, UPI Full Form in Marathi, UPI काम कसे करते, UPI कसे वापरतात, UPI साठी उपलब्ध मोबाईल अँप्स आणि UPI विषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

UPI Full Form In Marathi

युपीआय फुल फॉर्म UPI Full Form In Marathi

UPI Full Form in Marathi । UPI Long Form in Marathi

फोन पे किंवा गुगल पे किंवा पेटीएम सारख्या मोबाईल बँकिंग अँप्स वरून आजच्या स्थितीला आपण पेमेंट करतो. UPI या तंत्रज्ञानाचा वापर करून हे सर्व काही शक्य झाले आहे.

UPI शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Unified Payment Interface (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) असा होतो. UPI चा मराठी भाषेत Full form हा युनिफाईड पेमेंट इंटरफेस हाच होतो.

UPI म्हणजे काय? – What is UPI in Marathi?

UPI ही एक ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी वापरण्यात येणारी प्रणाली आहे. UPI चा अर्थ हा युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा आहे. UPI ही प्रणाली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजे RBI च्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. यासाठी RBI ने NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ची मदत घेतली आहे.

UPI या प्रणाली ने आपण बँकेत न जाता किंवा बँकेच्या नेट बँकिंग विभागात न जाता देखील एकमेकांना पैसे पाठवू शकतो किंवा पैशांचे व्यवहार करू शकतो. UPI आपल्या बँकेशी जरी जोडलेला असला तरी देखील यामध्ये बँकेतून फक्त पैसे जाणे आणि येणे इतकेच घडते. इतर सर्व कार्य हे UPI तंत्रज्ञान वापरलेले अँप्स करतात. सुरक्षेच्या बाबतीत UPI अधिक सुरक्षित आहे. UPI मुळे आर्थिक व्यवहार अधिकाधिक सुलभ व्हायला मदत झाली.

UPI ला सुरुवात ही भारतामध्ये 11 एप्रिल 2016 रोजी झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UPI चे उदघाटन केले. त्यांनतर येणारा काळ जसे की नोटबंदी आणि त्यानंतर 2020 मध्ये आलेला कोरोना संकट यामुळे हे UPI पेमेंट अधिकाधिक प्रसिद्ध होत गेले. आता आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडे UPI साठी फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे, भारत पे सारखे अँप्स नक्की बघायला मिळतात.

UPI काम कसे करते? – How UPI Works?

भारतात UPI आधी देखील नेट बँकिंग ही सुविधा होती मात्र त्यामध्ये सुलभता नव्हती. पुढील काळात IMPS हेच नेट बँकिंग मधील तंत्र वापरून UPI सुरू करण्यात आली. UPI मध्ये असलेली सुलभता त्याला इतक्या जास्त प्रमाणात लोकप्रिय बनवत गेली.

UPI ने जर तुम्हाला पैसे पाठवायचे असतील तर त्यासाठी समोरील व्यक्तीचे खाते कोणत्या बँकेत आहे, त्याचे नाव काय आहे, खाते क्रमांक काय आहे या सर्व गोष्टी टाकाव्या लागत नाही. यामागील कारण म्हणजे जेव्हा तुम्ही कोणत्याही पेमेंट अँप च्या माध्यमातून UPI खाते सुरू करतात तेव्हाच तुम्हाला तुमची बँक त्या UPI ID सोबत जोडलेली असते.

त्यामुळे ती सर्व माहिती आपल्या एका UPI ID सोबत जोडलेली असते. याचा फायदा असा होतो की आपण त्या व्यक्तीचा UPI ID टाकला किंवा त्याचा संपर्क क्रमांक जरी दिला तरी देखील आपल्या खात्यातून पैसे सरळ त्याच्या खात्यात टाकता येतात.

आपल्याला हे सर्व करण्यासाठी सुरुवातीला स्वतःचे बँक खाते आणि UPI ID लिंक करणे गरजेचे असते. शिवाय समोरील व्यक्तीचा देखील UPI ID बनलेला आणि लिंक असणे गरजेचे असते.

UPI वापरासाठी काय गरजेचे असते? – Requirements to Use UPI?

UPI या प्रणालीचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील गोष्टी असणे गरजेचे असते.

 •  UPI ही प्रणाली सध्या फक्त स्मार्टफोन किंवा आयफोन सोबत चालते. त्यामुळे स्मार्टफोन किंवा आयफोन मध्ये UPI संलग्नित पेमेंट अँप असणे गरजेचे आहे. लवकरच सरकार फिचर फोन वरून देखील UPI व्यवहार करण्यासाठी सुविधा देण्याचा प्रयत्न करते आहे.
 •  मोबाईल मध्ये एखादे पेमेंट अँप्स म्हणजे गुगल पे, फोन पे, भारत पे, पेटीएम, अमेझॉन पे सुरू असावेत. यामध्ये लॉगिन करून तुमच्या मोबाईल वरून खाते सुरू केलेले असावे.
 •  UPI चा सरळ संबंध हा बँकांसोबत नाही तरी देखील आपले पैसे हे बँकेतून येणार असतात आणि बँकेतून जात असतात त्यामुळे बँक खाते असणे गरजेचे असते.
 •  UPI ID सुरू करताना आपल्याला बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड द्यावे लागते. त्यामुळे बँकेकडून ATM कार्ड मिळालेले असावे.
 •  बँकेमध्ये आपला मोबाईल नंबर त्या खात्यासोबत लिंक असेल तरच आपल्याला UPI खाते सुरु करता येते.
 •  UPI इंटरनेट वर अवलंबून काम करते. त्यामुळे आपले इंटरनेट हे सुरक्षित आणि वेगवान असावे.

UPI ची वैशिष्ट्ये – Facts about UPI

 •  UPI ही प्रणाली आपल्याला पैसे पाठविण्यासाठी आणि पैसे घेण्यासाठी उपयुक्त आहे. यावर एका वेळी जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत पैसे व्यवहार करण्याचे बंधन आहे.
 •  UPI ID हा तुमच्या बँकेच्या खात्याच्या सर्व माहितीला एक पर्यायी ऑप्शन म्हणून वापरता येतो.
 •  नेट बँकिंग सारखी प्रक्रिया हळू नाहीये त्यामुळे व्यवहार पटकन होतात आणि आपल्याला त्याविषयी लगेच सत्यता देखील तपासून बघता येते.
 •  नेट बँकिंग अँप्स सारखी गुंतागुंतीची रचना नसल्याने वापरण्यास अगदी सुलभ असतात.
 •  फक्त पैशांची देवाण घेवाण नाही तर ऑनलाइन सर्व व्यवहार करण्यासाठी UPI लोकप्रिय आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी ऑनलाइन वेबसाईटवर पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड माहिती भरण्याची गरज नसते.

FAQ

UPI साठी कोणते मोबाईल अँप्स वापरावे?

UPI प्रणाली वापरण्यासाठी Google Pe, Phone Pe, Amazon Pe, Paytm हे सर्वात जास्त विश्वसनीय मोबाईल अँप्स आहेत.

UPI वरून पैसे पाठविण्यासाठी मर्यादा काय आहे?

UPI वरून तुम्हाला एका वेळी जास्तीत जास्त 1 लाख रुपयांचा व्यवहार करता येतो.

UPI ची सुरुवात कोणी केली आहे?

NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने UPI या प्रणालीला RBI सोबत सुरुवात केली आहे.

BHIM हे UPI अँप भारत सरकारचे अँप आहे का?

BHIM हे अँप NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या ना नफा ना तोटा तत्वावर काम करणाऱ्या संस्थे अंतर्गत म्हणजेच भारत सरकार अंतर्गत येते.

Leave a Comment