एनएसीएच फुल फॉर्म NACH Full Form In Marathi

NACH Full Form In Marathi भारतात दिवसेंदिवस ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण वाढत आहे. यासंबंधी एक शब्द म्हणजे NACH. मागच्या काही दिवसांमध्ये NACH नावाची बरीच चर्चा झाली. आज आपण बघणार आहोत की NACH म्हणजे काय? NACH meaning in Marathi, NACH full form in marathi आणि NACH विषयी इतर सर्व माहिती आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

NACH Full Form In Marathi

एनएसीएच फुल फॉर्म NACH Full Form In Marathi

NACH full form In Marathi | NACH long form in marathi :

NACH शब्दाचा full form in marathi म्हणजेच NACH लाँग फॉर्म इन Marathi हा National Automated Clearing House (नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस) असा आहे.

NACHम्हणजे काय? | What Is NACH? :

NACH (नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस) हि एक ऑनलाईन पेमेंट पद्धती आहे. जसे RBI (Reserve Bank of India) चे ECS हि एक विद्यमान पेमेंट पद्धती आहे त्याप्रमाणेच प्रमाणेच NACH हि NPCI- National Payments Corporation Of India (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) द्वारे सेट केलेले फंड क्लिअरिंग प्लॅटफॉर्म आहे.

NACHचे 2 प्रकार आहेत – NACH Debit (NACH डेबिट) आणि NACH Credit (NACH क्रेडिट). NACH (डेबिट) आणि NACH (क्रेडिट) चे उद्दिष्ट लाभार्थी जास्त संख्येत असतील असे व्यवहार आणि पुन्हा पुन्हा आणि ठराविक वेळेत करावे लागणारे व्यवहार सोपे करणे हा आहे.

NACH चे फायदे | NACH Benefits:

NACH चे ग्राहकांसाठी फायदे – Benefits ऑफ NACH For Customers :

 • NACH मुळे देय तारखा लक्षात ठेवण्याची गरज नसते
 • NACH द्वारे बिल, हप्ते, प्रीमियम हे सर्व वेळेत आपोआप भरले जाते.
 • NACH ही जलद आणि कमी मॅन्युअल म्हणजे कमी कागदोपत्री प्रक्रिया आहे.

NACH चे बँकांसाठी फायदे – Benefits Of NACH For Banks :

 • NACH मुळे कागदावर आधारित व्यवहार कमी झाले.
 • धनादेश वर अवलंबून व्यवहार देखील NACHमुळे कमी झाले.
 • NACH प्रक्रिया ही जलद आहे आणि कमी manual असल्याने बँकाचा वेळ वाचतो.
 • NACH द्वारा ग्राहक आणि बँकांना सलग्न असलेल्या ग्राहक आणि संलग्न संस्थांना उत्तम सेवा देणे शक्य झाले.

कॉर्पोरेट (वापरकर्ता संस्था) साठी NACH चे फायदे – Benefits Of NACH for Corporate :

 • NACHमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात उत्तम ग्राहक सेवा देता येणे शक्य झाले.
 • NACHमुळे बिले मंजूर आणि वितरित करणे जास्त सोपे झाले आणि वेळेवर होऊ लागले.
 • NACH द्वारा भत्ते, शिष्यवृत्ती इत्यादी सारख्या बदलणाऱ्या फायद्यांचे स्वयंचलित क्रेडिट करणे सुलभ झाले.
 • NACHमुळे धनादेश म्हणजेच कॅश आणि कागदी व्यवहारांवर भर कमी झाले.

आपण बघितले की NACH पेमेंट पद्धतीचे काय काय फायदे आहेत. आता आपण बघुया की NACH डेबिट ची वैशिष्टे काय आहेत.

NACH Debit Characteristis NACH ची वैशिष्टे :

NACH डेबिटची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत –

 • NACH डेबिट हे confirmation (कन्फर्मेशन) म्हणजेच पुष्टिकरण आणि acknowledge (एक्नॉलेज) म्हणजे पोचपावती हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठरावीक वेळेत करते. हि प्रोसेस ऑटोमॅटिक होते तसेच देवाणघेवाण पण ह्याच पद्धतीने होते.
 • NACH डेबिट मध्ये प्प्रत्येक व्यवहार सुरू करण्यापूर्वी बँकेकडून त्यासाठीचा आदेश हा अधिकृत करून स्वीकार केला जातो. त्याशिवाय हा व्यवहार होत नाही.
 • NACH डेबिट मध्ये प्रत्येक व्यवहार करताना युनिक मॅन्डेट रेफरन्स नंबर (UMRN) द्वारे प्रत्येक आदेश हा अद्वितीय रित्या ओळखला जातो. यामुळे प्रत्येक व्यवहाराचा तपशील घेणे ग्राहकांसाठी सोपे जाते.

अशाप्रकारे आजच्या लेखात आपण बघितले की मग म्हणजे काय, NACH meaning in Marathi तसेच NACH full form in Marathi म्हणजेच NACH long form in Marathi. यासोबतच आपण बघितले की NACH चे प्रकार काय आहेत, NACH चे फायदे काय आहेत आणि NACH बद्दल इतर सर्व माहिती आपण आजच्या लेखात जाणून घेतली आहे.

FAQs – Frequently Asked Questions:

NACH चे प्रकार काय आहेत?

प्रामुख्याने NACH चे NACH डेबिट आणि NACH क्रेडिट असे दोन प्रकार आहेत.

NACH क्रेडिट म्हणजे काय?

NACHक्रेडिट ही संस्थांद्वारे वापरली जाणारी एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा आहे. NACHक्रेडिट पेमेंट सेवा वापरकर्ता संस्थेच्या बँक खात्यात मोठा संख्येने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट प्रदान करण्यासाठी वापरली जाते. NACHक्रेडिट द्वारे पगार, पेन्शन, लाभांश, व्याज, इत्यादी पेमेंट केले जातात.

NACH डेबिट म्हणजे काय?

NACH (डेबिट) हे NACHसेवेसाठी नोंदणीकृत कॉर्पोरेटला पुन्हा पुन्हा करावे लागणारे आणि ठराविक काळानंतर करावे खूप जास्त ग्राहकांना पेमेंट कारवाया लागणाऱ्या संस्थेस सुविधा देते. NACH डेबिट द्वारे पेमेंट आपोआप करता येतात. NACH डेबिट मुळे, टेलिफोन बिल, वीजबिल, पाणी बिले, उपकर/करांची वसुली, कर्जाच्या हप्त्यांची परतफेड, म्युच्युअल फंडातील नियतकालिक गुंतवणूक, विमा प्रीमियम इत्यादीसाठी पेमेंट आपोआप होते.

मी आधीच ईसीएसद्वारे (एसे) स्वतःची नोंदणी केली आहे? मला NACH सेवांसाठी पुन्हा नोंदणी करावी लागेल का?

नाही. जर तुम्ही आधीच ESE नोंदणी केली असेल तर NACH साठी त तुम्हाला पुन्हा आदेश फॉर्म भरण्याची गरज नाही. ESE आदेश हा NACH सेवांसाठी वैध असेल.

NACH डेबिट ही एक आदेश आधारित डेबिट सेवा आहे. मी नोंदणीकृत NACH तपशीलांमध्ये बदल करू शकतो का?

होय. तुम्ही नोंदणीकृत NACH तपशीलांमध्ये बदल करू शकता. NACH तपशिलामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही मॅन्डेट फॉर्म (Mandate form) भरून आणि त्यानंतर तेथील `मॉडिफाई` (modify) या पर्यायावर टिक करावा. त्यांनतर तुम्हाला हवा असलेला NACH तपशील बदलावा. अशाप्रकारे NACH साठी नोंदणीकृत तपशील सुधारू शकता. तसेच तुम्हाला जर NACH तपशील कॅन्सल करायचा असेल तर तुम्ही मॅन्डेट फॉर्म (Mandate form) भरून आणि तेथील `Cancel` या पर्यायावर टिक करावा. अशाप्रकारे तुम्ही तुम्हाला नको असलेली NACH नोंदणी रद्द करू शकता.

2 thoughts on “एनएसीएच फुल फॉर्म NACH Full Form In Marathi”

 1. मला loan घेत असताना nach from माझ्याकडून भरून घेतला तर याचा मला काय आहे

Leave a Comment