एटीएम फुल फॉर्म ATM Full Form In Marathi

ATM Full Form In Marathi बँकांमधील व्यवहार आता जवळपास बंद होऊन आपल्याला पैसे काढण्यासाठी किंवा टाकण्यासाठी देखील आता ATM मशीन असलेल्या ठिकाणी जावे लागते आहे. स्टेट बँक सारख्या अनेक बँकांनी तर आता आपल्या शाखेत पैसे काढण्यासाठी किंवा टाकण्यासाठी मर्यादा आणल्या असून सर्व 50 हजारांच्या खालील व्यवहार ATM मध्येच करायला सांगितले जाते.

ATM Full Form In Marathi

एटीएम फुल फॉर्म ATM Full Form In Marathi

आपण अनेकदा ATM च्या माध्यमातून पैसे काढतो मात्र नक्की ATM म्हणजे काय, ATM Full Form in Marathi, ATM कसे वापरतात, ATM चे प्रकार असतील तर ते कोणते, ATM चा इतिहास आणि ATM च्या विविध भागांविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.

ATM Full Form in Marathi – ATM Long Form in Marathi

ATM हे आधी सांगितल्या प्रमाणे एक मशिन आहे त्यामुळे आज आपले अनेक व्यवहार वेगवान आणि सुरळीत झालेले आहेत. आपल्याला कधीतरी विनोदाचा भाग म्हणून ATM चा Full Form हा Any Time Money असा सांगितला जायचा मात्र तो ATM चा खरा Full Form नाही.

ATM हा शब्द मशिनसाठी देखील वापरला जातो आणि कार्ड साठी देखील वापरला जातो. ATM शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Automated Teller Machine असा आहे तर मराठी भाषेत ATM शब्दाचा Full Form हा स्वयंचलित टेलर मशिन हा आहे.

ATM म्हणजे काय? – What is an ATM in Marathi?

ATM हे जवळपास सध्या सर्व खेडेगावात देखील पोहोचलेले मशीन आहे. ATM हे एक मशीन असून याचा वापर हा पैशांचे व्यवहार करण्यासाठी केला जातो. आता या मध्ये पैसे काढणे, पैसे पाठविणे यासोबत पैसे टाकण्याच्या देखील सुविधा आलेल्या आहेत. परंतु काही लोक पैसे टाकणाऱ्या मशीनला जरी ATM म्हणत असतील तरी त्याचे नाव CDM मशिन असते.

बँकांमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेकदा पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असे आणि त्यासाठी आपल्याला पावती भरून द्यावी लागत असे मात्र सध्या ATM मुळे हे काम अगदी एका छोट्याश्या प्लास्टिक कार्ड ने होते आहे. पैसे पाठविण्यासाठी देखील आधी आपल्याला स्लिप भरून घ्याव्या लागत होत्या मात्र आता ते काम देखील ATM मधून होते आहे.

आपल्या गावात असलेल्या बँकेच्या शाखेकडून तुम्हाला एक भारतात सर्वत्र चालणारे आणि गरज असेल तर मागणी करून विदेशात देखील चालणारे एक ATM कार्ड मागविता येते. हे एक प्लास्टिक चे कार्ड असते आणि त्यावर मॅग्नेटिक स्ट्रीप असतात. आपल्या जवळच्या ATM मशीन मध्ये जाऊन तुम्ही हे प्लास्टिक कार्ड टाकले आणि त्यासोबत तुमचा एक गोपनीय असा 4 अंकी कोड टाकला की तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरून व्यवहार करता येतात.

ATM चा इतिहास – History of ATM in Marathi

आज आपण ATM चा वापर हा जास्तीत जास्त पैसे काढण्यासाठी करतो मात्र इतिहासात ATM ची सुरुवात ही काही वेगळ्याच कारणासाठी झालेली होती. 1960 मध्ये बँकॉग्राफ नावाचे एक मशीन विकसित करण्यात आले आणि याचा वापर करून आपल्याला पैसे जमा करता येत होते. अमेरिकेत हे मशिन निर्माण करण्यात आली होती. ल्युथर जॉर्ज सिमजियन यांना या मशिनच्या शोधाचे पूर्ण श्रेय जाते.

याच बँकॉग्राफ मध्ये काही बदल करून ही मशीन बारक्ले या इंग्लंड मध्ये असलेल्या बँकेत बसविण्यात आले. मशिनचा वापर हा 1967 साली सुरू करण्यात आला.
ATM चा शोध कोणी लावला हा प्रश्न आपल्याला देखील पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर आहे जॉन शेफर्ड बँरन! जॉन यांना ATM या शोधाचे जनक म्हणले जाते.

ATM चा वापर कसा करतात?

ATM मधून आपल्याला व्यवहार करण्यासाठी खालील प्रकारे वापर करता येतो.

  • ATM हे मशीन असते आणि त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला ATM कार्ड हे एक प्लास्टिक कार्ड हवे असते.
  • बँकेमध्ये निवेदन केल्यानंतर किंवा आता नवीन खाते उघडत असताना तुम्हाला ATM कार्ड दिले जाते.
  • ATM कार्ड हे तुम्हाला बँकेकडून जरी मिळत असले तरी देखील ते तुमच्या पत्त्यावर पोस्टाने येते. त्यासोबत तुम्हाला एक पिन म्हणजेच गोपनीय आकडा देखील मिळतो.
  • ATM मशीन मध्ये तुम्हाला तुमचे ATM कार्ड घेऊन जावे लागते. तिथे असलेल्या छोट्या ATM कार्ड टाकण्याच्या जागेत ATM कार्ड टाकावे. नंतर तुम्हाला त्या पोस्टासोबत मिळालेला 4 अंकी पिन तुम्ही टाकावा.
  • नंतर तुम्हाला ATM साठी नवीन तुमचा स्वतःचा 4 अंकी पिन देखील बनविता येतो.
  • आता तुम्ही पुढील वेळा पासून पैसे काढण्यासाठी तुमचा नवीन पिन वापरू शकतात.
  • CASH WITHDRAWAL हा पर्याय आणि खात्याचा प्रकार निवडून तुम्ही तुम्हाला खात्यातून हवी असलेली रक्कम काढता येते.
  • तुम्ही ATM कार्ड जर बघितले तर त्याच्या पाठीमागील बाजूस एक काळ्या रंगाची पट्टी असते. या पट्टीला मॅग्नेटिक स्ट्रीप म्हणतात. आपली सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने याच काळ्या पट्टीवर साठविलेले असते.

काही ठिकाणी ATM कार्ड हे व्यवहार पूर्ण होऊपर्यंत तसेच आत ठेवावे लागते तर आपण जर आपले ATM कार्ड दुरीकडे म्हणजे पेट्रोल पंप, मॉल सारख्या ठिकाणी वापरत असाल तर ATM फक्त स्वॅप करावे लागते.

ATM वरून कोणते व्यवहार करता येतात?

ATM कार्ड हे ATM मशीन मध्ये टाकल्यानंतर आणि तुमचा पिन टाकल्यानंतर तुम्हाला खालील व्यवहार हे त्या ठिकानावरुन करता येतात.

  • CASH WITHDRAWAL – हा पर्याय ATM मध्ये सर्वात आधी देण्यात आला आणि जास्तीत जास्त लोक पैसे काढण्यासाठी हा पर्याय निवडतात. ATM चा वापरच सर्वाधिक पैसे काढण्यासाठी होत असतो.
  • CASH DEPOSIT – तुम्हाला जर खात्यात पैसे जमा करायचे असतील तर कॅश डिपॉझिट हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल.
  • BANK STATEMENT – बँकेतील म्हणजेच तुमच्या खात्यातील मागील काही व्यवहार जर तुम्हाला बघायचे असतील हा पर्याय उपयोगी पडेल. याआधी बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे मागील व्यवहार जाणून घ्यावे लागत होते मात्र ATM ने हे काम अगदी सुलभ झाले आहे.
  • MONEY TRANSFER – मनी ऑर्डर सारखी वेळखाऊ पद्धती आता संपली असून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पाठविण्यासाठी हा पर्याय तुम्हाला वापरता येतो.

FAQ

ATM चे वेगवेगळे प्रकार कोणते असतात?

ऑन साईट, ऑफ साईट, ऑनलाइन आणि ऑफलाईन हे मुख्य 4 प्रकार ATM चे असतात. यामध्ये बँकेच्या परिसरात आणि बँकेच्या सर्व्हर सोबत जोडलेले आहेत की नाही यावरून हे 4 प्रकार आहेत.

Privately Owned ATM किंवा White Label ATM म्हणजे काय?

खाजगी मालकीची म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीने स्थापित केलेली ATM ही Privately Owned ATM किंवा White Label ATM म्हणून ओळखली जातात.

ATM मशीन मधून पैसे टाकता येतात का?

हो, मात्र उत्तर पूर्णपणे बरोबर नाही. कारण ATM मशीन मधून आपण पैसे टाकतो असे जरी म्हणत असलो तरी CDM या मशीन प्रक्रियेतून आपण पैसे टाकत असतो.

ATM मधून एका वेळी किती पैसे निघू शकतात?

ATM मशीन मधून एका वेळी किती पैसे निघू शकतात हे तुमच्या बँकेच्या शाखेवर अवलंबून आहे. कधी कधी ही मर्यादा ATM मशीन नुसार 20 हजार प्रति दिवस इतकी असते. बँकेच्या ATM शिवाय तुमच्या खात्याच्या मर्यादेवर देखील या रक्कमेमध्ये बदल होऊ शकतात.

Leave a Comment