केवायसी फुल फॉर्म KYC Full Form In Marathi

(KYC Full Form In Marathi) आपण बँकेत गेलो किंवा एखाद्या एप्लिकेशन मध्ये जर खाते सुरू करायचं असेल तर आपल्याला कायम KYC हा शब्द कानी पडतो. आपण KYC करतो देखील. त्यासाठी आपण आपले काही कागदपत्रे आणि त्यांच्या कॉपी आपण जमा करत असतो. मात्र आपल्याला हा KYC शब्द म्हणजे नक्की काय आहे? KYC चा Full Form काय आहे? KYC करण्याची गरज, KYC कशी करतात?, KYC चे प्रकार काय आहेत? या आणि यासोबत अनेक प्रश्नांची उत्तरे माहीत नसतात. आज आपण याच प्रश्नांची उत्तरे KYC Full Form in Marathi या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

KYC Full Form In Marathi

केवायसी फुल फॉर्म KYC Full Form In Marathi

KYC म्हणजे काय? (What Is KYC In Marathi)

KYC म्हणजे शुद्ध मराठी भाषेत आपल्या ग्राहकाला जाणून घेणे होय. आपल्याला शक्यतो ज्या ठिकाणी पैशांचे व्यवहार करायचे असतात अशा ठिकाणी KYC करावी लागते. या माध्यमातून ती बँक किंवा ती सेवा देणारी संस्था ग्राहकाला जाणून घेत असते. त्याच्या विषयी अधिक माहिती मग ती ओळखपत्र असेल किंवा त्याचा पत्ता असेल हे जाणून घेत असतो.

आता आपले आधारकार्ड आणि पॅनकार्ड एकमेकांना लिंक आहे आणि त्यामुळे आपले जे काही व्यवहार आहेत त्यांची सुस्थिती किंवा काहीही भ्रष्टाचार असेल तर तो लगेच समजून येतो. त्यामुळे बँका, एखादे पैसे देणारे अँप, पैसे एक्सचेंज करण्यासाठी असणारे अँप्स, क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या आणि विमा देणाऱ्या एजन्सी या आपल्या ग्राहकविषयी जाणून घेण्यासाठी आणि तो भ्रष्टाचारी आणि एखाद्या मणी लौंड्रींग चा भाग नाहीये ना हे जाणून घेण्यासाठी त्याची KYC करून घेतात. सर्व काही ऑनलाइन होत आहे आणि त्यामुळे आता KYC ला खूप चांगल्या प्रकारे महत्व प्राप्त होत आहे.

KYC Full Form in Marathi । KYC Long Form in Marathi

KYC या प्रक्रियेचा इंग्रजी भाषेत Full Form हा Know Your Customer (क्नो युअर कस्टरम) असा होतो. KYC प्रक्रियेला शुद्ध मराठी भाषेत तुमच्या ग्राहकाला ओळखा असे म्हणतात. यालाच काही ठिकाणी ग्राहकाला जाणून घ्या असे संबोधले जाते. शब्द अनेक जरी असेल तरी सर्रास KYC हाच शब्द वापरलेला असतो.

KYC करण्याची गरज/ आवश्यकता :-

आपल्याकडे नव्हे तर संपूर्ण जगभरात दहशतवादाला पाठपुरावा करणारे, भ्रष्टाचार करणारे आणि मनी लौंड्रींग प्रकरणात वाढ होत आहे. अशा स्थितीत एखाद्या ग्राहकाला कसे ओळखता येईल म्हणून KYC हे धोरण जगभरात स्वीकारले गेले आहे.

अनेकदा एखादी बँक आपल्या ग्राहकाला भरपूर मोठ्या प्रमाणात कर्ज देत असते मात्र त्या बँकेने जर त्याचा KYC केला नसेल तर त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण कदाचित तो व्यक्ती विजय मल्ल्या असू शकतो. KYC ही प्रक्रिया कायदेशीर असून मग ती बँक त्या व्यक्तीविषयी किंवा कंपणीविषयी KYC मागवून त्यांच्या रेकॉर्ड नुसार त्याला नाकारू देखील शकते. KYC केल्यामुळे अनेक अशा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या ग्राहकांची संख्या कमी होत आहे.

KYC चे प्रकार काय आहेत?

KYC करण्याचे 2 प्रकार आहेत. हे प्रकार KYC कसा केला जातो यानुसार पडलेले आहेत.

1. eKYC :-

eKYC म्हणजे Electronically Know Your Customer होय. यामध्ये तुमचे कागदपत्रे आणि माहिती सर्व काही ऑनलाइन गोळा केली जाते. जी माहिती ऑनलाइन होत नाही ती देखील ऑफलाईन होते मात्र यात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वापरलेले असतात. त्यामुळे या पद्धतीला eKYC असे म्हणतात.

2. cKYC :-

cKYC या प्रकारची KYC ही शक्यतो विमा, इन्शुरन्स आणि शेअर मार्केट सारख्या ठिकाणी केली जाते. यामध्ये KYC अधिक कडक आणि जास्तीत जास्त सुरक्षित असते. cKYC म्हणजे Central Know Your Customer होय. भारतात जिथे मोठे व्यवहार होतात किंवा वित्तीय संस्था आहेत त्यामध्ये अशा प्रकारे KYC केली जाते.

आणखी एका प्रकारे KYC करण्याच्या मुख्य 2 पद्धती आहेत. यामध्ये तुम्ही कोणते कागदपत्रे वापरतात या अनुसार हे प्रकार आहेत.

1. आधार आधारित केवायसी :-

आपले आधारकार्ड हे आता सर्वत्र लिंक झालेले आहे आणि त्यामुळे ग्राहकाला मिनी केवायसी ही आधार कार्ड आणि त्यावरील माहिती वापरून करता येते.

2. IPV KYC :-

IPV म्हणजे व्यक्ती सत्यपान आधारित KYC होय. इंग्रजी भाषेत IPV ला In Person Verification असे म्हणतात. यामध्ये एक व्यक्ती म्हणजेच KRE सेंटर मधील एक कर्मचारी त्या व्यक्तीच्या घरी जाऊन किंवा कॉल वरून त्याचे आधार डिटेल्स सत्य आहेत का हे तपासतो. तो कर्मचारी ग्राहकाच्या घरी जाऊन किंवा ग्राहक त्यांच्या ऑफिसला येऊन आधार बायोमेट्रिक करतात. यामध्ये त्या व्यक्तीच्या पत्त्याविषयी शंका असेल तर त्याठिकाणी त्याला भेटायला केआरई कर्मचारी जात असतो.

KYC साठी आवश्यक कागदपत्रे :-

KYC करत असताना आपल्याला 2 मुख्य पुरावे गरजेचे असतात- पहिला म्हणजे ओळखीचा पुरावा आणि दुसरा म्हणजे पत्त्याचा पुरावा होय. ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही आधारकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड (फोटो हवा), ड्रायव्हिंग लायसन्स, इत्यादी पैकी एक देऊ शकतात. याशिवाय सरकारमान्य कोणताही एक प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकतात.

युनिव्हर्सिटी कडून मिळालेले ओळखपत्र हे देखील ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येते. पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही पत्ता असलेले कोणतेही ओळखपत्र वापरू शकतात. पासपोर्ट, मतदार कार्ड आणि रेशन कार्ड हे तुम्ही पत्त्याचा पुरावा म्हणून देऊ शकतात. भाडे करार, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा फ्लॅट मेंटेनन्स बिल देखील चालतात. इतर कागदपत्रे जसे की लँड लाईन बिल्स, वीज बिल, गॅस बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, इत्यादी देखील पत्त्याचा पुरावा म्हणून देता येतात मात्र हे 3 महिन्यांपेक्षा जास्त जुने नसावे.

KYC कशी करतात?

KYC करण्यासाठी 3 मुख्य पर्याय आहेत.

1. ऑनलाइन
2. आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण
3. ऑफलाईन

आपण या तिन्ही पद्धतीविषयी जाणून घेण्याऐवजी फक्त ऑनलाइन विषयी जाणून घेऊयात कारण सध्या संपूर्ण भारतात नव्हे तर जगभरात ऑनलाइन KYC साठी प्राधान्य दिले जाते आहे.

ऑनलाइन KYC करताना तुम्हाला दोन पर्याय मिळतात. आधार आधारित ओटीपी ही पहिली पद्धत असून तुम्हाला कुठे जाण्याची गरज नसते. आधार आधारित बायोमेट्रिक पद्धत ही दुसरी पद्धत असून यात तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागतो आणि मग तुम्हाला मिळालेल्या तारखेला तुम्ही त्यांच्या कार्यालयात किंवा त्यांचा कर्मचारी तुमच्या घरी येऊन तुमचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करून घेतात.

तर मित्रांनो KYC Full Form In Marathi या विषयी तुम्हाला माहिती मिळालीच असेल तर या पोस्ट ला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेयर करा.

FAQ’s On केवायसी फुल फॉर्म KYC Full Form In Marathi

केवायसी कसे अपडेट करायचे?

केवायसी स्थिती अधूनमधून अपडेट करण्यासाठी, तुम्हाला ओळख पुराव्याची एक प्रत आणि पत्त्याच्या पुराव्याची एक प्रत, भारत सरकारच्या अधिकृतपणे वैध दस्तऐवजांच्या (OVD) सूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रदान करणे आवश्यक आहे.

केवायसी प्रक्रिया मोफत आहे का?

होय, केवायसी पडताळणी पूर्णपणे मोफत आहे.

केवायसीचे नियम काय आहेत?

दोन मूलभूत अनिवार्य KYC कागदपत्रे छायाचित्रासह ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा आहेत. बचत खाते, मुदत ठेव, म्युच्युअल फंड आणि विमा यासारखे खाते उघडताना एखाद्याची ओळख प्रस्थापित करण्यासाठी हे आवश्यक आहे.

केवायसीचे तीन ३ घटक कोणते आहेत?

KYC प्रक्रियेमध्ये ओळखपत्र पडताळणी, चेहरा पडताळणी, कागदपत्र पडताळणी जसे की युटिलिटी बिले पत्त्याचा पुरावा आणि बायोमेट्रिक पडताळणी यांचा समावेश होतो.

Leave a Comment