आयएएस फुल फॉर्म IAS Full Form In Marathi

(IAS Full Form In Marathi) IAS ऑफिसर ही पोस्ट म्हणले की एक आदरभाव त्या व्यक्तीविषयी निर्माण होतो. अनेकदा आपण IAS या पोस्ट विषयी ऐकतो मात्र नक्की हे IAS म्हणजे काय? IAS शब्दाचा Full Form काय आहे? IAS कसे बनता येते? IAS साठी कोणती पात्रता परीक्षा द्यावी लागते? IAS ची कार्ये काय आहेत? याविषयी जाणून घेऊयात.

IAS Full Form In Marathi

आयएएस फुल फॉर्म IAS Full Form In Marathi

IAS म्हणजे काय? (What Is IAS In Marathi)

UPSC म्हणजेच केंद्रीय लोक सेवा आयोगा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांमधून IAS या पदासाठी उमेदवार निवडले जातात. सरकारी नोकरीत एक उच्च दर्जाचे आणि मान सन्मानासोबत जबाबदारीचे पद म्हणून IAS या पदाकडे बघितले जाते.

IAS हे पद कमी आहेत मात्र यासाठी प्रयत्न करणारे उमेदवार भरपूर असतात. आपण इतर सर्व जे काही सरकारी पदे बघतो त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा फक्त IAS अधिकाऱ्याला असतो. अनेकदा आपल्याला आपल्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जवळचा विषय वाटतो मात्र या जिल्हाधिकाऱ्यांची पोस्ट मिळण्यासाठी IAS अधिकारी व्हावं लागतं. आपला उप जिल्हाधिकारी ते डायरेक्टर जनरल ऑफ स्टेट हे IAS अधिकारी असतात.

भारताचे विभाजन आणि स्वतंत्र भारताची निर्मिती झाली तेव्हा भारतात आधीपासून असलेल्या सिव्हिल सर्व्हिसला एक वेगळे रूप देण्यात आले. भारताकडे आलेल्या सिव्हिल सर्व्हिस ला भारतीय प्रशासकीय सेवा तर पाकिस्तानकडे गेलेल्या सिव्हिल सर्व्हिसला केंद्रीय सुपिरियर सेवा असे ही नावे देण्यात आली.

IAS Full Form in Marathi । IAS long form in Marathi

IAS शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Indian Administrative Service असा आहे. IAS शब्दाचा मराठी भाषेत अर्थ म्हणजेच Full Form हा भारतीय प्रशासकीय सेवा असा होतो.

IAS हे केंद्रीय लोक सेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांपैकी सर्वात उच्च दर्जाचे पद म्हणून ओळखले जाते. तसे बघायला गेलं तर IAS, IFS या दोन्ही पदांचा दर्जा हा समान आहे मात्र ज्यांना भारतात राहून सेवा द्यायची त्यांच्यासाठी IAS हे सर्वोच्च दर्जाचे पद आहे.

IAS पदासाठी पात्रता :-

IAS होण्यासाठी आपल्याला UPSC ने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे लागते. UPSC ने उमेदवारांसाठी काही नियमावली घालून दिलेली आहे तिची पूर्तता करावी लागते.

  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. UPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इतर पदांसाठी भूतान, तिबेट आणि नेपाळ प्रांतातील लोकांना संधी आहेत मात्र IAS पदासाठी त्यांना परीक्षा देता येत नाही.
  • परीक्षार्थी हा कोणत्याही एका सरकारमान्य विद्यापीठातून पदवी घेतलेला असावा.
  • पदवी शिक्षण घेत असाल आणि शेवटच्या वर्षात जर असाल तर तुमची कागदपत्रे तपासणी होत असताना तुमच्या हातात पदवी असणे गरजेचे असते.
  • UPSC ने त्यांच्या सर्व परिक्षांवर वयोमर्यादा घातलेल्या आहेत. जर तुम्ही IAS पदासाठी अर्ज करत असाल तर खालील प्रमाणे वयाच्या अटी आहेत.
    ○ खुला प्रवर्ग – 32 वर्षे
    ○ इतर मागास वर्ग – 35 वर्षे
    ○ अनुसूचित जाती व जमाती – 37 वर्षे
  • UPSC ने परीक्षार्थी साठी त्याच्या परीक्षा देण्याच्या वेळेवर देखील मर्यादा घातलेल्या आहेत. तुम्ही किती वेळा पेपर देऊ शकता हे देखील तुमच्या जातीनुसार ठरते.
    ○ सामान्य वर्ग – 6 वेळा
    ○ इतर मागास वर्ग – 9 वेळा
    ○ अनुसूचित जाती व जमाती – अमर्यादित (वयाची अट असते)

IAS मधून कोणती पदे मिळतात?

IAS अधिकारी हे उच्च दर्जाचे पद असून यातून खालील पदांवर नियुक्त्या होत असतात.

  1. जिल्हाधिकारी (डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट)
  2. मुख्य सचिव
  3. जिल्हा परिषद आयुक्त
  4. आयुक्त
  5. निवडणूक आयुक्त
  6. सार्वजनिक क्षेत्र सचिव
  7. कॅबिनेट सचिव

IAS कसे बनता येईल?

IAS अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी UPSC द्वारे सिव्हिल सर्व्हिसेस साठी सुटणारे फॉर्म भरावे लागतील. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला निवडीच्या 3 टप्प्यातून जावे लागेल.

  1. पूर्व परीक्षा (Prelims) – पूर्व परीक्षा हा UPSC मधील सर्वात पहिला टप्पा आहे. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळाले की मग आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र होत असतो. ही परीक्षा 400 गुणांची असते.
  2. मुख्य परीक्षा (mains) – मुख्य परीक्षेत देखील एकूण 9 पेपर असतात. या पेपर मध्ये तुमचे सर्व ज्ञान तापसले जाते.
  3. मुलाखत (Interview) – मुलाखतीत तुमची कागदपत्रे पडताळणी आणि निर्णय घेण्याची क्षमता व त्यासोबत तुम्ही किती चांगल्या प्रकारे प्रशासकीय अधिकारी बनू शकता याविषयी माहिती जाणून घेतली जाते.

एकदा उमेदवार या तिन्ही टप्प्यातून पात्र झाला की मग त्याला त्याच्या योग्य पदावर नियुक्त केले जाते. पदभार स्वीकारल्यानंतर मग त्याची मेडिकल टेस्ट केली जाते.

IAS अधिकाऱ्यांची कामे आणि जबाबदाऱ्या :-

MPSC सारख्या राज्य सेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून निवडून आलेले सर्व अधिकारी हे IAS ऑफिसर च्या हाताखाली असतात. म्हणजे IAS अधिकाऱ्याला या सर्वांवर नियंत्रण ठेवता येत असते. ज्या प्रदेशात त्याची पोस्टिंग केली जाते तिथे हा IAS अधिकारी कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करतो. सार्वजनिक समस्यांचे निराकरण करण्याचे काम IAS अधिकारी करतात. आपत्तीजनक स्थितीमध्ये सर्व IAS ऑफिसर कडे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. आपल्या प्रांतात जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात त्याला IAS अधिकाऱ्याची समंती असणे गरजेचे असते.

IAS अधिकारी हा जिल्हाधिकारी पदावर असेल तर त्याच्यावर जिल्ह्याचा भार असतो. त्याच्या पदानुसार मग त्याची कामे विभागलेली असतात. सचिव हे पद त्याच्याकडे असेल तर त्याला त्या ठिकाणी निर्णय काय घ्यायचे याविषयी सल्ले द्यायचे असतात. आयुक्त पदावरील अधिकाऱ्याला त्या भवनात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. भवनातील जे काही राजकीय नेतृत्व असतील त्यांच्याहुन देखील उच्च दर्जा आणि मान हा आयुक्ताला म्हणजेच त्या IAS अधिकाऱ्याला असतो.

IAS अधिकारी हे पद जबाबदारी आणि कर्तबगारी दाखविण्याचे पद आहे. IAS पदासाठी होणाऱ्या नियुक्त्या आणि निवडी या देखील त्याच लेव्हल अनुसार होतात. ज्याची निवड करायची आहे तो व्यक्ती दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकेल का? त्यांच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे का? निष्पक्ष निर्णय आणि कार्यक्षमता त्याच्याकडे आहे का? राजकीय दबावात देखील आपले प्रशासकीय कार्य तो कितपत पार पाडू शकेल? याविषयी सर्व निरीक्षण हे IAS होण्याआधी होणाऱ्या मुलाखतीत होत असते.

आज आपण IAS म्हणजे काय? IAS Full Form in Marathi, IAS कसे बनता येते? IAS होण्यासाठी पात्रता, IAS झाल्यानंतर मिळणारी पदे, IAS होऊन काय कामे करावी लागतात? याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली.

FAQ’s On आयएएस फुल फॉर्म IAS Full Form In Marathi

आयएएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो?

सातव्या वेतन आयोगानुसार आयएएस अधिकाऱ्याचे मूळ वेतन 56,100 रुपये आहे. पगाराव्यतिरिक्त, आयएएस अधिकाऱ्याला प्रवास भत्ता आणि महागाई भत्ता यासह इतर अनेक भत्ते देखील दिले जातात.

IAS साठी पात्रता काय आहे?

IAS परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. UPSC नागरी सेवा परीक्षा वयोमर्यादा: उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे असावे आणि त्याचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

आयएएस अधिकाऱ्याचे काम काय असते?

धोरणे तयार करणे, अंमलबजावणी करणे आणि पुनरावलोकन करणे यासह सरकारच्या कामकाजाचे व्यवस्थापन करणे. सर्व विविध कामांसाठी विविध विभाग आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींशी सल्लामसलत करणे. विविध योजनांसाठी केंद्र सरकारच्या विविध निधीचे व्यवस्थापन आणि वितरण इत्यादी कार्ये असतात.

12वी पास IAS साठी अर्ज करू शकतात का?

या परीक्षेला बसण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत पात्रता निकष हे आहेत – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पदवीधर असणे आवश्यक आहे! त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या 12वी उत्तीर्ण विद्यार्थी 12वी नंतर लगेच या परीक्षेला बसू शकत नाहीत. 12वी पूर्ण केल्यानंतर त्यांनी आधी ग्रॅज्युएशन पूर्ण केले पाहिजे.

Leave a Comment