ECS फुल फॉर्म ECS Full Form In Marathi

ECS Full Form In Marathi : NEFT हे नाव अनेकांना ऐकलेले असते मात्र ECS विषयी जास्त लोकांना माहिती नसते. ECS हा देखील बँकेतील व्यवहारात वापरला जाणारा पर्याय आहे. आज आपण ECS म्हणजे काय, ECS चा फुल फॉर्म काय आहे, ECS कसे काम करते, ECS चा बँकिंग क्षेत्रात के फायदा आहे, ECS ही सेवा कशी आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ECS Full Form In Marathi

ECS फुल फॉर्म ECS Full Form In Marathi

ECS Full Form in Marathi । ECS Long Form in Marathi

बँक खात्यातून होणारी ऑटो डेबिट किंवा ऑटो क्रेडिट सेवा ही ECS मार्फत होत असते. त्यामुळे सध्याच्या काळात ECS ही सेवा खूप प्रचलित झालेली आहे.

ECS शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Electronic Clearance Service (इलेक्ट्रॉनिक क्लीअरन्स सर्व्हिस) असा आहे. ECS सेवेला मराठी भाषेमध्ये विद्युत क्लिअरिंग सेवा म्हणून ओळखतात.

ECS म्हणजे काय? – What is ECS in Marathi?

एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविण्याचा एक इलेक्ट्रॉनिक पर्याय म्हणजे ECS होय. ही सेवा मुख्यतः ऑटो स्वरूपात कार्यरत असते. म्हणजे एका ठराविक कालावधी नंतर किंवा एका ठराविक रक्कमेचे व्यवहार हे ऑटो करणे म्हणजे अनुपम तिथे ECS सेवा वापरत असतो.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ECS ही सेवा बँकिंग क्षेत्रातील काही ठराविक कालावधी नंतर घडणारे व्यवहार अधिकाधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी सुरू केलेली आहे.

आपले आर्थिक व्यवहार हे आपल्या क्रेडिट स्कोअर वर खूप जास्त प्रमाणात प्रभाव टाकत असतात. त्यामुळे आपल्याला जे काही पेमेंट असतील ते शेवटच्या तारखेच्या आत करणे हे कधीही फायद्याचे असते. ECS सेवेच्या मदतीने आपल्या बँकेतून कर्जाचे हप्ते, विविध प्रकारची बिले, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर त्याचे सिप देखील ऑटो पद्धतीने जातात.

ECS चा इतिहास – History of ECS

9 ऑगस्ट 2003 रोजी भारतीय डार्क विभाग म्हणजेच पोस्ट खात्याने ECS ही सेवा सुरू केली. या सेवेला मुंबई शहरातून सुरुवात करण्यात आली होती. प्रायोजिक तत्वावर काही काळ ही सेवा चालविल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने सर्व भारतात ECS चा अवलंब केला. ECS मुळे बँकेच्या विविध व्यवहारांसाठी लागणारा कालावधी देखील कमी झाला आणि बँक व्यवस्थेवरील ताण कमी झाला.

ECS कुठे वापरली जाते? – Where is the use of ECS?

आपल्याला आता सर्व काही ऑटो आणि कमीत कमी कष्टात व्हावे अशी आशा असते. आपल्याला प्रत्येक महिन्याला करावी लागणारी गॅसची, विजेची आणि मोबाईलची बिले, पॉलिसी चे हप्ते, कर्जाचे हप्ते, म्युच्युअल फंड मधील सिप एका विशिष्ट तारखेला ऑटो म्हणजेच स्वयंचलित पद्धतीने करायची असतील तर त्या ठिकाणी ECS हे तंत्रज्ञान वापरले जाते.

याशिवाय आपण बँकेमध्ये जाऊन देखील ECS सुविधा सुरू करून घेऊ शकतो. सुरू केलेली ECS सुविधा तुम्हाला एका खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात एका ठराविक तारखेला ठराविक रक्कम ऑटो पाठविण्याची मुभा देत असते. ECS ही सेवा पूर्णपणे संगणकीकृत असल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारे चुका होण्याची किंवा काहीतरी फ्रॉड होण्याची शक्यता नाही.

तुम्ही जर स्कॉलरशिपचा लाभ घेतला असेल किंवा सरकारच्या एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यामध्ये तुमच्या खात्यात ठराविक तारखेला एक हप्ता येत असतो. त्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकार कडून देखील हेच ECS तंत्रज्ञान वापरले जाते.

ECS चे बँकिंग क्षेत्रात फायदे – Benefits of ECS in Banking Sector

ECS चा फायदा हा केंद्र सरकार कडून येणाऱ्या योजना सरळ शेतकऱ्यांच्या खात्यां वर किंवा लाभार्थ्यांच्या खात्यांवर पोहोचण्यासाठी मोलाची मदत होत आहे. यामुळे अनेक भ्रष्टाचार देखील कमी झाले आहेत.

आता आपण UPI वापरतो आहे मात्र ECS हे तंत्रज्ञान आल्यानंतर आपल्याला विजेची बिले देखील बँकेतून भरता यायला लागली होती. त्यामुळे या सेवेचा फायदा डिजिटल युगाच्या आधी पासून होतो आहे. यामध्ये सुविधांची वाढ होत गेल्याने आज आपले व्यवहार जलद आणि सुलभ झाले आहेत.

ECS चा फायदा असा होतो की आपल्याकडे क्रेडिट स्कोअर मेंटेन ठेवणे महत्वाचे असते. अनेकदा आपण आपल्या पॉलिसीच्या तारखा किंवा कर्जाच्या हप्त्यांची तारीख विसरून जात असतो तेव्हा मात्र ही ECS सेवा असेल तर तुमच्या खात्यातून रक्कम सरळ तिकडे पाठविली जाईल. ECS मुळे आपला क्रेडिट स्कोअर हा टिकवून ठेवायला आणि त्यामध्ये वाढ करण्यासाठी मदत होते.

ECS सेवा सुरू कशी करावी? – How to Apply for ECS?

ECS ही सेवा फक्त ज्यांच्याकडे सॅलरी खाते आहे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. सॅलरी खाते हे एखाद्या सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जाते. ECS साठी आपल्याला आवेदन करावे लागते.

बँकेमध्ये जाऊन आपल्याला त्याविषयी बँकेत कल्पना द्यावी लागते. बँकेकडून मिळणारा ECS Mandate अर्ज म्हणजेच एक प्रकारे आज्ञापत्र भरून द्यावे लागते.

या आज्ञापत्रातून आपल्याला त्या बँकेमध्ये बँकेतून क्रेडिट आणि डेबिट साठी परवानगी द्यावी लागते. फॉर्म मध्ये महत्वाची बँकेची माहिती भरावी लागते. एकदा माहिती पूर्ण भरली की तुम्हाला बँकेकडून प्रत्येक व्यवहाराचे मेसेज मोबाईल वर मिळत जातात.

FAQ

ECS साठी Transaction चार्ज किती असतो?

ECS व्यवहारांसाठी क्लिअरिंग हाऊस ची मदत घेतली जाते. त्यामुळे क्लिअरिंग हाऊस अनुसार बँकेकडून 25 पैसे ते 50 पैसे प्रति व्यवहार चार्ज केला जातो.

ECS व्यवहार सुट्टीच्या दिवशी होतात का?

ECS व्यवहार हे सुट्टीच्या दिवशी होत नाहीत कारण त्यासाठी बँकेचे मुख्य कार्यालय सुरू असावे लागते.

ECS व्यवहार थांबविता येतात का?

बँकेसोबत आणि कर्ज दात्यासोबत संपर्क करून आपल्याला आपले ECS व्यवहार थांबविता येतात.

ECS बाऊन्स होतो का? ECS बाऊन्स झाल्यास किती चार्ज द्यावा लागतो?

एखाद्या चेक प्रमाणे ECS देखील बाऊन्स होतात आणि त्यावर चेक बाऊन्स झाल्यानंतर ज्याप्रमाणे दंड लावला जातो अगदी तसाच 750 रुपयांपर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो.

Leave a Comment