आयसीआयसीआय फुल फॉर्म ICICI Full Form In Marathi

ICICI Full Form In Marathi : ICICI बँकेविषयी आपल्याला माहिती असेलच मात्र ICICI चा फुल फॉर्म काय आहे? याविषयी खूप कमी लोकांना माहिती असेल. आज आपण ICICI बँकेचा इतिहास, ICICI शब्दाचा Full Form काय आहे, ICICI म्हणजे काय, ICICI बँकेविषयी काही रोचक तथ्य आणि ICICI बँकेच्या कार्यप्रणाली विषयी सविस्तर माहिती जाणून  घेणार आहोत.

ICICI Full Form In Marathi

आयसीआयसीआय फुल फॉर्म ICICI Full Form In Marathi

ICICI Full Form in Marathi । ICICI Long Form in Marathi

ICICI हे औद्योगिक क्षेत्रातील आणि बँकिंग क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव आहे. ‘खयाल आपका’ या ब्रीदवाक्याच्या अंतर्गत संपूर्ण भारतात ही बँक कार्यरत आहे.

ICICI शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Industrial Credit and Investment Corporation of India (इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) होय. ICICI शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ असा होतो.

ICICI म्हणजे काय? – What is ICICI Bank?

भारतातील खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक म्हणून ICICI बँक ओळखली जाते. इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ICICI होय. ICICI बँकेची स्थापना ही 1994 साली झाली होती. आज बँकेच्या भारतात 4,874 पेक्षा जास्त शाखा आहेत.

ICICI ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक तर आहेच मात्र 1998 मध्ये खाजगी क्षेत्रात सर्वात आधी इंटरनेट बँकिंग सुविधा देण्यास सुरुवात देखील ICICI बँकेने केली. भारतात सोडता एकूण इतर 18 देशांमध्ये ICICI बँक कार्यरत आहे. ICICI बँकेचे भांडवल हे इतके जास्त आहे की भांडवल दृष्टीने भारतातील तिसरी आणि खाजगी क्षेत्रातील पहिली सर्वात मोठी बँक म्हणून ICICI बँकेला बघितले जाते.

ICICI बँक लिमिटेड या नावाने ही बँक कार्यरत असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ICICI बँकेला बहुराष्ट्रीय बँक आणि एक वित्तीय कंपनी म्हणून दर्जा प्राप्त आहे.

ICICI बँकेचा इतिहास – History of ICICI

ICICI हे नाव आज जरी बँकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असले तरी देखील त्याचा इतिहास हा सॅमसंग कंपनी सारखा वेगळा आहे. 1955 साली सुरू झालेली ICICI लिमिटेड कापड, सिमेंट आणि इतर काही क्षेत्रात कार्यरत होती.

एक रिटेल बँक बनविण्याचा पुढे त्यांनी विचार केला आणि 1993 पासून त्यांनी या कामाला सुरुवात देखील केली. कायदेशीर तरतुदी आणि इतर सर्व गोष्टी पूर्ण करून अखेरीस 1994 मध्ये ICICI बँक लिमिटेड ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी श्री चंदा डी कोचर हे ICICI बँकेचे संचालक आणि सीईओ म्हणून रुजू झाले.

1998 साली भारतात समभाग सार्वजनिक अर्पण करण्याच्या हेतूने जे निर्णय झाले त्यात ICICI बँकेमध्ये त्यांचा स्वतःचा म्हणजेच ICICI चा हिस्सा हा 46 टक्के इतका राहिला. 2000 मध्ये ICICI ची NYSE म्हणजे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये इक्विटी देण्यात आली. 2001 मध्ये ICICI ने मदुरा लिमिटेड चे अधिग्रहण केले.

ICICI कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ICICI फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या दोन वेगवेगळ्या संस्था म्हणून काम करत होत्या. 2001-02 मध्ये ICICI बँकेच्या मुख्य कार्यकारी मंडळाने निर्णय घेत या दोन्हींचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. सर्व काही आता एकाच नावाखाली आले होते. ICICI बँक हे नाव ICICI लिमिटेड या मुख्य कंपनीला देण्यात आले.

ICICI बँकेच्या सुविधा – Services From ICICI Bank

ICICI ही खाजगी बँक असून सर्व आर्थिक व्यवहार करण्याच्या सुविधा या बँकेमधून आपल्याला मिळतात.

 • चालू खाते आणि बचत खाते
 • क्रेडिट आणि डेबिट कार्ड
 • ग्राहक बँकिंग
 • प्रायव्हेट बँकिंग
 • कॉर्पोरेट बँकिंग
 • फायनान्स
 • इन्श्युरन्स
 • इव्हेस्टमेंट
 • मोर्गेज लोन्स
 • पर्सनल लोन
 • ट्रेडिंग आणि रिटेल फॉरेक्स
 • पेमेंट सोल्युशन
 • वेल्थ मॅनेजमेंट

ICICI बँकेतील मुदत ठेवींवरील व्याजदर – ICICI Bank Fixed Deposit Interest Rates

ICICI बँकेकडून 5 वर्षांच्या मुदत ठेव पावतीसाठी 5.75% टक्के व्याजदर दिला जातो. 3 वर्षांच्या मुदत ठेवीसाठी देखील हाच व्याजदर लागू आहे. ICICI बँकेत सिनिअर सिटीझन साठी देखील सारखाच व्याजदर लागू होतो.

तुम्हाला ICICI बँकेत 1 वर्ष मुदत ठेव पावतीसाठी 5.35% व्याजदर मिळतो. हे सर्व व्याजदर 5 करोड खालील रक्कमेसाठी लागू पडतात.

ICICI बँकेतून जर FD वेळेच्या आधी काढायची असेल तर त्यावर काही प्रमाणात म्हणजे एक वर्षाच्या आत काढली तर 0.50% आणि त्यापेक्षा जास्त काळाच्या FD लवकर काढल्या तर 1.00% रक्कम दंड म्हणून भरावी लागते. अशा वेळी आपल्या मुदत ठेवीवरील व्याजदर आणि मुदत ठेव काढताना असलेल्या व्याजदर यातील सर्वात कमी व्याजदर तुम्हाला दिला जातो.

ICICI बँक कर्जावरील व्याजदर – Loan Interest Rates in ICICI Bank

ICICI बँकेत पर्सनल लोन साठी 10.50% ते 19% प्रति वर्ष इतका व्याजदर लागू होतो.

गृह कर्जासाठी ICICI बँकेमध्ये खालील प्रमाणे व्याजदर लागू होतात.

 • 35 लाखांपर्यंत कर्ज असेल तर त्यावर6.0% ते 8.05% व्याजदर लागू होतात. स्वतःचा व्यवसाय असेल तर तुम्हाला हा व्याजदर 7.70% ते 8.20% इतका द्यावा लागतो.
 • 35 लाख ते 75 लाख यादरम्यान तुमची रक्कम असेल तर6.0% ते 8.20% नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आणि व्यावसायिक असेल तर 7.70% ते 8.35% इतका व्याजदर लागू होतो.
 • 75 लाख रुपयांपेक्षा जास्त जर कर्ज असेल तर त्यावर नोकरदाराला60% ते 8.30% तर व्यावसायिकाला 7.70% ते 8.45% व्याजदर लागू होतो.

FAQ

ICICI बँकेची स्थापना कधी झाली?

1994 साली ICICI बँकेची स्थापना झाली.

ICICI ही बँक सरकारी आहे की खाजगी आहे?

ICICI बँक ही भारतातील दुसरी सर्वात मोठी खाजगी बँक आहे.

ICICI बँकेतील खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक कोणता आहे?

ICICI बँकेतील खात्यात शिल्लक रक्कम तपासणी करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा- 9594613613

ICICI बँकेचा कस्टमर केअर संपर्क क्रमांक कोणता आहे?

18001038181 हा ICICI बँकेच्या ग्राहक सेवा म्हणजेच कस्टमर केअर सेंटरचा संपर्क क्रमांक आहे.

Leave a Comment