एलएलपी फुल फॉर्म LLP Full Form In Marathi

LLP Full Form In Marathi – LLP या शब्द आपण एखाद्या कंपनीच्या नावाच्या शेवटी नक्की बघितलेला असेल. मात्र नक्की हे LLP म्हणजे काय आहे, LLP Full Form in Marathi, LLP आणि PVT LTD यामध्ये काय फरक आहेत, LLP चे फायदे आणि LLP विषयी इतरही सविस्तर गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

LLP Full Form In Marathi

एलएलपी फुल फॉर्म LLP Full Form In Marathi

LLP Full Form in Marathi । LLP Long Form in Marathi

आपल्याकडे कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी विविध प्रकार आहेत त्यापैकी एक म्हणजे LLP होय. शक्यतो हा प्रकार जास्त लोकांच्या द्वारे वापरला जात नाही मात्र तरी देखील याचे अनेक फायदे असतात.

LLP शब्दाचा इंग्रजी भाषेग Full Form हा Limited Liability Partnership (लिमिटेड लाईबलिटी पार्टनरशिप) असा होतो. LLP शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा मर्यादित दायित्व भागीदार असा होतो.

LLP म्हणजे काय? – What is LLP in Marathi?

LLP म्हणजे लिमिटेड लाईबलिटी पार्टनरशिप होय. मराठी मध्ये याचा अर्थ हा मर्यादित दायित्व भागीदार असा होतो. शब्दावरून आपल्याला या LLP चा अर्थ देखील कळतो की LLP मध्ये कंपनीच्या दायित्वात म्हणजे मालकी हक्कात मर्यादा असतात.

मर्यादा असतात म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती त्याची कंपनी LLP म्हणून रजिस्टर करत असतो तेव्हा तो त्या कंपनीचा हक्क मर्यादित करत असतो. आता स्वतः त्या व्यक्तीच्या देखील नावावर त्या कंपनीचे पूर्ण अधिकार नसतात. जेवहा LLP कंपनी असते तेव्हाच प्रत्येक गुंतवणूकदार हा स्वतःच्या मर्यादित हक्कांची दाखवणूक त्या कंपनीवर करत असतो.

LLP मध्ये कंपनीत असलेल्या एका गुंतवणूकदाराच्या चुकीचा परिणाम हा दुसऱ्या गुंतवणूकदारांवर होत नसतो. म्हणजे समजा एका गुंतवणूकदाराने कर्ज घेतले आहे मात्र तो परत करू शकला नाही तर ते कर्ज परत करण्यासाठी पूर्ण कंपनी विक्रीला न काढता त्याचा जेव्हडा मर्यादित हक्क होता तितकाच भाग विक्रीसाठी काढला जातो.

याचा फायदा इतर गुंतवणूकदारांना असा होतो की इतरांच्या निष्काळजीपणाचा फटका स्वतःला बसत नाही. LLP ही व्यवसाय रचना लिमिटेड देयता भागीदारी कायदा 2008 अनुसार अस्तित्वात आलेली आहे.

LLP मध्ये गुंतवणूकदार हे कायद्यानुसार त्यांच्या मर्यादित हिस्स्यावर हक्क दाखवू शकतात. त्यामुळे अधिकार आणि हक्क यामध्ये न अडकता प्रत्येक गुंतवणूकदाराला त्याच्या कंपनीसाठी काहीतरी नवीन करता येते. समोरच्या गुंतवणूकदारांच्या वागण्याचा किंवा कार्याचा परिणाम काय होईल यामध्ये उद्योजकांना जास्त लक्ष द्यावे लागत नसते.

अंतर्गत व्यवस्थापनाच्या समस्या अधिक कमी होतात. LLP ला व्यावसायिक क्षेत्रातील पावसाळ्यातील वाहन म्हणून देखील संबोधले जाते. अंतर्गत व्यवस्थापन आणि परस्पर सहमतीने झालेलं करार यामुळे व्यवसाय अधिकाधिक लवचिक बनत असतो.

LLP आणि PVT LTD मधील फरक

  • LLP म्हणजे मर्यादित दायित्व भागीदारी होय.
  • Pvt Ltd म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होय.

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008 अनुसार LLP कंपन्यांचे रजिस्ट्रेशन होते आणि कार्यभार चालतो. कंपनी कायदा 2013 अनुसार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर आणि कार्यभार करते.

कोणत्याही प्रकारे किमान भांडवल विषयी निकष लागू होत नाहीत. किमान भांडवलासाठी कोणत्याही प्रकारे निकष लागू होत नाही.

LLP कंपनी असण्यासाठी कमीत कमी 2 सदस्य असणे गरजेचे असते. जास्तीत जास्त तुम्ही कितीही सदस्य असलेली कंपनी LLP म्हणून रजिस्टर करू शकतात. प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जर तुम्हाला कंपनी रजिस्टर करायची असेल तर कमीत कमी 2 सदस्य असणे आवश्यक आहे. यामध्ये जास्तीत जास्त 200 सदस्य संख्या असू शकते.

कंपनीला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त कितीही संचालक असू शकतात?

कंपनीला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 15 संचालक असू शकतात.

संचालक मंडळाच्या बैठकांचा अहवाल सादर करणे गरजेचे नसते. प्रत्येक वर्षाला 4 संचालक मंडळाच्या बैठका घेऊन त्याचा अहवाल द्यावा. दोन बैठकांमध्ये 120 दिवसांपेक्षा जास्त अंतर नसावे.

जोपर्यंत 40 लाखांच्या वर वार्षिक उलाढाल जात नाही किंवा एका भागीदाराची गुंतवणूक 25 लाखांपेक्षा जास्त नसते तोपर्यंत CA असणे सक्तीचे नाही. CA हा असायलाच हवा.

कंपनीच्या नावाच्या शेवटी LLP लावणे अनिवार्य असते. कंपनीच्या नावाच्या शेवटी प्रा. लि. (Pvt. Ltd.) लावणे गरजेचे असते. LLP ही व्यवसाय संरचना स्टार्टअप साठी सुरू करण्यात आलेली आहे.ज्या व्यवसायाची जास्तीत जास्त आर्थिक उलाढाल आहे, ज्या उद्योजकांना बाहेरून निधी हवा असतो अशा कंपनीसाठी प्रायव्हेट लिमिटेड ही व्यवसाय रचना आहे.

LLP म्हणून व्यवसाय रजिस्टर करण्याचे फायदे

  •  LLP म्हणून व्यवसाय रजिस्टर करणे अगदी सोपे आहे.
  •  LLP रजिस्ट्रेशन करताना आणि पुढेही त्याचे व्यवस्थापन सांभाळताना अगदी सोपे असते.
  •  इतर सर्व व्यवसाय रचना नोंदणी पेक्षा LLP नोंदणी स्वस्त आहे. त्याला जास्त खर्च येत नाही.
  •  व्यावसायिक क्षेत्रात ज्याप्रमाणे गुंतवणूकदार हा त्या कंपनीचा एक भाग स्वतःच्या नावावर शेअर्स च्या स्वरूपात ठेवतो त्याच प्रमाणे LLP मध्ये आहे.
  •  त्यामुळे LLP व्यवसायाला कॉर्पोरेट सारखा दर्जा दिला जातो.
  •  कमीत कमी 2 भागीदार असतील तरी तुम्हाला LLP म्हणून कंपनी रजिस्टर करता येते. शिवाय जास्तीत जास्त सदस्यांची मर्यादा देखील नाही.
  •  भांडवल किती असावे याविषयी कोणत्याही प्रकारची अट नाही.
  •  CA असलाच पाहिजे अशी एका मर्यादेपर्यंत अट नाही.
  •  संचालक मंडळ नसले तरी चालते शिवाय आपल्याला संचालक मंडळाच्या बैठका आणि त्याचे अहवाल यावर कोणत्याही प्रकारे अट नाहीत.
  •  परदेशातून जर परकीय गुंतवणूक करायची असेल तर शासकीय मार्गाने इथे शक्य नसते मात्र तुम्ही स्वयंचलित मार्गाने ते करू शकतात.
  • स्टार्टअप साठी LLP हा व्यवसाय रचनेचा प्रकार अगदी योग्य आहे.

FAQ

LLP म्हणजे काय?

LLP म्हणजे लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप म्हणजेच मर्यादित दायित्व भागीदारी होय.

LLP म्हणून कंपनी रजिस्टर करण्यासाठी किती खर्च येतो?

LLP म्हणून कंपनी किंवा व्यवसाय रजिस्ट्रेशन करण्यासाठी साधारणतः 7 हजार रुपये इतका खर्च येतो. यामध्ये तुम्ही ज्या व्यक्तीकडून रजिस्टर करून घेता त्यानुसार त्याचे काही चार्जेस जोडले जाऊन खर्च वाढू शकतो.

Pvt Ltd आणि LLP यापैकी कोणते चांगले आहे?

जेवहा प्रश्न मालकी हक्क आणि व्यवस्थापन विषयी येतो तेव्हाच प्रायव्हेट लिमिटेड कधीही चांगले आहे. मात्र ज्यांचा स्टार्टअप आहे किंवा व्यवसाय सुरुवात झाला आहे तर त्यांच्या साठी LLP नेहमीच योग्य असते.

LLP रजिस्ट्रेशन साठी CA ची आवश्यकता असते का?

नाही, LLP म्हणून जर तुम्हाला व्यवसाय रजिस्टर करायचा असेल तर त्यासाठी CA ची आवश्यकता नसते. CA ची आवश्यकता ही वार्षिक उलाढाल 40 लाखांच्या वर गेल्यास LLP व्यवसायाला सुद्धा पडते.

Leave a Comment