ईसीजी फुल फॉर्म ECG Full Form In Marathi

ECG Full Form In Marathi –  ECG म्हणजे काय? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का? ECG हा शब्द आपण दावाखान्याशी किंवा उपचारांच्या संबंधात कधीतरी ऐकतो. आजच्या लेखात आपण ECG म्हणजे काय, ECG meaning Marathi, ECG full form आणि ECG बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

ECG Full Form In Marathi

ईसीजी फुल फॉर्म ECG Full Form In Marathi

ECG Full Form In Marathi | ECG Long Form In Marathi

ECG शब्दाचा Long Formi म्हणजेच ECG full form हा Electrocardiogram (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) असा आहे.

ECG म्हणजे काय? | What is ECG?

ECG म्हणजेच इलेक्ट्रोकार्डियोग्राम हे एक वैद्यकीय विद्युत उपकरण आहे. ECG हे हृदयाच्या आजारांच्या संबंधित वापरले जाणारे उपकरण आहे. ECG वापरून केल्या जाणाऱ्या चाचणीला ECG करणे असे म्हणतात. ECG हे हृदय तपासणीसाठी वापरले जाते. हृदयाची सामान्य तपासणी करण्यासाठी एच केला जातो. ECG हे पूर्णपणे वेदनारहित आहे.

ECG करण्यामागचा मुख्य उद्देश हा हृदयात जर काही वेदना होत असेल आणि त्या वेदना कशामुळे होत आहे आणि हृदयात काही समस्या असेल तर हृदयाची तपासणी करून समस्या त्वरित शोधण्यासाठी, निरीक्षण करून त्याबद्दल चाचणी केली जाते. ECG हे हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी वापरली जाते

ECG यास EKG देखील म्हटले जाते. ECG हे अनेकदा रुग्णालयात, आरोग्य सेवा केंद्रात किंवा मेडीकल लॅब मध्ये असते. रुगांचा ECG हा रुग्णालय आणि लॅब मधे केला जातो. जवळजवळ प्रत्येक रुग्णालयात ECG उपकरण असतेच. रुग्णांच्या रोगाचे निराकरण करण्यासाठी हे एक महत्वाचे उपकरण आहे.

ECG का केला जातो?

हृदयाच्या अनेक सामान्य समस्यांचे निदान करण्यात मदत करण्यासाठी ECG केला जातो. ECG हे वेदनारहित आणि कुठ्ल्याही प्रकारची हानी न करणारी वैद्यकीय तपासणी आहे.

जर एखाद्या रुग्णाला खालील समस्या जाणवत असतील तर ECG केला जातो :

 • जर हृदयाची अनियमित लय म्हणजेच अनियमित ठोके होत असतील (Arrhythmias)
 • हृदयविकाराचा झटका येत असेल तर ECG केला जातो.
 • हृदयातील अवरोधित म्हणजेच ब्लॉक किंवा आकासलेल्या रक्तवाहिन्या असतील आणि छातीत दुखत असेल, त्रास होत असेल तर ECG केला जातो. तुम्हाला यापूर्वी
 • हृदयविकाराचा झटका अगोदर येऊन गेला आला आहे की नाही हे तपासण्यासाठी
 • पेसमेकरसारखे काही हृदयविकारावरील उपचार किती चांगले काम करत आहेत हे तपासण्यासाठी ECG केला जातो.

तुम्हाला खालील लक्षणे दिसत असतील किंवा समस्या जाणवत असतील तर ECG करणे आवश्यक असते : 

 • छाती दुखणे.
 • हृदयाची असामान्य धडधड
 • चक्कर येणे, डोके दुखणे.
 • जलद नाडी
 • धाप लागणे
 • अशक्तपणा, थकवा किंवा व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे.
 • जर घरातील व्यक्तींना हृदयविकार झालेला असेल किंवा हृदयविकाराची समस्या असेल अशावेळी समस्या नसतील तरी ECG करणे गरजेचे आणि फायद्याचे ठरते.

ECG करताना काही त्रास होतो का?

ECG म्हणजेच इलेक्ट्रोकार्डियोग्राम ही एक सुरक्षित तपासणी आहे. ECG करताना कुठ्ल्याही प्रकारचा विजेचा धक्का लागण्याचा नसतो. ECG करताना इलेक्ट्रोड वापरतात जे वीज निर्माण करत नाही म्हणून विजेचा धक्का लागत नाही. वापरलेले इलेक्ट्रोड वीज निर्माण करत नाहीत. इलेक्ट्रोड्स केवळ हृदयाच्या विद्युत बदलांची नोंद घेतात.

ECG करताना इलेक्ट्रोड हे छातीला लावले जातात.इलेक्ट्रोड काढताना तेव्हा पट्टी काढण्यासारखीच किरकोळ वेदना होऊ शकते पण ते हानिकारक नसते.

ECG करताना तुम्ही काय तयारी करावी?

ECG करताना कुठ्ल्याही प्रकारची विशेष तयारी करण्याची गरज नसते. तुम्ही ज्या रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे ECG करणार असाल त्या डॉक्टरला अगोदर सर्व माहिती विचारून घ्यावी तसेच त्यांना तुम्ही घेत असलेल्या सर्व औषधांची आणि आहरची माहिती द्यावी. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तयारी करावी.

ECG प्रक्रिया :

ECG करण्याअगोदर तुम्हाला खालील गोष्टी करण्यास सांगितल्या जाऊ शकतात –

ECG करण्यासाठी रुग्णाला रुग्णालयाचे कपडे घालण्यास सांगितले जाऊ शकते. ECG करताना शरीरास इलेक्ट्रोड लावले जातात त्यामुळे ज्या भागात इलेक्ट्रोड लावले जाणार असेल तर तेथील केस काढायला सांगितले जाऊ शकते जेणेकरून इलेक्ट्रोड व्यवस्थित लावले जावेत.

रुग्ण तयार झाल्यानंतर रुग्णाला सामान्यत: तपासणी टेबल किंवा बेडवर झोपण्यास सांगितले जाते.

ECG दरम्यान –

ECG दरम्यान, 12 पर्यंत सेन्सर्स म्हणजेच इलेक्ट्रोड्स छाती आणि अंगांना जोडलेले असतात. इलेक्ट्रोड हे वायर असलेले चिकट पॅच असतात जे ECG मॉनिटरला जोडलेले असतात. ECG इलेक्ट्रोड हृदयाचे ठोके वाढवणारे इलेक्ट्रिक सिग्नल रेकॉर्ड करतात. संगणक ही सर्व माहिती रेकॉर्ड करतो आणि मॉनिटरवर किंवा कागदावर वेव म्हणजेच लाटा म्हणून दाखवतो.

ECG चाचणी दरम्यान रुग्ण श्वास घेऊ शकतो परंतु रुग्णाला शांत झोपावे लागते. हालचाल करणे, बोलणे किंवा थरथरणे यामुळे चाचणीचा निकाल चुकीचा येऊ शकतो त्यामुळे याची काळजी घेणे आवश्यक आहे.

ECG चाचणीनंतर रूग्ण हा दैनंदिन व्यवहार करू शकतो. फक्त चाचणीमुळे आरामाची किंवा विशेष काळजी घेण्याची आवश्यकता नसते. पण डॉक्टरने सांगितले असल्यास विशेष काळजी घ्यावी. डॉक्टर ECG रिपोर्ट बघून तुम्हाला आवश्यक ती काळजी घेण्यास सांगतील तसेच समस्येचे निराकरण केले जाईल.

अशाप्रकारे आज आपण ECG म्हणजे काय, ECG full form Marathi म्हणजेच ECG long form in Marathi, ECG प्रक्रिया आणि ECG का का जातो याबद्दल माहिती बघितली.

FAQs – Frequently Asked Questions :

ईसीजी चाचणी कशासाठी केली जाते?

ECG म्हणजेच इलेक्ट्रोकार्डियोग्राम हि एक वैद्यकीय चाचणी असून ती हृदयातील विद्युत सिग्नल रेकॉर्ड करण्यासाठी केली जाते. ECG हि एक साधारण आणि वेदनारहित चाचणी आहे. ECG हे हृदयाच्या काही समस्या असल्यास त्या त्वरित शोधण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी वापरली जाते.

तुमचा ईसीजी सामान्य असेल तरीही तुम्हाला हृदयाची समस्या असू शकते का?

ECG रिपोर्ट हा चांगला म्हणजेच सामान्य आला असेल तर त्याचा अर्थ हृदय स्वस्थ आहे असा नसतो. यासोबतच काही लोकांना हृदयविकार असला तरीही त्यांचे ECG रिपोर्ट हे चांगले म्हंचेच स्वस्थ येऊ शकतात. म्हणूनच हृदयाची समस्या समजून काहीवेळा पुढील चाचण्या करण्याची गरज पडू शकते.

ईसीजीचे काही दुष्परिणाम आहेत का?

ECG चाचणीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. ECG चाचणी दरम्यान किंवा ECG केल्यानंतर कुठ्ल्याही प्रकारचा त्रास होत नाही अजिबात दुखत नाही.

ईसीजी चाचणी वेदनादायक आहे का?

ECG चाचणी करणे हे बिलकुल वेदनादायक नाही. रुग्णाला ECG करताना रुग्णाला झोपण्यास सांगितले जाते आणि लहान धातूचे टॅब (इलेक्ट्रोड) चिकट कागदासह त्वचेवर लावतात. हे इलेक्ट्रोड खांद्यावर, छातीवर, मनगटावर आणि घोट्यावर एका ठराविक पद्धतीने लावले जातात.

Leave a Comment