एचआयव्ही फुल फॉर्म HIV Full Form In Marathi

HIV Full Form In Marathi समाजात HIV किंवा AIDS सारखे विषय समोर आले की आपल्याकडे बोलणे टाळण्याची प्रथा पडलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला याविषयी जास्त माहिती नसते. आज आपण HIV Full Form in Marathi, HIV म्हणजे काय, HIV होण्याची कारणे, HIV ची लक्षणे, HIV वरील उपचार या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

HIV Full Form In Marathi

एचआयव्ही फुल फॉर्म HIV Full Form In Marathi

HIV Full Form in Marathi – HIV Long Form in Marathi

HIV शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Human Immunodeficiency Virus infection असा आहे. यालाच मराठी मध्ये ह्युमन इम्युनोडेफिशियनसी व्हायरस इन्फेक्शन म्हणून ओळखतात. मराठी भाषेत सांगायचे झाले तर मानवाला रोगप्रतिकारशक्ती कमी करणारा हा एक विषाणू आहे.

HIV म्हणजे काय? – What is HIV in Marathi?

आपल्याला AIDS हा आजार जर माहिती असेल तर HIV नक्कीच माहिती असेल. HIV हा AIDS आजार होण्यासाठी कारणीभूत असणारा विषाणू आहे. कोरोना विषाणू आपण बघितला आहे त्याचप्रमाणे एकमेकांपासून दुसऱ्याला HIV ची बाधा होऊ शकते. HIV हा विषाणू आहे आणि यामुळे आपले शरीर कमकुवत बनते आणि रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती पूर्णपणे कमी होऊन जाते. याचा परिणाम असा होतो की कोणताही एखादा आजार HIV बाधित व्यक्तीला सहज ग्रासतो.

HIV हा हवेत कोरोना विषाणू सारखा पसरणारा विषाणू नाहीये त्यामुळे तुम्ही HIV बाधित व्यक्तीला सहज जवळ ठेवू शकतात. HIV चा प्रसार हा लैंगिक संबंध, रक्तसंक्रमन आणि गर्भधारणा यामुळे होतो. त्यामुळे या तीन गोष्टी करत असताना काळजी घेणे गरजेचे असते.

आपल्याला AIDS माहिती असतो. प्रत्येक HIV बाधित व्यक्ती हा AIDS बाधित आहे असे नाही. कारण HIV हा विषाणू आहे आणि विषाणूचा शरीरात प्रवेश झाला म्हणजे AIDS झाला असे नाही. काही काळ गेल्यानंतर व्यक्ती मग AIDS ने बाधित होत असतो. त्यामुळे HIV संक्रमण झाल्यानंतर उपचार घेतले की आपण त्यातून सुधारून सहज उपचार घेऊन AIDS होण्यापासून वाचू शकतो.

HIV होण्याची कारणे – What Causes HIV in Marathi?

आपल्या देशात HIV आणि AIDS सारख्या समस्यांना लाजेपोटी दुर्लक्षित केले जाते आणि यामुळे भारतासारख्या प्रगतशील देशात प्रगतीच्या पथावर HIV आणि AIDS धोका बनून उभे आहेत. आपण आज HIV संक्रमण कसे होते आणि त्याची कारणे काय आहेत हे जाणून घेऊयात जेणेकरून आपल्याला ते टाळता आले तर आपल्याला बाधा होण्याची शक्यता कमी होईल.

  • रक्त आपल्या शरीरात देत असताना मिळणारे रक्त हे जर HIV बाधित असेल तर संक्रमण होऊ शकते.
  • आईकडून आपल्या मुलांमध्ये हा HIV संक्रमित होण्याची शक्यता जास्त असते.
  • एखादा HIV संक्रमित व्यक्ती असेल तर त्यासोबत झालेला लैंगिक संबंध हे HIV संक्रमाचे कारण असते.
  • केस कर्तनालय करण्याच्या कात्री आणि ब्लेड माध्यमातून जर घावावर काही लागले तर HIV संक्रमण होऊ शकते.
  • टॅटू जिथे काढले जातात तिथे टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणारी पॉइंटर पिन देखील HIV संक्रमणाचे कारण बनू शकते.
  • मेडिकल क्षेत्रात आता एक सिरींज म्हणजे इंजेक्शनची सुई पुन्हा वापरत नाहीत मात्र ती वापरल्यास देखील आपल्याला HIV संक्रमणाचा धोका असतो.

HIV ची लक्षणे – Symptoms of HIV in Marathi

आपल्याला काही सामान्य लक्षणे ही HIV ची दिसत असतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपण HIV ची चाचणी करून घेणे कधीही योग्य ठरते.

  • थोड्या कामातून किंवा छोट्या कामाचा देखील जास्त थकवा जाणवणे.
  • दिवसेंदिवस वजन कमी होत जाणे आणि त्यात कधीही वाढ न होणे.
  • स्मरणशक्ती मध्ये कमी दिसून येणे. काही गोष्टी लवकर न आठविणे.
  • अतिसार हा आजार खूप काळ होणे. यामध्ये जुलाब देखील होतात. आणि त्यामध्ये खंड पडत नाही.
  • कोरडा खोकला येणे आणि त्यामध्ये काही काळ थकवा जाणवणे.
  • रोगप्रतिकारक शक्ती मध्ये कमतरता दिसून येणे आणि लवकर आजारांनी ग्रस्त होणे.
  • खूप जास्त प्रमाणात ताप येणे. ताप हा सतत असणे.
  • रात्री झोपेत असताना अचानक पणे भीती वाटून घाम येणे.

HIV वरील उपचार – Treatment on HIV in Marathi

HIV या आजारावर आजपर्यंत उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे हे संक्रमण न होण्यासाठी जितकी जास्त काळजी घेता येईल तितके चांगले असेल. हे संक्रमण टाळण्यासाठी पोलिओ सारखी कोणतीही लस देखील अजून जगात विकसित झालेली नाही.

भारत सरकारने काही HIV प्रतिबंधक नियमावली बनवली आहे जीचे पालन केल्यास आपल्याला HIV होणार नाही. अनेकदा हा आजार अनुवांशिक असेल तर आपल्याकडे तो सहन करण्याची खेरीज काही पर्याय उपलब्ध नसतो. मात्र आपण इतर मार्गांनी होणारे संक्रमण मात्र थांबवू शकतो.

  • लैंगिक संबंध ठेवत असताना निरोधाचा वापर करा. निरोध वापरून HIV संक्रमण थांबविता येते.
  • लग्नानंतर किंवा लग्न होण्याआधी स्वतःची आणि आपल्या जोडीदाराची आधी HIV TEST करून घ्या. HIV टेस्ट अनुसार पुढे जाण्याविषयी ठरवा.
  • लैंगिक भागीदारांची संख्या कमीत कमी ठेवल्यास HIV सारखी समस्याच उद्भवत नाही.
  • आपल्याला जखम झालेली असेल तर न्हाव्याकडे जाऊन आल्यानंतर जखम स्वच्छ करा. दाढी करताना नवीन ब्लेड वापरण्यास सांगा.
  • दवाखान्यात नवीन सुई वापरण्यास सांगा. जुनी सुई दिसल्यास डॉक्टर किंवा नर्सला त्याविषयी जागरूक करा.

FAQ’s :-

HIV संसर्ग झालेला व्यक्ती जगू शकतो का? किंवा पूर्णपणे बरा होऊ शकतो का?

एखाद्या व्यक्तीला HIV चा संसर्ग झालेला असेल तर त्याला AIDS या स्थितीपर्यंत जाण्यासाठी मध्ये 8 ते 10 वर्षांचा कालावधी लागतो त्यामुळे जर HIV संक्रमण झाल्याचे लवकर कळले तर आपण HIV वर उपचार घेऊन त्या व्यक्तीचा जीव देखील वाचतो. HIV हे संक्रमण पूर्णपणे बरे होऊ शकते.

HIV आणि AIDS मध्ये काय फरक आहे?

HIV हा AIDS आजार होण्यासाठी कारणीभूत असणारा विषाणू आहे. HIV म्हणजे Human Immunodeficiency Virus आणि AIDS म्हणजे Acquired Immune Deficiency Syndrome होय.

HIV विषाणू कसा संक्रमित होऊ शकतो?

HIV हा विषाणू लैंगिक संबंध, रक्तसंक्रमण आणि आनुवंशिक पद्धतीने संक्रमित होतो.

HIV संक्रमित व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवता येतात का?

एखाद्या HIV बाधित व्यक्तीसोबत लैंगिक संबंध असतील तर आपल्याला देखील HIV चा धोका आहे. त्यामुळे HIV संक्रमित व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवणे चुकीचे आणि धोक्याचे आहे.

Leave a Comment