डीएमएलटी फुल फॉर्म DMLT Full Form In Marathi

DMLT Full Form In Marathi तुम्ही DMLT हा शब्द नक्कीच कुठेतरी ऐकला असेल. बऱ्याचदा 12 वी नंतर शिक्षणासाठी कोणती शाखा निवडावी किंवा कोणता कोर्स घ्यावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही कधीतरी DMLT चा विचार केला असेल आणि त्याबद्दल अजून जाणून घ्यायचे असेल.

DMLT Full Form In Marathi

डीएमएलटी फुल फॉर्म DMLT Full Form In Marathi

आजच्या लेखात आपण तेच बघणार आहोत. DMLT म्हणजे काय?, DMLT long form, म्हणजेच DMLT full form आणि DMLT बद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया.

DMLT Full Form In Marathi | DMLT Long Form in Marathi

DMLT शब्दाचा full form हा Diploma in Medical Laboratory Technology ( डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी) असा आहे. DMLT शब्दाचा शुध्द मराठीतील अर्थ हा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा असा आहे.

DMLT म्हणजे काय? | DMLT Meaning in Marathi

DMLT हा एक डिप्लोमा कोर्स आहे. DMLT मराठीमध्ये अर्थ वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रज्ञान डिप्लोमा असा होतो. DMLT हा एक वैद्यकिय कोर्स असून त्याचा कालावधी 2 वर्षे आहे.

DMLT कोर्स हा क्लिनिकल लॅब मधे केल्या जाणाऱ्या आरोग्य चाचण्यांचे शिक्षण देण्यासाठी बनलेला आहे. ह्या कोर्समधे क्लिनिकल लॅब व रोगांचे निदान करण्यासाठी ज्या काही चाचण्या केल्या जातात त्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. DMLT हा कोर्स 12 वी नंतर करता येतो.

 • डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (DMLT) हि वैद्यकिय शकाहा आहे जी आजारांचे निदान आणि उपचार करण्यासाठी आहे.
 • हया अभ्यासक्रमात विविध रोगांची चाचणी, तपासणी आणि रोगाचे निदांवकरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी बनवलेला डिप्लोमा कोर्स आहे.
 • हया कोर्स मधे विद्यार्थ्यांना बायोकेमिस्ट्री, ब्लड बँक, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजीचे सारखे विषय शिकवले जातात.
 • DMLT कोर्स मधे विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील उपकरणे आणि तंत्रज्ञान वापरण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाते.
 • विद्यार्थ्यांना सीटी स्कॅन मशीन, एक्स-रे मशीन, एमआरआय मशीन हे उपकरणे हाताळणे शिकवले जाते, त्यांचे ज्ञान दिले जाते.
 • DMLT कोर्स तुम्हाला रोगाचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यास सामर्थ बनवतो. .

DMLT पात्रता निकष | DMLT Eligibility Criteria

DMLT कोर्स करण्यासाठी खालील पात्रता निकष आहेत :

● DMLT कोर्सेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रता ही 10 वी पास आहे. एकूण 40% टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी 10 वी पास असणे आवश्यक आहे.
● DMLT करण्यासाठी वयाची कुठ्ल्याही प्रकारची मर्यादा नाहीत. हा कोर्स तुम्ही वयाच्या कुठ्ल्याही वर्षी करू शकता.
● तुम्ही रुग्णालय किंवा लॅबमध्ये काम करत असले आणि तुम्हाला बढती मिळण्यासाठी कोर्स करायचा असेल तरी तुम्ही DMLT कोर्स करू शकता.

DMLT प्रवेश प्रक्रिया | DMLT Admission Process

आता आपण DMLT ची प्रवेश प्रक्रिया कशी असते ते जाणून घेऊया.

 • DMLT कोर्स साठी प्रवेश घेण्याकरिता तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
 • बरेचसे कॉलेज हे कुठ्ल्याही प्रकारची प्रवेश परिक्षा घेत नाही. 10 वीच्या टक्क्यांवर प्रवेश दिला जातो. पण काही कॉलेज हे प्रवेश परिक्षा घेऊ शकतात आणि शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा जसे की NEET, CET ya परीक्षेच्या गुणवत्तेवर देखील प्रवेश दिला जाऊ शकतो.
 • लक्षात घ्यावे की प्रत्येक कॉलेजची प्रवेश प्रक्रिया ही वेगळी असू शकते. त्यातील मूलभूत घटक आपण वर बघितले पण आधी त्यासाठी तुम्हाला ज्या कॉलेज मध्ये किंवा विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे तिथे प्रत्यक्ष भेट देऊन किंवा त्या कॉलेजच्या वेबसाईट वर जाऊन सर्व माहिती अजियाद्राच जाणून घ्यावी आणि त्या माहितीप्रमाणे सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

आपण आता ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने प्रवेश कसा होऊ शकतो याचे स्वरूप बघुया.

ऑनलाईन पद्धत :-

 1. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
 2. तिथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेश अर्ज भरावा आणि आवश्यक ती सर्व माहीत बरोबर भरावी.
 3. त्यानंतर त्यांनी सांगितले आवश्यक टी सर्व कागदपत्रे अपलोड करावी.
 4. सांगितलेली फी भरावी आणि फॉर्म ची प्रिंट काढावी.
 5. काही ठिकाणी कागदपत्र पडताळणी करण्यासाठी परतेक कॉलेजला भेट देण्यासाठी बोलावले जाऊ शकते आणि फी पण कॉलेज मध्ये जाऊन भरावी लागू शकते. अशावेळी सर्व कागदपत्रे आणि फी सोबत ठेवावी.

ऑफलाइन पद्धत :-

 1. ऑफलाईन पद्धितीने प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला ठराविक तारखेला कॉलेजमध्ये बोलावले जाते.
 2. सोबत प्रवेशासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे घेऊन जावे.
 3. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेश अर्ज भरावा आणि कागदपत्रांच्या झेरॉक्स सोबत तो फॉर्म तिथे जमा करावा.
 4. कोर्स फी जमा करावी आणि प्रवेश निश्चित करावा.

DMLT केल्यानंतर नोकरीच्या संधी | Job After DMLT

DMLT हा एका नावाजलेला कोर्स आहे. यातून निर्माण होणाऱ्या नोकरीच्या संधी देखील खूप आहेत.

 • DMLT कोर्स केल्यानंतर तुम्ही कुठ्ल्याही रुग्णालयात लॅब असिस्टंट म्हणून कामाला रुजू होऊ शकतात. वेगवेगळ्या लॅब मधे DMLT कोर्स केलेल्यांची गरज असते त्यामुळे तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते.
 • DMLT कोर्स करून काही वर्ष पुरेसा अनुभव घेतल्यानंतर तुम्ही स्वतःची लॅब देखील सुरू करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हवे तेवढे काम करता येते आणि ही उत्पन्नाची एक सुवर्णसंधी असते.

DMLT नंतरचे पुढील कोर्सेस | Courses After DMLT

DMLT हा एक डिप्लोमा कोर्स आहे त्यामुळे यानंतर तुम्हाला उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही थेट नोकरी देखील करू शकता किंवा या क्षेत्रात कौशल्य वाढवण्यासाठी पुढचे शिक्षणही घेऊ शकता.

DMLT अभ्यासक्रमानंतर बॅचलर पदवी अभ्यासक्रम:

 1. BMLT – Bachelor of Medical Lab Technology (बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)
 2. B.Sc. Medical Imaging Technology – B.Sc. मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी
 3. B. Sc. Clinical Lab Technology – बी.एस्सी. क्लिनिकल प्रयोगशाळा तंत्रज्ञान

प्रामुख्याने DMLT नंतर BMLT आणि B.Sc. MLT या कोर्सेसला जास्त प्राधान्य दिले जाते.

FAQs – Frequently Asked Questions

DMLT कोर्स कधी करता येतो?

DMLT कोर्स हा 10 वी आणि 12वी नंतर करता येतो.

DMLT कोर्स साठी वयोमर्यादा काय आहे?

DMLT कोर्स करण्यासाठी कुठ्ल्याही प्रकारची वयोमर्यादा नाही.

DMLT कोर्स हि पदवी आहे का?

नाही. DMLT कोर्स हा डिप्लोमा कोर्स आहे.

DMLT कोर्स फी काय आहे?

DMLT कोर्सची फी ₹10, 000 ते ₹1 लाख पर्यंत असू शकते. काही कॉलेज मध्ये शिष्यवृत्ती देखील मिळू शकते.

Leave a Comment