पीडब्ल्यूडी फुल फॉर्म PWD Full Form In Marathi

PWD Full Form In Marathi आपण एखाद्या ठिकाणी रस्त्यावर जाताना पाटी वाचली तर आपल्याला PWD हे नाव दिसून येते मात्र नक्की हे PWD म्हणजे आहे तरी काय? याचा आणि रस्त्याचा काय संबंध आहे? सरकार कडून हे रस्ते होतात तर मग PWD ही सरकारी संस्था आहे की एखाद्या कंत्राटदाराच्या कंपनीचे नाव आहे का?

PWD Full Form In Marathi

पीडब्ल्यूडी फुल फॉर्म PWD Full Form In Marathi

PWD हे एक सरकारी डिपार्टमेंट असून सरकारी यंत्रणेच्या अंतर्गत जे काही बांधकाम होतात मग त्यातील रस्ते असो किंवा इमारती हे सर्व काही PWD अंतर्गत होते. आज आपण PWD full form in marathi, PWD म्हणजे काय, PWD ची कार्ये,PWD अधिकारी कसे बनता येते याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

PWD Full Form in Marathi । PWD Long Form in Marathi

PWD हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग असून याअंतर्गत राज्यातील अनेक कामे चालतात. PWD चा इंग्रजी भाषेत Full Form हा Public Works Department असा आहे. PWD चा मराठी भाषेत Full Form हा पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट असा आहे. याचाच मराठी अर्थ म्हणजेच PWD विभागाचे मराठी मध्ये नाव हे सार्वजनिक बांधकाम विभाग असे आहे.

PWD म्हणजे काय? – What is PWD in Marathi?

PWD म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभाग होय. PWD हे एक सरकारी यंत्रणेतील विभागाचे नाव असून याअंतर्गत महाराष्ट्र राज्यात विकासाच्या योजना राबविण्यासाठी काम केले जाते. महाराष्ट्र राज्याच्या PWD या विभागाच्या अंतर्गत रस्ते, पूल आणि इमारती बांधण्याचे काम केले जाते.

PWD या विभागाच्या अंतर्गत जनतेशी संबंधित सर्व बांधकामाची कामे केली जातात. यामध्ये सरकारी इमारती, रुग्णालय, पूल, उड्डाणपूल, रस्ते आणि शाळा देखील बांधल्या जातात. PWD अंतर्गत शहरातील पाणीपुरवठ्यासाठी आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी काम केले जाते. बांधकामासोबत दुरुस्ती देखील PWD अंतर्गत होते.

PWD विभागाचा इतिहास – History of PWD

भारतातील सर्वात जास्त इतिहास असलेला हा PWD विभाग जवळपास 150 वर्षांहून अधिक कालावधीपासून कार्यरत आहे. इतिहासात याच विभागाकडे पाटबंधारे खाते देखील होते. त्यामुळे या विभागाचे काम फार जास्त विभागलेले होते मात्र 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पाटबंधारे आणि इमारती व दळणवळण हे विभाग विभागले गेले. यातील पाटबंधारे खाते सध्या पाणी वाटप आणि नियोजनासाठी काम करते.

PWD हा स्वतंत्र Public Work Department म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रातील रस्ते आणि वाहतूक निगडित कामांमध्ये NHAI सोबत PWD वेगाने कार्यरत आहे. सरकारी इमारती आणि महाराष्ट्रातील रस्ते, पूल बांधणीमध्ये PWD चे योगदान हे फार मोलाचे आहे.

PWD ची कामे – Works of PWD in Maharashtra

प्रत्येक शहराच्या ठिकाणी PWD चे एक ऑफिस असते. त्यामुळे त्या शहरातील सर्व सार्वजनिक बांधकाम करण्याची जबाबदारी या PWD च्या क्षेत्रीय कार्यालयाकडे असते. PWD अंतर्गत खाली दिलेली कामे चालतात.

 • पाटबंधारे खाते जरी PWD अंतर्गत नसले तरी देखिल पाणीपुरवठा करण्याचे काम हे PWD च्या अखत्यारीत येते.
 • सर्व सरकारी इमारती बांधण्याचे काम हे PWD कडे असते.
 • रस्ते निर्मिती करणे. राज्य मार्ग निर्मिती हे PWD अंतर्गत होते आणि त्यासाठी NHAI कडून PWD ला मदत होते.
 • नद्या आणि ओढ्यांवर पूल बांधणे.
 • नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती मध्ये झालेल्या नुकसानावर तातडीने उपाययोजना करणे.
 • शासनाच्या योजना जसे की रोजगार हमी योजना किंवा श्रमदान योजनेच्या अंतर्गत काम करणे.
 • हेलिपॅड निर्मिती करणे किंवा तात्पुरत्या स्वरूपात हेलिपॅड बांधणे.
 • इमारतींच्या बाजूला बाग आणि बगीचे निर्माण करून त्याची देखरेख ठेवणे.
 • रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षांची काळजी घेणे. जर ती फळझाडे असतील तर त्याच्या फळांची विक्री करण्यासाठी लिलाव करणे.
 • सरकारी जागेवर म्हणजेच मुख्यतः रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे हटविणे.
 • खाजगी इमारतींसाठी देखील लिफ्ट सारख्या गोष्टींना परवानगी देणे किंवा त्या संदर्भात तपास करणे.
 • जे काही बांधकाम केले आहे त्याची दुरुस्ती करण्याची आणि देखरेख करण्याची जबाबदारी ही PWD कडे असते.

PWD अधिकारी कसे बनतात? How to become a PWD Officer?

तुम्हाला जर PWD अधिकारी बनायचे असेल तर PWD अधिकारी होण्यासाठी काही पात्रता निकष आहेत त्यासोबत कोण PWD अधिकारी बनू शकतं याविषयी खाली माहिती दिलेली आहे.

 • PWD अधिकारी बनण्यासाठी आपले वय हे कमीत कमी 21 वर्ष असायला हवे. वयाची अट ही 35 वर्षांपर्यंत आहे. वयाच्या अटी मध्ये सरकारी आरक्षणानुसार काही सवलती मिळतात.
 • PWD हे क्षेत्र इंजिनिअरिंग संबंधित असल्याने यामध्ये शक्यतो इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना जास्त संधी उपलब्ध आहेत. सिव्हिल, इलेक्ट्रीकल आणि मेकॅनिकल या क्षेत्रात इंजिनिअरिंग झालेली असेल तर तुम्हाला PWD खात्यात चांगल्या संधी आहेत. इतर इंजिनिअरिंग शाखेसाठी रिक्त पदांसाठी संधी निर्माण होतात.
 • इंजिनिअरिंग झालेले नसेल तरी देखील दोन वर्षे कामाचा अनुभव व डिप्लोमा या शिक्षणावर तुम्हाला PWD मध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
 • PWD मध्ये अंतर्गत परीक्षा पद्धतीने तुम्हाला मोठ्या पदावर जाता येते. त्यासाठी कोणत्याही प्रकारे बाह्य परीक्षा हा पर्याय नाही.

PWD चे इतर काही Full Form

 • Pearson with Disabilities – अपंग व्यक्तींना PWD हे प्रमाणपत्र दिले जाते. यावर त्याच्या अपंगत्वाची टक्केवारी दिलेली असते. अनेकदा आपण एखादा व्यक्ती अपंग आहे हे ओळखु शकतो मात्र सरकारी यंत्रणेने त्यांना सार्वजनिक ठिकानी आणि आरक्षणाच्या ठिकाणी स्वतःचे अपंगत्व सिद्ध करावे लागू नये म्हणून एक प्रमाणपत्र दिलेले आहे. त्याला आपण PWD प्रमाणपत्र असे म्हणतो.
 • Pure Welfare Donation
 • Plan With Design
 • People With Dream
 • Profile with Dedication

FAQ (Frequently Asked Questions)

PWD चा मराठी फुल फॉर्म काय आहे?

PWD चा मराठी भाषेत Full Form हा पब्लिक वर्क डिपार्टमेंट असा होतो. मराठी भाषेत त्याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभाग हा आहे.

PWD ही संस्था कोणाच्या अंतर्गत काम करते?

PWD हा महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत काम करणारा विभाग आहे.

PWD ची मुख्य कामे काय आहेत?

PWD ची मुख्य कामे ही रस्ते बनविणे, बांधकाम करणे आणि पूल- उड्डाणपूल बनविणे आणि दुरुस्ती करणे हे आहे.

Leave a Comment