ओपीडी फुल फॉर्म OPD Full Form In Marathi

OPD Full Form In Marathi मित्रांनो आज आपण ओपीडी म्हणजे काय? ओपीडी हा शब्द कुठे वापरण्यात येतो? ओपीडी चे फुल फॉर्म काय आहेत? हि सर्व माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळतील. ओपीडी ची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

OPD Full Form In Marathi

ओपीडी फुल फॉर्म OPD Full Form In Marathi

बऱ्याच जणांनी OPD हा शब्द खूपदा ऐकला असेल. अनेकदा दवाखान्यात गेल्यावर ऐकायला मिळतो. काही ठिकाणी हा वाचनात देखील येतो. आपणही बोलताना या शब्दाचा वापर करतो पण बऱ्याच जणांना त्याचा पूर्ण अर्थ माहीतच असेल असे नाही. OPD शब्दाचा full form, OPD शब्दाचा अर्थ किंवा OPD काय असते, OPD मधे कशासाठी जातात वैगेरे हे माहीत नसेल. आजच्या लेखात आपण OPD शब्दाबद्दल आणि OPD संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

OPD full form in Marathi | OPD long form in Marathi

OPD या शब्दाचा full form हा out patient department (आऊट पेशंट डिपार्टमेंट) असा होतो. Out patient department यास मराठीत बाह्यरुग्ण विभाग असे म्हणतात.

OPD म्हणजे काय? | OPD meaning in Marathi

OPD (Out Patient department) म्हणजे बाह्यरुग्ण विभाग होय. बाह्यरुग्ण म्हणजे असे रुग्ण जे दवाखान्यात उपचारासाठी राहत नसून फक्त उपचारासाठी किंवा तपासणीसाठी आलेले असतात. तर OPD हा विभाग अश्याच बाह्यरुग्ण रुग्णांच्या आरोग्य समस्या आणि उपचारासाठी तयार केलेला रुग्णालयाचा एक भाग आहे.

OPD मधे रुग्ण निदान किंवा उपचारासाठी भेट देतात. OPD मधे भेट देणाऱ्या रूग्णांना भेट देताना बेडची किंवा भरती होण्याची आवश्यकता नसते. तसेच या रुग्णांना त्वरित किंवा रात्रभर काळजी घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची म्हणजेच ऍडमिट करण्याची आवश्यकता नसते म्हणून हे रुग्ण OPD ला भेट देतात.

OPD ची वैशिष्टे | OPD काय काम करते?

 • हि उपचाराची सर्वात पहिली पायरी आहे. तुम्हाला जी काही आरोग्य समस्या आहे त्याचा उपचार करण्यासाठी सर्वप्रथम OPD मधे जावे लागते.
 • हि रोगाचे निदान कार्यासाठी सर्वात महत्वाची पायरी आहे.
 • OPD विभागात उपचार सेवा, म्हणजे कोणत्या उपचारांची गरज आहे याबद्दल माहिती, निदान चाचण्या (Medical Tests) म्हणजे रोगाचे किंवा आरोग्य समस्यांचे निदान करण्यासाठी ज्या चाचण्यांची गरज असते त्या चाचण्या, तसेच काही छोट्या आणि किरकोळ शस्त्रक्रिया असेल त्याविषयाची माहिती देतात.
 • हा विभाग जे रुग्ण रुग्णालयात दाखल होत नाही अश्या रुग्णांना निदान आंनी काळजी देण्याचे काम करतो.
 • OPD विभाग हा पूर्णपणे बाह्यरुग्ण करिता बनवलेला असतो.
 • रुग्णालयाचा पूर्ण व्यवस्थेत आणि करतात OPD हा विभाग खूप.महत्वाचा असतो. बऱ्याचदा
 • बाह्यरुग्ण विभाग बऱ्याचदा आणि जवळजवळ सर्वच ठिकाणी तळमजल्यावर असतो आणि रुग्णालयात प्रवेश केल्यावर सहज रित्या दिसेल आणि सापडेल अशा ठिकाणी असतो.
 • बऱ्याच वेळा OPD ही एकच असते पण त्यात विभाग पडले जातात. जसे की OPD मधी एक विभाग अस्थिव्यंग विभाग म्हणून असेल तर त्याठिकाणी फक्त अस्थिव्यंग रुग्णांना सेवा दिली जाते. अशाप्रकारे OPD मधील वेगवेगळ्या विभागांत त्याच रुग्णांना सेवा दिली जाऊ शकते. यात स्त्रीरोग विभाग, नेत्ररोग विभाग, नाक कान घसा विभाग, इत्यादी विभाग असू शकतात.
 • OPD ही प्रत्येक रुग्णालयात असेलच असे नाही. काही रुग्णालयात OPD नसते.

OPD उपचार | OPD treatment

आपण जाणून घेऊया कि opd मधे उपचार कसे दिले जात. तुम्ही बहूतेक वेळा हॉस्पिटलमध्ये गेले असाल आणि समोर एखादा काउंटर असलेला विभाग बघितला असेल. त्यावर OPD हे नाव देखील दिसले असेल. तर OPD हे अशा प्रकारे बनवलेले असते.

त्यात प्रते काउंटर वर एक व्यक्ती असतो. एका OPD चे वेगवेगळे विभाग असू शकतात. हे विभाग कोणत्या प्रकारची आरोग्य समस्या आहे त्यानुसार बनवलेले असतात. जसे की दंतरोग किंवा नेत्ररोग. तर दंतरोग उपचारासाठी वेगळी OPD आणि नेत्ररोग उपचारासाठी वेगळी OPD असू शकते.

काही ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एक केस पेपर काढावा लागतो. आपली आरोग्य समस्या काउंटर वरील व्यक्तीला सांगून त्यांच्याकडून तो केस पेपर घ्यायचा असतो. ते सांगतील त्याप्रमाणे आपल्या आरोग्य समस्येच्या संबंधित OPD मधे आपल्याला पाठवले जाते.

OPD विभागात डॉक्टर, नर्स हे सर्व असतात. तिथे गेल्यावर आपण आपली समस्या सांगायची असते आणि त्यांनतर डॉक्टर योग्य तोमुपचार करतात.
जर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असेल तर त्याबद्दल देखील OPD मधे सांगितले जाते.

OPD आरोग्य विमा | OPD health insurance

OPD Health Insurance म्हणजेच OPD आरोग्य विमा हि अशी विमा पॉलिसी असते ज्यात OPD चा खर्च देखील समाविष्ट असतो. म्हणजे तुम्हाला OPD उपचारासाठी जो काही खरंच येतो तो ह्या विमा पॉलिसी द्वारे दिला जातो.
प्रत्येक विमा पॉलिसी हि OPD चा खर्च देईलच अस नाही.

भारतातील काही विमा पॉलिसी ( Insurance Policy ) ज्यात OPD खर्च समाविष्ट असतो त्या खालीलप्रमाणे :

 • ICICI Lombard Complete Health Insurance
 • Manipal Cigna Lifetime Health
 • Bajaj Allianz Tax Gain Plan
 • Aditya Birla Activ Health Enhanced Plan
 • Bharti AXA Health AdvantEdge
 • Care Health Insurance Plan
 • SBI Arogya Plus Plan

विमा पॉलिसी मधे नियम आणि अटी लागू पडू शकतात. म्हणुन तुम्हाला हवा असलेला विमा काळजीपूर्वक सर्व अटी वचून निवडावा.

OPD शब्दाचे इतर long form | OPD शब्दाचे इतर full form

 • Once Per Day (वन्स पर डे)
 • Office of Public Defence (ऑफिस ऑफ पब्लिक डिफेन्स)
 • Optical Path Difference (ऑप्शनल पाथ डिफरन्स)
 • Original Pack dispensing (ओरिजनल पॅक डीस्पेंसिंग)
 • Overfill Protection Device (ओव्हरफील प्रोटेक्शन डिवाइस )
 • Ocean Physics Department (ओशियन फिजिक्स डिपार्टमेंट)
 • Over Pressure Device ( ओव्हर प्रेशर डिवाइस)

आपण आता या full forms बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

● Once Per Day –
Once Per Day म्हणजे दिवसभरात एकदाच किंवा दिवसातून एकदाच. हे अशा गोष्टींबद्दल माहिती देते जी दिवसातून फक्त एकदाच केली जाते किंवा होते. उदाहरणार्थ, औषध हे फक्त दिवसातून एकदाच घ्यावे. (Medicine should be taken once per day only)

● Optical Path Difference –
Optical Path Difference हि एक विज्ञानातील संकल्पना आहे. Optical Path Difference हे प्रकाशाने माध्यमातून पार केलेले अंतर आणि माध्यमाच्या अपवर्तनाचा निर्देशांक (index of refraction) यांचा गुणाकार होय.

● Ocean Physics Department –
हि विज्ञानातील एक शाखा आहे. यामध्ये समुद्रातील जीवन आणि त्याचे स्वरूप आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी भौतिकशास्त्राचा (Physics) वापरले जाते.

अशाप्रकारे आपण OPD म्हणजे काय, OPD चे काम, OPD long form, याबद्दल आवश्यक तेवढी माहिती जाणून घेतली आहे.

FAQs – Frequently Asked Questions

ओपीडी म्हणजे काय?

ओपीडीचे पूर्ण स्वरूप बाह्यरुग्ण विभाग आहे.

ओपीडी महत्त्वाची आहे का?

ओपीडी महत्वाची आहे कारण ही एक सेवा आहे जी वैद्यकीय समस्या कव्हर केली जाते याची खात्री करते. ओपीडीमध्ये वैद्यकीय सल्लामसलत इत्यादी अनेक फायदे उपलब्ध आहेत. ओपीडीसाठीही विमा उपलब्ध आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे कारण तो सर्व रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

Leave a Comment