ईव्हीएस फुल फॉर्म EVS Full Form In Marathi

EVS Full Form in Marathi अनेकदा आपण आपल्या शाळेत EVS हा विषय ऐकून असतो किंवा आपल्याला एक विषय म्हणून EVS महाविद्यालयीन वर्गांमध्ये देखील असतो. EVS आपण ऐकून असतो मात्र नक्की EVS म्हणजे काय? EVS शब्दाचा मराठी भाषेत अर्थ काय होतो? EVS विषयी अधिक माहिती काय आहे? याविषयी आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

EVS Full Form In Marathi

ईव्हीएस फुल फॉर्म EVS Full Form In Marathi

EVS म्हणजे काय? – EVS Meaning in Marathi

EVS चा आपण शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर Environmental म्हणजे पर्यावरणीय आणि Studies म्हणजे अभ्यास होय.

आता पर्यावरणाचा अभ्यास म्हणजे नक्की काय? आपण ज्या पृथ्वीवर असतो त्या पृथ्वीवरील सर्व सजीव आणि निर्जीव घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्यांच्यातील या सहसंबंधांचा केलेला वैज्ञानिक रित्या अभ्यास म्हणजे EVS होय. याशिवाय यामध्ये अनेक इतर विषय देखील आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक रित्या पर्यावरणावर आणि त्या अनुषंगाने मनुष्यावर जे काही परिणाम होत आहेत यांचा देखील अभ्यास या विषयात केला जातो.

EVS मध्ये कुठल्याही प्रकारे बंधन नसून यामध्ये तुम्हाला अनुभवण्यासाठी आणि शिकण्यासाठी अनेक छोटे मोठे क्षेत्र आहेत. मनुष्य आता जे काही करतो आहे आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीने पर्यावरणावर जो काही परिणाम होतो आहे याविषयी अभ्यास EVS मध्ये होत असतो.

EVS Full Form in Marathi । EVS long form in Marathi

EVS या शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Environmental Studies असा होतो. EVS शब्दाचा मराठी भाषेत Full Form चा अर्थ हा पर्यावरण अभ्यास असा आहे.

EVS हा शब्द पर्यावरणाच्या सोबत जोडलेला असल्याने अनेकदा आपल्याला यामध्ये नक्की काय असते? याविषयी उत्सुकता लागून असते. पर्यावरणात ज्या सर्व गोष्टींचा म्हणजे पृथ्वी पासून ते वातावरण आणि या सर्व गोष्टींचा उपभोग घेणाऱ्या सजीवांचा आणि निर्जीवांचा मनुष्याच्या अनुषंगाने केलेला अभ्यास म्हणजे EVS होय.

EVS हा फक्त एक विषय नसून यामध्ये तुम्हाला आता पदव्युत्तर शिक्षण घेण्याच्या देखील संधी आहेत. या वाक्याला ऐकून तुम्हाला देखील EVS मध्ये करिअर आणि त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इर्षा निर्माण झाली असेल. तर चला याविषयी अधिक माहिती देखील जाणून घेऊयात.

EVS मध्ये शिक्षण घेण्याचे उद्दीष्टे

EVS हे शिक्षण घेण्याचा सर्वात महत्वाचा फायदा आणि उद्दिष्ट हे आहे की सध्या निसर्गातील अनेक गोष्टी संपत आला आहेत तर या विनाशाकडे जात असलेल्या गोष्टींना नक्की पर्यायी व्यवस्था काय आहे याविषयी अभ्यास केला जातो. EVS ने आपल्याला प्राणी आणि सजीव वनस्पती यांच्यातील सहसंबंध समजतात हा आणखी एक फायदा होतो.

EVS च्या माध्यमातून सध्या अनेक नवीन आणि मागील काळापासून सुरू असलेले अनेक पर्यावरणीय समस्या समोर आलेल्या आहे. या सर्व पर्यावरणीय समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्यावरील उत्तर समजून घेण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी EVS ची मदत होते आहे.

EVS च्या अभ्यासाने सध्या नैसर्गिक संसाधनांचा वापर कसा करावा आणि पर्यावरणाला कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ द्यायचे नसेल तर त्यामध्ये काय बदल करावे हे समोर येते आहे. संपत आलेल्या उर्जास्रोतांवर काय पर्यायी मार्ग आहे याविषयी EVS या विषयाच्या माध्यमातून समाजपर्यंत उत्तर पोहोचते आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी EVS या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची मोठ्या प्रमाणात मदत होते आहे. त्यामुळे आपल्याला जर पर्यावरणाविषयी आपुलकी असेल आणि पर्यावरणासाठी काही करायचे असेल तर EVS चा अभ्यास करणे कधीही फायद्याचे असेल.

EVS मध्ये पदव्युत्तर शिक्षण

EVS मध्ये जर तुम्हाला पदव्युत्तर शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी लागणाऱ्या पात्रता पूर्ण कराव्या लागतील. इतर कोर्सेस प्रमाणे हा देखील 2 वर्षांचा मास्टर कोर्स आहे.

EVS विषयात जर तुम्हाला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल म्हणजेच जर तुम्हाला मास्टर ऑफ EVS व्हायचे असेल तर तुम्हाला खालील पात्रता पूर्ण कराव्या लागतील.

 • विद्यार्थी हा बारावी झालेला असावा. त्याची शाखा कोणतीही असली तरी देखील त्याला 11 वि आणि 12 वि या वर्षांमध्ये बायोलॉजी निगडित एक तरी विषय असायला हवा.
 • तुम्हाला कोणत्याही विज्ञान विषयात पदवीचे शिक्षण घेणे बंधनकारक आहे.
 • तुमच्याकडे जर या दोन पात्रता असतील तर तुम्हाला मास्टर ऑफ ईव्हीएस साठी नक्कीच प्रवेश मिळेल.

या व्यतिरिक्त देखील EVS संदर्भात काही प्रमाणपत्र देणारे कोर्स आहेत त्याविषयी आपण पुढे जाणून घेणार आहोत.

EVS मध्ये कोणते विषय असतात?

EVS मध्ये खालील काही विषय असतात.

भूगोल (Geography), नैतिकता (Ethics), मानव वंश शास्त्र (Anthropology), धोरण (Policy), राजकारण (Politics), नागरी नियोजन (Urban Planning), प्रदूषण नियंत्रण (Pollution Control), नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (Natural Resources Management), कायदा (Law), अर्थशास्त्र (Economics), तत्वज्ञान (Philosophy), समाजशास्त्र (Sociology), सामाजिक न्याय (Social Justice)

EVS मध्ये सर्टिफिकेट कोर्सेस

तुम्हाला मास्टर शिवाय EVS विषयात काही कोर्सेस करता येतात आणि या कोर्सेस चे प्रमाणपत्र हे तुम्हाला करियर साठी ग्राह्य धरण्यात येते.

 • पर्यावरण विज्ञान विषयात डिप्लोमा
 • पर्यावरण शास्त्र विषयात पदवी
 • पर्यावरण व्यवस्थापन विषयात पदवी
 • अर्थ सायन्स विषयात डिप्लोमा
 • पर्यावरण शास्त्र आणि विज्ञान विषयात डिप्लोमा

EVS कोर्सेस नंतर करियरच्या संधी

ज्यांनी EVS विषयात शिक्षण घेतलेले आहे त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या करियर मध्ये खूप महत्वाचा वाटा असतो. EVS शिक्षण झाले असेल तर खालील काही ठिकाणांवर तुम्हाला काम करण्याच्या संधी मिळू शकतात.

 1. नैसर्गिक संसाधनचे संवर्धन करणाऱ्या संस्था
 2. पर्यावरणीय पैलूंचा अभ्यास
 3. पर्यावरणीय समस्या आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था
 4. प्रदूषण नियंत्रण
 5. पर्यावरण आणि त्या सोबत जोडलेले सामाजिक प्रश्न
 6. लोकसंख्या आणि त्याचे पर्यावर्णावरील परिणाम
 7. पर्यावरण आणि ह्रास व त्यावरील पर्याय

वरील सर्व क्षेत्रांमध्ये तुम्हाला पर्यावरण शास्त्र संशोधक, पर्यावरण सल्लागार, लेक्चरर, वन्यजीव किंवा पर्यावर्णीय फोटोग्राफर, वन्यजीव आणि पर्यावरण निगडित चित्रपट निर्माता, कचरा व्यवस्थापन सल्लागार, संचालक सारख्या पदांवर काम करण्याच्या संधी निर्माण झालेल्या आहेत.

EVS शब्दाचे इतर काही Full Form

 1. European Voluntary Service
 2. Electronic Variable Speed
 3. Erdman Video System
 4. Ear Voice Span
 5. Enhanced Vision System
 6. Enterprises Visibility system
 7. Emergency Vehicle Service
 8. Exposure Value System
 9. Extravehicular Suit
 10. Electronic Village Systems
 11. Electronic Vehicle Stability

FAQ’s

ईव्हीएस विषय काय आहेत?

ईव्हीएस विषय हा इतिहास, भूगोल आणि विज्ञान या अभ्यासाच्या तीन घटकांचा समावेश आहे. हा विषय विस्तीर्ण पर्यावरणाच्या मानवी, सामाजिक आणि सांस्कृतिक परिमाणांच्या ज्वलंत आकलनासह निसर्ग आणि त्यातील घटकांचा शोध, विकास आणि संवर्धन यावर लक्ष केंद्रित करतो.

शाळेत EVS चा अर्थ काय?

EVS किंवा पर्यावरण अभ्यास हा प्राथमिक वर्गात शिकवला जाणारा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. हा विषय मुलांना त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी कशा कार्य करतात आणि संवाद साधतात हे समजण्यास मदत करतो.

आम्ही ईव्हीएसचा अभ्यास का करतो?

पर्यावरण शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांचे निर्णय आणि कृतींचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो हे समजण्यास मदत होते. हे जटिल पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये तयार करते आणि लोकांना अति-शोषणामुळे होणारे परिणाम समजून घेण्यास आणि त्यानुसार कार्य करण्यास मदत करते.

पर्यावरण विज्ञान सोपे आहे का?

पर्यावरण विज्ञान हे सामान्यतः प्राप्त करण्यासाठी सोपे विज्ञान पदवींपैकी एक मानले जाते. या समजुतीचे एक कारण असे आहे की ते अगदी हाताशी आहे आणि कमीतकमी विज्ञानाच्या प्रमुख मानकांनुसार, कमीतकमी जटिल गणिताची आवश्यकता आहे.

Leave a Comment