पीसीओडी फुल फॉर्म PCOD Full Form In Marathi

PCOD Full Form in Marathi आपल्याला महिलांच्या समस्यांविषयी जास्त बोलायला लागले की थोडंस वेगळं वाटत मात्र आजतागायत महिलांनी जे सहन केले आहे त्या समस्या आता झाकून न ठेवता त्यावर विचार करून त्यासंदर्भात जनसामान्यांच्या मध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. महिलांच्या समस्यांमधील सर्वात जास्त प्रमाणात सध्या दिसून येणारी समस्या ही मासिक पाळी संबंधित आहे.

PCOD Full Form In Marathi

पीसीओडी फुल फॉर्म PCOD Full Form In Marathi

अनेकदा महिलांना आणि शक्यतो मुलींना अनियमित मासिक पाळीची समस्या जाणवते आणि त्यामुळे त्यांनी जर डॉक्टरांचा सल्ला घेतलाच तर डॉक्टर PCOD विषयी सांगतात. अनियमित मासिक पाळीची समस्या शहरातील मुलींना डॉक्टरांकडे जाऊन सल्ल्याने सोडवता येतात मात्र ग्रामीण भागात याविषयी अजूनही जागृती होणे गरजेचे आहे. आज आपण याच PCOD विषयी संपूर्ण माहिती, PCOD Full Form in Marathi, PCOD म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत.

PCOD म्हणजे काय? PCOD Meaning in Marathi

स्त्रियांच्या मासिक पाळी मधील अनियमितता किंवा अधिक त्रास होणे याला PCOD असे म्हणतात. हा एक आजार आहे. सध्याच्या स्थितीत अनेक स्त्रियांमध्ये आपल्याला ही समस्या प्रकर्षाने बघायला भेटते.

PCOD ग्रस्त महिलांच्या ovary मध्ये म्हणजेच अंडाशया मध्ये गाठी तयार होतात. मासिक पाळीच्या वेळी महिलांच्या शरीरातून अविकसित स्त्री बीज हे बाहेर टाकले जाते मात्र PCOD मुळे निर्माण झालेल्या गाठीचा परिणाम असा होतो की हे स्त्री बीजच निर्माण होत नाही आणि झाले तेही गाठींचा अडथळा आल्याने महिलांना या काळात त्रास होतो.

महिलांच्या शरीरात या काळात भरपूर बदल होतात. हार्मोनल असंतुलित होणे ही एक सर्वात जास्त प्रकर्षाने जाणविणारी समस्या आहे. या काळात स्त्रियांची चिडचिड होण्याचे हार्मोनल इमबॅलन्स हे सर्वात महत्वाचे कारण आहे.

PCOD Full Form in Marathi । PCOD Long Form in Marathi

PCOD हा वैद्यकीय क्षेत्रातील मधील एका आजाराचा शॉर्ट फॉर्म आहे. PCOD शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Polycystic Ovarian Disease असा आहे.
शुद्ध मराठी भाषेत PCOD म्हणजेच मासिक पाळीशी निगडित समस्या होय. PCOD हा शब्द आणि समस्या स्त्रियांना आता छोटी जरी वाटत असली तरी देखील पुढे जाऊन त्याचे गंभीर परिणाम होत असतात.

PCOD कोणत्या वयोगटात होते?

महिलांमध्ये होणाऱ्या या समस्येचा एक असा ठराविक कोणताही वयोगट नाही. किशोरवयीन मुलींमध्ये म्हणजे ज्यांना आता मासिक पाळी सुरू झालेली आहे अशा मुलींपासून ते जोपर्यंत महिलांना मासिक पाळी येते म्हणजेच 50 वर्षांपर्यंत महिलांमध्ये ही समस्या होते.

PCOD समस्येने आपल्याला वेधले आहे हे जाणून घेण्यासाठी महिलांनी मासिक पाळीवर लक्ष ठेवावे. जर मासिक पाळी मध्ये अनियमितता दिसून आली तर आपल्याला PCOD वर उपचार घ्यावे लागतील हे लक्षात घ्यावे.

PCOD समस्या का उद्भवते?

आपल्याला PCOD होण्याची कारणे कळली तर आपण सहज PCOD होण्यापासून थांबू शकतो.

● दैनंदिन दिनचर्येत झालेले बदल :-

हार्मोनल बदल हे PCOD चे सर्वात मुख्य कारण आहे. त्यामुळे दैनंदिन दिनचर्येत होत असलेले बदल, कुटुंबात काही समस्या असतील तर त्या आणि त्यामुळे येणारा तणाव ही हार्मोन्स मध्ये बदल होण्याची कारणे आहेत.

● फास्ट आणि जंक फूड :-

आपल्याला सध्याच्या धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि जंक फूड हाच एक आधार झालेला आहे. मात्र याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात याविषयी मात्र आपण कधी विचार देखील करत नाही. आहारात झालेल्या या बदलांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

● अनेकदा वरील दोन्ही कारणे नसताना देखील PCOD सारख्या समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे अनुवंशिकता. त्यामुळे जर आपल्या परिवारात कोणाला ही समस्या असेल तर आपण आधीच त्याविषयी अधिकाधिक काळजी घ्यायला सुरुवात करायला हवी.

PCOD ची लक्षणे – Symptoms of PCOD

PCOD ही समस्या ग्रामीण भागात देखील प्रकर्षाने जाणवते मात्र यावर उपचार आणि उपाय घेण्यासाठी जागृती नसल्याने महिलांना आपला जीव देखील गमवावा लागतो. त्यासाठी एकदा PCOD ची लक्षणे काय आहेत याविषयी सर्वांनी जाणून घेतलेच पाहिजे.

● मासिक पाळीतील अनियमितता

महिलांमध्ये आपल्याला माहिती असेल की जे स्त्री बीज फलित होत नाही त्याला प्रत्येक महिन्याला योनीमार्गातून बाहेर टाकले जाते. हेच स्त्री बीज बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला किंवा कालावधीला मासिक पाळी असे म्हणतात. आपण वर माहिती घेतल्याप्रमाणे हे स्त्री बीज निर्माण होत नाही किंवा अडथळे येतात आणि त्यामुळे मासिक पाळी उशिरा येते. महिलांना या काळात साधारण मासिक पाळीच्या तुलनेत भरपूर त्रास होतो.

● गर्भधारणा न होणे

अनेकदा स्त्री बीज निर्मिती होऊन त्याचा नर बीजसोबत संपर्क देखील येतो मात्र गर्भाशयाची निर्मिती होण्यासाठी लागणाऱ्या जागेत अंडाशय गाठींचा अडथळा निर्माण होतो. याचा परिणाम असा होतो की गर्भाशय निर्मिती ही होते मात्र काही थोड्याच दिवसात तो गर्भाशय बाहेर टाकला जातो. यालाच आपण महिलांमधील वंध्यत्व असे देखील म्हणतो.

● हार्मोनल बदल

स्त्रियांना या काळात त्रास सहन करावा लागल्याने त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल चेंजेस हे होतात. त्यांचे शरीर सक्षम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असते मात्र या हार्मोनल बदलांचा परिणाम त्यांच्या वागण्यावर होतो. महिलांची या काळात असंख्य वेळा चिडचिड होते. अनेकदा त्यांना थकल्यासारखे जाणवते किंवा कंटाळा येतो. महिलांमध्ये सततचा अशक्तपणा जर जाणवत असेल तर PCOD चे हे महत्वाचे लक्षण आहे.

● अचानक होणारी वजन वाढ

महिलांमध्ये ही समस्या आता प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे जर तुमच्या शरीराचे वजन अचानक पणे वाढत असेल तर त्याकडे कधी दुर्लक्ष करू नका कारण याचे कारण PCOD असते. अचानक होणारी वजनवाढ ही आपल्याला पोटाच्या घेराशी संबंधित आहे. पोटाचा घेर हा अचानक वाढण्यास सुरुवात होते.

PCOD वरील उपाय

आपल्या बदलत्या जीवन शैलीत PCOD ही समस्या प्रकर्षाने जाणवते आहे. त्यामुळे PCOD पासून दूर राहायचे असेल किंवा या समस्येचे निराकरण करायचे असेल तर खालील उपाय नक्की पाळायला हवेत.

  • PCOD ही समस्या जाणवत असेल किंवा जर तुम्हाला यापासून दूर राहायचे असेल तर दररोज व्यायाम करणे हा एक उत्तम उपाय आहे. व्यायामाने आपले शरीर सुदृढ आणि सशक्त बनते. त्यामुळे याचा फायदा आपल्याला शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यासाठी देखील होतो.
  • आपल्या आहारात सध्या भरपूर बदल होत आहेत. संतुलित आहार हे निरोगी आरोग्यासाठी महत्वाचा आहे असे आपण म्हणतो. त्यामुळे आपला आहार संतुलित असावा आणि आहारात कोणत्याही प्रकारे फास्ट फूड नसावा.

FAQ’s

PCOD ही गंभीर समस्या आहे का?

PCOD मध्ये कोणतीही गंभीर गुंतागुंत होत नाही. PCOS मध्ये नंतरच्या टप्प्यात टाइप 2 मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि एंडोमेट्रियल कर्करोग यासारख्या गंभीर गुंतागुंत आहेत.

महिलांमध्ये पीसीओडीची समस्या काय आहे?

पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम हा एक विकार आहे ज्यामध्ये क्वचित, अनियमित किंवा दीर्घकाळापर्यंत मासिक पाळी आणि अनेकदा जास्त पुरुष संप्रेरक (अँड्रोजन) पातळी समाविष्ट असते. अंडाशयांमध्ये द्रवपदार्थाचा असंख्य लहानसा संग्रह होतो - ज्याला फॉलिकल्स म्हणतात - आणि नियमितपणे अंडी सोडण्यात अयशस्वी होऊ शकतात.

Leave a Comment