ICU Full Form in Marathi मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ICU म्हणजे काय? ICU ची वैशिष्ट्ये काय आहेत? दवाखान्यात ICU चे काम काय आहेत? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
आयसीयु फुल फॉर्म ICU Full Form In Marathi
ICU शब्दाच्या अर्थ | ICU meaning in Marathi | ICU long form –
ICU या शब्दाचा long form हा Intensive Care Unit (इन्टेन्सिव्ह केअर युनिट) असा आहे. मराठीत यास अतिदक्षता विभाग असे म्हणतात. हे एक अत्यंत गंभीर आजारी असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयातील एक विशेष वॉर्ड म्हणजेच प्रभाग आहे.
आयसीयू म्हणजे काय? | ICU meaning in Marathi –
ICU हे खूप गंभीर आजारी असलेल्या रुग्णासाठी एक विशेष प्रभाग आहे. ICU मध्ये अशा व्यक्तींना ठेवले जाते ज्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यांना विशेष सेवा दिली जाते. दवाखान्यात ICU असा विभाग आहे जिथे गंभीर आजार असलेले लोक ठेवले जातात आणि त्यांची काळजी घेतली जाते. या विभागातम विशेष प्रशिक्षण दिले गेलेले डॉक्टर्स आणि नर्सेस असतात जे रुग्णांची देखभाल करण्याचे काम करतात. या कक्षात गंभीर आजारी असलेल्या लोकांना उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे ठेवलेले असतात.
ही अत्यंत नाजूक आहे किंवा ज्यांची जगण्याची आशा ही खूप कमी आहे अशा रुग्णांना रुग्णांना ठेवण्याचे आणि त्यांची देखभाल करण्याचे दवाखान्यातील विभागाला ICU असे म्हणतात. जे रुग्ण आपात्कालीन सेवेसाठी दाखल होतात त्या रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवले जाते. आपत्कालीन सेवेत दाखल न झालेले रुग्ण ICU मधे ठेवायचे असतील तर विशेषज्ञ आणि डॉक्टर्स कडुन परवानगी घ्यावी लागते.
वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना ICU मध्ये भरती केले जाते. यात काही सरळ आपत्कालीन सेवेसाठी आलेले असतात तर काही आजार अजून तीव्र झाला म्हणून आलेले असतात. ICA मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आले येत असतात पण त्या सर्वांना हे एकाच गोष्टीची अत्यंत गरज असते ती म्हणजे निरंतर लक्ष आणि देखभाल. ICU मध्ये त्या लोकांची काळजी घेतली जाते त्यांचे जीवन गंभीर आजारामुळे किंवा अपघात झाल्याने गंभीर परिस्थिती असल्याने आयुष्य धोक्यात असते. ICU मधील रुग्णांना प्रत्येक क्षणी देखरेखीखाली ठेवलेले असते.
ICU ची वैशिष्टे | ICU speciality and care –
ICU ची स्थिती ही अन्य विभाग पेक्षा वेगळी असते :
- आयसीयूमध्ये उच्च प्रशिक्षित टीम द्वारा रुग्णांची 24 तास देखभाल केली जाते. ICU मधे 24 तासाच्या प्रत्येक क्षणी एक टीम हजर असते. कारण एखादा रुग्ण अत्यंत गंभीर आजारी पडला तर त्याला लगेच तीव्रतेने उपचार करण्यासाठी तिथे एक टीम असणे गरजेचे असते.
- दुसरं म्हणजे ICU कक्षात इतर विभागाच्या तुलनेत कमी बेड्स म्हणजेच खाटा असतात. याचे कारण म्हणजे ICU मधील रुग्णांना आरामाची जास्त गरज असते त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, रुग्णांना आराम करायला कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून तिथे कमीत कमी रुग्ण भरले जातात. उदाहरणार्थ एखाद्या ICU मधे एक किंवा दोन किंवा जास्तीत जास्त चार रुग्ण असतात
- आयसीयूमध्ये जीवनावश्यक उपकरणे असतात. म्हणजेच आयसीयूमध्ये अशी उपकरणे असायची इतर विभागात नसतात.
- ICU मधील रुग्णांना खूप कमी लोक भेटू शकतात आणि खूप कमी वेळ भेटू शकतात. कुणालाही जास्त वेळ थांबताही येत नाही. तेथील रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे याची काळजी चा भाग म्हणून त्यांना जास्त वेळ भेटू दिले जात नाही.
ICU मधील उपकरणे | Machines and Equipment in ICU –
1. Ventilator : ICU मध्ये चे उपकरण असतात त्यातले एक म्हणजे व्हेंटिलेटर असे उपकरण आहे. जे रुग्णासाठी तेव्हा भारतात जेव्हा रुग्णाला श्वास घ्यायलाही त्रास होतो म्हणजे रुग्णाची परिस्थिती एवढी गंभीर असते की त्यांना स्वतःहून श्वास घेणे अवघड जात असते किंवा श्वास घेता येत नाही अशावेळी त्या रुग्णाला व्हेंटिलेटर मशीन श्वास घ्यायला मदत करते. जे रुग्ण व्हेंटिलेटरवर असतात त्यांना बोलता येत नाही म्हणून त्यांच्याशी बोलताना ते जास्त बोलावे लागेल असे बोलू नये. व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण फक्त हो किंवा नाही असा मान हलवून संकेत देऊ शकतो.
2. Heart Monitor : दूसरे उपकरण म्हणजे हार्ट मॉनिटर. हार्ट मॉनिटर हे एक असे उपकरण आहे ज्याची एक स्क्रीन असते यावर आपल्याला वेगवेगळ्या रंगाच्या रेषा दिसतात आणि त्या सतत हलत असतात आणि त्याच रेषा समोर काही आकडे ही दिसतात. हार्ट हृदयाची गती मोजण्याचे उपकरण आहे. या रेषा आणि आकडे रुग्णाच्या हृदयाची गती दाखवतात. हार्ट मॉनिटर्स काही बेल्ट असतात किंवा वायर असतात जे रुग्णाच्या छातीला चिटकवले जातात.
यामुळे रुग्णाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि हे सुरक्षित असे उपकरण आहे. ह्या वायर मुळे किंवा ह्या बेल्ट मुळे व्यक्तीचे हृदयाची गती कमी जास्त होण्याचे संकेत दिले जातात. रुग्णाच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर, त्याच्या हृदयाची गती खूप कमी किंवा खूप जास्त होत असेल तर हे उपकरण विशिष्ट प्रकारचा आवाज करून त्याविषयी सूचना देते. हा आवाज बहुतेक वेळा बीप बीप असा असतो.
3. Feed Tube : पुढचे उपकरण म्हणजे feed tube (फीड ट्यूब). याला मराठीत खाण्याची नळी असे म्हणतात जर रुग्ण खूप गंभीर अवस्थेत असेल आणि रुग्णाला खाता आणि पिता येत नसेल तेव्हा feed tube द्वारे त्या रुग्णाला खाणेपिणे भरवले जाते.
आयसीयूमध्ये रुग्णांना ठेवायचा खर्च :-
ICU हे सर्व उपकरणांना ने समृद्ध असे विभाग आहे. तिथे रुग्णाची अत्यंत काळजीपूर्वक देखभाल केली जाते आणि 24 तास देखरेख ठेवली जाते. तिथे असे रुग्ण दाखल केले जातात त्यांची त्यांची अवस्था खूप गंभीर आहे म्हणून ICU मध्ये प्रत्येकाला ठेवले जात नाही.
गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांचा ICU मध्ये ठेवले जाते आणि ICU मधील खर्च हा प्रत्येक रुग्णालयात वेगवेगळा आहे. साधारणत: ICU चा खर्च हा जास्त येऊ शकतो. खास खाजगी रुग्णालयात याचा खर्च हा प्रत्येक रुग्णालयांना नुसार वेगळा आहे. पण बहुतेक सरकारी रुग्णालयात हे मोफत असते. तिथे कुठलाही खर्च येत नाही किंवा खूपच कमी असा खर्च येतो तसेच जास्त खर्च येत असेल तर सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याद्वारे तुम्ही हा खर्च कमी करू शकता किंवा पूर्ण माफही करू शकता.
अशाप्रकारे आपण असेल बद्दल सगळी माहिती बघितली आहे आशा आहे की तुम्हाला सगळी माहिती उपयोगी ठरेल.
FAQs – Frequently Asked Questions
आयसीयू कशासाठी वापरला जातो?
अतिदक्षता विभाग (ICUs) हे विशेष रुग्णालयाचे वॉर्ड आहेत जे खूप आजारी असलेल्या लोकांसाठी उपचार आणि देखरेख प्रदान करतात. त्यांच्याकडे विशेष प्रशिक्षित आरोग्यसेवा व्यावसायिक आहेत आणि त्यांच्याकडे अत्याधुनिक देखरेख उपकरणे आहेत.
रुग्णांना आयसीयूमध्ये का ठेवले जाते?
ICU अशा लोकांची काळजी घेते ज्यांना गंभीर दुखापत किंवा आजार यासारखी जीवघेणी परिस्थिती असते, जिथे त्यांना चोवीस तास देखरेख आणि जीवन समर्थन मिळते. हे हॉस्पिटलच्या इतर वॉर्डांपेक्षा वेगळे आहे: ICU तज्ञांच्या उच्च-प्रशिक्षित टीमकडून 24 तास काळजी प्रदान करते.