बीएमसी फुल फॉर्म BMC Full Form In Marathi

BMC Full Form In Marathi तुम्ही कधीतरी BMC हा शब्द ऐकला असेल. कित्येकदा बातम्यांमध्ये किंवा जाहिरातीमध्ये हा शब्द आला असेल किंवा कोणाच्या तोंडून हा शब्द ऐकला असेल. “BMC ने नवीन प्रकल्प सुरू केला” असेही कधीतरी वाचण्यात आले असेल.

BMC Full Form In Marathi

बीएमसी फुल फॉर्म BMC Full Form In Marathi

खरंतर मुंबई महानगरपालिकेचे नाव ऐकले असेल तर त्यासोबत तुम्ही BMC हा शब्द देखील ऐकला असेलच. काहींनी नकळत या शब्दाचा प्रयोगही केला असेल पण बऱ्याच लोकांना BMC अर्थ, BMC म्हणजे काय आणि BMC full form माहीत नसेल. आजच्या लेखात आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. चला तर मग BMC म्हणजे काय, BMC full आणि BMC बद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.

BMC Full Form In Marathi | BMC Long Form In Marathi

BMC (बीएमसी) full form म्हणजेच BMC long form हा Brihanmumbai Municipal Corporation ( बृहन्मुंबई मुन्सिपल कॉर्पोरेशन ) असा आहे. BMC शब्दाचा शुद्ध मराठीतील अर्थ हा बृहन्मुंबई महानगरपालिका असा आहे.

बीएमसी म्हणजे काय? | BMC Meaning in Marathi

BMC (Brihanmumbai Municipal Corporation) म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराची प्रशासकीय नागरी संस्था आहे. BMC ची स्थापना हि 1988 वर्षी झाली. BMC म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. याला MCGM म्हणजेच Municipal Corporation of Great Mumbai ( मुन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेट मुंबई) असे म्हणून देखील ओळखले जाते.

BMC बद्दल अधिक माहिती आपण खाली जाणून घेऊया :

 • BMC भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. BMC चे वार्षिक बजेट भारतातील काही लहान राज्यांपेक्षा जास्त आहे जसे की गोवा.
 • 1966 पर्यंत BMC हे महानगरपालिका ऑफ ग्रेटर बॉम्बे (MCGB) म्हणून ओळखले जात असे.
 • मुंबई शहर आणि शहरातील काही उपनगरातील नागरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनासाठी BMC हि जबाबदार आहे.
 • BMC चे नेतृत्व करणारी व्यक्ती म्हणजेच BMC Administrator (ऍडमिनिस्ट्रेटर) हा एक IAS अधिकारी असतो. म्हणजेच BMC चे काम IAS अधिकाऱ्याकडून सांभाळले जाते.

IAS अधिकारी सोबतच BMC मध्ये नगरसेवक कार्यरत असतात. BMC द्वारे केल्या जाणाऱ्या कामामध्ये येणाऱ्या मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करण्याचे काम नगरसेवक करत असतात. नगरसेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक म्हणजेच दर पाच वर्षाला निवडणूक घेतली जाते.

जून 2008 पर्यंत, BMC मधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत होत असत. पण सर्व कामकाज मराठीत होत असल्याने काही प्रकारच्या अडचणी येऊ लागल्या. यामुळे BMC ने 2008 पासून इंग्रजीमध्ये काही कामकाज सुरू केले. आता BMC ने इंग्रजीमध्ये फॉर्म स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

 • नगरसेवकांना महामंडळाच्या कार्यांचे मूल्यमापन करण्यासाठी निवडले जाते. म्हणजेच कार्याचे परिणाम, महत्व हे सर्व नगरसेवकांकडून बघितले जाते.
 • नगरसेवक हे कर निश्चित करणे, करार मंजूर करणे, निधी वितरित करणे इत्यादी वित्त आणि बजेटशी संबंधित प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्याचे आणि काम करण्याचे अधिकार नगरसेवकांना असतात.

आपण BMC म्हणजे काय हे जाणून घेतल आहे.

Function of BMC | BMC चे कार्य-

आता आपण पुढे बघुया की BMC काय काम करते.

BMC हि महानगरपालिका आहे. महानगरपालिका ही त्या शहरातील सर्व सार्वजनिक कामे बघते. BMC हि मुंबईची महानगरपालिका आहे म्हणून BMC द्वारा मुंबईतील सर्व सार्वजनिक कामे बघितली जातात. मुंबई हे शहर मोठे असून तिथली लोकसंख्याही जास्त आहे त्यामुळे मुंबई शहरातील BMC द्वारे केल्या जाणाऱ्या कामांचे स्वरूपही विस्तारीत आहे.

BMC द्वारा खालील काम केले जातात :

 • मुंबईतील आणि काही उपनगरांतील रस्ते आणि उड्डाणपूल यांच्या बांधणीचे काम BMC करते.
 • मुंबई शहरातील भुयारी मार्ग बांधण्याचे कामही BMC कडूनच केले जाते.
 • याबरोबरच रस्ते आणि भुयारी मार्गांची स्वच्छता करण्याचे काम BMC कडून केली जाते.
 • रस्त्यांवरील आणि भूयरी मार्गातील प्रकाशयोजना नियोजन आणि काम BMC करते.
 • मान्सून नुसार येणाऱ्या आणि बाकीच्या साथीचे रोग रोखण्यासाठी BMC कडून कडक रित्या काम केले जाते. याचबरोबर या रोगांच्या नियंत्रणाचे काम देखील BMC कडे असते.
 • शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणे हे काम BMC कडे असते.
 • मृत्युनंतर नागरिकाच्या अधिकारक्षेत्रातील सर्व स्मशानभूमी आणि स्मशानभूमींवर अधिकार ठेवण्याचे काम BMC करते.
 • संपुर्ण शहरातील आरोग्य आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी BMC कडे असते.
 • शहरातील कचरा संकलन म्हणजेच कचरा जमा करणे आणि कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे काम देखील BMC कडे असते.
 • BMC कडून शहरातील सर्व भागांत आणि सर्व घरात पाणीपुरवठा केला जातो.
 • शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आणि त्यावर प्रक्रिया करणे याचे व्यवस्थापन BMC बघते.
 • शहरातील मालमत्तेची सर्व नोंदणी ठेवणे हे काम BMC कडे असते. म्हणजेच एखादी इमारत बेकायदेशीर असेल तर तिला पडण्याचा अधिकार आणि तिच्यावर कायदा करण्याचा अधिकार BMC कडे असतो.
 • गरज पडल्यास शहरातील इमारत नियमांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आणि जबाबदारी BMC कडे असते.
 • शहरात नवीन उद्याने तयार करणे आणि जुन्या उद्यांनाची काळजिं घेण्याचे काम BMC करते.
 • शहरात सार्वजनिक जागा तयार करणे आणि त्यांची देखभाल करणे हे काम देखील BMC करते.
 • शहरातील समुद्रकिना-यावर जीवरक्षक पुरवणे तसेच इतर सुविधा पुरवणे आणि समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा बघण्याचे ठेवण्याचे काम BMC करते.

अशाप्रकारे आपण BMC म्हणजे काय, BMC full form, BMC meaning in Marathi आणि BMC काय काम करते ह्याबद्दल सर्व माहिती जाणून घेतली आहे.

FAQs – Frequently Asked Questions :

BMC कडून कामासाठी परवानगी कशी मिळवतात?

BMC कडून एखाद्या कामासाठी परवानगी मिळवण्यासाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागेल. मग अर्ज पाठवल्यानंतर, तुम्हाला 2 दिवस प्रतीक्षा करावी लागेल आणि नंतर सर्व तपशीलांसह म्हणजेच माहितीसह मुद्रित स्वरूपात त्यांच्याकडून परवानगी मिळविण्यासाठी तुम्हाला बीएमसी कार्यालयास भेट द्यावी लागेल.

बृहन्मुंबई महानगरपालिका काय काम करते?

बृहन्मुंबई महानगरपालिका हि मुंबई शहर आणि काही उपनगरातील नागरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनाची जबाबदारी सांभाळते.

BMC आणि MCGM एकच आहे का?

होय. BMC आणि MCGM (Municipal Corporation of Great Mumbai) एकच आहे. BCM म्हणजेच MCGM होय.

BMC ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे का? / भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे?

होय. BMC हि भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे.

Leave a Comment