सीआरपीएफ फुल फॉर्म CRPF Full Form In Marathi

CRPF Full Form In Marathi भारतात जेव्हा कधी एखादे मोठे संकट येते किंवा एखाद्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षेची गरज असते तेव्हा एक दल मदतीला कायम हजर असते आणि त्याला आपण CRPF म्हणून ओळखतो.

CRPF Full Form In Marathi

सीआरपीएफ फुल फॉर्म CRPF Full Form In Marathi

अनेकदा आपण CRPF जवान आहे असे बोलून जातो किंवा कोरोना काळात देखील आपण CRPF जवानांना बघितले असेल, इतकेच काय तर आपल्याकडे निवडणुका लागल्यानंतर पोलिसांच्या मदतीला मतदान केंद्रांवर हेच CRPF जवान कार्यरत असतात. मात्र आपल्याला CRPF विषयी जास्त माहिती नसते, त्यामुळे आज CRPF म्हणजे काय, CRPF चा फुल फॉर्म काय आहे, CRPF दलाचा इतिहास, CRPF मध्ये सहभागी कसे होता येईल याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

CRPF Full Form in Marathi । CRPF Long Form in Marathi

CRPF हे एक राखीव पोलीस दल असून यामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीला जवान म्हणूनच संबोधले जाते. CRPF शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Central Reserve Police Force असा आहे. CRPF शब्दाचा मराठी मध्ये Full Form हा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असा असून याला मराठी भाषेत केंद्रीय राखीव पोलीस दल असे नाव आहे.

CRPF म्हणजे काय? – What is CRPF in Marathi?

आपल्या भारत देशात प्रत्येक राज्याला विभागून राज्य पोलीस दल आहेत मात्र केंद्रात एक सर्वात मोठे पोलीस दल आहे जे केंद्र सरकारच्या आदेशावरून कार्य करते. हे पोलीस दल म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF होय.

CRPF ही एक मोठी पोलीस दलाची तुकडी असून संपूर्ण देशात विभागलेली आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत CRPF चे कार्य चालते. ही तुकडी देशाकडून असली तरी देखील प्रत्येक राज्याची आंतरिक आणि बाह्य सुरक्षा अबाधित ठेवण्याचे काम करत असते.

आर्मी ज्या पद्धतीने देशाच्या सीमांवर कार्यरत असते त्याच प्रमाणे देशाच्या आंतरिक सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या मदतीला ही CRPF जवानांची तुकडी असते. देशाच्या एकतेला जिथे कुठे गालबोट लागू शकते मग ती दंगल असो किंवा नक्षलवादी क्षेत्र असो हेच काय तर एखाद्या कोरोना सारख्या संकट काळात देखील हेच CRPF जवान तैनात केले जातात.

CRPF विषयी थोडक्यात माहिती

 • CRPF म्हणजे Central Reserve Police Force होय.
 • CRPF म्हणजे केंद्रीय पोलीस राखीव दल होय.
 • घोषवाक्य – सेवा आणि निष्ठा
 • CRPF हे दल भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
 • CRPF हे ब्रिटिश काळातील CRP म्हणजेच Crown Representatives Police दलाचे स्वातंत्र्योत्तर नाव आहे.

CRPF चा इतिहास – History of CRPF in Marathi

CRPF हे दल भारताच्या स्वातंत्र्यानंतर जरी निर्माण झालेले असले तरी देखील ब्रिटिश काळात देखील हे दल कार्यरत होते.

 • 27 जुलै 1939 : ब्रिटिश कालखंडात उच्च ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या छावण्या जिथे असत त्या ठिकाणी सुरक्षा म्हणून ब्रिटिश सरकारने CRP या दलाची स्थापना केली होती.
 • CRP म्हणजे Crown Representatives Police होय. भारतात अनेक ठिकाणी उठाव आणि इंग्रजांविरुद्ध त्यावेळी बंड होत होते. त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन आणि ब्रिटिश आर्मीची कमी भरून काढण्यासाठी हे दल निर्माण झाले.
 • स्वातंत्र्याच्या नंतर 1949 च्या सुमारास हीच संकल्पना पुढे सुरू ठेवत फक्त या दलाचे नाव बदलले. CRP आता भारतात CRPF म्हणून कार्य करण्यास सुरू झाले.
 • तेव्हापासून CRPF हे दल भारतातील संवेदनशील ठिकाणी आणि काही ठिकाणी सीमा सुरक्षा दलासोबत तर काही ठिकाणी आर्मी सोबत संपूर्ण देशभरात कार्यरत आहे.

CRPF मध्ये भरती होण्यासाठी पात्रता – Eligibility to Enter in CRPF

अनेक तरुणांना आर्मी मध्ये न जाता सरकारी सेवेत जाण्याची आवड असते किंवा आर्मी सोबत त्यांना CRPF चे देखील वेध लागलेले असतात. तर आज आपण CRPF भरतीसाठी पात्रता निकष काय आहेत हे जाणून घेऊयात.

 • CRPF मध्ये भरतीसाठी वय हे 20 वर्ष पूर्ण आणि 25 वर्षांच्या आत असायला हवे.
 • वयाच्या अटीत काही प्रवर्गांसाठी सवलती देखील आहेत. एससी / एसटी साठी ही सवलत 5 वर्षे तर ओबीसी साठी 3 वर्षे आहे.
 • एखादा उमेदवार हा सरकारी नोकरदार कुटुंबातील असेल तर त्याला देखील 5 वर्षे वयाच्या अटीमध्ये सवलत असते.
 • विद्यार्थी हा सध्या नवीन लागलेल्या निकषानुसार इयत्ता 12 वि झालेला हवा. त्यासाठी कोणत्याही शाखेचे बंधन नाही.
 • शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांची उंची 170 सेमी पेक्षा जास्त आणि महिलांसाठी उंची 157 सेमी पेक्षा जास्त असावी.
 • पुरुषांसाठी छाती फुगवून 85 सेमी तर न फुगवता 80 सेमी असायला हवी.
 • याशिवाय काही शारीरिक चाचणीत अटी आहेत, त्या तुम्हाला CRPF च्या ऑफिशियल वेबसाईट बघायला मिळतील.

CRPF भरती प्रक्रिया – How to Become CRPF Police?

CRPF मध्ये भरती होण्यासाठी आपल्याला 3 टप्पे पार करावे लागतात. प्रत्येक वर्षी ही भरती होते आणि आपल्याला त्यासाठी त्यांच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागतो.

1. लेखी परीक्षा

लेखी परीक्षेचे दोन विभाग केलेले आहेत. एकूण 300 मार्कांचा हा लेखी पेपर असतो.
पेपर 1: सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता या विषयांचे प्रश्न इथे असतात. 200 मार्कांचा हा पेपर असतो.
पेपर 2: निबंध लेखनाचा हा पेपर एकूण 100 मार्कांचा असतो.

2. मेडिकल आणि शारीरिक क्षमता चाचणी

तुम्ही लेखी पेपर पास केल्यानंतर तुम्हाला या टप्प्यात प्रवेश मिळतो. मेडिकल मध्ये तुमच्या शरीराची तपासणी केली जाते.
शारीरिक क्षमता चाचणी मध्ये 100 मीटर धावणे, 5 आणि 3 मी लांब व 0.5 आणि 0.9 मी उंच उडी यांचा समावेश होतो.

3. मुलाखत

तुम्ही जर सर्व प्रकारे फिट असाल तर तुम्हाला मुलाखतीला बोलावले जाते. यामध्ये तुमचे कागदपत्रे तपासली जातात आणि नंतर तुम्हाला काही निर्णय क्षमतेवर केंद्रित प्रश्न विचारले जातात.

तुम्ही जर हे तीनही टप्पे पार केले तर तुम्हाला CRPF दलात समाविष्ट केले जाते.

FAQs (Frequently Asked Questions)

CRPF ची कामे काय असतात?

CRPF दलाची कार्ये ही दंगल ग्रस्त भागात आणि नक्षलग्रस्त भागात शांतता ठेवणे, जिथे देशाच्या एकतेला धोका आहे अशा विघातक प्रवृत्तीवर लक्ष ठेवून असणे, महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा देणे आणि संकट काळी देशसेवेसाठी तत्परतेने उभे असणे हे असतात.

CRPF मध्ये पगार किती मिळतो?

CRPF मध्ये तुमच्या पदानुसार 50 हजार ते 1 लाख 20 हजार इतके मासिक वेतन मिळते.

CRPF मध्ये कोणती पदे असतात?

CRPF दलात आपल्या पोलीस दलाप्रमाणेच असिस्टंट कमांडट, सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल ही पदे असतात. यामध्ये तुम्हाला आंतरिक बढती परीक्षा माध्यमातून मिळते.

पोलीस स्मरणोत्तर दिवस कधी आणि का साजरा केला जातो?

21 ऑक्टोबर हा दिवस 21 ऑक्टोबर 1959 मध्ये चिनी सैन्याने केलेल्या लडाख येथील CRPF तुकडीवरील हल्ल्यातील जवानांना आदरांजली म्हणून पोलीस स्मरणोत्तर दिवस म्हणून साजरा केला जातो.

Leave a Comment