एमएसएमई फुल फॉर्म MSME Full Form In Marathi

MSME Full Form In Marathi तुम्ही MSME हा शब्द कुठेतरी ऐकला असेल. नसेल ऐकला तर हा शब्द उद्योगासंबंधीत आहे. भारत सरकारने लघु उद्योगांना हाताळण्यासाठी एका मंत्रालयाची स्थापना केली त्याचे नाव MSME होय. आजच्या लेखात आपण MSME म्हणजे काय, MSME full form आणि MSME बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

MSME Full Form In Marathi

एमएसएमई फुल फॉर्म MSME Full Form In Marathi

MSME Long Form In Marathi | MSME Full Form In Marathi

MSME शब्दाचा long form म्हणजेच full form हा Micro, Small, and Medium Enterprise (मायक्रो, स्मॉल अँड मिडीयम एंटरप्रायझ) असा आहे. MSME यास शुद्ध मराठीत सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग असे म्हटले जाते.

MSME म्हणजे काय? | MSME meaning in Marathi

MSME हे भारत सरकारच्या Ministry of Micro, Small and Medium Enterprises (सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग मंत्रालय) याद्वारे हाताळल्या जाणाऱ्या सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगाचे नाव आहे. भारतातील ह्या तीन गटांत येणाऱ्या सर्व उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी भारत सरकारने त्याला प्राधान्य दिले असून त्यांच्यासाठी पूरक अश्या योजना, कायदे आणि नियम केले आहेत. आजच्या लेखात आपण MSME म्हणजे काय सोबतच त्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया.

Important of MSME | MSME चे महत्व

 1. भारतातील एकूण रिजगरापैकी 45% रोजगार हे MSME द्वारा दिले जातात. म्हणजेच सगळ्यात जास्त रोजगार हा MSME कडून दिला जातो. 11 करोड लोकांना जॉब देते.
 2. भारतातून परदेशी होणाऱ्या निर्यातीत 50% निर्यात हे MSME द्वारा होते.
 3. भारतातील एकूण कारखान्यांमधून 90% कारखाने हे MSME मध्ये येतात.
 4. MSME द्वारा 6500 जास्त पदार्थांचे उत्पादन केले जाते.
 5. एकूण GDP मधील 10% GDP हा MSME कडे आहे. 33% GDP हा MSME कडून येतो.

कोणते उद्योग MSME उद्योगांमध्ये येतात? | Which enterprises comes under MSME?

MSME अंतर्गत वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग आणि सेवा उद्योग अश्या दोन्ही प्रकारचे उद्योग समाविष्ट आहेत. हया दोन्ही वर्गातील उद्योगांसाठी MSME नोंदणी करता येते.

MSME उद्योग हे 3 प्रकारे विभाजित केलेले आहेत – सूक्ष्म, लहान आणि मध्यम. हे उद्योग गुंतवणूक आणि उलाढाल या निकषांवर विभाजले गेले आहेत.

MSME साठी पात्रता :-

MSME म्हणून नोंदणी करण्यासाठी उद्योगांचे पात्रता निकष हे खालीलप्रमाणे आहेत .

 • सूक्ष्म उद्योग : सूक्ष्म उद्योगात नोंदणी करण्यासाठी 1 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुक आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असावी लागते.
 • लघु उद्योग : लघु उद्योगात नोंदणी करण्यासाठी 10 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुक आणि 50 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असावी लागते.
 • मध्यम उद्योग : उद्योगात नोंदणी करण्यासाठी 50 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुक आणि 250 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असावी लागते.

MSME Registration (Udyam Registration) Process | MSME नोंदणी (उद्यम नोंदणी) प्रक्रिया

MSME नोंदणीस उद्यम नोंदणी असेही म्हटले जाते. MSME (उद्यम) नोंदणी करण्यासाठी लागणारी प्रक्रिया खालीलप्रमाणे.

 1. सर्वप्रथम MSME वेबसाईट https://udyamregistration.gov.in/ यावर जावे.
 2. त्यानंतर “For New Entrepreneurs who are not registered yet as MSME or those with EM-II” (नवीन उद्योजकांसाठी जे अद्याप MSME म्हणून नोंदणीकृत नाहीत किंवा EM-II आहेत त्यांच्यासाठी) यावर क्लिक करावे.
 3. आधार कार्डनुसार आधार क्रमांक आणि नाव टाका आणि “Validate & Generate OTP” वर क्लिक करावे.
 4. तुमच्या फोनवर OTP येईल तो टाकावा आणि “Validate” वर क्लिक करावे.
 5. त्यांनतर पुढील पान येईल त्यावर संस्थेचा प्रकार निवडा आणि तुमचा पॅन क्रमांक भरा आणि validate वर क्लिक करा.
 6. त्यानंतर वैयक्तिक आणि व्यवसाय सर्व माहिती भरावी.
 7. त्यानंतर “Agree to Terms and Conditions” वर क्लिक करावे आणि तमग “Submit and Get final OTP” वर क्लिक करावे.
 8. त्यानंतर तुमच्या फोनवर आलेला OTP प्रविष्ट करा आणि “सबमिट” वर क्लिक करावे आणि तुम्हाला नोंदणी क्रमांक म्हणजेच Register Number मिळेल.
 9. यानंतर तुमची सर्व माहिती सरकारकडून पडताळून बघितली जाईल आणि तुमच्या ई मेल आयडी वर तुम्हाला एक ई-नोंदणी दस्तऐवज म्हणजेच कागदपत्र मिळेल.

MSME नोंदणीचे फायदे काय आहेत? What are the benefits of MSME registration?

MSME मंत्रालयांतर्गत नोंदणी केल्यानंतर व्यवसायाला खालील फायदे मिळू शकतात.

 1. MSME अंतर्गत उद्योगांना उद्योगांसाठी घेतल्या जाणाऱ्या बँक कर्जावरील व्याजदर सबसिडी म्हणजेच सूट मिळते.
 2. MSME अंतर्गत येणाऱ्या उद्योगांना प्रत्यक्ष कर कायद्यांतर्गत करात सूट दिली जाते.
 3. MSME उद्योगांसाठी परवाने मिळणे सोपे असते.
 4. नोंदणी आणि मंजूरी मिळवणे देखील MSME उद्योगांसाठी सोपे आहे.
 5. MSME नोंदणी केलेली असेल तर व्यवसायात येणारे विजेचे बिल कमी भरण्याची तरतूद करते म्हणजेच उद्योगांसाठी लागणाऱ्या विजेच्या वीज बिलात सवलत मिळते.
 6. MSME उद्योगांना मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफीचा दावा करता येतो त्यामुळे संपादन खर्च कमी केला जाऊ शकतो.
 7. MSME उद्योग भारत सरकारने सुचविल्यानुसार औद्योगिक प्रोत्साहनासाठी मिळत असलेल्या सबसिडीसाठी पात्र ठरतात.
 8. MSME उद्योग हे ISO प्रमाणपत्र बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा दावा करू शकतात. सरकारकडून हा खर्च दिला जाऊ शकतो.
 9. MSME उद्योग कोणत्याही बँकेत ओव्हर ड्राफ्टवर 1% व्याजदर सूट घेऊ शकतात.
 10. MSME उद्योगांसाठी पेटंट नोंदणी करायची असेल तर त्यावर 50% सबसिडी मिळू शकते.
 11. बँक MSME व्यवसायासाठी लोन म्हणजेच कर्ज सहजपणे देते.
 12. MSME उद्योगांसाठी MSME प्रमाणपत्र दिले जाते त्यामुळे व्यवसायात कुठ्ल्याही प्रकारची अडचण येत नाही.
 13. सरकारकडून MSME ला प्राधान्य दिले जाते.
 14. NGT (National Green Tribunal) कडून कुठ्ल्याही प्रकारची अडचण येत नाही.

अशाप्रकारे आपण MSME म्हणजे काय, MSME full form aani MSME फायदे, MSME नोंदणी प्रक्रिया आणि MSME नोंदणीचे फायदे याबद्दल माहिती बघितली आहे.

FAQs – Frequently Asked Questions

MSME अंतर्गत कोणते व्यवसाय येतात?

सर्व सेवा आणि उत्पादन करणारे उद्योग हे MSME अंतर्गत येतात.

MSME साठी GST अनिवार्य आहे का?

1 एप्रिल 2021 पासून MSME नोंदणीसाठी पॅन आणि GST क्रमांक असणे अनिवार्य आहे.

व्यापारी उदयम नोंदणीसाठी पात्र आहेत का?

किरकोळ आणि घाऊक व्यापार यांस MSME म्हणजेच उदयम नोंदणी पोर्टलवर नोंदणी करण्याची परवानगी आहे.

MSME प्रमाणपत्र मिळण्यासाठी किती दिवस लागतील?

ज्या नोंदणीत GST/PAN तपशील नोंदणीमध्ये समाविष्ट केलेला असतो अशावेळी MSME प्रमाणपत्र मिळविण्यासाठी साधारणपणे 2-3 दिवस लागतात, ज्यांच्याकडे पॅन तपशील नाहीत, त्यांना त्याच दिवशी प्रमाणपत्र मिळते.

Leave a Comment