NCC Full Form in Marathi महाविद्यालयात असताना आपल्याला सतत शिस्त आणि ध्येयाकडे लक्ष केंद्रित असणारे आर्मी सारखे राहणारे काही युवक दिसत असतात. महाविद्यालयात असताना देशसेवेसाठी एक प्रेरणा निर्माण करण्यासाठी आणि मुलांना आर्मीच्या शिस्तीसाठी तयार करायला NCC ला सुरुवात झाली.
एनसीसी फुल फॉर्म NCC Full Form In Marathi
मात्र हे NCC म्हणजे नक्की काय आहे, NCC Full Form in Marathi, NCC स्थापना आणि इतिहास, NCC स्थापनेचे उद्दिष्टय, NCC दिवस, आणि इतरही NCC विषयी अधिकाधिक माहिती जाणून घेणार आहोत.
NCC Full Form in Marathi । NCC Long Form in Marathi
NCC या शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा National Cadet Corps हा आहे. NCC चा मराठी भाषेत Full Form हा नॅशनल कॅडेट कॉर्पस आहे. NCC ला मराठी भाषेत राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दल असे म्हणतात. आपल्याकडे NCC शब्दाला हिंदी भाषेत किंवा त्यांच्या पत्रव्यवहार भाषेत राष्ट्रीय सैनिक छात्र दल म्हणून ओळखले जाते.
NCC म्हणजे काय? – What is NCC in Marathi?
जर एखाद्या प्रसंगी लष्कराची कमतरता भासली तर आपल्याकडे एक दुसरी फळी तयार असावी म्हणून NCC ची स्थापना करण्यात आली. देशभरात NCC हे एक दल असून शाळा आणि महाविद्यालयात NCC साठी मुलांची भरती केली जाते. NCC दलामध्ये शामिल असलेल्या मुलांना काही थोड्याफार शस्त्रांचे आणि आर्मीच्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. शिस्त आणि अनुशासन यासोबत त्या युवा पिढीला ओळख करून दिली जाते.
आर्मी मध्ये भरती झाल्यानंतर जे काही प्रशिक्षण सुरुवातीच्या काळात दिले जाते ते सर्व NCC कॅडेट्सला महाविद्यालयात दिलेले असते. त्यामुळे आर्मी भरती मध्ये NCC कॅडेट्सला प्राधान्य दिले जाते.
NCC ची स्थापना व इतिहास
16 एप्रिल 1948 म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही कालावधीनंतर लगेच NCC ची स्थापना करण्यात आली. पं हृदयनाथ कुंजर यांच्या नेतृत्वाखाली NCC ची स्थापना झाली. सुरुवात तेव्हा झाली असली तरी देखील 15 जुलै 1948 पासून NCC स्थापना झाल्याचे जाहीर करन्यात आले. NCC ला तसा 1966 आधीचा इतिहास आहे. असे एक दल त्यावेळी जर्मनीमध्ये सुरू केले गेले होते. त्यालाच NCC स्थापनेची प्रेरणा म्हणता येईल.
NCC ची स्थापना आधी झाल्यानंतर पुढे जाऊन याला आधार हा नॅशनल कॅडेट्स कॉर्पस ऍक्ट चा मिळाला. स्थापनेच्या कालखंडात NCC चे उद्दिष्टय हे पुढील काळासाठी प्रशिक्षित असे मनुष्यबळ आधीच तयार करून ठेवणे हे होते. मात्र काळ बदलत गेला आणि आता NCC चे उद्दिष्टय हे स्वतंत्र नागरी सेवा बनणे हे आहे. NCC चे मुख्यालय हे दिल्ली येथे स्थापन झाले. आजही NCC चे मुख्यालय दिल्ली या ठिकाणीच आहे. NCC च्या सुरुवातीच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान मोठे आहे. NCC मध्ये वायुसेना देखील पुढील काळात जोडली गेली.
NCC ची ब्रीद आणि ध्वज
भारतीय सैन्यासाठी एक मागची फळी बनून उभे राहणे हे NCC चे उद्दिष्टय होते आणि त्यामध्ये NCC यशस्वी देखील झाली. तरुण पिढीला सैन्य दलाची तयारी करवून घेणे आणि त्यांच्या मनात सैन्याविषयी आकर्षण निर्माण करणे हे उद्दिष्टय NCC ने साध्य करून दाखविले.
NCC ची सुरुवातीला ‘कर्तव्य, एकता आणि शिस्त’ ही टॅगलाईन होती मात्र काही काळानंतर यामध्ये बदल करून टॅगलाईन ही ‘ऐक्य आणि शिस्त’ करण्यात आली.
लाल, निळा आणि आकाशी हे तीन रंग वापरून NCC चा ध्वज बनविण्यात आला आहे. 1954 साली हा ध्वज बनविण्यात आला आहे. NCC हा शब्द ध्वजाच्या अगदी मध्यभागी लिहिलेले आहे. एका बाजूला कडेला पानांनी किनार बनवलेली आहे. NCC नावासोबत Unity and Discipline म्हणजे ऐकता आणि शिस्त हे ब्रीद देखील लिहिलेले आहे.
NCC दिवस
प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात असलेल्या चौथ्या रविवारी NCC दिवस साजरा केला जातो. NCC दिवस साजरा करताना NCC अंतर्गत अनेक छोटेमोठे उपक्रम घेतले जातात. NCC अंतर्गत युवकांमध्ये NCC आणि आर्मी जॉईन करण्यासाठी या काळात जनजागृती केली जाते.
NCC जॉईन कशी करतात?
NCC ही तुमच्या महाविद्यालयात आणि विद्यालयात असते. त्यामुळे तुम्हाला जर NCC कॅडेट्स बनायचे असेल तुमच्या NCC सिनिअर किंवा शिक्षक यांच्यासोबत तुम्हाला संपर्क साधावा लागेल. NCC प्रवेशासाठी एक फॉर्म भरावा लागेल. कदाचित तुम्हाला एक आधी शारीरिक चाचणी देखील द्यावी लागेल.
NCC तुमच्या महाविद्यालयात नसेल तरी देखील तुम्हाला शेजारील महाविद्यालयात जिथे NCC आहे तिथे प्रवेश घेता येतो. आपल्याकडे 12 वि आधी ज्युनिअर विंग NCC आणि त्यानंतर पदवी अभ्यासक्रमात सिनिअर विंग NCC असते. आपल्या वयानुसार तुम्हाला त्या वर्गामध्ये प्रवेश मिळतो.
NCC प्रमानपत्राचे फायदे
- राज्य आणि केंद्र सरकारकडून सरकारी म्हणजेच नागरी सेवेत NCC करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.
- भारतीय सैन्य अकादमी मध्ये NCC प्रमाणपत्र असलेल्या कॅडेट्सला एक जागा राखीव ठेवलेली असते.
- नेव्ही कॉर्पस मध्ये NCC प्रमाणपत्र असलेल्या कॅडेट्सला 6 जागा राखीव असतात.
- NCC प्रमाणपत्र असल्यास वायुदलात 10% सवलत असते.
- NCC प्रमाणपत्र असेल तर CDS म्हणजेच शॉर्ट सर्व्हिस कमिशन मधील लेखी परीक्षा द्यावी लागत नाही. मात्र हे NCC चे BEC प्रमाणपत्र असावे.
NCC चे इतर काही Full Form
NCC चे नॅशनल कॅडेट्स कॉर्पस शिवाय इतरही काही FULL FORM आहेत. ते खालीलप्रमाणे
- National Capital Commission
- National Community Church
- Newcastle City Council
- Nikko Cordial Corporation
- Nunawading Christian College
- Norwalk Community College
FAQ (Frequently Asked Questions)
NCC म्हणजे काय?
NCC हे एक नागरी दल असून NCC चा Full Form हा National Cadets Corps असतो.
NCC मध्ये महिलांना प्रवेश असतो का?
हो, NCC मध्ये महिला देखील भाग घेऊ शकतात. महिलांसाठी NCC ची महिला कॅडेट्स टीम देखील असते.
NCC मध्ये उंचीची काही अट असते का? असेल तर उंचीची अट काय आहे?
NCC मध्ये तुम्हाला उंचीची अट असते कारण हे सर्व कॅडेट्स पुढे आर्मी मध्ये भरती होणार असतात. NCC प्रवेशासाठी कमीत कमी उंची 157.5 सेमी तर महिलांसाठी ही उंची 152 सेमी असावी लागते.
NCC दिवस कधी साजरा केला जातो?
प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी NCC दिवस साजरा केला जातो.
खूपच छान माहिती आहे पण जर शाळेत सुरु करायचे असेल तर कशा प्रकारे करता येईल ते मार्गदर्शन मिळेल का