एमएचटी-सीईटी फुल फॉर्म MHT CET Full Form In Marathi

MHT CET Full Form In Marathi इयत्ता बारावी नंतर आपल्याला अनेक शाखांसाठी मार्ग खुले होतात आणि याच शाखांसाठी आपल्याला प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक संयुक्त परीक्षा घेतली जाते ती म्हणजे MHT CET होय. आपण आज MHT CET चा Full Form, MHT CET म्हणजे काय, MHT CET परिक्षेविषयी अधिकाधिक माहिती आणि पात्रता निकष जाणून घेणार आहोत.

MHT CET Full Form In Marathi

एमएचटी-सीईटी फुल फॉर्म MHT CET Full Form In Marathi

MHT CET Full Form in Marathi । MHT CET Long Form In Marathi

MHT CET शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Maharashtra Common Entrance Test असा होतो. MHT CET शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा महाराष्ट्र कॉमन एन्ट्रान्स टेस्ट असा होतो. याचाच अर्थ महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा असा होतो.

MHT CET म्हणजे काय? What is MHT CET in Marathi?

आपण CET परीक्षा देतोय हे ऐकतो मात्र त्यातील CET परीक्षेचे अनेक प्रकार आहेत त्यातील MHT CET हे एका महाराष्ट्र शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे नाव आहे.

MHT CET ही परीक्षा महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र सरकार अंतर्गत घेतली जाते. MHT CET परीक्षेच्या माध्यमातून बी टेक, बी ई म्हणजेच इंजिनिअरिंग, बी फार्मा, आणि इतर इंजिनीरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या बॅचलर पदवी साठी प्रवेश मिळतो. यामधून आता इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रवेशासाठी इतर काही प्रवेश परीक्षा देखील आहेत मात्र महाराष्ट्रात प्रत्येक इंजिनिअरिंग महाविद्यालयात MHT CET अंतर्गत काही राखीव जागा भरल्या जातात.

MHT CET परिक्षेविषयी थोडक्यात – Short Info about MHT CET Exam

MHT CET म्हणजेच महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परिक्षेविषयी आज थोडक्यात काही माहिती जाणून घेऊयात.

 • MHT CET म्हणजे Maharashtra Common Entrance Test होय. यालाच सामाईक प्रवेश परीक्षा असे म्हणतात.
 • MHT CET ही परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र सरकार यांच्या अंतर्गत घेतली जाते.
 • MHT CET परीक्षेसाठी mhtcet2022.mahacet.org ही ऑफिशियल वेबसाईट आहे.
 • अभियांत्रिकी, कृषी आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी MHT CET ही एक कॉमन इन्ट्रान्स टेस्ट आहे.
 • MHT CET ही परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. या परिक्षे नंतर मेरिट अनुसार विद्यार्थ्यांना बी ई, बी फार्मसी, बीएस्सी ऍग्री सारख्या कोर्सेसला ऍडमिशन देण्यात येते.

MHT CET परीक्षा स्वरूप

 • MHT CET ही परीक्षा कॉम्प्युटर बेसड एक्साम आहे. संगणकावर ऑनलाइन MCQ पद्धतीने ही परीक्षा होईल.
 • MHT CET परीक्षेचा कालावधी हा 180 मिनिटांचा असतो. यामध्ये तुम्हाला 2 वेगळे ग्रुप मिळतात.
  ○ PCM Group
  ○ PCB Group
 • MHT CET ही परीक्षा तुम्हाला इंग्रजी भाषेत देता येते. गणित हा विषय इंग्रजी मध्येच असतो मात्र फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय तुम्हाला मराठी, इंग्रजी किंवा उर्दू भाषेत देता येतात.
 • MHT CET परीक्षा 3 पेपर मध्ये विभागली गेली आहे. यातील पहिला पेपर हा गणित, दुसरा पेपर हा फिजिक्स आणि केमिस्ट्री तर तिसरा पेपर हा बायोलॉजी विषयाचा असतो.
 • एखाद्याला जर हे तिन्ही पेपर द्यायचे असतील तर तो देऊ शकतो. अनेकदा आपला पुढील मार्ग निश्चित नसेल तर आपल्याला हे 3 पेपर देणे योग्य ठरते.
 • पेपर 1 मध्ये तुम्हाला एकूण 50 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. म्हणजे पेपर 1 हा 100 गुणांचा असतो.
 • पेपर 2 आणि 3 यामध्ये प्रत्येकी 100 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्न हा 1 गुणाला असतो.
 • प्रत्येक पेपरला विद्यार्थ्याला 90 मिनिट इतका कालावधी दिला जातो.
 • MHT CET परीक्षेत इतर स्पर्धा परिक्षांप्रमाणे चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा होत नाहीत.

MHT CET परीक्षेसाठी पात्रता निकष

MHT CET परीक्षेसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र सरकारने काही पात्रता निकष घालून दिले आहेत. त्याविषयी खाली सांगत आहोत.

 • विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा हा सर्वात महत्वाचा निकष आहे.
 • MHT CET परीक्षा देण्यासाठी कोणत्याही प्रकारे वयाची अट नाही.
 • इयत्ता बारावी मध्ये आपल्याला ज्या ग्रुप चा पेपर द्यायचा आहे त्यानुसार विषय असायला हवेत. यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे बंधनकारक तर बायोलॉजी किंवा गणित यापैकी एक पर्यायी विषय असायला हवा.
 • इयत्ता बारावी सोबत समकक्ष असलेल्या सर्व कोर्सेसचे विद्यार्थी देखील MHT CET देण्यासाठी पात्र असतात. बीएस्सी करून जरी एखाद्याला CET द्यायची असेल तरी ते देऊ शकतात.
 • सध्या बारावी इयत्तेमध्ये असलेले विद्यार्थी देखील ही MHT CET परीक्षा देऊ शकता.
 • 12 वि किंवा त्या सम असलेल्या कोर्सेस मध्ये कमीत कमी 45% गुण हे खुल्या प्रवर्गासाठी आणि SC, ST आणि OBC साठी 40% गुण मिळवणे अत्यावश्यक आहे.

MHT CET परीक्षेसाठी अभ्यासक्रम

MHT CET 2022 साठी आयोजनकांकडून काही काळापूर्वी अभ्यासक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार इयता बारावी शाखेचा 80 टक्के अभ्यासक्रम तर 11 वि शाखेचा 20 टक्के अभ्यासक्रम हा MHT CET 2022 परीक्षेला असणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात या विद्यार्थ्यांना काही अभ्यासक्रम हा कमी करण्यात आला होता त्यामुळे MHT CET 2022 ला नक्की काय अभ्यासक्रम आहे हे विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर भेट देऊन जाणून घ्यावे. इतर वेळी संपूर्ण अभ्यासक्रम हा MHT CET परीक्षांसाठी असतो. यावेळी सेलच्या निर्णयानुसार MHT CET परीक्षेची काठिण्य पातळी ही वाढविण्यात आलेली आहे. यामागील उद्देश हा MHT CET परीक्षेचा दर्जा JEE आणि NEET परीक्षांच्या लेव्हलचा करणे असे आहे.

MHT CET परीक्षेची फी

MHT CET परीक्षेसाठी नियमित शुल्कात बदल हे होत असतात मात्र 2022 अनुसार हे शुल्क 800 रुपये खुल्या प्रवर्गासाठी होते. महिलांना या शुल्कात सूट मिळते. याशिवाय SC, ST आणि OBC समाजाला देखील हे शुल्क कमी असते.

FAQ (Frequently Asked Questions)

MHT CET म्हणजे काय?

MHT CET ही एक महाराष्ट्र सरकार कडून घेतली जाणारी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट असून यातून तुम्हाला इंजिनिअरिंग व फार्मसी आणि ऍग्री कॉलेजमध्ये पदवी साठी प्रवेश मिळतो.

MHT CET साठी ऑफिशियल संकेतस्थळ कोणते आहे?

MHT CET साठी प्रत्येकवर्षी संकेतस्थळ हे बदलत असते मात्र यामध्ये जास्त बदल न होता फक्त वर्ष बदलते. उदाहरण 2022 साली हे संकेतस्थळ mhtcet2022.mahacet.org होते. यात 2022 च्या जागेवर पुढील वर्षी 2023 असेल.

MHT CET परीक्षेत तीनही पेपर देता येतात का?

हो, आपल्याला तीनही पेपर देता येतात. ज्या विद्यार्थ्यांना बारावीला बायोलॉजी आणि गणित हे दोन्ही विषय आहेत त्यांना हे तिन्ही पेपर देता येतात.

Leave a Comment