बीए फुल फॉर्म BA Full Form In Marathi

BA Full Form in Marathi आपण या लेखात BA या शब्दाचा long form तसेच BA काय आहे आणि BA म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेऊया. BA मध्ये तुम्हाला कोणत्या करिअर च्या संधी असू शकतात याची पण माहिती जाणून घेणार आहोत.

BA Full Form In Marathi

बीए फुल फॉर्म BA Full Form In Marathi

BA full form in Marathi | BA long form in Marathi

BA या शब्दाचा long form म्हणजेच full form हा Bachelor’s of Arts (बॅचलर ऑफ आर्ट) असा आहे आणि अजुन एक long form हा British Airways असा आहे. BA हा एक पदवी अभ्यासक्रम आहे. या लेखात आपण BA म्हणजे काय आणि BA syllabus, BA eligibility criteria हे सर्व जाणून घेऊया.

BA म्हणजे काय? BA Meaning in Marathi

BA म्हणजेच Bachelor’s of Arts हे एका पदवीचे नाव. हि पदवी कला सशाखेतील विषयांसाठी दिली जाते. म्हणजेच कला शाखेतील विषयांतील पदवीला BA म्हणतात.
Bachelor of Arts (BA) हा अभ्यासक्रम साधारणतः 3 वर्षांचा असतो. काही विद्यापीठांमध्ये हा 4 वर्षांचा देखील असू शकतो.

आपण BA बद्दल जून जाणून घ्यायचे म्हंटले तर हा अभ्यासक्रम लिबरल आर्ट्सच्याअब्यासातून निर्माण झाला. लिबरल आर्ट (लिबरल आर्ट) हि एक अशी संज्ञा आहे जी भाषाविषयक शाखा जसे की, व्याकरण , तर्कशास्त्र (Philosophy), वक्तृत्व, अंकगणित, भूमिती, खगोलशास्त्र आणि संगीत यासारख्या शिक्षणाच्या अनेक शाखांच्या अभ्यासासाठी लागू केली जाते.

लिबरल आर्ट्सचा अभ्यास मध्ययुगात सुरू झाला. या अभ्यासात भाषाविषयक आणि कलेशी निगडित विषयांवर जास्त भर दिला जातो. BA मध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये इंग्रजी, भूगोल, गणित, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, सामाजिक कार्य आणि गृहविज्ञान या विषयांचा समावेश होतो.

BA पात्रता निकष | BA eligibility criteria

BA हा एक पदवी अभ्यासक्रम आहे म्हणून यासाठी सर्वप्रथम मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून 12 वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 12 वी कला शाखेतून उत्तीर्ण असेल तर उत्तमच पण विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी देखील पुढे BA साठी प्रवेश घेऊ शकता. प्रत्येक विद्यापीठामध्ये असे असेलच असे नाही पण बहुतेक विद्यापीठामध्ये 12 वी वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेले असाल तरी BA मधे प्रवेश मिळतो.

BA साठी अजून एक आवश्यक असलेली अट म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बारावीच्या वर्गात किमान 40 टक्के मिळवणे. 12 वी मध्ये किमान 40 टक्के गुण आवश्यक आहे.

जर विद्यार्थ्याला उत्तम विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी 12 वी मध्ये धिक गुण हवेत. प्रत्येक विद्यापीठाचे निकष वेगळे असू शकतात पण काही नावाजलेल्या विद्यापीठामध्ये कला शाखेत पदवी घ्यायची असेल तर 90 टक्के पेक्षा जास्त गुण असावे लागतात पण हे प्रत्येक विद्यापीठ अनुसार बदलू शकते.

श्रेणीसाठी किंवा राखीव गटासाठी जसे की SC किंवा ST किंवा OBC किंवा भिन्न पात्रता असलेल्या उमेदवारांना काही टक्के सूट मिळते.

विद्यार्थ्याला ज्या विद्यापीठात किंवा कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचा पात्रता निकष तपासून बघावा . विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तिथून सर्व माहिती मिळवून मग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करावी.

BA अभ्यासक्रम स्वरुप | BA Course Structure

 • प्रामुख्याने BA हा 3 वर्षांचा कोर्स असतो आणि हा सत्र स्वरूपाचा असतो. याचाच अर्थ असा की ह्या अभ्यासक्रमात वार्षिक परीक्षा न होता सत्र परीक्षा होते.
 • काही ठिकाणी पहिल्या वर्षी वार्षिक परिक्षा आणि नंतरच्या 2 वर्षी सत्र परीक्षा होऊ शकते.
 • प्रत्येक सत्राला विषय बदलले जातात. प्रत्येक सत्रात आपण आपल्या आवडीने विषय निवडू शकतो. ज्या विषयात BA पदवी प्रदान करायची आहे (Major Subject) तो विषय तिसऱ्या वर्षी म्हणजेच शेवटचे 2 सत्र निवडायचा असतो. त्या विषयातील वेगवेगळ्या शाखा तिसऱ्या वर्षी शिकवल्या जातात.
 • प्रत्येक सत्राला अंतिम परीक्षा होते आणि प्रत्येक सत्र परीक्षेचं गुण हे पदवी निकालात गृहीत धरले जातात.
 • काही विद्यापीठांत 2 विषयांत Major ( मेजर) करता येते. म्हणजेच तुम्ही एकच वेळी 2 विषयांत पदवी घेऊ शकता अशा BA ला Double Major (डबल मेजर) म्हटले जाते.

BA शिसक्षणासाठी शिष्यवृत्ती | Scholarships for BA Education

BA हि एक शासनमान्य पदवी आहे तसेच हा एक अव्यावसायिक अभ्यासक्रम आहे. खरंतर बहूतेक विद्यापिठात आणि कॉलेज मध्ये या पदवीसाठी जास्त शुल्क आकारले जात नाही.

या पदवी अभ्यासक्रमासाठी खूप साऱ्या श्रेणी आणि वर्गांसाठी शिष्यवृत्ती लागू पडतात. सर्वच गटातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून काही शिष्यवृत्ती ह्या श्रेणी किंवा गट या निकषावर आधरी ना ठेवता गुणवत्तेवर आधारित देखील आहे. सरकारद्वारे बऱ्याच शिष्यवृत्ती दिल्या जातात. प्रत्येक शिष्यवृत्तीचे निकष आणि पात्रता हे वेगळे असू शकतात. ज्या त्या शिष्यावृतीनुसर ते नीट तपासून बघावे.

BA केल्यावर नोकरी – व्यवसायाच्या संधी | Career after BA

BA पदवी ही विषयांवर अवलंबून असते आणि म्हणूनच त्याच्यातील नोकरी किंवा व्यवसाय याच्या शाखा देखील विषयावर अवलंबून असतात. याचाच अर्थ असा की आपण ज्या विषयात पदवी घेऊ तसे व्यवसाय आणि नोकरीचे क्षेत्र ठरेल.

सामान्यतः BA केल्यानंतर विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या मिळू शकतात. व्यक्ती खाजगी कंपनीसाठी BPOs, स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन फर्म्स (Strategic Commuication Firm), कन्सल्टिंग फर्म्स (कन्सल्टिंग Firm), पत्रकारिता इत्यादींमध्ये काम करू शकतात.

व्यक्ती सरकारी क्षेत्रात, रेल्वे, बँकिंग, सार्वजनिक उपक्रम, लष्करी इत्यादी क्षेत्रात काम करू शकतात. तसेच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. बँकिंग क्षेत्रातील परीक्षा, रेल्वे क्षेत्रातील परीक्षा आणि लोकसेवा क्षेत्रातील परीक्षा देऊ शकतात. लोकसेवा क्षेत्रातील परीक्षा देऊन आयएएस (IAS), आयएफएस (IFS) आणि आयपीएस (IPS) बनू शकता.

भारतातील प्रचलित BA कोर्सेस | Popular BA course in India –

खाली आपण सर्वसामान्यपणे BA मध्ये पदवी घेतले जाणारे विषय बघुया :

 • अर्थशास्त्रात BA (BA in Economics)
 • इतिहासात BA (BA in History)
 • भूगोलात BA (BA in Geography)
 • तर्कशास्त्र विषयात BA (BA in Philosophy)
 • शारीरिक शिक्षण विषयात BA (BA in Physical Education)
 • राज्यशास्त्र विषयात BA (BA in Political Science)
 • सामाजिक शास्त्र विषयात BA (BA in Social Science)
 • योगा विषयात BA (BA in Yoga)
 • समाजशास्त्र विषयात BA (BA in Sociology)
 • सार्वजनिक प्रशासन विषयात BA (BA in Public Administration)

BA शब्दाचे अजून long form | BA all long forms –

BA या शब्दाचा अजुंनेक long form आहे तो म्हणजे British Airways (ब्रितिष एअर्वेज). हि इंग्लंड ची प्रसिध्द अशी Airline (एअरलाइन) आहे.

अशाप्रकारे आपण BA शी निगडित सर्व माहिती बघितली आहे.

FAQs – Frequently Asked Questions

बी.ए.चा विद्यार्थी म्हणजे काय?

बीए (बॅचलर ऑफ आर्ट्स) किंवा बीएस (बॅचलर ऑफ सायन्स) पदवी या दोन्ही चार वर्षांच्या युनिव्हर्सिटी पदव्या आहेत ज्या सामान्य शैक्षणिक आवश्यकता सामायिक करतात.

बीएचा उपयोग काय?

बीएच्या यशस्वी कामगिरीनंतर, विद्यार्थी नोकरी शोधू शकतात किंवा बीए पूर्ण केलेल्या कोणत्याही क्षेत्रात पदव्युत्तर पदवी सारख्या उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतात. कला शाखेची पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी विविध क्षेत्रात करिअरच्या पर्यायासाठी जाऊ शकतात.

Leave a Comment