NSS Full Form In Marathi NSS म्हणजे काय? बऱ्याच जणांना हा प्रश्न कधीतरी नक्की पडला असेल. तुम्ही अनेकदा NSS हा शब्द ऐकला असेल. शाळेत असताना किंवा कॉलेज मध्ये खेळाच्या संबंधी किंवा काही उपक्रमाच्या संबंधित याबद्दल बोलताना आढळले असेल. म्हणूनच आजच्या लेखात आपण NSS म्हणजे काय हे जाणून घेणार होत. NSS शब्दाचा long form म्हणजेच full form, NSS म्हणजे काय आणि त्याबद्दल सर्व माहिती आज आपण बघुया.
एनएसएस फुल फॉर्म NSS Full Form In Marathi
NSS full form in Marathi | NSS long form in Marathi
NSS या शब्दाचा long form म्हणजेच NSS शब्दाचा फुल फॉर्म हा National Service Scheme (नॅशनल सर्व्हिस स्कीम) असा आहे. यास शुद्ध मराठी भाषेत राष्ट्रीय सेवा योजना असे म्हणतात. याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे बघुया.
NSS म्हणजे काय ? | NSS meaning in Marathi
NSS चा मराठी अर्थ हा राष्ट्रीय सेवा योजना असा आहे. 1969 वर्षी भारत सरकारने NSS ही संस्था स्थापन केली. NSS चे सर्व कार्य हे युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय हाताळते. हि संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश हा तरुण विद्यार्थ्याचे, युवकांचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व घडवण्याचा होता.
NSS द्वारे 11वी आणि 12वी वर्गातील विद्यार्थी आणि त्यापुढील विद्यार्थी तरुणांना विविध सरकारी कार्यक्रम आणि सरकारद्वारे सामुदायिक सेवा उपक्रमांत भाग घेण्याची संधी मिळते. सामुदायिक सेवेद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडावा हेच या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
NSS ची उद्दिष्टे | objectives of NSS
NSS हि अशी योजना आहे जी भारतातील तरुण पिढीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एकजुटीचे आणि नेतृत्वाचे शिक्षण प्रदान करते त्यातील काही प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे :
- आपल्या देशाची संस्कृती आणि विविधता तरुणांना कळावी.
- सामुदायिक काम आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आवश्यक काढले विकसित करणे.
- राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व जाणून घेणे आणि ती टिकवून ठेवणे.
- अडचणीच्या वेळी एकत्र येऊन काम करणे किती आवश्यक आणि देशासाठी ते किती गरजेचे आहे हे समजून घेणे.
- समाजाच्या विकासासाठी प्रतेक स्तरावर कसे काम केले जाईल याची शिकवण देणे.
- तरुणांना समाजातील समस्या आणि गरजा ओळखता याव्या आणि दूरदृष्टी निर्माण व्हावी तसेच आलेल्या समस्येला सामोरे जाणे आणि योग्य ते उपाय शोधून काढणे असे व्यावितीमत्व घडवणे.
NSS चे फायदे | Benefits of NSS
NSS प्रशिक्षण आणि उपक्रमांद्वारे तरुण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात वाढ होते आणि त्यांना खालीलप्रमाणे प्राप्त होतात :
- एक कुशल सामाजिक नेता म्हणून जडणघडण होते. नेतृत्व कसे करावे आणि सामुदायिक काम कसे करावे याचे शिक्षण मिळते.
- एक कार्यक्षम प्रशासक म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. पुढे जाऊन देशातील कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल जागरूक राहणे अनिंती जबाबदारी घेणे किती महत्वाचे आहे याची जाणीव मिळते.
- NSS ची विविध उपक्रम केल्याने देशाच्या अनेक स्तरावरील लोकांना भेटले जाते आणि त्यांच्या जीवनाबद्दल कल्पना येते, यामुळे विद्यार्थ्यांत संभव अनिंसमंता पेरली जाते. अशा प्रकारचे विद्यार्थीच पुढे जाऊन देशाच्या विकासात भर घालतात.
NSS द्वारा प्रमुख उपक्रम | NSS Major Activities
NIC – National Integration Camp (नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प) :
NIC म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता शिबिर हे दरवर्षी आयोजित करण्यात येते. NIC शिबिराचा कालावधी हा 7 दिवसांचा असून त्यात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांची भोजन आणि राहण्याची व्यवस्था सरकारकडून केली जाते. प्रत्येक शिबिरात 200 NSS स्वयंसेवक सहभागी केले जातात.
Adventure Program: साहसी उपक्रम
Adventure Program (साहसी उपक्रम) हे शिबिर दरवर्षी आयोजित केले जाते आणि त्यात सुमारे 1500 NSS स्वयंसेवक सहभागी होतात. आणि त्यात किमान 50% स्वयंसेवक ह्या मुली असतात. ह्या शिबिरात ट्रेकिंग, पॅरा-सेलिंग, वॉटर राफ्टिंग असे उपक्रम घेतले जातात.
NSS Republic Day Parade Camp (NSS प्रजासत्ताक दिन परेड शिबिर ) :
NSS स्वयंसेवकांचे पहिले प्रजासत्ताक दिन शिबिर हे नावाजलेले शिबिर आहे. NSS कडून 200 NSS स्वयंसेवक हे प्रजासत्ताक दिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि मार्च-पास्ट मधे सहभागी होण्यासाठी निवडले जातात. त्यातील एक पाधक हे प्रजासत्ताक दिना रोजी निवडलेल्या हे राजपथ, नवी दिल्ली प्रजासत्ताक दिनाच्या परेड मधे सहभागी होते. हा कार्यक्रम 1 ते 31 जानेवारी दरम्यान चालतो.
National Youth Festivals ( नॅशनल युथ फेस्टिवल) – राष्ट्रीय युवा महोत्सव :
दरवर्षी 1 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान भारत सरकार सरकार, क्रीडा आणि युवा कार्यक्रम मंत्रालयामार्फत देशाच्या विविध भागात राज्य सरकारांच्या सहकार्याने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केले जातात. राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान सुमारे 1500 सहभागी NSS स्वयंसेवक सहभागी होतात.
National Service Scheme Award ( नॅशनल सर्व्हिस स्कीम अवॉर्ड) – राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार :
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने NSS स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी, NSS यांनी केलेल्या स्वयंसेवी सेवेला मान्यता देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारांची स्थापना केली होती.
FAQs ( Frequently Asked Questions)
NSS चे ब्रीदवाक्य काय आहे?
Not me but you (नॉट मी बट यू) हे NSS चे ब्रीदवाक्य म्हणजेच motto आहे. याचा मराठी अर्थ हा मी नाही पण तू असा होतो. नाहं वै भवान् या संस्कृत मधील वाक्याचा वापर NSS ने घोषवाक्य म्हणून केला आहे. आपल्या अगोदर दुसऱ्याचा विचार करणे, दुसऱ्याला आवश्यक मदत करणे आणि निस्वार्थीपणे जगाची सेवा करणे असा सुदंर संदेश हे ब्रीदवाक्य देऊन जाते आणि याच प्रमाणे जीवन जगण्याचा संदेश युवकांना देते.
राष्ट्रीय सेवा योजना कधी सुरू करण्यात आली?
राष्ट्रीय सेवा योजना 24 सप्टेंबर 1969 रोजी तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. व्ही.के. आर.व्ही. राव 37 विद्यापीठांमध्ये यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली.
NSS मधे प्रवेश कसा घ्यावा?
NSS मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमच्या शाळा किंवा कॉलेजमधील NSS प्रमुखांशी संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून प्रवेश फॉर्म घेऊन तो भरावा. समजकर्याचे 240 तास पूर्ण केल्यानंतर तुम्हा NSS कडून सेवेचे प्रमाणपत्र मिळेल.
NSS चे प्रतीक काय आहे?
कोणार्क सूर्य मदिरावरील रथ चक्र हे NSS चे प्रतीक आहे.