आशा फुल फॉर्म ASHA Full Form In Marathi

ASHA Full Form In Marathi कोरोना सारख्या संकट काळात स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता जनसामान्य व्यक्ती पर्यंत पोहोचून त्याची तपासणी आणि कोरोना विषयी जागरूकता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य या आशा वर्कर्स ने केले आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून हे जाणून घेणार आहोत की ASHA म्हणजे काय, ASHA चा फुल फॉर्म काय आहे, महाराष्ट्र राज्यात किती आशा सेविका आहेत, आशा सेविकांची कामे काय आहेत,आशा सेविका नियुक्ती प्रक्रिया, आशा सेविकांचे मानधन याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

ASHA Full Form In Marathi

आशा फुल फॉर्म ASHA Full Form In Marathi

ASHA Full Form in Marathi । ASHA Long Form in Marathi

ग्लोबल हेल्थ अवॉर्ड सारखा जागतिक आरोग्य संघटनेकडून दिला जाणारा सन्मानाचा पुरस्कार हा भारतातील आशा वर्कर्स ला 2022 दिला जाणार आहे. ASHA शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Accredited Social Health Activists (ऍक्रेडेटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट्) असा होतो. ASHA शब्दाचा मराठी भाषेत Full Form किंवा अर्थ हा मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते असा होतो.

ASHA म्हणजे काय? । What is ASHA?

12 एप्रिल 2005 रोजी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच NRHM राबविण्यासाठी सुरुवात केली. या मोहिमेचा एक भाग म्हणजे गावात आणि खेड्यांमध्ये आरोग्य आणि आरोग्याविषयी जनजागृती होण्यासाठी आशा स्वयंसेविका म्हणून महिलांची नेमणूक करण्यात आली. आशा सेविका महिला बनवून महिला सबलीकरण आणि आरोग्य सेवेची जनजागृती या दोन्ही गोष्टी सरकारला साधता आल्या.

आशा ही एक आरोग्य योजना आहे. आशा योजनेत स्वयंसेविका म्हणून कार्य करणाऱ्या महिला या त्या गावातील स्थानिक असतात. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना आणि समाजातील खालच्या स्तरावरील नागरिक यांच्यातील एक महत्वाचा दुवा म्हणून ASHA सेविका कार्यरत असतात.

आजही या आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत आणि त्यांचे संपूर्ण देशातून कौतुक देखील होत असते. मात्र फक्त कौतुकाने पोट भरत नसतात हे आपल्या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी या आशा सेविकांना देखील आंदोलन करावे लागत होते, यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीही असू शकत नाही.

आरोग्य गट प्रवर्तक – Health Block Facilitator

एका आरोग्य केंद्रात एक महिला, त्या भागातील आशा सेविकांची कामे आणि प्रश्न सोडवण्यासाठी नेमलेली असते. तिला आपण गट प्रवर्तक म्हणून ओळखतो. आशा सेविका आरोग्य विभागाच्या सोबत गट प्रवर्तक या दुव्याने जोडलेल्या असतात. आशा सेविकांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगून त्यांच्या कार्यात येणाऱ्या अडथळ्यांना सोडविण्याचे काम गट प्रवर्तक करतात.

ASHA स्वयंसेविकांची नियुक्ती प्रक्रिया – ASHA Workers Eligibility & Recruitment Process

 • आशा स्वयंसेविका होण्यासाठी महिला कमीत कमी 10 वि पास असणे अनिवार्य आहे.
 • विवाहित महिला असणे गरजेचे आहे. विधवा, घटस्फोट झालेल्या महिलांना यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिले जाते.
 • महिलेचे वय 25 ते 45 वर्षे असावे.

आशा सेविकांची नियुक्ती होत असताना वरील अटी पाळल्या जात आहेत की नाही याची तपासणी होते. त्यानंतर ग्रामसभेच्या माध्यमातून एखाद्या महिलेची नियुक्ती आशा सेविका म्हणून केली जाते.

गावातील लोकसंख्या अनुसार आशा स्वयंसेविका नियुक्ती केली जाते. त्याचे प्रमाण हे पहिल्या 1500 लोकसंख्ये मागे 1 आशा सेविका आणि त्यापुढील प्रत्येक 1000 व्यक्तींमागे 1 आशा सेविका असे असते. एकदा आशा सेविका निवड झाल्यानंतर त्या महिलेला 23 दिवसांच्या एका प्रशिक्षण शिबिरामधून पुढे जावे लागते.

ASHA स्वयंसेविकांची कामे – Works of ASHA Workers

आशा सेविका या जनसामान्य लोकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य करत असतात. त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 • लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती घडवून आणणे.
 • आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण भागात असलेले गैरसमज दूर करणे.
 • केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून मिळणाऱ्या आरोग्य सुविधा लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून देणे.
 • वातावरणातील बदलांनुसार पसरणाऱ्या साथीच्या रोगांवर उपाय योजना आणि त्या रोगांच्या विरोधात जनजागृती घडविण्याचे काम आशा सेविका करतात.
 • गर्भवती महिला आणि इतर आरोग्य समस्या असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात पोहोचविणे.
 • कुटुंब कल्याण योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविणे.
 • महिलांमध्ये सॅनिटरी पॅड आणि गर्भनिरोधक वाटणे.
 • गावातील अंगणवाडी सेविका सोबत जाऊन त्यांना मदत करणे.
 • प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, आहार याविषयी बालक मातांमध्ये जनजागृती करणे.
 • जन्म मृत्यू नोंद ठेवणे.

याशिवाय केंद्र सरकारच्या अनुसार एकूण 72 आरोग्य सेवा कार्य या आशा स्वयंसेविका महिला करत असतात.

ASHA स्वयंसेविका वेतन – ASHA Workers Salary

ASHA कर्मचाऱ्यांना कामावर अनुसरून मोबदला दिला जातो. संपूर्ण भारतात आशा सेविकांना वेतन हे 4 ते 10 हजार असते. महाराष्ट्र राज्यात हे वेतन काही काळापूर्वी फार कमी होते मात्र आता त्यात वाढ केलेली होती.

आशा सेविकांना त्यांच्या 72 कार्याच्या अनुसार वेतन दिले जाते. त्यांचे सेवांच्या अनुसार वेतन खालीलप्रमाणे आहे.

 • 1500 रुपये प्रति महिना – आपल्या भागातील लाभार्थी यादी आणि इतर याद्या वरिष्ठांना पोहोचविणे.
 • 200 रुपये प्रति महिना – ग्राम आरोग्य पोषण दिवस अंमलबजावणी करणे.
 • 150 रुपये प्रति महिना – आरोग्य, पोषण आणि स्वच्छता यांच्या संबंधित अहवाल देण्यासाठी समितीची मासिक सभा घेणे.
 • 150 रुपये प्रति महिना – गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या बैठकांना हजेरी लावून आपल्या कार्याची माहिती देणे.

याशिवाय  इतरही अनेक सेवांच्या मोबदल्यात आशा सेविकांना वेतन मिळत असते. त्यांचे महाराष्ट्रातील सरासरी वेतन हे 4 हजार ते 7 हजार इतके आहे.

FAQ

ASHA म्हणजे काय? ASHA चा फुल फॉर्म काय आहे?

ASHA म्हणजे ऍक्रेडेटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट् होय. आशा या नावाने महाराष्ट्रभर या सेविका प्रसिद्ध आहेत. मराठी मध्ये आशा म्हणजे मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य सेविका होय.

ASHA सेविकांचे मुख्य काम काय असते?

आरोग्य केंद्र म्हणजेच केंद्राकडून मिळणाऱ्या ग्रामीण आरोग्य योजनेतील आणि जनसामान्य नागरिकांमधील एक दुवा म्हणून काम करणे हेच आशा सेविकांचे मुख्य कार्य आहे.

SHA योजना कोणत्या विभागाअंतर्गत राबविली जाते?

आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेच्या अंतर्गत आशा ही योजना राबविली जाते.

ASHA योजनेची सुरुवात कोणी केली?

2005 साली डॉ आंबूमनी रामदास यांनी ASHA या योजनेचा प्रारंभ केला

Leave a Comment